About Us
• मनोगत •
स्पर्धा परीक्षेस बसणारे विद्यार्थी,
संगणक युग ओलांडून नॅनो युगात आपण प्रवेश करता आहात . जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरील तुमचे स्थान यशाच्या कौशल्यावर आधारलेले आहे. जीवनातील यश हे स्पर्धेशिवाय मिळूच शकत नाही. आपण अभ्यास करत असलेत्या शिष्यवर्ती परीक्षेतील यशाचे कौशल्य निर्माण करण्यासाठीच Examvishwa Youtube Channel and Examvish Digital Education Blog आपल्या हाती ठेवत आहोत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे परीक्षा करीता हा Blog तैयार करण्यात आलेल्या आहे.
या Blog मध्ये पेपर 1 व पेपर 2 यात मार्गदर्शिकेचे वेगळेपण व वैशिष्ठ्य आहे. या Blog तैयार करताना सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करुन प्रत्येक घटकावरील सर्व मुद्याचा समावेश करून प्रश्न प्रकाराचा समावेश केला आहे. जेणे करुन प्रश्नपत्रिकेत विचारल्या जाणाऱ्या विविध प्रश्न प्रकारांची ओळख तुम्हास होईल. प्रत्येक पाठातील मुद्यांची नमुना उदाहरण - त्यावरील सोपी क्लृप्ती- नियम आणि स्पष्टीकरण, नमुना उदाहरणावर आधारित त्याच प्रकारची सराव उदाहरणे - सराव उदाहरणाचे नियम -सूत्रांवर आधारित स्पष्टीकरण अचूक उत्तरसूचीसह प्रत्येक प्रश्नाखाली अशी मांडणी केली आहे. जी प्रत्येक विद्यार्थ्यांस स्वयं अभ्यासास प्रेरित करेल आणि उदाहरणे अचूकपणे कमी वेळेत सोडविण्यास मदत करेल.
'अचूक प्रयत्न, स्वयं-अभ्यास आणि सातत्यपूर्ण सरावातून उत्तरातील अचूकता' ही त्रि-सूत्री आपणांस परीक्षेतील यशापर्यंत घेऊन जाते, या प्रकारच्या अभ्यासाने अचुकता व वेग वाढून आपल्यात आत्मविश्वास निर्माण होईल. या ज्याद्वारे शिष्यवर्ती परीक्षेत ९०% पेक्षा जास्त मार्कस मिळविणे सोपे होईल. परीक्षेतील यशासाठी शिष्यवर्ती परीक्षाची संपूर्ण गरज आपल्या अचूक प्रयत्नांच्या माध्यमातून ही Blog भागवेल, हे गमक आपल्यासमोर ठेवून परीक्षेसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!
श्री जितेंद्र एस.बिसेन
Examvishwa Digital Education

No comments