बुलढाणा
बुलढाणा जिल्हा हा अमरावती विभाग मध्ये असून विदर्भाच्या पश्चिम सीमेवर आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजधानी पासून ५०० कि मी अंतरावर आहे
बुलढाणा जिल्ह्यामध्ये १३ तहसील असून ६ महसूल उपविभाग आहेत. जिल्ह्याचे ठिकाण बुलढाणा असून या जिल्ह्यापासून औरंगाबाद (१५० कि मी), अमरावती(२०० कि मी), पुणे(४२५ कि मी), नागपूर(३५० कि मी) अंतरावर आहे.
लोणार, शेगाव, सैलानी दर्गा, जिजामाता जन्म ठिकाण हे या जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे आहेत.
२०११ च्या जनगणने नुसार जिल्ह्याची लोकसंख्या २५,८८,०३९ असून लिंग प्रमाण ९२८/१००० आहे. तसेच शिक्षणाची शेकडेवारी प्रमाण ८२.०९% आहे.
कापूस,ज्वारी, सोयाबीन, सुर्यफुल हे या जिल्ह्यातील महत्वाचे पिके आहेत. खामगाव, मलकापूर हे महत्वाचे औद्योगिक शहरे आहेत.
भौगोलिक माहिती
| जिल्ह्याचे ठिकाण | बुलढाणा |
| भौगोलिक सीमा | अक्षांश १९.५१° ते २१.१७° उ. व रेखाक्ष ७५.५७° ते ६.५९° पू. उत्तरेस मध्यप्रदेश, पूर्वेस अकोला, दक्षिणेस परभणी व जालना, पश्चिमेस जालना व जळगाव. |
| क्षेत्रफळ | ९,६४० चौ कि मी |
| पाउस | जुने ते सप्टेंबर मध्ये दक्षिण मान्सून पासून |
| हवामान | उष्ण व कोरद उन्हाळा आणि थंड हिवाळा |
जनगणना २०११
| लोकसंख्या | २५,८८,०३९ |
| लोकसंख्या घनत्व | २६८ प्रती चौ कि मी |
| लिंग प्रमाण | ९२८ स्त्री प्रती १००० पुरुष |
| शिक्षणाचे प्रमाण | ८२.०९% |
इतर
| पर्यटन स्थळे | १. लोणार सरोवर २. वीर माता जिजाबाई यांचे जन्म ठिकाण, सिंदखेड राजा ३. स्वामी विवेकानंद आश्रम ४. संत गजानन महाराज देवस्थान, शेगाव ५. सैलानी बाबा दर्गाह, चिखली ६. जगातील सर्वात उंच हनुमान मूर्ती, नांदुरा 7. प्रसिद्ध बालगी मंदिर, मेहकर |
| रेल्वे स्थानक | जिल्ह्याच्या ठिकाण पासून मलकापूर (५० किमी), नांदुरा (४५ किमी), शेगाव (७० किमी) |
| राष्ट्रीय महामार्ग | राष्ट्रीय महामार्ग न ६ (खामगाव, नांदुरा, मलकापूर) |
| जवळील विमानतळ | औरंगाबाद १५० किमी |
| राज्य परिवहन महामंडळ आगार | बुलढाणा, मलकापूर, चिखली, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद. |
जिल्ह्याची रचना
| महसूल उपविभाग | बुलढाणा, मेहकर, मलकापूर, खामगाव, जळगाव जामोद , सिंदखेड राजा |
| महसूल तालुके | बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, मलकापूर, मोताळा, नांदुरा, मेहकर, सिंदखेड राजा, लोणार, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर. प्रमुख - तहसीलदार |
भौगोलिक रचना
बुलढाणा जिल्हा (किंवा बुलडाणा जिल्हा) हा महाराष्ट्र राज्याच्या अमरावती विभागात आहे विदर्भातील या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९६८० चौ.किमी इतके असून लोकसंख्या २२,३२,४८० इतकी आहे. जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण दिशेस अनुक्रमे अकोला-वाशीम, जळगाव-जालना व परभणी हे जिल्हे आहेत. तर उत्तरेस नेमाड जिल्हा(मध्य प्रदेश) आहे.
जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यालय बुलढाणा शहरात असून ते १३ तालुक्यांशी राज्य महामार्गानी जोडले गेले आहे. मुंबई ते हावडा हा महत्त्वाचा रेल्वे मार्ग तसेच पूर्व-पश्चिम भारतास जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ या जिल्ह्यातून गेला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडील सर्व नद्या पश्चिम दिशेस वाहणार्या आहेत व त्या तापी नदीला जाऊन मिळतात तर दक्षिणेकडील नद्या पैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. कापूस, ज्वारी, सोयाबीन, सूर्यफूल ही या जिल्ह्यातील महत्त्वाची पिके आहेत. जिल्ह्यात खामगाव, मलकापूर ही औद्योगिक शहरे आहेत.
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे
· शेगाव येथे श्री संत गजानन महाराजाचे मंदिर आहे व आनंदसागर हा प्रसिद्ध बगीचा आहे.
· लोणार येथील उल्कापाताने निर्मिलेले खार्या पाण्याचे सरोवर प्रसिद्ध आहे.
· जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे गांव छत्रपती शिवाजी राजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे जन्मस्थान आहे.
· नांदुरा येथे जगातील सर्वात मोठी हनुमान मूर्ती आहे.
· देऊळगाव राजा हे गाव तेथील बालाजीच्या मंदिरासाठी लोकांना माहीत असते.
· लोणार पासून दक्षिणेला १५ किमी अंतरावर (लोणार-आघाव-वझर रोडवर) पार्डा दराडे नावाचे गाव आहे. तेथे पांडवकालीन महादेवाचे मंदिर आहे
· लोणार पासून ७ किमी वर पांगरा (डोले) गाव आहे. तेथे भगवान बाबाचे मंदिर आहे.
· बुलडाणा जिल्ह्यातच पैनगंगा या नदीचा उगम झालेला आहे ते ठिकाण बुधनेश्वर हे असून बुलढाणा अजिंठा या रोडवर बुलडाण्यापासून २० किमी अंतरावर आहे.
· जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये चिखली पासून फक्त १२ किलोमीटर च्या अंतरावर साकेगाव या गावामध्ये जुने (हेमाडपंथी शिवमंदिर) आहे. निसर्गरम्य असे हे साकेगाव चिखली ते सैलानी या रोडवर आहे.
Post a Comment