विष्णुशास्त्री पंडीत
१८६४ मध्ये मुंबईच्या इंदुप्रकाश या साप्ताहिकाच्या मराठी विभागाचे ते उपसंपादक होते. वृत्तपत्रातून त्यांनी बालविवाह विधवांचे केशवपन जरठकुमारी विवाह , पुनर्विवाह यासारख्या ज्वलंत प्रश्नांची सांगोपाग चर्चा करुन लोकजागृती केली. १८५६ ला विधवा विवाहास मान्यता देणारा कायदा संमत झाला. परंतु त्यांनी कायदयापेक्षा लोकजागृतीस जास्त महत्त्व दिले. १८६४ मध्ये त्यांनी एका विधवेशी पुनर्विवाह करुन आपल्या कृतीतून समाज जागृती केली. हाच पहिला जाहिर विधवाविवाह होय. त्यांनी ईश्वरचंद विद्यासागर यांच्या विधवा विवाह या ग्रंथाच्या मराठीत अनुवाद केला. विधवा विवाहास प्रोत्साहन मिळावे व त्यासंदर्भात लोकजागृती व्हावी या हेतूने १८६६ मध्ये त्यांनी पुनर्विवाहोत्तेजक मंडळ या नावाची संस्था स्थापन केली. या मंडळाचे ते चिटणीस होते. १८७६ मे ला विष्णुशास्त्री पंडीत मृत्यू पावले.
विष्णुशास्त्री पंडीतांची ग्रंथसंपदा
१) नाना फडणवीस यांची संक्षिप्त बखर
५) हिंदुस्थानचा इतिहास भाग- ३
९) ब्राह्मण कन्या विवाह
२) इंग्रजी मराठी कोष
६) विधवा विवाह
१०) संस्कृत आणि महाराष्ट्र
३) धातुकोष
७) शुद्रधर्म
११) स्मृतीशास्त्र
४) आर्य लोकांच्या प्राचीन व अर्वाचीन रीती
८) विधवोद्वाहविवेक
१२) पुरुषसुक्त व्याख्या
Post a Comment