जळगाव जिल्हा

 

विशेष - 
              केळ्यांचे आगर ही जळगाव जिल्ह्याची सर्वांत महत्त्वाची ओळख होय. उत्तर महाराष्ट्रातील (ज्याला खानदेश असे म्हटले जाते) हा एक वैशिष्ट्यपूर्ण जिल्हा होय. सातपुड्याच्या रांगेतील आदिवासींचे वास्तव्य; भारतातील प्रमुख नदी असणा-या् तापीचा जिल्ह्यातून जाणारा प्रवाह, मूलभूत सोयीसुविधा सशक्त करणारे रेल्वेचे जाळे आणि आधुनिक शेतीचे -सिंचनाचे यशस्वी प्रयोग... या जिल्ह्याची अशी अनेक वैशिष्ट्ये सांगाता येतील. 
             खानदेश म्हणून ओळखला जाणा-या् ह्या जिल्ह्याने सातवाहनांपासून, मराठे व त्यांनतर इंग्रजांपर्यंत अनेक राजवटी पाहिल्या. १९०६ मध्ये जेव्हा खानदेशाची विभागणी झाली तेव्हा हा पूर्व खानदेश सध्याचे जळगाव बनला. तदनंतर १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती बरोबर जळगाव राज्यात दाखल झाला.
 भूगोल- 
            जळगाव जिल्हा महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या उत्तरेला मध्य प्रदेश राज्य, पूर्वेला बुलढाणा, दक्षिणेला औरंगाबाद जिल्हा, नैऋत्येला नाशिक, पश्र्चिमेला धुळे जिल्हा - असे जिल्हे वसलेले आहेत. जळगाव जिल्ह्यातील शेतीची प्रगती ही तेथे उपलब्ध असणार्या जलसंपदेमुळेच होय. तापी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती मध्य प्रदेश राज्यात उगम पावते. ह्या नदीचे वैशिष्ट्य म्हणजे, ही नदी इतर नद्यांसारखी पश्चिम घाटातून बंगालच्या उपसागराला न मिळता, पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळते. (ही नदी पश्र्चिमवाहिनी आहे.) 
शेती विकासासाठी व पिण्याच्या पाण्याच्या वापरासाठ, जळगाव जिल्ह्याने, अनोखा असा नदीजोड प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली असून, पायलट (पथदर्शी) प्रकल्प म्हणून यशस्वीदेखील करून दाखविला आहे. जिल्ह्यातील हवामान विषम व कोरडे आहे. त्या-त्या काळात कहक थंडी व अतिउष्ण उन्हाळा असे हवामान या भागात असते. जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर (मध्य प्रदेशास लागून) सांतपुडा पर्वतरांगा असून या भागात जंगलांचे प्रमाण जास्त आहे. 
स्थानिक स्वराज्य संस्था 
क्र. प्रशासनाचा प्रकार  संख्या   नावे 
   महानगरपालिका           जळगाव. 
   नगरपालिका       १३      भुसावळ, अमळनेर, चाळीसगांव, चोपडा, पाचोरार्, फैजपूर, यावल, रावेर, सावडा, पारोळे, धरणगाव, एरंडोल,जामनेर. 
   जिल्हा परिषद            जळगाव. 
   पंचायत समित्या   १५     चाळीसगांव, भडगाव, पारोळे, अमळनेर, चोपडा,एरंडोल, जळगाव, पाचोरा, जामनेर, भुसावळ,यावल, रावेर,एदलाबाद/ मुक्ताईनगर, बोदवड, धरणगाव. 
 जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६८ मतदारसंघ असून पंचायत समितीचे १३६ मतदारसंघ आहेत.
वैशिष्ट्य -
             पूज्य सानेगुरुजी, बालकवी ठोमरे, माधव जूलिअन्, बहिणाबाई चौधरी, स्वामी कुवलयानंद हे या जिल्ह्याचे आधुनिक काळास देणे, तर सखाराम महाराज समाधीने व तत्त्वज्ञान मंदिराने महाराष्ट्राची पंढरी बनलेले अमळनेर, पर्शियन शिलालेख व पांडववाडा असलेले एकचक्रानगर म्हणजे हल्लीचे एरंडोल, यादवकालीन शिल्प असलेले पाटण, चांगदेव व पारोळे इ. गावे हे या जिल्ह्याचे सांस्कृतिक लेणे आहे. उनपदेव, सुनपदेव, नाझरदेव येथे उष्ण झरे व पाल-मनुदेवी ही निसर्गरमणीय स्थाने प्रवासी आकर्षणे आहेत. फैजपूर हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पहिले ग्रामीण अधिवेशनस्थळ म्हणून अजरामर, तर वरखेडी बुद्रुक हे केवळ सामान्य जनांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध दिलेल्या असामान्य लढ्यासाठी स्मरणीय आहे.

परिचय

हल्लीच्या धुळे, जळगाव व नंदूरबार या दोन्ही जिल्ह्यांचा प्रदेश मध्ययुगीन काळापासून खान्देश या नावाने ओळखला जातो. तथापि प्रशासनाच्या दृष्टीने ब्रिटीशांनी 1906 मध्ये खान्देशचे पूर्व खान्देश व पश्चिम खान्देश असे दोन जिल्ह्यात विभाजन केले. जळगाव मुख्यालय असलेला 10 तालुके व तीन पेठ्यांचा मिळून पूर्व खान्देश जिल्हा होता.

1917 मध्ये पारोळा व त्यानंतर भडगाव व मुक्ताईनगर या पेठांना तालुक्यांचा दर्जा देण्यात आला. 1956 मधील राज्य पुनर्रचनेत मुंबई राज्यात समाविष्ठ असलेला पूर्व खान्देश हा जिल्हा 1960 मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्याचा एक जिल्हा म्हणून राहिला. 10.10.1960 पासून महाराष्ट्र शासनाने नावात बदल केल्याने पूर्व खान्देश हा जिल्हा जळगाव जिल्हा या नावाने ओळखला जावू लागला. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या 3 जून 1999 च्या अधिसुचनेनुसार भुसावळ आणि एरंडोल तालुक्याचे विभाजन करुन अनुक्रमे बोदवड आणि धरणगाव हे दोन नवीन तालुके निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात 23 जून 1999 पासून 15 तालुके आहेत.

भौगोलिक रचना

जळगाव जिल्हा तापी नदीच्या मध्य खोऱ्यात महाराष्ट्र राज्याच्या वायव्य पूर्वेस 20 अंश उत्तर अक्षांश व 74.55 अंश ते 76.28 अंश पूर्व रेखांश यादरम्यान या जिल्ह्याचे अस्तित्व आहे. जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेस व ईशान्येस मध्यप्रदेश या राज्याच्या सीमा आहेत. आग्नेय दिशेस बुलढाणा, दक्षिणेस औरंगाबाद, नैऋत्येस नाशिक तर पश्चिम वायव्येस धुळे या जिल्ह्यांच्या सीमा आहेत.
जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे
उनपदेव ता. चोपडा
उन-अप म्हणजे गरम पाणी खान्देशातील भाषेत वुना देव म्हणजे ज्याने हे उष्ण पाणी निर्माण केले तो देव. असे अर्थ बोलीभाषेतील जाणकार सांगतात. उनपदेव हे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अडावद गावाच्या शिवारात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आहे. हे ठिकाण अनादी काळापासून उपासक व साधुसंतांचे स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणी नैसर्गिक उष्ण पाण्याचे अखंड झरे असून पाणी एका गोमुखाद्वारे पडून प्राचीन काळात बांधलेल्या कुंडातून सतत वाहते. या पाण्याचे सर्वसाधारण उष्ण तापमान 60 ते 70 अंश सेल्सिअस इतके असते. हे पाणी गंधकयुक्त असल्याने शरिराला व्याधीमुक्त करते, असे वैज्ञानिक कारणही सांगितले जाते. 

उष्ण पाण्यात स्नान केल्याने चर्मरोगाचे निवारण होते असा अनेकांचा अनुभव आहे. याबद्दल एका दंतकथेनुसार, शरभंग ऋषींकरिता या पाण्याची निर्मिती प्रभू श्रीरामचंद्रानी केली होती. शरभंग ऋषींचे शरीर दुर्गंधीयुक्त होते व त्यास छिद्रे पडली होती. प्रभू श्रीरामचंद्र, लक्ष्मण व सीता वनवासात भ्रमण करीत करीत शरभंग ऋषींच्या आश्रमात आले. तेव्हा शरभंग ऋषींनी श्रीराम यांची पूजा केली व श्रीरामाकडून वर मागितला. तेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांनी अग्निबाण मारुन उष्ण पाण्याची निर्मिती केली. शरभंग ऋषींनी त्या पाण्यात आंघोळ केली व त्यांना दिव्य शरीर प्राप्त झाले.

गरम पाण्याचा झरा असलेल्या हौदाच्या पश्चिम बाजूलगतच जमिनीत शरभंग ऋषीची गुफा असून, या गुफेत शिवलिंग आहे. कोरीव दगडातील या गुफेत जाताना वेगळेच थ्रील अनुभवायला मिळते. आत गेल्यावर मात्र निरव शांतता आणि गारवा जाणवतो. उनपदेव येथील झरे बाराही महिने सुरु असल्याने तेथे नेहमीच गर्दी आढळून येते. झऱ्यांच्या भोवती सुसज्ज तलाव व धर्मशाळा आहे. पौष महिन्यात याठिकाणी महिनाभर यात्रा असते. उष्ण पाण्यात स्नान करण्यासाठी व निसर्गरम्य वनसृष्टीचा आनंद लुटण्यासाठी दूरदूरचे पर्यटक येथे येत असतात.

निसर्गरम्य उंच सातपुडा पर्वतातील पहिल्या पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या उनपदेवचा परिसर आता एक पर्यटनस्थळ म्हणून नावारुपाला येत आहे. उत्तरेला उंच डोंगर आणि जंगलाचा परिसर असल्याने संपूर्ण परिसरात एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते. दुर्मिळ पक्ष्यांचा सहवासही सागाची बहुसंख्य झाडे असलेल्या जंगलात लाभतो. या परिसरात लहान-लहान आदिवासी पाडेही आहेत. पर्यटकांसाठी सुविधाही पुरविण्यात आल्या आहेत. दुय्यम मोठे स्नानकुंड, स्ट्रीट लाइट्स, घनदाट वनराईत वनभोजनाची व्यवस्था अशा निसर्गसंपन्न पार्श्वभूमीमुळे या परिसराचे महत्त्व दिवसागणिक वाढत आहे.

उनपदेव परिसरात मुरलीधर, राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, महादेव, गणपती आणि शनी या देवांची मंदिरे असल्याने पर्यटनाबरोबरच धार्मिक स्थळ म्हणूनही याकडे पाहिले जाते. मंदिराच्या खालच्या बाजूला भरीव दगडाला लागून असलेल्या गोमुखातून साडेसात मीटर लांब व पावणेदोन मीटर उंचीच्या मोठ्या तांबड्या विटांनी बांधलेल्या हौदात गरम पाणी पडते. गोमुखातून पडलेल्या पाण्याचे तापमान सुमारे 60 अंश सेल्सिअस असते.

मनुदेवी ता. यावल

सातपुड्याच्या पर्वतरांगात निसगरम्य वनराईत वसलेल्या यावल तालुक्यात श्री क्षेत्र मनुदेवीचे स्थान आहे. श्रीमनुदेवीचा उल्लेख सप्तशक्तीपीठ या ग्रंथात मार्कण्डेय ऋषींनी केला आहे.

या मंदिरात विष्णू, शंकर व पार्वती यांच्या देखील मुर्त्या आहेत. इ. स. 1251 मध्ये या मंदिराचा शोध लागला. तेव्हाचा गवळी राजा ईश्वरसेन याने या हेमाडपंथी मंदिराची स्थापना केली. या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात गवळी वाड्याचे अवशेष अजूनदेखील पाहावयास मिळतात.

हे पवित्र स्थळ सातपुड्याच्या पायथ्याशी निसर्ग सौंदर्याने नटलेले असून बाजूस रमणीय धबधबा वाहत असतो. पावसाळ्यात याची सुंदरता अधिकच मनमोहक असते. खान्देशातील बऱ्याच लोकांचे कुलदैवत श्रीमनुदेवी आहे. मार्गर्शीष महिन्यात, नवरात्रात व अष्टमीस येथे नवचंडी यज्ञाचे आयोजन केले जाते.

हे स्थान चोपडा-यावल रस्त्यावर असून आडगाव फाट्यापासून पुढे 7 किमी आहे. मनुदेवीला जाण्यासाठी चोपडामार्गे तसेच भुसावळमार्गे यावलला जाता येते. तेथून यावल-चोपडा रस्त्यावर सात किमी अंतरावर मनुदेवी हे तीर्थक्षेत्र आहे. 
मनुदेवीला जाण्यासाठी यावल, जळगाव, भुसावळ, चोपडा येथून बससेवा उपलब्ध आहे.

पाल ता. रावेर

सातपुडा पर्वताच्या एका पठारावर रावेर तालुक्यात पाल हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण वसलेले आहे. हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ रावेरच्या 22.4 किमी पश्चिमेस आहे. आदिवासींसाठी निर्माण केलेले सातपुडा विकास मंडळ व आदिवासी आश्रमशाळा येथे कार्यरत आहे. पाल येथील जुन्या किल्ल्याचे बुरुज, तट व इतर अवशेष या स्थळाची प्राचीनता दर्शवतात. आभीर अधिपतींचे राज्य असताना येळो त्यांचे स्थानिक मुख्यालय होते. पुढे सत्तेत आलेल्या फारुकीचे देखील येथे ठाणे असावे.

ब्रिटीश राजवट आली तेव्हा पाल पूर्णत: निर्जन होते व तेथे जंगली श्वापदांचा सुळसुळाट होता. पालच्या जुन्या मशिदीच्या प्रवेशद्वारावर राजेशाही कमान आहे. मशीद 8.1 मी. लांब व तेवढीच रूंद असून काळ्या दगडात बांधलेली आहे. परंतु चुन्याचा वापर केलेला नाही. मशिदीसमोरील खांब ढासळले असले तरी मूळ वास्तू सुस्थितीत आहे. मशिदीमागे 60 मी. लांब व तेवढ्याच रूंदीचा हत्तीवाडा आहे. काहीजण यास हत्ती बांधण्याची जागा संबोधत असले तरी ती बाजारहाटाची बंदिस्त सुरक्षित जागा असावी.

हत्तीवरुन येथे बाजारहाट करता येत असावा. मशिदीपासून किल्ल्याकडे फरसबंदी मार्ग होता. किल्ल्यातून फरसबंदी मार्गाने सुकी नदीकाठच्या नागझरीजवळ उतरता येते. येथे दाट झाडी असून नागझरी कुंडात गोड पाणी पडते. या 9 मी. रुंद व 15 मी लांबीच्या जलाशयास किल्ल्यातील विहिरीतून झरे आहेत असे सांगतात. या जलाशयाला 15 नागमुख्य असून त्यातून पाणी सुकी नदीत जाते. गावाजवळील टेकडीवर पालचा ऋषींचे स्मारक आहे.

सन 1956 मध्ये खोदकाम करताना पुरातन काळातील दगडी बांधकामाची, सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था केलेली आढळली. या पुरातन किल्ल्यात महमंद तुघलक कालीन नाणीही सापडली आहेत. पाल येथे आभीरराज कालीन पुरातन मोठ्या विटात बांधलेले महादेव मंदीर आढळले आहे. येथे बऱ्याच ठिकाणी गवळी मुर्ती सापडल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने येथे वनक्षेत्र कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारले आहे. येथेच हरिण पैदास केंद्रही आहे.

श्री क्षेत्र मेहूण ता. मुक्ताईनगर

चांगदेव गावाजवळ मुक्ताईनगरपासून 8 कि.मी. अंतरावर तापी नदीकाठी सध्याचे पुनर्वसित मेहूण गाव आहे. येथे संत मुक्ताईचे स्मृती मंदिर होते. ते आता हतनूर धरणाखाली आले आहे. येथे संत मुक्ताईचे समाधीस्थान आहे. येथून 1 कि.मी. अंतरावर संत चांगदेव महाराजांचे समाधीस्थान चांगदेव आहे. येथे पुरातन हेमाडपंथी सोमेश्वर महादेवाचे मंदीर आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक वद्य त्रयोदशीला क्षेत्र आळंदी येथे समाधी घेतली.

संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर संत मुक्ताबाईंनी शके 1219 वैशाख वद्य 12 ला ( इ. स. 1296) तापीतीरी समाधी घेतली. भुसावळपासून सुमारे 20 किमीवर मुक्ताईनगरजवळ कोथळी येथे संत मुक्ताईचे मंदीर आहे. तेथूनच जवळ मुक्ताईनगरला संत मुक्ताईचे नवीन मंदीर बांधण्यात आले आहे. संत मुक्ताईभोवती एक अदभूत रम्यतेचे वलय आहे. मेहूण हे मुक्ताबाई या बालयोगिनेचे स्मारक म्हणून ओळखले जाते. माघ वद्य दशमी ते द्वादशी असे तीन दिवस येथे मोठी यात्रा भरते.

श्री क्षेत्र चांगदेव ता. मुक्ताईनगर

हठयोगी संत श्री चांगदेव यांचे मंदीर मुक्ताईगरपासून 4 किमीवर पूर्णा व तापी नदीच्या संगमावर आहे. हे हेमाडपंथी मंदीर काळ्या संगमरवरी शिळा एकावर एक रचून बांधलेले आहे. जेथे या दोन नद्यांचा संगम होतो तेथे महादेव मंदीर आहे. चांगदेव मंदीर बरेच प्राचीन असून त्याचा उल्लेख अबुल फजल यांच्या ऐने अकबरीत आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर बाळबोध लिपीतील काही मजकूर आहे. श्री क्षेत्र चांगदेव मंदीर हे 18 व्या शतकात बांधलेले आहे. मंदिराजवळून वाहत असलेल्या तापी व पूर्णा नद्यांना पूर्वी अनुक्रमे चंद्रकन्या व सुर्यकन्या अशी नावे होती.

या दोन्ही नद्यांच्या पवित्र संगमाची जागा म्हणजे आताचे चांगदेव. याठिकाणी चांगदेव महाराजांनी 1400 वर्षे तपश्चर्या केली, असे म्हणतात. याच मंदिरात नंतर श्री चांगदेव महाराजांच्या मुर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.चांगदेव मंदिराच्या बाहेर गरुडाची मूर्ती आहे.

याच गरुडावरुन महाराजांनी पृथ्वीभ्रमण केलेले आहे. चांगदेव मंदीर हे सहा महिन्याच्या रात्रीत बांधून पूर्ण केलेले आहे.श्री क्षेत्र हरताळे ता. मुक्ताईनगर सुमारे 850 वर्षांपूर्वी याच ठिकाणी महानुभाव श्री चक्रधर स्वामी यांनी भेट दिलेली आहे. भोजन घेऊन मुक्काम केलेला आहे. त्या स्थळांना भक्तासह भोजनस्थान, व्याघ्रभेट व वस्तीस्थान अशी नावे आहेत. त्याठिकाणी महानुभाव मंदीर आहे. वरती टेकडावर श्रावणबाळ समाधी व त्यांच्या आई-वडिलांची समाधी स्थळे आहेत. याठिकाणी प्रत्येक पौर्णिमा व चक्रधर स्वामी जयंती महोत्सवाच्या वेळी यात्रा भरते.

पदमालय ता. एरंडोल

पदमालय हे एरंडोल तालुक्यात एरंडोलपासून 11 किमी अंतरावर व जळगाव जिल्ह्याच्या मुख्यालयापासून 50 किमी अंतरावर वसलेले आहे. या तिर्थक्षेत्री अतिप्राचीन व दुर्मिळ असे डावी व उजवी सोंड असलेल्या गणेशाचे मंदीर आहे. मंदिराचा परिसर नयनरम्य असून मंदिराच्या समोरच मोठा तलाव आहे. या तलावात विविध छटा असलेल्या कमळाची फुले उमलतात.

प्रत्येक संकष्ट चतुर्थीस व अंगारकी चतुर्थीस विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गणेश भक्त या पावन तिर्थस्थळी गणेशच्या दर्शनाला येतात. श्री गणेश पुराणात उपासना खंडातील चार अध्यायात श्रीक्षेत्र पदमालयातील मुर्तींचा उल्लेख आहे. या मुर्ती स्वयंभू असल्याची श्रद्धा आहे. या संस्थानाला माधवराव पेशवे यांनी सनद दिली होती.एकाच पीठावर एक उजव्या सोंडेचा व दुसरा डाव्या सोंडेचा अशा स्वयंभू प्रवाळयुक्त श्री गजाननाच्या मुर्ती येथेच पाहावयास मिळतात. पदमालयापासून दोन किमी अंतरावर भीमकुंड आहे. येथे भीमाने बकासुराचा वध केल्याचे दंतकथेत सांगितले जाते. पदमालय पर्यटनस्थळाच्या विकासासाठी शासनाने तरतूद केली असून याठिकाणी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते.

पाटणादेवी ता. चाळीसगाव

पाटणादेवी येथील प्राचीन मंदिराची स्थापना शके 1128 मध्ये झाली असून हे मंदीर हेमाडपंथी कलेचा उत्कृष्ट नमूना आहे. हे मंदीर यादवकालीन असून गौताळा अभयारण्यात येते. हे स्थान पार्वतीचे शक्तीपीठ असून याचा उल्लेख देवी भागवतमध्ये आहे. श्री चंडीकामाता बऱ्याच कुळांची कुलस्वामीनी असून या पवित्र जागृत स्थळाच्या दर्शनासाठी असंख्य भाविक येत असतात. प्रख्यात गणितज्ज्ञ भास्कराचार्य यांचा जन्म पाटणचाच. त्यांचा येथे जोतीर्विद्येचा खूप मोठा आश्रम होता. भास्कराचार्यांना शून्याचा शोध येथेच लागला असे म्हटले जाते. त्यांच्या यज्ञकुंडाचे अवशेष अजूनही पाहावयास मिळतात. मंदिराजवळील परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला असून येथून 3 किमी अंतरावर पितळखोरा लेणी आहे.

येथे निसर्ग परिचय केंद्रातून परिसरातील वनसंपदेची माहिती देण्यात आली आहे. धवलतीर्थ केदारकुंड असून दोन डोंगरी नद्यांचा उगम येथे आहे. येथे जवळच महर्षी वाल्मिकींची समाधी आहे. पाटणादेवी येथे प्रतिवर्षी चैत्र पौर्णिमेस मोठी यात्रा भरते. शारदीय नवरात्री उत्सवाचे वेळी यात्रा, भगवती महापुजा, होमहवन इत्यादी कार्यक्रम होतात. वर्षभर याठिकाणी भाविकांची वर्दळ सुरु असते. याठिकाणी जाण्यासाठी चाळीसगाव येथे रेल्वेने अथवा एस.टी.ने पोहोचता येते. तेथून एस.टी.सह खाजगी वाहनांची सेवाही उपलब्ध असते.

कला महर्षी केकी मूस कलादालन, चाळीसगाव

चाळीसगाव रेल्वे स्टेशनजवळच असणाऱ्या दगडी बैठ्या वास्तूत कला महर्षी के. की. मूस यांचे कलादालन आहे. मुंबई येथील पारसी कुटुंबात 3 ऑक्टोबर 1992 रोजी केकी मूस यांचा जन्म झाला. हे पारसी कुटुंब 1920 मध्ये चाळीसगाव येथे आले होते. केकी यांनी कलाशिक्षण व फोटोग्राफी यासाठीच आपले जीवन वाहून घेतले. सन 1935 ते 1938 या काळात केकी ब्रिटनच्या शेफील्ड नगरातील बेनेट महाविद्यालयातून उपयोजित कलेचे शिक्षण घेवून बाहेर पडले आहेत. युरोपातल्या अनेक कलातिर्थ्यांना भेटी दिल्या. युरोप प्रवासात छायाचित्रांनी त्यांना वेड लावलं.

1938 नंतर त्यांनी घरात कायमचे बंदिस्त करुन घेतले.
कलातपस्येसाठी केकी आयुष्यभर अविवाहित राहिले. छायाचित्रणाची टेबल टॉप ही विशेष पद्धत म्हणजे एखाद्या विषयाला अनुसरुन लहान मोठ्या साहित्याच्या मदतीने तसे वातावरण प्रसंगाचे सेट तयार करावयाचे व त्याचे असे छायाचित्र घ्यावे की पाहणारास ते प्रत्यक्ष त्या-त्या ठिकाणी जाऊन घेतलेले छायाचित्र असावे असे वाटते. केकींना या प्रकारात असंख्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. कॅमेरा व ब्रश हाताळण्याबरोबरच ते सतारही खुबीने वाजवित होते. त्यांचे श्रेष्ठत्व पाहूनच रॉयल सोसायटी ऑफ आर्ट या संस्थेने त्यांना मानद सदस्य केले होते.

गांधी तीर्थ, जळगाव

येथील गांधीवादी विचारवंत व उद्योजक भंवरलालजी जैन यांनी जैन हिल्स परिसरात उभारण्यात ‘गांधी तीर्थ’ साकारले आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या गांधीतीर्थचे उद्घाटन झाले आहे. निसर्गरम्य परिसरात महात्मा गांधी यांचे जीवनचरित्र, साहित्य, घडामोडी, त्यांची अहिंसा मार्गाची चळवळ, देश-विदेशातील त्यांच्या चळवळींची आठवण करून देणारे हे तीर्थ म्हणजे एक विद्यापीठच ठरले आहे.

महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित एक विशाल संग्रहालय म्हणून गांधीतीर्थकडे पाहता येईल. महात्मा गांधीजींचे विचार समाजात रुजवणे तसेच सत्य, अहिंसा, शांती आणि परस्पर सहकार्याची भावना जागतिक पातळीवर विकसित करणे हा गांधी रिसर्च फाऊंडेशनचा मुख्य उद्देश असून त्यादृष्टीने हे संग्रहालय उभारण्यात आले आहे.जैन हिल्स परिसरातील निसर्गरम्य अशा आमराई असलेल्या भागात चार एकर क्षेत्रात सुमारे ६५ हजार चौरस फूट परिसरात गांधी तीर्थ साकारले आहे. या विशाल भवनात ग्रंथालय, वाचनालय, संग्रहालय, अभिलेखागार, सभागृह स्थापन करण्यात आले आहे. गांधीजींनी आपल्या जीवनात बऱ्याच वृत्तपत्रांचे संपादन केले व अनेक वृत्तपत्रात त्यांचे लेखसुद्धा प्रकाशित झाले. त्यांच्या त्या मूळ प्रतींचा संग्रह येथे करण्यात आला आहे. आचार्य विनोबा भावे व त्यांच्यावर अन्य लेखकांनी लिहिलेली ७६० पुस्तके येथे उपलब्ध आहेत.

१९३६ चे अधिवेशन फैजपूर येथे पार पडले. महात्मा गांधींनी अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यावेळी त्यांनी घातलेली सुताची माळ, चप्पल, आंघोळीचा दगड रिसर्च फाऊंडेशनमध्ये उपलब्ध आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनमध्ये गांधी व विनोबा भावे यांच्याशी संबंधित प्रकाशित-अप्रकाशित साहित्य, ऑडिओ-व्हिडीओ, छायाचित्र, दस्तावेज, तिकिटे, लिफाफे, नाणे व नोटा संग्रहित करण्यात आल्या आहेत.

महात्मा गांधींच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग शिल्पे, लेझर शो आदींच्या माध्यमातून साकारण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे व मल्टीमिडीया तंत्राचा वापर करुन याठिकाणी गांधी जीवनाचे दर्शन घडविले जाते.याठिकाणी पोहोचण्यासाठी जळगाव येथे रेल्वेने अथवा एस.टी.ने पोहोचता येते. जळगाव शहरापासून चार किमी अंतरावर शिरसोली रोडवर (जळगाव- पाचोरा) हे ठिकाण आहे.

त्रंबकेश्वर मंदिर

निसर्गरम्य परिसर - त्रंबकेश्वर डोंगराच्या कुशीत वसलेले नयनरम्य स्थान आहे. श्रावण महिन्यात हिरव्या पाचूच्या बेटासारखे हे चिमुकले गाव दिसते. मध्यभागी गंगासागर कुंड आहे. गावाचा पाणीपुरवठा येथून होतो. कुशावर्त कुंड तर तीर्थांचे तीर्थ म्हणून समजले जाते. ब्रम्हगिरी पर्वत समुद्रसपाटीपासून १२९४ मीटर्स (४२४६ फुट ) उंच आहे. अनेक धार्मिक विधी केले जातात. नारायण नागबली विधीसाठी देशाच्या कानाकोप-यातून मान्यवर येत असतात. येथे क्षेत्रस्थ ब्राहमणांनी आपल्या यजमान घराण्याच्या पुरातन वंशावली जपल्या आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अनेक ऐतिहासिक मान्यवरांचे हस्ताक्षर आहे.

भगवान शंकराचे हे भव्य मंदिर हेमाडपंथी पध्दतीने बांधलेले आहे. या मंदिरास त्या काळी सुमारे ३० लाख रूपये खर्च आला. १७४५ ते १७७५ च्या दरम्यान पेशव्यांनी हे पवित्र कार्य केले. मंदिराचे काम संपूर्ण काळया दगडात आहे. कोरीव काम अतिशय सुबक असून मंदिर भव्य आणि पवित्र आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराशी नगारा घर आहे. मंदिराच्या चहुबाजूंनी मोठी तटवजा भिंत आहे, तर परिसर दगडांनी बांधलेला आहे, आत भक्तांना स्नान करायला व पाय धुवायला कुंड आहे. मंदिराचा गाभारा अतिशय शांत व पावित्राने आणि मांगल्याने भरलेला आहे. शिवलिग हे स्वयंभू आहे. पिडीत ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे दर्शन होते. दर सोमवारी पालखी निघते. मंदिराचा कळस सोन्याचा आहे.

श्रीसिहस्थ गोदावरी मंदिर

रामकुंडाच्या उत्तरेस हे मंदिर असून फक्त १२ वर्षांनी, म्हणजेच सिहस्थ कुंभमेळयाचे वेळीच १ वर्षभर हे मंदिर उघडते. वर्षातून दोनदा ज्येष्ठ शु !! १० (दशहरा) व कार्तिक शु !! १५ त्रिपुरी पौर्णिमा दीपोत्सवासाठी हे मंदिर उघडले जाते. या मंदिरात भगिरथीची मूर्ती आहे. सिहस्थ गोदावरीचे मंदिर फक्त नाशिकक्षेत्रीच आहे.

श्रीगंगा गोदावरी मंदिर

हे मंदि रामकुं डाच्या पूर्वेला अरूणा संगमाजवळ असून येथे मकर वाहिनी गोदावरी व भागिरथी अशा दोन मूर्ती आहेत. तीर्थयात्रेची गंगाभेट या मंदिरात करतात. या मंदिराची व्यवस्था श्रीगंगा गोदावरी पंचकोटी ( पुरोहीत संघ ) या संस्थेकडे आहे. हया मंदिरात नित्य अभिषेक, पूजा, सप्तशती पाठ, आरती इ. कार्यक्रम होतात.

श्रीकाळाराम मंदिर

नाशिक क्षेत्रातील हे प्रमुख मंदिर मानले जाते. प्रभू रामचंद्र वनवासात असताना पंचवटीत आल्यानंतर जेथे त्यांनी वास केला होता, त्या ठिकाणी पुरातन मंदिर होते. हया पुरातन मंदिराचा जीर्णोध्दार पेशव्यांचे सरदार श्री. ओढेकर यांनी केला. इ.स.१७७८ ते १७९० म्हणजेच १२ वर्षे मंदिराचे बांधकाम चालले हाते. भव्य मंदिर व सभामंडप यासाठी २३ लाख रूपये खर्च झाल्याची नोंद आहे. हे मंदिर रामसेज येथील काळया दगडांचे बांधले असून अतिशय सुंदर व कलात्मक असे आहे. मंदिराच्या चारही दिशांना भव्य द्वार आहेत. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिरातील मूर्ती वालूकामय आहेत. तसेच मंदिराचा कळस सोन्याचा आहे. चैत्र शुध्द प्रतिपद (गुडीपाडवा) ते शुध्द नवमी (रामनवमीपर्यंत) ‘‘श्रीराम जन्मोत्सव‘‘ मोठया प्रमाणात साजरा केला जातो. चैत्र शुध्द एकादशीला रामरथ व हनुमानरथाची यात्रा निघते. हया रथयात्रेचे दृश्य पाहण्यासाठी असंख्य भाविक नाशिकला येतात.

सीतागुंफा

श्रीकाळाराम मंदिराच्या उत्तरेस हे स्थान आहे. सीतचे वास्तव्य या ठिकाणी होते म्हणून हे स्थान सीतागुंफा नावाने ओळखले जाते. सीतागुंफेत भुयारा सारख्या अरूंद मार्गातून जावून येण्यास लहान मुलांना गंमत वाटते. या ठिकाणी पाच वटवृक्ष आहेत. म्हणून ते ‘पंचवटी‘ नावाने प्रसिध्द आहे.

श्रीकपालेश्वर मंदिर

ज्या मंदिरात भगवान शंकराच्या पुढे नंदी नाही असे एकमेव मंदिर म्हणजे नाशिकचे कपालेश्वर मंदिर, त्याची आख्यायिका अशी आहे की, ब्रह्मदेवाच्या एका मुखाने केलेली भगवान विष्णूची निदा ऐकून भगवान शंकराने त्या मुखाचा छेद केला. परंतू त्यामुळे ब्रह्महत्येचे पातक लागले म्हणून ते पळू लागले. पळताना विश्रांतीसाठी थांबले असताना गाय - वासराचा (बैलाचा) संवाद ऐकला. बैल म्हणत होता की, ‘‘उद्या मी माझ्या मालकाला ठार करीन ‘‘ तेव्हा गाय म्हणाली की, ‘‘तू असे करू नको. कारण ब्रह्महत्येचे पातक लागेल‘‘. तेंव्हा बैल गाईला म्हणाला की, मला ब्रह्महत्या विनाशाचे तीर्थ कोठे आहे याची माहीती आहे‘‘ त्याप्रमाणे दुस-या दिवशी त्या बैलाने आपल्या मालकाला ठार केल्यावर तो तेथून पळत निघाला हे पाहून शंकरही त्याच्या मागे निघाले. त्या बैलाने (नंदिने) नाशिकला रामतीर्थावर अरूणा संगमाच्या ठिकाणी उडी मारताच तो शुध्द झाला. हे पाहून भगवान शंकरही या अरूणा संगमावर स्नानादी कर्मे करून शुध्द झाले व समोरच कपारीत बसले. त्यांच्या मागचे ब्रह्महत्येचे पातक नाहिसे झाले. नंदीमुळे ब्रह्महत्या विनाशाच्या स्थानाचे ज्ञान झाले म्हणून त्यास गुरूसमान मानून शंकराने नंदिला आपल्यासमोर बसविले नाही. त्यामूळेच संपूर्ण भारतात भगवान शंकरापुढे नंदी असला तरी कपालेश्वरसमोर मात्र नंदि नाही. असे हे एकमेव आहे.

सुंदर नारायण मंदिर

भगवान विष्णूंना जालंदर पत्नी वृंदा हिच्या शापाने कृष्णवर्णरूप प्राप्त झाले. (त्याला आपण शालिग्राम म्हणतो) तेव्हा महाविष्णूंनी गोदावरी तीर्थावर स्नान करून आपले रूप पूर्ववत प्राप्त करून घेतले व तेथेच वास्तव्य केले तेंव्हापासून सुंदरनारायण मंदिर प्रसिध्द झाले. गोदावरीच्या तीरावर व्हिक्टोरिया पुलाजवळ म्हणजे आताच्या होळकर पुलाजवळील हे मंदिर १७५६ मध्ये गंगाधर यशवंत चंद्रचुड यांनी पुन्हा बांधले. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराचे वैशिष्टय म्हणजे २० व २१ मार्च रोजी सूर्याचे किरण विष्णूच्या मूर्तीवर पडतात. म्हणून याला ‘हरिहर भेट‘ असेही म्हणतात. हेच मंदिर औरंगजेबाने उध्वस्त करून तेथे थडगे बांधले होते. पेशवे काळात हे थडगे काढून तेथे भव्य मंदिर साकार झाले व आक्रमणाचे पाप धुतले गेले.

श्री सप्तश्रृंगी देवी मंदिर व श्री नारोशंकर (रामेश्वर) मंदिर

ही दोन्ही मंदिरे रामगया तीर्थावर पंचवटीमध्ये वसलेली आहेत. ही दोन्ही स्थाने जागृत असून सरदार राजेबहादूर या घराण्याची आहेत. हया ठिकाणी इतिहासप्रसिध्द नारोशंकराची घंटा आहे. वसईच्या लढयातून पेशव्यांनी ही घंटा जिकून आणलेली आहे.

बालाजी मंदिर

रामसेतू पुलाअलिकडे सरकारवाडयाजवळ हे मंदिर उभे आहे. ते १७७१ मध्ये बांधले गेले. मंदिरातील देखण्या मूर्ती तामिळनाडू राज्यातील पण्णवेल्ली गावात गणपतीबुवा गोसावी यांना सापडल्या. बालाजीचा मुकूट सोनेरी असून त्यावर रत्ने व माणके जडविलेली आहेत. या मंदिराचा ट्रस्ट असून संस्थानचा कारभार व गरजूंना आर्थिक मदत या ट्रस्ट तर्फे होते.

मुरलीधर मंदिर :

गोरेराम गल्ली-कापड पेठेतील हे मंदिर १८२८ मध्ये कै. दादाबुवा यांनी बांधले. मुरली वाजविणा-या कृष्णाची मूर्ती आणि दोन्ही बाजूला सवंत्स धेनू आहेत. कृष्णजन्माच्या उत्सावात दररोज वेगळे रूप सजविले जाते. ते अत्यंत मनोहरी असते.

यशवंतरावमहाराज मंदिर / समाधी

साधूपुरूष यशवंतरावमहाराज देव-मामलेदार यांचे मंदिर गोदावरीच्या काठी आहे. हे देवालय १८८७ मध्ये देव मामलेदारांनी समाधी घेतल्यानंतर बांधले गेले. यशवंतरावमहाराज सटाणा येथे मामलेदार असतांना मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी सरकारी नियम धाब्यावर बसवून त्यांनी गोरगरीबांना मदत केली होती. अत्यंत साधुवृत्तीचे संत पुरूष म्हणून त्यांचा लौकिक होता. एखाद्या सरकारी अधिका-याचे असे जगातले हे एकमेव मंदिर असावे. याच पटांगणात दरवर्षी वसंत व्याख्यानमाला होते.

मोदकेश्वर गणपती

संत गाडगेबाबा महाराजांच्या धर्मशाळेच्या अलिकडे श्रीमोदकेश्वराचे मंदिर लागते. हे एक जागृत स्थान असून हा गणपती नावाला पावतो अशी भक्तांची नितांत श्रध्दा आहे. आजूबाजूच्या उत्खननात मोदकाच्या आकाराचे दगड सापडले म्हणून त्या मंदिराला मोदकेश्वर मंदिर असे नाव पडले.

कपूरथळा छत्री

गाडगेमहाराज पुल वरामसेतू पूल यांच्या मधोमध ३० फु ट उंचीची संपूर्ण संगवरवरी कपूरथळा छत्री आहे. कपूर-थळा (पंजाब) संस्थानच्या माजी नशेशांचे १८७० मध्ये एडन येथे निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ही छत्री बांधण्यात आली. समोरच कपूरथळा धर्मशाळा आहे.

काटया मारूती

हे स्थान पंचवटीत वरूणा नदीच्या पुलाजवळ आहे. येथील मारूतीची मूर्ती १० फू ट उंचीची आहे. म्हणून या मारूतीला ‘लंबे हनुमान‘ असेही म्हणतात.

तपोवन

हे स्थान पंचवटीपासून ३ कि.मी.वर आहे. येथे कपिला व गोदावरीचा संगम आहे. सांख्य शास्त्राचे प्रणेते श्री. कपिल मुनींची ही तपोभूमि आहे. या संगमावर १. ब्रह्मयोनी, २. विष्णुयोनी, ३.रूद्रयोनी, ४. मुक्तीतीर्थ, ५. अग्रीतीर्थ, ६. सौभाग्य तीर्थ, ७. कपील तीर्थ, ८. कपिला संगम हया अष्टतीर्थांचा उल्लेख स्कंद पुराणात आहे. तपोवनात श्री कपिल महामुनी दर्शन, कपिला गाय आणि प्रभु रामचंद्र व लक्ष्मणाने शूर्पनखाचे नाक कापले ते दर्शविणा-या मूर्ती आहेत. तपोवनातील नैसर्गिक सौदर्य रमणीय आहे. या ठिकाणी श्री. संत जनार्दन भेट झाल्याचा उल्लेख आढळतो. कपिला गोदावरीचा संगम, कपिमुनींची तपोभूमि अष्टतीर्थ, रामायणातील महत्वाचे स्थान इत्यादी स्थानमहात्म्य असलेली पंचवटीतील तपोवन ही भूमी पौराणिक महात्म्य सांगून जाते. पर्यटकांच्या दृष्टीने महत्वाच्या या जागेवर महानगरपालिकेच्यावतीने दर्शनी भागात आकर्षक बांधकाम करून तेथील परिसर सुशोभित करण्यात येत आहे.

भद्रकाली मंदिर

नाशिक शहरात श्रीभद्रकाली नवदुर्गाचे पुराणप्रसिध्द मंदिर आहे. येथे दररोज कथा, किर्तन व प्रवचने होतात. नवरात्र उत्सव मोठया प्रमाणावर साजरा केला जातो.

समर्थ रामदासांची टाकळी

नाशिक च्या पूर्वेस हे स्थान आहे. नासर्डी व गोदावरीच्या संगमावर हे वसले आहे. येथे राष्ट्रसंत श्रीसमर्थ रामदासस्वामी यांनी १३ वर्षे तपश्चर्या करून गोमय मारूतीची स्थापना केली. दासनवमी व श्रीरामनवमी तसेच श्रीहनुमान जयंती या दिवशी या ठिकाणी मोठी यात्रा भरते. टाकळी येथील वास्तव्यातच गुरूनानक यांचा नातू व गोसावी सांप्रदायाचे प्रवर्तक चंद्राचार्य यांची व समर्थ्यांची भेट झाल्याचा उल्लेख आढळतो. भक्ती आणि शक्ती, ज्ञान आणि युक्ति याची सांगड घालून आक्रमकांचा संहार करण्याची व महाराष्ट्र धर्माची प्रेरणा देणारे हे शक्तीस्थान आहे.

भक्तीधाम (कैलासमठ)

भक्तीधाम (कैलासमठ) हे स्थान पंचवटीमध्ये पेठरोडवर आहे. येथे विद्वान वेद-वेदांग शास्त्राचे पठण करण्यासाठी येतात. तसेच येथे विद्यार्थ्यांसाठी निवासी वेदपाठशाळा चालविली जाते. यात्रेकरूंना राहण्यासाठी या ठिकाणी चांगली व्यवस्था आहे.

मुक्तीधाम

नाशिकरोड मधील सर्वात भव्य मंदिर कै.जयरामभाई बिटको यांनी २३ लाख रूपये खर्च करून एक आधुनिक संगमरवरी देवस्थान उभे केले आहे. राजस्थान मधील मक्रान (जयपूर) येथून आणलेला दगड व राजस्थानी कारागीर यांनी हे शिल्प घडविले . गीतेचे श्लोक या मंदिराच्या भितीवर कोरलेले आहेत. सर्व म्हणजे १२ ज्योर्तिलिगांचे देखावे प्रेक्षणीय आहेत. बहुतेक सर्व मोठया देवदेवतांचे दर्शन येथे एकत्र होते. जवळच एक उद्यान आहे. भक्तांसाठी राहण्याची सोय मुक्तीधामच्या परिसरात आहे.

कोदंडधारी राम

धर्मवीर डॉ.मुंजे यांनी स्थापन केलेल्या भोसला मिलीटरी स्कूलच्या परिसरात कोदंडधारी रामाचे हे सुंदर मंदिर आहे. नेमबाजी शिकवितांना बंदूकिच्या ज्या गोळया उडविल्या जातात. त्या गोळयांच्या (काडतूस) उरलेल्या धातूतून ही अप्रतिम मूर्ती घडविलेली आहे.

सोमेश्वर मंदिर

नाशिकच्या उत्तरेस म्हणजे नाशिक गंगापूर रस्त्यानजिक सुमारे ४ कि.मी. अंतरावर हे मंदिर असून गोदावरी नदीच्या काठी आहे. तेथे स्वयंभू सोमेश्वर प्रकट झाले आहेत. त्या स्थळावर सोमेश्वराचे आद्य मंदिर असून मंदिराखालून गुप्त गंगा वहात असून ती जवळच असलेल्या एका झाडाखालून प्रकट झाली आहे. तिचा प्रवाह अव्याहत चालू असतो. मंदिराचा परिसर अतिशय रमणीय आणि नयनमनोहर आहे. पुढे गंगापूरचा धबधबा असून त्याच्या पुढे शंकराचार्य डॉ.कुर्तकोटींचा आश्रम व समाधी आहे.

गंगेश्वर वेदमंदिर

वेदग्रंथाचे संगमरवरी शिल्प असलेले हे मंदिर वैशिष्टयपूर्व आहे. इटालीयन मार्बलमध्ये मंदिराचे बांधकाम आहे. प्रवेशद्वार भव्य असून सुबक काचेची दालने आहेत. मंदिरात श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई यांच्या मूर्ती आहेत. गुरू गंगेश्वरांचा पुतळा मनोहरी आहे, हे मंदिर नाशिक-त्रंबक रस्त्यावर आहे.

प्रेक्षणीय स्थळे

पांडव लेणी

नाशिकच्या अलिकडे दक्षिणेस सुमारे ८ किलोमीटर्सवर डोंगरात कोरलेली लेणी आहेत. शहराच्या नैऋत्येस शंखाच्या आकाराचे तीन डोंगर आहेत. त्यांना ‘‘त्रिराशी‘‘ असे संबोधतात. मध्याला डोंगरावर ही लेणी आहेत. ती सुमारे इ.स.पूर्व १०० ते ११० या वर्षी खोदलेली असावीत. एकूण २९ गुंफा आहेत. शालिवाहन हया हिदू राजाने बौध्द भिक्कूसाठी प्रवासात विश्रांती घेण्यासाठी ही लेणी बांधली . आतील भगवान गौतम बुध्दाच्या तसेच बोधीसत्वाच्या मूर्ती प्रेक्षणीय आहेत.

चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारक

चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे अत्यंत आकर्षक स्मारक पांडवलेण्याच्या पायथ्याशी नाशिक महानगरपालिकेने साकारले आहे. या जागेचे क्षेत्रफळ ११.७५ एकर असून डोंगराच्या पूर्व आणि उत्तरेच्या उतरणीवरून वाहणा-या पाण्याचा नैसर्गिक उपयोग करून हे नयनरम्य स्थान निर्माण झाले. मध्यवर्ती जलसंचय हे केंद्रस्थान मानून भोवताली टेरेसेसची आखणी करून खुला रंगमंच उभारला आहे. तसेच २५० प्रेक्षक बसतील असे छोटे चित्रपटगृह, कॅन्टीन व रंगबेरंगी तरंगती कारंजी व येथे विहरण्यासाठी हिरवेगार लॉन असे चित्ताकर्षक नवे पर्यटन स्थळ निर्माण झाले आहे.

बुध्दस्मारक

कै.दादासाहेब फाळके स्मारक उद्यानाचा एक अविभाज्य भाग दिसावा अशी रचना येथील बुध्दस्मारकाची करण्यात आली आहे. स्मारक उद्यानापैकी पांडवलेण्याच्या प्रवेशद्वाराजवळील पाच एकर जमिनीत बुध्दस्मारकाची उभारणी करण्यात आली आहे. बुध्दस्मारकांच्या तळमजल्याला प्रदर्शनासाठी कलादालन व अभ्यासिक ा असून सांचीस्तुपांचा प्रतिकृतीच्या गोलाकाराचे चैत्य सभागृह आहे. चैत्य सभागृहाकडे जाण्यासाठी प्रदर्शन मार्गाला चार प्रवेशद्वारे आहेत. या प्रवेशद्वारावर चार समप्रमाणात आसांची चार तोरणे उभारण्यात आली आहेत.

(पांडवलेणी,फाळके स्माकर, व बौध्द स्मारक हे तीनही एकाच ठिकाणी असून येथे सिटी बस व रिक्षाने जाता येते) 

चांभार लेणी

नाशिकच्या उत्तरेस (पंचवटीच्या पुढे) पाच मैलावर म्हसरूळजवळ जैनांची गजपंथी लेणी आहेत. त्याला ‘चांभार लेणी ‘ असेही म्हणतात. गजपंथी टेकडीच्या पायथ्याजवळील म्हसरूळ या गावी १९४२ साली पारसनाथ मंदिर बांधण्यात आले. ही लेणी ११ व्या शतकात बांधली गेली असून ती जैनांच्या पवित्र तीर्थापैकी मानली जातात. खाली सीताकुंड आहे. पौष महिन्यात दर रविवारी येथे यात्रा भरते.

श्रीसप्तश्रृंगी देवी

महाराष्ट्रत शक्तीची साडेतीन पीठे मानली जातात. त्यापैकी वणीच्या देवीचा सप्तश्र्रृंगी गड हे आदिशक्ती स्थान मानले जाते. ओंकारातील आकार पूर्ण रूप होवून सप्तश्र्रृंगी गडावर स्थिरावला. म्हणून आदिमायेचे हे पूर्णरूप मानले जाते. नाशिकपासून ६५ कि.मी. दूर सहयाद्री पर्वतांच्या पूर्व-पश्चिम पर्वतरांगेत हे स्थान आहे. समुद्रसपाटीपासून ४६०० फुट उंचीवरचे हे ठिकाण निसर्गाने नटलेले व भाविकांना आकर्षित करणारे आहे. गडावर चढून आल्यावर ५०० पाय-या चढून मंदिराकडे जाता येते. डोंगराच्या कपारीत ८ फुट उंचीची व १८ बाहू असलेली स्वयंभू पाषाणमूर्ती आहे. विशेष म्हणजे, या मुर्तिच्या चेह-यावरील भाव महाकाय व महिषासुरमर्दिनीरूप असूनही अत्यंत प्रसन्न आहे. दर पौर्णिमेला व नवरात्रात भाविकांची गर्दी असते. चैत्र पौर्णिमेला तर लक्षावधी भाविक येतात. गडावर पूर्वी १०८ कुंडे होती. परंतु, सध्या त्यापैकी १० ते १५ कुंडे दिसतात. जलगुंफा, शिवतिर्थ, तांबुल तीर्थ व काजळ तीर्थ इ.१०-१२ तीर्थ दिसतात. शिवालयतीर्थापासून जवळच शितकडा नावाची १२०० फुट खोल दरी आहे. यालाच ‘सतीचा कडा‘ असेही म्हणतात.

(वणीतील नाशिक दिडोरी रस्त्याने बसने जाता येते. तसेच पंचवटीत दिडोरी रस्त्यावरून टॅक्सीही मिळते. गडावर रहाण्याची अल्प दरात सोय आहे. भोजन प्रसाधानाची ही व्यवस्था आहे.)

टाकेद तीर्थ

नाशिक पासून ७१.१ कि.मी. व इगतपूरी पासून ६२.३ कि.मी. अंतरावर असलेले टाकेद हे गाव आहे. या ठिकाणी रावण सीतेला नेत असता जटायूशी युध्द झाले ते ठिकाण होय. टाकेद या ठिकाणी महाशिवरात्रीस मोठी यात्रा भरते.

रामसेज डोंगर

पंचवटीच्या उत्तरेस १० मैलावर हा डोंगर आहे. या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्र शय्येसाठी जात. या रामसेज पर्वताच्या दगडांचेच श्री काळाराम मंदिर बांधलेले आहे.

चांदवडची रेणुकादेवी व रंगमहाल

नाशिकपासून ६५ कि.मी. अंतरावर आग्रारोडवर चांदवड येथे रेणुकामाता देवीचे डोंगरातील मंदिर प्रसिध्द आहे. अहिल्याबाई होळकर यांनी १७५० ते १७६५ या काळात चांदवड येथे अनेक सुधारणा केल्या तसेच भव्य रंगमहाल बांधला. हया रंगमहालातील नक्षीकामात असलेले रंग आजही रसिकांना आकर्र्षत करतात. याशिवाय डोंगरावर चंद्रेश्वराचे मंदिर आहे.

No comments

Hindi vyakaran Mock Test

Scholarship Exam 2024 PAPER 1/2 : Hindi अनेकार्थी शब्द Start The Quiz Time's Up score: Next question See Your Result Total Quest...

Powered by Blogger.