मराठी सराव (२५ - प्रश्न )
प्रश्न 1 ते 3 साठी सूचना : पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून दिलेल्या प्रश्नांच्या योग्य उत्तरांचा पर्याय निवडा: निसर्ग हा माणसाचा जिवाचा सखा आहे. उन्हापासून माणसाला वाचविण्यासाठी वृक्ष सावली देतो. ग्रीष्माच्या दाहकतेपासून माणसाला वाचविण्यासाठी पावसाचा वर्षाव होतो. पर्वताच्या उँचीमुळे वादळी वाऱ्यापासून रक्षण होते. झाडांची मूळे जमिनीत खोलवर गेल्यावर जमिनीची धूप थांबवतात. झाडांच्या श्वसनामुळे अशुद्ध वायू कमी होऊन माणसाला प्राणवायू मिळतो. निसर्गातील विविध प्राणी, पक्षी, कीटक हे देखील जणू काही माणसाच्या सुखाचाच विचार करतात. मधमाश्यांच्या मेहनतीतून माणसाला मधुर मध मिळतो. तुतीच्या पानांवर पोसणारा रेशमाचा किडा आपल्या समर्पणातून माणसाला मऊसूत रेशीम धागा देतो. निसर्ग हा एक मोठा दाता आहे. किंबहुना आपल्याकडे जे जे काही आहे ते दुसऱ्याला द्यावे हा संदेश निसर्ग पावलोपावली देतो. उंच कड्यावरून कोसळणारे धबधबे माणसाला नयनसुख देतातच. शिवाय त्यांच्या शक्तीचा उपयोग करून माणूस विदयुतशक्ती, ऊर्जा निर्माण करतो. बेधुंद वाहणाऱ्या वाऱ्याच्या सामर्थ्यावर माणसाच्या पवनचक्क्या फिरतात. सतत खळखळाट करणारा सागर माणसाला आपल्या अथांग उदरातून क्षार, शंख, शिंपले, मत्स्यधन देतोच. निसर्गाने युगानुयुगे दिलेले वैभव, सुबत्ता यांची त्याला आठवणही राहिली नाही. क्षुल्लक स्वार्थापायी तो झाडे तोडतो, जंगले उद्ध्वस्त करतो, नद्यांचे गोडपाणी दूषित करतो, सागराच्या अथांगतेलाही अडसर निर्माण करतो आणि मागे उरते केवळ प्रदूषण ! आपल्या शिकारीच्या हौसेपोटी माणसाने आज कित्येक निसर्गदत्त पशू, पक्षी नष्ट केले आहेत. माणसाला निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्याचा विसर पडला आहे जणू !
1)ग्रीष्म ऋतूबाबत उताऱ्यात कोणते वर्णन आले आहे ? ग्रीष्म ऋतूबाबत उताऱ्यात कोणते वर्णन आले आहे ?
- सर्वांत शीतल ऋतू
- सर्वांत उष्ण ऋतू
- पावसाचा वर्षाव होणारा ऋतू
- ) निसर्ग शुद्ध करणारा ऋतू
Answer: सर्वांत उष्ण ऋतू
Explanation: None.
2)निसर्गाकडून आपण कोणता बोध घेतला पाहिजे ? (दोन अचूक पर्याय निवडा)
- दातृत्व
- स्वार्थीपणा
- परोपकार
- प्रदूषण
Answer: दातृत्व, परोपकार
Explanation:None.
3)माणसाच्या कोणत्या छंदापायी पशुपक्ष्यांच्या काही जाती नष्ट झाल्या आहेत ?
- स्वार्थ
- शिकार
- खेळ
- भ्रमंती
Answer:शिकार
Explanation: None.
प्रश्न 4 ते 6 साठी सूचना : पुढील कविता वाचा, त्याखाली विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा : ओढाळ वासरू रानी आले फिरू कळपाचा घेरू सोडूनिया। कानामध्ये वारे भरूनिया न्यारे फेर धरी फिरे रानोमाळ। मोकाट मोकाट अफाट अफाट वाटेल ती वाट धावू लागे। विसरूनी भान, भूक नि तहान पायाखाली रान घाली सारे। थकूनिया खूप सरता हुरूप आठवे कळप तयालागी। फिरू जाता मागे दूर जाऊ लागे आणखीच भागे भटकत। पडता अंधारू लागले हंबरू माय ! तू लेकरू शोधू येई !
4)कवितेतील वासराचा स्वभाव कसा आहे ?
- शांत
- चतुर
- उनाड
- होतकरू
Answer:उनाड
Explanation: None.
5)वासराला कशाची आठवण राहिली नाही ?
- रान
- माळ
- हुरूप
- तहान
Answer:तहान
Explanation: None.
6)'कानात वारे शिरणे' म्हणजे
- उड्या मारणे
- रानोमाळ फिरणे
- हुरूप वाटणे
- बेभान होणे
Answer: बेभान होणे
Explanation:None.
7)'आवाज' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
- वद
- रव
- रद
- नमन
Answer: रव
Explanation:None
8)'संकोच' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
- असंकोच
- नि:संकोच
- लज्जित
- निडर
Answer:नि:संकोच
Explanation:None
9)लेखननियमानुसार अचूक शब्द कोणता ?
- माहीती
- नुसकान
- झूजुमूंजु
- विशेष्य
Answer: विशेष्य
Explanation:None.
10)पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?
- हैरान
- सुवर्णमुद्रा
- गि-हाइक
- नाट्यीकरण
Answer: नाट्यीकरण
Explanation: None.
11)पुढीलपैकी कोणत्या पर्यायात शब्दसमूह व त्याच्यासाठीचा एक शब्द यांची योग्य जोडी आहे ? (दोन अचूक पर्याय निवडा)
- जनहिताबद्दल जागरूक - जनहितकक्ष
- ठरवलेल्या कामाचा निश्चय – संकल्प
- पाहण्यासाठी आलेले लोक - कलावंत
- ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे - नियतकालिक
Answer: ठरवलेल्या कामाचा निश्चय – संकल्प,ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे - नियतकालिक
Explanation:None
12)'मदत करणे' या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायांतून निवडा :
- हात मारणे
- हातभार लावणे
- हाताशी धरणे
- हातावर तुरी देणे
Answer:हातभार लावणे
Explanation:None.
13)खालील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण म्हण तयार केल्यास सातव्या क्रमांकावर कोणतेअक्षर येते ?
- दा
- ले
- च
- आ
Answer: आ
Explanation: None.
14)पुढीलपैकी कोणता शब्द 'जोडशब्द' नाही ?
- गोडधोड
- नातीगोती
- गुरूशिष्य
- मूलबाळ
Answer:गुरूशिष्य
Explanation:None
15)पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द दिलेल्या दोन्ही अर्थांनी वापरला जातो ?
- पण - प्रतिज्ञा, अट
- कर - किरण, काठ
- भाव - दर, दर्शन
- दंड - शिक्षा, नियम
Answer: पण - प्रतिज्ञा, अट
Explanation:None.
16)'आश्चर्यम्' या शब्दात एकूण किती वर्ण आहेत ?
- सात
- नऊ
- चार
- आठ
Answer: आठ
Explanation: None.
17)पुढीलपैकी कोणता शब्द विशेषण आहे ?
- शौर्य
- बिकट
- निसर्ग
- प्रसंग
Answer: बिकट
Explanation:None
18)'पुस्तके वाचण्याचा माझा छंद लहानपणापासून मला आनंद व विरंगुळा देत राहिला.'या वाक्यात कोणती अव्यये आली आहेत ? (दोन अचूक पर्याय निवडा)
- व
- छंद
- पासून
- आनंद
Answer:व ,पासून
Explanation:None.
19)खालील वाक्यपूर्तीसाठी कोणते अव्यय अचूक आहे ?केवढे मोठे उंच शिखर !
- वाहवा !
- छे !
- शाबास !
- अबब !
Answer: अबब !
Explanation: None.
20)पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द परस्पर विरुद्धलिंगी नाहीत ?
- दाता x दाती
- नरx नारी
- दास - दासी
- विद्वान - विदुषी
Answer: दाता x दाती
Explanation:None
21)'बक्षीस' या नामाचे अनेकवचनी रूप पर्यायांतून निवडा :
- बक्षिसे
- बक्षीस
- बक्षीसी
- बक्षिसा
Answer: बक्षिसे
Explanation:None.
22)पुढील वाक्यात किती प्रकारची विरामचिन्हे आली आहेत ? दीपकने विचारले, "म्हणजे आपण कुणीच फटाके, फुलबाजे व भुईचक्र आणायची नाहीत ? ते सर्व पैसे चिन्मयला यायचे ?"
- तीन
- चार
- पाच
- सहा
Answer:तीन
Explanation: None.
23)'सानिका मैदानावर धावते.' या वाक्याचा काळ ओळखा :
- भूतकाळ
- वर्तमानकाळ
- भविष्यकाळ
- साधाकाळ
Answer: वर्तमानकाळ
Explanation:None
24)'माणसातला देव' या पाठाचे लेखक कोण ?
- शंकर वैद्य
- सुधाकर प्रभू
- प्रफुल्ल रणदिवे
- शिवाजी देशमुख
Answer: शिवाजी देशमुख
Explanation:None.
25)'त्र्यंबक बापूजी ठोंबरे' यांना कोणत्या नावाने ओळखतात ?
- राजकवी
- कुसुमाग्रज
- केशवसुत
- बालकवी
Answer:बालकवी
Explanation: None.
Post a Comment