उस्मानाबाद जिल्हा

 

उस्मानाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातला एक जिल्हा आहे. जिल्हा मुख्यालय उस्मानाबाद शहर येथे आहे. जिल्ह्याचा बहुतेक भाग खडकाळ आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२ चौरस किलोमीटर आहे. त्यातील २४१ चौ.कि.मी भाग हा शहरी आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १४,८६,५८६(इ.स.२००१) इतकी असून त्यातील १५.६९ % शहरी आहे. जिल्ह्यातील 'तुळजापूर' येथील 'तुळजाभवानी' मातेचे मंदिर प्रसिद्ध आहे.

भौगोलिक स्थान

अक्षांश : १७.३५ ते १८.४० उत्तर रेखांश : ७५.१६ ते ७६.४० पूर्व.

उस्मानाबाद जिल्हा राज्याच्या दक्षिण भागात स्थित आहे.उस्मानाबाद जिल्हा हा मराठवाडयात त्याच्या नैर्ऋत्येला आहे. हा जिल्हा समुद्रसपाटीपासून ६०० मी. उंचीवर असून पूर्णपणे दख्खनच्या पठारात येतो. ह्या जिल्ह्यात मांजरा आणि तेरणा नद्यांची पात्रे येतात.उस्मानाबादच्या नैर्ऋत्येला सोलापूर जिल्हा, वायव्येला अहमदनगर जिल्हा, उत्तरेला बीड जिल्हा, पूर्वेला लातूर जिल्हा, व दक्षिणेला कर्नाटकातील बिदर व गुलबर्गा हे जिल्हे आहेत.जिल्ह्याचा बहुतांश भाग खडकाळ तर उर्वरित भाग सपाट आहे.जिल्ह्याचा बहुतांश भाग बालाघाट नावाच्या लहान पर्वताने व्यापलेला आहे. भूम, वाशी, कळंब, उस्मानाबाद आणि तुळजापूर हे तालुके बालाघाटच्या रांगेत स्थित आहेत. गोदावरी आणि भीमा सारख्या मोठ्या नद्यांचा काही भाग जिल्ह्याच्या अंतर्गत येतो.जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२.४ चौ.किमी आहे पैकी शहरी भागाचे क्षेत्रफळ २४१.४ चौ.किमी आहे(एकूण क्षेत्रफळाच्या ३.२१ %) आणि ग्रामीण भागाचे क्षेत्रफळ ७२७१.० चौ.किमी आहे (एकूण क्षेत्रफळाच्या ९६.७९ %).

जिल्ह्याचे हवामान

जिल्हा बालाघाट डोंगररांगांनी वेढला असून हवामान मुख्यत: कोरडे आहे. पावसाळ्याचा कालावधी साधारणपणे जूनच्या मध्यापासून सप्टेंबर अखेरपर्यंत असतो. सरासरी पर्जन्यमान ६०० ते ७०० मिलिमीटर. आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर हवामान दमटसर असते. डिसेंबर-जानेवारी शीत हवामानाचा काळखंड असतो. फेब्रुवारीपासून जूनपर्यंत हवामान अधिकाधिक कोरडे आणि तापमान उष्ण होत जाते. उन्हाळ्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचे तापमान हे मराठवाड्यामधील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असते. ज्वारी, सूर्यफूल, हायब्रीड ज्वारी, तुरी, ऊस, कापूस, गहू आणि हरभरा ही मुख्य पिके आहेत.

 

जिल्ह्यातील तालुके

·         उस्मानाबाद,

·         तुळजापूर,

·         उमरगा,

·         लोहारा,

·         कळंब,

·         भूम,

·         वाशी 

·         परांडा

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

·         तुळजापूर हे देशातील प्रसिद्ध देवस्थान आहे. तुळजाभवानी हे छत्रपती शिवाजी यांचे कुलदैवत होते. हे भवानीमातेचे मंदिर उस्मानाबादपासून २५ कि.मीवर., सोलापूरपासून ४१ तर ते हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग येथून ४० कि.मी.वर आहे.

·         कळंब हे जिल्ह्यातील व्यावसायिकदृष्टया महत्त्वाचे ठिकाण आहे. ते मांजरा नदीच्या काठावर वसलेले आहे. कळंबपासून २० कि.मी.वर येरमाळा येथे येडेश्वरी देवीचे मंदिर आहे.

·         परांडा हे ऐतिहासिक ठिकाण किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे.

·         रामलिंग मंदिर हे भगवान शिवशंकराचे प्रसिद्ध मंदिर आहे. ते उस्मानाबाद पासून 20 KM च्या अंतरावर सोलापुर औरंगाबाद या रोडवरील येडशी या गावात आहे.येथे दुर्गा देवीचे पुरातन मंदिर आहे.श्रावन महिन्यात येथे मोठ्या प्रमाणावर भक्तगण येतात.तसेच भरपूर पाउस पडल्यावर येथील धबधबा हा आकर्षन ठरू शकते.तसेच या प्रदेश हा डोंगराल प्रदेश आहे तसेच येथे मोठ्या प्रमाणावर वनराई आहे.त्यामुले या प्रदेशास रामलिंग अभयारण्य म्हणून घोषित केले आहे.

·         इतर पर्यटनस्थळे- संत गोरोबा मंदिर, धाराशिव लेणी, नळदुर्ग किल्ला, कुंथलगिरी येथील जैन मंदिर.

 

तेरचे वस्तू संग्रहालय :

तेर येथे कै. रामलिंगअप्पा लामतुरे वस्तू संग्रहालय आहे. उस्मानाबाद पासून २२ कि.मी. अंतरावर हे गाव आहे. कै. रामलिंगअप्पा लामतुरे यांनी चौकस बुद्धीने व ऐतिहासिक वस्तू जमवण्याचा छद या जोरावर वस्तू जमावल्या व हा लाखो रुपयांचा संग्रह त्यांनी २२ जानेवारी १९७१ रोजी शासनाकडे सुपूर्द केला. शासनाने तेथे भव्य वास्तू उभी केली असून अभ्यासक व पर्यटकांना हि वास्तू उपयुक्त ठरली आहे.

माणकेश्वर हेमांडपंथी देवालय :

परंडा तालुक्यातील माणकेश्वर हेमांडपंथी देवालय प्रसिद्ध आहे. इ सर्वात जुने व सर्वात सुंदर देवालय आहे. प्रत्येक छोटया – मोठ्या दगडावर अप्रतिम शिल्प कोरलेले आहे. गाभा-यात महादेवाची प्रंचड पिंड आहे.

येरमाळयाची येडाई:

येरमाळा हे गाव उस्मानाबाद पासून ५० कि. मी. अंतरावर आहे. प्रभुरामचंद्राना वनवासाला जाताना प्रलोभन दाखवण्यासाठी देवी पार्वतीने सतीचे रुप घेउन भुलवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रामाने पार्वतीला येडी आहेस. असे म्हंणटले. तेव्हापासून हि देवी इथे राहिली व तिचे नाव येडाई उर्फ येडेश्वरी झाले. या आख्यायिकेचा उल्लेख रेणुका स्त्रोत्रात असल्याचे पुजारी सांगतात. येरमाळा हे सोलापूर – औरंगाबाद रस्त्यावर आहे.

सोनारीचा कालभैरव:

परंडयाच्या उत्तरेस ७ कि.मी. अंतरावरील सोनारी या गावी श्री. कालभैरवनाथ मंदिर आहे. स्कंद पुराणात याचा उल्लेख आढळतो. चंड नावाच्या दैत्याचा मुलगा प्रचंड हा गोदावरीच्या दक्षिण भागात दंडकारण्यात (हल्लीचे परंडा) राहत होता. त्याच्या त्रासाने सर्व पीडित शंकराला शरण गेले. शंकराने काशी क्षेत्राच्या रक्षणासाठी जे ८ भैरव आपल्या नेत्रातून निर्माण केले होते. त्यापैकी कालभैरव याने या प्रचंड दैत्याचा तसेच सुवर्णसूर, भैमकासुराचा वध केला. त्यानंतर शंकराने त्याचा सुवर्णपुरी उर्फ सोनारीत राहण्याची आज्ञा केली. त्यामुळे कालभैरव सोनारीत वास्तव्य करू लागले. अशी आख्यायिका सांगितली जाते.

कल्याण स्वामीचा मठ:

महापुरुषांच्या वास्तव्याचे एक ठिकाण परंडा तालुक्यात डोमगाव येथे आहे. एका आड वाटेला, सोनारी जवळ असलेल्या या गावात समर्थ रामदासाचे पट्टशिष्य पूज्य कल्याणस्वामीचा यांचा मठ आहे. या कल्याणस्वामीच्या हस्ताक्षरातील दासबोधाची सुरेख अक्षरातील प्रत व खुद्द रामदासांनी त्यात केलेल्या दुरुस्त्या या स्थानाला आगळे महत्व आहे.

सिद्धेश्वर वडगाव:

प्राचीन शिवमंदिर, श्रावण सोमवरी व महाशिवरात्रीच्या दिवशी भाविक दर्शनास येतात. हे ठिकाण उस्मानाबाद पासून ८ कि.मी. अंतरावर आहे.

रामलिंग मंदिर:

रामलिंग हे सोलापूर – बीड मार्गावरील येडशी जवळ आहे. यासंबंधी असे सांगितले जाते के, या प्रवाह संगमात स्नान करून प्रभू श्रीरामांनी शिवलिंगाची पूजा केली, म्हणून भगवान शंकर यांचे रामलिंग या नावाने प्रसिद्ध झाले. सीताहरणाच्या वेळी या दंडकरण्यातून राम – लक्ष्मनाच संचार झाला. त्यांचे हे स्थान आहे. श्रावण महिना व दर सोमवारी भक्तगण मोठ्या प्रमाणात येथे येतात.

अणदूरचा खंडोबा:

सोलापूर – हैद्राबाद राष्ट्रीय मार्गावर अणदूर हे गाव आहे. त्या काळात त्याचे आनंदवूर हे नाव होते. मनिमल्ल दैत्याचा संहार करण्यासाठी शंकराने मल्हारी मार्तंड भैरवनाचा अवतार धारण केला. त्यानंतर भक्त व मुनीच्या प्रर्थनेनुसार भैरवरुपी शंकर अरीमैलार येथे स्वयंभू लीन्गृपणे प्रगट झाले. हे मंदिर हेमाडपंथी असून आवारात अनेक दीपमाळा आहेत. अनदुरला मार्गशीष ६ ला इ मैलापुरला पौष शुद्ध १५ ला यात्रा भरते. इथे प्राण्यांचा नाही तर पुरणाचा नैवेद्य दिला जातो हे विशेष.

जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र:

भारतात जैन धर्मीयांची अनेक तीर्थक्षेत्र (धर्मीकस्थाने) आहेत. या तीर्थक्षेत्रचे सिद्धक्षेत्र,(निर्माणभूमी) कल्याणक्षेत्र व अतिशय क्षेत्र असे तीन प्रकार समजतात. ज्या तीर्थक्षेत्रावर चोवीस तीर्थकर किंवा मुनी यापैकी कानोनितरी मोक्षाला गेलेले असतात.त्याला सिद्धक्षेत्र म्हणतात. दक्षिण भारतातील एकमेव दिगंबर जैन सिद्धक्षेत्र म्हणजे कुंथलगिरी उसमानाबाद – औरंगाबाद रस्त्यावर ६० कि.मी. व सरमकुंडी फाट्यापासून डावीकडे २ कि.मी. अंतरावर पहाडावर हे तीर्थक्षेत्र आहे.

हजरत शमशुद्दीन गाझी दर्गा:

उस्मानाबाद येथे हजरत शमशुद्दीन गाझी यांचा दर्गा प्रसिद्ध आहे. या दर्ग्यात फारसी भाषेतील कोरलेले एक शिलालेख असून त्यात या पुरुषाचा निर्वाणकाळ ७२० हिजरी असा दिलेला आहे. हा दर्गा फारच भव्य, सुंदर, प्राचीन शिल्पकलेच्या दृष्टीने प्रेक्षणीय आहे. दरवर्षी येथे त्यांचा उरूस भरतो.

 

जिल्ह्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ गट

उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण ५४ जिल्हा परिषदेचे मतदारसंघ गट आहेत.

·         वाशी तालुका

 • पारगाव  • पारा  • वाशी  • तेरखेडा

·         लोहारा तालुका

 • कानेगाव  • माकणी  • सास्तूर  • लोहारा  • जेवळी

·         कळंब तालुका

 • ईटकूर  • डिकसळ  • नायगाव  • शिराढोण  • खामसवाडी  • मोहा  • येरमाळा

·         उमरगा तालुका

 • कवठा  • बलसूर  • दाळींब  • येणेगूर  • गुंजोटी  • आलूर  • कदेर

·         उस्मानाबाद तालुका

 • ढोकी  • पळसप  • कोंड  • तेर  • येडशी  • अंबेजवळगा  • उपळा  • सांजा  • पाडोळी  • केशेगाव  • बेंबळी  • वडगाव

·         भूम तालुका

 • ईट  • पाथरूड  • वालवड  • माणकेश्‍वर

·         परांडा तालुका

 • लोणी  • डोंजा  • शेळगांव  • अनाळा  • जवळा

·         तुळजापूर तालुका

 • सिंदफळ  • काक्रंबा  • मंगरूळ  • काटी  • काटगाव  • अणदूर  • जळकोट  • नंदगाव  • शहापूर

वाहतूक

Øराष्ट्रीय महामार्ग क्र. 9 - हैदराबाद ते मुंबई आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 - गदग (कर्नाटक) ते बडोदा (गुजरात) हे दोन राष्ट्रीय महामार्ग उस्मानाबाद जिल्ह्यातून जातात पैकी राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 हा उस्मानाबाद शहरातून जातो

Øउस्मानाबाद शहर रेल्वे ने जोडले आहे उस्मानाबाद हे लातूर रोड ते मिरज जंक्शन या रेल्वेमार्गावरील महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. उस्मानाबाद येथून पुणे, मुंबई, कोल्हापूर,पंढरपूर, मिरज, लातूर, नांदेड, परभणी, परळी वैजनाथ, अकोला नागपूर, हैदराबाद, निजामाबाद, बिदर आदी ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत

Øउस्मानाबाद जिह्यात एस. टी. ची उत्तम वाहतूक आहे. उस्मानाबाद च्या मुख्य बस स्थानकापासून महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांकडे जाण्यासाठी एस. टी. बसेस (निम आराम तसेच परिवर्तन बसेस) उपलब्ध आहेत. उस्मानाबाद बसस्थानका वरून धावणारी तुळजापूर-उस्मानाबाद-औरंगाबाद हायकोर्ट एक्सप्रेस हि महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एस.टी. बस म्हणून ओळखली जाते Øउस्मानाबाद येथून अन्य राज्यातील मुख्यालये आणि प्रमुख शहरे पणजी, बंगलोर, हुबळी, विजापूर, हैदराबाद, सुरत आदी ठिकाणी जाण्यासाठी एस.टी.च्या निम आराम तसेच परिवर्तन बसेस उपलब्ध आहेत

No comments

Hindi vyakaran Mock Test

Scholarship Exam 2024 PAPER 1/2 : Hindi अनेकार्थी शब्द Start The Quiz Time's Up score: Next question See Your Result Total Quest...

Powered by Blogger.