संकल्पना

 उष्णतेचे सूवाहक

  • उष्णता वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या पदार्थांना उष्णतेचे सुवाहक असे म्हणतात. उदाहरणार्थ तांबे, सोने, चांदी, लोखंड इत्यादी.

उष्णतेचे दर्वाहक

  • उष्णतेचे वहन करण्याची क्षमता नसणाऱ्या पदार्थांना उष्णतेचे दुर्वाहक असे म्हणतात. उदाहरणार्थ लाकूड, रबर, प्लॅस्टिक, कापड, कागद, अॅक्रीलिक इत्यादी.
  • लोखंडाप्रमाणेच कोबाल्ट, निकेल हे धातूही चंबकाकडे आकर्षिले जातात. चुंबकाकडे आकर्षिले जाणारे पदार्थांना चुंबकीय पदार्थ असे म्हणतात. तर याउलट चुंबकाकडे आकर्षिल्या न जाणाऱ्या पदार्थांना अचुंबकीय पदार्थ असे म्हणतात. उदाहरणार्थ तांबे, अॅल्युमिनियम, जस्त, सोने-चांदी इत्यादी.
  • आपल्या सभोवताली घडणारे काही बदल आपल्याला उपयुक्त असतात तर काही बदल हानिकारक असतात. जसे फुले येणे, फळ पिकणे, दधाचे दही होणे हे उपयुक्त बदल असून दूध नासणे, भाजीपाला सडणे हे बदल हानिकारक असतात. काही बदल जलद होणारे असतात तर काही बदल सावकाश होणारे असतात. या प्रकारे बदलाचे काही प्रकार आहेत.

1.परिवर्तनीय बदल - पुन्हा पुन्हा उलट-सुलट क्रमाने होऊ शकणाऱ्या बदलांना परिवर्तनीय बदल असे म्हणतात.

2. अपरिवर्तनीय बदल - पुन्हा पुन्हा उलट सुलट न घडणाऱ्या बदलांना अपरिवर्तनीय बदल असे म्हणतात.

3. आवर्ती बदल - ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडणाऱ्या बदलांना आवर्ती बदल असे म्हणतात. उदाहरणार्थ भरती-ओहोटी, ऋतू इत्यादी.

4. अनावर्ती बदल -जे बदल ठराविक काळानंतर घडत नाहीत त्यांना अनावर्ती बदल असे म्हणतात. उदाहरणार्थ वादळ येणे, भूकंप, त्सुनामी इत्यादी.

भौतिक बदल

  • पाण्याचा बर्फ होतो म्हणजे पाणी स्थायू रूपात जाते. तर बर्फ वितळल्यावर पुन्हा द्रवरूप होते म्हणजे अवस्था बदलल्या तरी पदार्थ तोच राहत असेल तर त्या बदलाला भौतिक बदल असे म्हणतात.

बाष्पीभवन

  • वाफेला बाष्प असे म्हणतात तर द्रवाचे बाष्प होणे या क्रियेला बाष्पीभवन असे म्हणतात. रॉकेल, पेट्रोल अशा द्रव्यांचे बाष्पीभवन लवकर होते. समुद्र किनाऱ्यावर मीठ तयार होण्यासाठी हीच क्रिया उपयोगी पडते.

सांद्रीभवन

  • बाष्प थंड होऊन पुन्हा पाण्यात रूपांतर होत असते त्याला सांद्रीभवन असे म्हणतात. याच तंत्राचा वापर करून फळबागांमध्ये रोपे लावताना रोपांच्या बाजूला प्लॅस्टिकचे आवरण लावलेले असते. त्यामुळे बाष्पीभवन जरी झाले तरी प्लॅस्टिकच्या आवरणामुळे सांद्रीभवन होऊन पाणी तेथेच साठून राहते.

उत्कलन = उकळणे विलयन = वितळणे

रासायनिक बदल

  • जे बदल घडल्याने मूळ पदार्थांचे रुपांतर नवीन गुणधर्माच्या पदार्थात होते अशा बदलांना रासायनिक बदल असे म्हणतात. जसे साखर खूप तापल्याने तिच्यापासून कोळसा बनणे ही रासायनिक क्रिया आहे.

क्षरण

  • लोखंडाची वस्तू गंजली की त्यावर विटकरी रंगाचा थर आणि तांब्याच्या वस्तू वर हिरवट थर तयार होतो या क्रियेला धातूंचे क्षरण असे म्हणतात. यावर उपाय म्हणून लोखंडी पत्रे, नळ इत्यादी वस्तूंवर जस्ताचा पातळ लेप लावतात तर तांब्यापितळेच्या भांड्यांना कथिलाचा लेप देऊन कल्हई केली जाऊन या वस्तू दीर्घकाळ टिकतात यालाच पावडर कोटिंग असे म्हणतात.
  • क्युलेक्स नावाचा डास चावल्यामुळे हत्ती रोग होतो. या आजाराचा परिणाम प्रामुख्याने पायांवर होऊन पाय प्रचंड प्रमाणात सुजतात. यावर उपाय म्हणून अल्बँडाझोल आणि इव्हरमेक्टीन यांचा वापर केला जातो.


No comments

Hindi vyakaran Mock Test

Scholarship Exam 2024 PAPER 1/2 : Hindi अनेकार्थी शब्द Start The Quiz Time's Up score: Next question See Your Result Total Quest...

Powered by Blogger.