सजीव आणि सजीवांची लक्षणे

 सजीव आणि सजीवांची लक्षणे

  • शरीराच्या आतील भागात असलेल्या इंद्रियांना आंतरेंद्रिये म्हणतात. उदाहरणार्थ फुफ्फुसे, हृदय, यकृत, अन्ननलिका इ.
  • शरीराच्या वेगवेगळ्या हालचाली आणि कामे सुरळीतपणे होण्यासाठी शरीराच्या कामात सुसूत्रता असणे गरजेचे असते. शरीराच्या सर्व अवयवांचे आणि त्यांच्या कार्याचे नियंत्रण मेंदू करतो
  • हृदयाकडून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे आणि तेथून परत हृदयाकडे अशी रक्ताची ने-आण सतत सुरू असते, यालाच रक्ताभिसरण असे म्हणतात. रक्ताभिसरण मध्ये हृदयाचे कार्य मुख्य असून रक्तवाहिन्यांमधून रक्त सतत पुढे ढकलण्यासाठी हे पंपाप्रमाणे कार्य करते.
  • श्वास घेणे म्हणजे नाकाने बाहेरची हवा फुफ्फुसात घेणे. उच्छ्वास म्हणजे फुप्फुसातील हवा नाकाद्वारे बाहेर सोडणे होय. एकापाठोपाठ होणाऱ्या या क्रियांना एकत्रितपणे श्वासोच्छवास म्हणतात.
  • अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकांत होणे आणि ते नंतर रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नाचे पचन असे म्हणतात. अन्नाचे पचन अन्ननलिकेमध्ये होते. तोंड, ग्रासिका, जठर,लहान आणि मोठे आतडे असे अन्ननलिकेचे भाग असतात.
  • अन्नपचनास मदत करणाऱ्या रसांना पाचकरस असे म्हणतात. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्रवते. तर स्वादुपिंड सुद्धा पचनसंस्थेतील एक महत्त्वाचा अवयव असून पाचक विकारांचा विसर्ग करतो म्हणून यकृत आणि स्वादुपिंडात तयार होणारे पाचक रस लहान आतड्यात येतात.
  • तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यांमध्ये पिष्टमय पदार्थांचे प्रमाण अधिक असते. डाळी, मांस, दूध यांमध्ये प्रथिने अधिक असतात. भुईमूग, करडई यांसारख्या तेलबियांत स्निग्धाचे प्रमाण अधिक असून पालेभाज्यांपासून क्षार आणि जीवनसत्त्वे मिळतात.
  •  शरीराला लागणारे सर्व अन्नघटक योग्य प्रमाणात मिळतील अशा अन्नपदार्थांचा समावेश ज्या आहारात असतो त्याला चौरस आहार असे म्हणतात.
  • वाढत्या वयाच्या मुला-मुलींचा आहार किंवा अन्नगरज सारखीच असते.
  • संतुलित आहार न मिळाल्यामुळे काही मुले अशक्त, हडकुळी दिसतात. त्यांच्या आहारात पिष्टमय पदार्थ आणि प्रथिनयुक्त पदार्थांची कमतरता असते. म्हणून अपुप्या आणि संतुलित आहारामुळे त्यांचे पोषण झालेले नसते यालाच कुपोषण असे म्हणतात. शरीराची वाढ, विकास तसेच नियमनासाठी मर्यादित स्वरूपात आवश्यक असलेल्या सेंद्रिय संयुगाच्या समूहाला जीवनसत्त्वे असे म्हणतात. परंतु काही जीवनसत्त्वांच्या अभावामुळे वेगवेगळे विकार होत असतात.


जीवनसत्त्व जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होणारे विकार उपाययोजना
रातांधळेपणा आहारात पालेभाज्या, पिवळी पिकलेली रातांधळेपणा फळे,गाजर, पपई,आणि दध यांचा समावेश
बी जीभ लाल होणे त्वचा खरखरीत आहारात डाळी, पालेभाज्या दूध यांचा समावेश होणे
सी हिरड्यांतून रक्त येणे आहारात आवळा, लिंबू, संत्रे, मोड आलेले कडधान्ये यांचा समावेश
डी पायाची हाडे बाक येणे ऑइल यांचा आहारात समावेश. कोवळ्या सूर्यप्रकाशात बसणे, दूध, वाकणे, पाठीला शार्कलिव्हर ऑइल आणि कॉडलिव्हर


  • आपला भारत देश विविधतेने नटलेला असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी राहणीमान, पेहेराव, खाद्यपदार्थ वेगवेगळे बनवले जातात, जसे- दक्षिण भारतात इडली, डोसा सारखे पदार्थ, उत्तर भारतात आलू पराठा, छोले भटूरे, तर महाराष्ट्रात झुणका भाकर, वरण-भात हे लोकांच्या आवडीचे पदार्थ आहेत.

  • हरभरा, मूग, मटकी अशा कडधान्यांना मोड आल्यामुळे तर काही पदार्थांना आंबवल्यामुळे अन्नपदार्थांतील जीवनसत्त्वात वाढ होऊन त्यांची पौष्टिकता वाढते याउलट अन्नपदार्थ खूप वेळ शिजवत ठेवणे, शिजलेल्या पदार्थांतील पाणी काढून टाकणे अशामुळे पदार्थांची पौष्टिकता कमी होते.

रोगः

  • शारीरिक किंवा मानसिक कार्यात बिघाड निर्माण होण्याच्या स्थितीला रोग म्हणतात. निरोगी राहणे हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे असते. परंतु बऱ्याच वेळा आहारातील समस्या, वातावरणातील बदल यामुळे रोग निर्माण होतात.जसे.....

1.साथीचे रोग - ठराविक क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना जेव्हा एकच आजार होतो तेव्हा त्याला साथीचा रोग असे म्हणतात. हिवताप, टायफाईड, कावीळ आणि कॉलरा हे साथीच्या रोगांची उदाहरणे आहेत.

2. संसर्गजन्य रोग - एकमेकांच्या संपर्कात येऊन संसर्ग होणाऱ्या रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात. उदाहरणार्थ क्षयरोग, घटसर्प इत्यादी.

3.संपर्कजन्य रोग-संपर्क म्हणजे स्पर्श,स्पर्शावाटे होणाऱ्या रोगांना संपर्कजन्य रोग असे म्हणतात. उदाहरणार्थ खरुज, नायटा इत्यादी.

  • बी. सी. जी. (BCG) त्रिगुणी लस (Bacillus Calmette Guerin) ही घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात यांच्या प्रतिबंधासाठी दिली जाते. ही लस मुख्यत्वेकरून क्षयरोगाविरुद्ध वापरली जाते.
  •  प्रथमोपचार अपघातानंतर जखमींना वैद्यकीय मदतीची गरज असते. वैद्यकीय मदत मिळेपर्यंत करण्याच्या तात्पुरत्या उपचारांना प्रथमोपचार असे म्हणतात.
  • इजा झालेल्या ठिकाणी असह्य वेदना होऊन त्या भागाचा आकार सूज येऊन लक्षात येण्याजोगा बदलणे ही हाड मोडल्याची लक्षणे आहेत.
  • पोळणे म्हणजे अतिगरम वाफेमुळे बसणारा चटका यामुळे त्वचा लाल होते तर भाजणे म्हणजे आगीमुळे किंवा तीव्र रसायनांमुळे होणारी जखम होय.

उष्माघात

  • प्रखर सूर्यप्रकाशात किंवा उन्हात बराच वेळ फिरल्यामुळे भोवळ येणे, उलट्या होणे, डोके दुखणे, श्वासोच्छासात अडथळा येणे या स्थितीला उष्माघात असे म्हणतात. ज्या ठिकाणी उन्हाळ्यात तापमान 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते, अशा ठिकाणी उष्माघाताचे प्रकार अधिक आढळतात. यावेळी ज्याला उष्माघात झाला त्याला सावलीत बसवून जलसंजीवनी पिण्यास देतात.

जलसंजीवनी - ओरल रिहायड्रेशन सोल्युशन (ओ.आर.एस.) -

  • याचा उपयोग शरीरातील पाणी आणि क्षार यांची कमतरता भरून काढण्यासाठी होतो.
  •  हगवण आणि डीहायड्रेशन (निर्जलीभवन) झालेल्या रुग्णांसाठी वापरतात.
  • तीव्र भाजलेल्या रुग्णांनाही देतात. 
  • सर्पदंश झाल्यास दंश झालेल्या जागेच्या वर आवळपट्टी बांधून पोटॅशियम परमॅग्नेटच्या (KMnO.) द्रावणाने जखम धुतात व त्याचे स्फटिक जखमेवर दाबुन बसवतात.
  • अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत.
  •  पृथ्वीवरील माती, दगड, खनिजे, हवा, पाणी, वनस्पती, प्राणी इत्यादी नैसर्गिक साधन संपत्ती आहे.
  • शेतीसाठी सुपीक मृदेची आवश्यकता असते तर भांडी, माठ, रांजण तयार करण्यासाठी मातीचाच उपयोग केला जातो. चिनी मातीपासून कपबशा, बरण्या, मुखवटे, कुंड्या अशा उपयोगी तसेच शोभेच्या वस्तू बनवल्या जातात. मुलतानी माती सौंदर्य प्रसाधन म्हणून वापरली जाते.
  • शहाबादी फरशी तसेच संगमरवर, कडप्पा अशा दगडांचा वेगवेगळ्या बांधकामात उपयोग केला जातो.

धातूपाषण (Ores) म्हणजे धातूचा असा कोणताही भाग की जो आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचा असून अशुद्ध स्वरूपात आढळतो. सहसा खाणीमध्ये धातूपाषण आढळत असून उष्णतेच्या आधारे गाळण प्रक्रियेने (Smelting) यातील अशुद्धी बाहेर काढली जाते. उदाहरणार्थ डोलोमाईट, क्रोमाइट, मॅग्रेटाइट इत्यादी.

जलसंजीवनी तयार करण्याची पद्धत

  • उकळून थंड केलेले एक लिटर पाणी घ्या.
  • त्यामध्ये शिगोशिग भरलेली चहाचे आठ चमचे साखर आणि अर्धा चमचा नेहमीच्या वापरातले मीठ घाला. चव येण्यासाठी लिंबाच्या रसाचे थेंब घाला.
  • मिश्रण चांगले ढवळा आणि हे मिश्रण थोड्या थोड्या वेळाने पिण्यास द्या.
  • यापासून मिळणाऱ्या शुद्धधातूंचा उपयोग कारखान्यांमध्ये केला जातो. आणि हत्यारे, यंत्रे व घरामध्ये वापरली जाणारी भांडी इत्यादी बनवली जातात.
  • महाराष्ट्र शासन विविध अभयारण्य स्थापन करून प्राण्यांचे संवर्धन करीत आहे. अमरावती जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प, सोलापूर येथे माळढोक पक्षी अभयारण्य, कोल्हापूर येथे राधानगरी अभयारण्य तर धुळे येथे अनेरडॅम पक्षी अभयारण्य हे आहेत.
  • पाणी, वारा यांच्यामुळे जमिनीवरील माती कमी होणे याला जमिनीची धूप असे म्हणतात. जमिनीची धूप रोखण्यासाठी वृक्षारोपण करणे, जमिनीचे लहान लहान सपाट भाग करणे, उताराच्या बाजूने पाणी अडवणारे आडवे बांध घालणे, असे उपाय करू शकतो कारण खडकांपासून मातीचा 2.5 सेंटीमीटर पातळ थर तयार होण्यासाठी सुमारे 800 ते 1000 वर्षांचा काळ लागू शकतो.
  •  नैसर्गिक साधन संपत्तीच्या संवर्धनासाठीचा एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने राज्याच्या काही भागात दुष्काळावरमात करण्यासाठी2014-15 पासून महाराष्ट्रातील 22 टंचाईग्रस्त जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ केलेला असून 2019 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्याचा निर्धार केलेला आहे. याअंतर्गत पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविणे, पाणीसाठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे, बधारे, गाव तलाव, पाझर तलाव, इत्यादी जलस्रोतांची साठवण क्षमता वाढवणे अशी कामे सुरू आहेत.
  • पदार्थ सुक्ष्म कणांचे बनलेले असतात. आपण जे पदार्थ पाह शकतो, स्पर्श करू शकतो त्यांना द्रव्य म्हटले जाते.
  •  पदार्थ सुक्ष्म कणांचे बनलेले असतात. आपण जे पदार्थ पाह शकतो, स्पर्श करू शकतो त्यांना द्रव्य म्हटले जाते.
  • सर्व पदार्थ सूक्ष्मकणांचे बनलेले असतात. चराचर सृष्टीतील वस्तूंचे 7 गटांत वर्गीकरण होत असून पदार्थाच्या सूक्ष्मातीसूक्ष्म कणांना 'पीलव' असे नाव भारतातील प्राचीन तत्त्वज्ञ महर्षी कणाद यांनी दिले आहे. शेतातील धान्याचे कण वेचून त्यावर उदरनिर्वाह महर्षी करीत असल्यामुळे त्यांना 'कणाद' असे नाव पडले.
  • त्यांचा जन्म इ.सन पूर्व सहाव्या शतकात प्रभास क्षेत्र म्हणजे सध्याच्या गुजरात राज्यातील सोरटी सोमनाथ जवळच्या प्रभासपट्टण येथे झाला असून त्यांचे मूळ नाव उलूक होते.
  •  कोणत्याही पदार्थामध्ये असणारा द्रव्यसंचय म्हणजे त्या पदार्थाचे वस्तुमान (Mass) असून ते कधीच बदलत नाही. ते सगळीकडे सारखेच असते तर एखाद्या वस्तूवर गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होऊन येणारी राशी म्हणजे वजन (Weight At) होय.


No comments

Hindi vyakaran Mock Test

Scholarship Exam 2024 PAPER 1/2 : Hindi अनेकार्थी शब्द Start The Quiz Time's Up score: Next question See Your Result Total Quest...

Powered by Blogger.