नागपूर जिल्हा
| विभागाचे नाव | नागपूर विभाग |
| मुख्यालय | नागपूर |
| तालुके | १.नागपूर शहर, २.नागपूर ग्रामीण, ३.सावनेर, ४.कळमेश्वर, ५.नरखेड, ६.काटोल, ७.पारशिवनी, ८.रामटेक, ९.हिंगणा, १०.मौदा, ११.कामठी, १२.उमरेड, १३.भिवापूर १४.कुही |
| क्षेत्रफळ | ९,८९७ चौरस किमी (३,८२१ चौ. मैल) |
| लोकसंख्या | ४६,५३,१७१ (२०११) |
| लोकसंख्या घनता | ४७० प्रति चौरस किमी (१,२०० /चौ. मैल) |
| शहरी लोकसंख्या | ६४.२६% |
| साक्षरता दर | ८९.२५% |
| लिंग गुणोत्तर | १.०५ ♂/♀ |
| | |
| लोकसभा मतदारसंघ | नागपूर, रामटेक |
| विधानसभा मतदारसंघ | १.नागपूर उत्तर , २.नागपूर दक्षिण पश्चिम, ३. नागपूर दक्षिण, ४. नागपूर पश्चिम, ५.नागपूर पूर्व, ६.नागपूर मध्य, ७.उमरेड, ८.काटोल, ९.कामठी, १०.रामटेक, ११.सावनेर, १२.हिंगणा |
नागपूरचा इतिहास:
महाराष्ट्राची हिवाळी राजधानी असलेले नागपूर हे अतिशय झपाट्याने विकसित होत असलेले आणि मुंबई व पुण्यानंतर राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. 2011 च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या 24 लाख 5 हजार 421 इतकी होती. नागपूर शहराचा भौगोलिक भूभाग देशाच्या नागरी प्रदेशातील 13 वा मोठा भूभाग आहे. अलीकडेच भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून आणि दुसरे हरित शहर म्हणून नागपूरला मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होत असल्याने महाराष्ट्राच्या विदर्भातील व्यावसायिक आणि राजकीय हालचालींचे प्रमुख केंद्र अशीही नागपूरची ओळख आहे. विदर्भात विशेषत: नागपूर जिल्ह्यात संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असल्याने या शहरातून देशभरात संत्र्याचा व्यापार मोठ्या प्रमाणात होत असतो. यामुळेच संपूर्ण देशात नागपूरची ओळख संत्रा नगरी अशीही आहे. याशिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपुरात असल्याने तसेच दलित बौद्ध चळवळीचेही नागपूर हेच महत्त्वाचे केंद्र असल्याने राजकीयदृष्ट्यादेखील या शहराचे विशेष महत्त्व आहे.
या शहराची स्थापना गोंड राजाने केली असली, तरी भोसलेंच्या राज्यकाळात ते मराठा साम्राज्याचा भाग बनले. ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने 19 व्या शतकात या शहराची सूत्रे आपल्या हातात घेतली आणि सेंट्रल प्रोव्हिअन्स अॅण्ड बेरारची राजधानी म्हणून नागपूरची घोषणा करण्यात आली. पहिल्या राज्य पुनर्गठनानंतर नागपूरने आपला राजधानीचा दर्जा गमविला. तथापि, राजकीय नेत्यांमध्ये झालेल्या नागपूर करारानुसार नागपूरला महाराष्ट्राची दुसरी राजधानी करण्यात आले. या शहराने भारतातील अनेक व्याघ्र प्रकल्पांना जगाशी जोडले असल्याने नागपूरला भारताची व्याघ्र राजधानी असेही म्हटले जाते. पुण्यानंतर महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राकरिता महत्त्वाच्या असलेल्या शहरांमध्येही नागपूरचे नाव प्राधान्याने घेतले जाते. झिरो माईलचे चिन्हांकन हे नागपुरातच आहे आणि ते भारताच्या भौगोलिक केंद्रंबिंदूचे संकेत असल्यानेदेखील नागपूर हे देशाचे मध्यवर्ती शहर ठरले आहे.
कन्हान नदीची उपनदी असलेली नागनदी नागासारखीच वाहात असल्याने आधी या शहराचे नाग असे नाव पडले आणि या नाग नदीमुळेच नागपूर असे नाव ठेवण्यात आले. काहींच्या मते, जुन्या नागपूरमधून नागनदी वाहात असल्याने या शहराचे नाव नाग नदीवरून ठेवण्यात आले आहे आणि देशातील विविध शहरे, तालुका आणि गावांच्या नावापुढे ज्या प्रकारे पूर हे विशेषण देण्यात आले आहे, त्याचप्रकारे नाग या नावापुढे पूर असे नाव देण्यात आले. याच अनुषंगाने नागपूर महानगर पालिकेच्या सिम्बॉलवर नाग दाखविण्यात आला आहे.
या शहरात तीन हजार वर्षांआधीपासून अर्थातच इ.सनपूर्व आठव्या शतकापासून मानवी अस्तित्व असल्याचे पुरावे सापडू शकतात. दृगधामणा (म्हाडा कॉलनीजवळ) येथे असलेल्या मेहीर समाधीमुळे नागपूरच्या परिसरात स्मारकांची (मेगालिथीक) संस्कृती अस्तित्वात असल्याचे संकेत मिळतात. नागपूर शहराचा पहिला संदर्भ दहाव्या शतकात शेजारील वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे आढळून आलेल्या ताम्रपटावर उल्लेखित आहे. 862 मध्ये राष्ट्रकुटचे राजे कृष्णा (तृतीय) यांच्या काळात नागपूर आणि नंदीवर्धनाच्या विसाया जिल्ह्यात असलेल्या गावात हा उल्लेख अजूनही आहे. तिसर्या शतकाच्या अखेरीस राजे वाकाटाका घराण्याचे राजे विद्याशक्ती यांनी नागपूरवर राज्य केले असल्याचे म्हटले जाते. चोथ्या शतकात वाकाटाका साम्राज्याचे नागपूर प्रांत आणि आसपासच्या परिसरावर राज्य होते. त्यांचे गुप्ता साम्राज्यासोबत चांगले संबंध होते. वाकाटाका साम्राच्याचे राजे पृथ्वीसेन (प्रथम) नागपूरपासून 28 किलोमीटर अंतरावर असलेल्या नगरधन (प्राचिन नाव नंदीवर्धना) असे नाव असलेल्या आपल्या राजधानीकडे वळले. वाकाटाका साम्राज्यानंतर हा प्रांत बदामीचे चालुक्य,राष्ट्रकुट यांच्या अधिकारात आले आणि त्यानंतर या प्रांतावर यादवांचे साम्राज्य आले. इ.सनपूर्व 1296 मध्ये अलाउद्दिन खिल्जीने यादव साम्राज्यावर आक्रमण केले आणि देवगिरीवर ताबा मिळविला. यानंतर 1317 मध्ये तुघलक साम्राज्य सत्तेत आले. सतराव्या शतकात मुघलांनी या प्रांतावर आपले राज्य प्रस्थापित केले. तथापि, प्रांतीय प्रशासनाची सूत्रे मध्यप्रदेशच्या छिदवाडा जिल्ह्यातील देवगड नागपूरच्या गोंड राजांकडेच होती.
देवगड — नागपूर साम्राज्याचे राजकुमार बख्त बुलंद यांनी नागपूरची स्थापना केली असल्याचे ताजा इतिहास सांगतो. त्यानंतरचा देवगडचा राजा चांद सुल्तान होता. त्याने नागपूरला आपली राजधानी निश्चित केले हकेली आणि या शहराला त्याने वॉल सिटी बनविले होते. 1739 मध्ये चांद सुल्तानचे निधन झाल्यानंतर चांद सुल्तानचा अनौरस पुत्र वाली शाह हा राजा झाला आणि चांद सुल्तानची विधवा पत्नी आपली दोन मुलेे अकबर शाह आणि बुरहान शाह यांचे हित जोपासण्यासाठी बेरारचे मराठा नेते रघुजी भोसले यांना जाऊन मिळाली. 1743 नंतर मराठा राज्यकर्ते सत्तेवर येऊ लागले. रघुजी भोसले यांच्यापासून ही सुरुवात झाली. देवगड, चांदा आणि छत्तीसगड या प्रांतांवर त्यांनी 1751 पर्यंत राज्य केले.
1803 मध्ये राघोजी (द्वितीय) दुसर्या अँग्लो —मराठा युद्धाच्या काळात ब्रिटीशांविरोधात पेशव्यांना जाऊन मिळाले. पण, या युद्धात ब्रिटीशांचा विजय झाला. 1816 मध्ये राघोजी (द्वितीय) यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मुलगा पारसाजी याला मुधोजी (द्वितीय) याने हद्दपार केले आणि त्याचंी हत्या केली. 1817 मधील मुधोजी तिस-या आन्गलो — मराठा युद्धाच्या काळाच्या काळात मुधोजी इंग्रजांविरोधात पेशव्यांना जाऊन मिळाले. पण, सध्या नागपूर शहरात असलेल्या सीताबर्डी येथील युद्धात त्यांचा पराभव झाला. हे युद्ध भोसल्यांच्या साम्राज्यासाठी ‘टर्निंग पॉईंट’ ठरले. या युद्धानंतर भोसल्यांच्या साम्राज्याला घरघर लागली आणि ब्रिटीशांनी नागपूर शहर काबिज केले. तात्पुरत्या ताजपोशीनंतर मुधोजींना हद्दपार करण्यात आले आणि ब्रिटीशांनी राघोजी (द्वितीय)चे नातू राघोजी (तृतीय) यांच्या डोक्यावर राजमुकुट ठेवला. 1840 पर्यंत त्यांची सत्ता होती. त्यांच्या सत्तेच्या काळात या प्रांताची प्रशासकीय सूत्रे इंग्रज रेसिडेंटच्या हातात होती. राघोजी (तृतीय) यांच्या निधनानंतर 1853 मध्ये ब्रिटिशांनी नागपूरची सूत्रे आपल्या हातात घेतली.
1853 ते 1861 या काळात नागपूर, छिदवडा आणि छत्तीसगडचा समावेश असलेला नागपूर प्रांत सेंट्रल प्रोव्हिअन्स अॅण्ड बेरारचा भाग बनले आणि ब्रिटीश केंद्रीय सरकारमध्ये हे शहर आयुक्तांच्या प्रशासकीय नियंत्रणात आणण्यात आले. नागपूरला या प्रांताची राजधानी करण्यात आले. 1903 मध्ये यात बेरारचा समावेश करण्यात आला. टाटा समुहाने 1 जानेवारी 1877 मध्ये देशातील पहिली टेक्सटाईल मिल नागपूर येथे सुरू केली. सेंट्रल इंडिया स्पिनींग अॅण्ड विविंग कंपनी लिमिटेड असे या कंपनीचे नाव होते.
1920 च्या नागपूर अधिवेशनात असहकार चळवळ सुरू करण्यात आली. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सेंट्रल प्रोव्हिअन्स अॅण्ड बेरार भारताचा प्रांत बनले आणि 1950 मध्ये मध्यप्रदेश या नावासह भारताचे राज्य झाले. पुन्हा एकदा या राज्याची राजधानी नागपूरलाच करण्यात आले. तथापि, 1956 मध्ये भाषिक आधारावर भारतातील राज्यांचे पुनर्गठन करण्यात आले आणि नागपूर व बेरार प्रांत बॉम्बे राज्याकडे सोपविण्यात आले. 1960 मध्ये बॉम्बे राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली.
14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे आयोजित औपचारिक जाहीर मेळाव्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या असंख्य अनुयायांसमवेत बोद्ध धम्म स्वीकारला आणि दलित— बोद्ध चळवळ सुरू केली. ही चळवळ आजही सक्रिय आहे. आगामी काळातही विकास आणि भरभराटीची क्षमता नागपूर शहरात आहे. नागपूरच्या प्रगती, विकास आणि भरभराटीत योगदान देणे महाराष्ट्र आणि भारत सरकारसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. 2002 मध्येच नागपूर शहराने आपल्या स्थापनेची 300 वर्षे पूर्ण केली आहेत. हा 300 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी शहराच्या विविध भागांमध्ये अनेक कार्यक्रम आयोेजित करण्यात आले होते.
भूगोल आणि हवामान
नागपूर जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग िंछदवाडा आणि मध्यप्रदेशच्या सिवनी जिल्ह्याने व्यापलेला आहे आणि पूर्वेला भंडारा जिल्हा आहे. दक्षिण आणि पश्चिमेकडे अनुक्रमे चंद्रपूर आणि वर्धा जिल्हा आहे. तर, वायव्येचा काही भाग अमरावती जिल्ह्याने व्यापलेला आहे.
नागपूर जिल्ह्यात नैसर्गिक आणि मावननिर्मित तलाव आहेत. यात अंबाझरी तलाव हा सर्वात मोठा आहे. अन्य नैसर्गिक तलावांमध्ये गोरेवाडा आणि तेलंगखेडी तलावाचा समावेश आहे. सोनेगाव आणि गांधीसागर हे तलाव मनुष्यनिर्मित असून, शहरातील ऐतिहासिक राज्यकर्त्यांनी त्यांची निर्मिती केली आहे. नाग नदी, पिली नदी आणि काही नाले हे शहराकरिता सांडपाणी वाहून नेणारे नैसर्गिक मार्ग आहेत. हिरवेगार शहर म्हणून नागपूरची ओळख आहे. छत्तीसगडनंतर भारतातील दुसरे सर्वाधिक हिरवेगार आणि स्वच्छ शहर म्हणून नागपूरला मान्यता देण्यात आली आहे. नागपूर शहर हे नैसर्गिक साधनांसाठी समृद्ध आहे. कृषी क्षेत्रासोबतच सोयाबिन, जवार आणि खनीज संपत्तीचे विपूल साठे या जिल्ह्यात आहेत. सागवन आणि गवताचे सर्वात मोठे उत्पादन नागपूर जिल्ह्यात होत असते. याशिवाय, मँगनिजचे मोठे साठेही या जिल्ह्यात आहेत.
हवामान
बंगालचा उपसागर आणि अरेबिअन समुद्रापासून दूर असलेल्या भारतीय द्विपकल्पाच्या मध्यभागी असलेल्या नागपूर शहराचे हवामान आर्द्र आणि कोरडे आहे. या शहरात वर्षातील बहुतांश काळ कोरडेच हवामान असते. जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या काळात नागपुरात 1205 मिमी इतका पाऊस पडत असतो. 14 जुलै 1994 रोजी या शहरात एकाच दिवशी 304 मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली होती. मार्च ते जून या उन्हाळ्याच्या काळात उनही तितकेच तापत असते. मे महिन्यात सर्वाधिक तापमान असते. नोव्हेंबर ते जानेवारी हा काळ हिवाळ्याचा असतो. हिवाळ्यात 10 अंशपर्यंत तापमान खाली येत असते. 29 मे 2012 रोजी या शहरात 48.6 अंश सेल्सिअस इतक्या महत्तम तापमानाची आणि 1937 मध्ये 3.9 अंश इतक्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली होती.
नागपूर जिल्ह्यात सरासरी 1064.1 मिमी इतका सरासरी पाऊस पडत असतो. उमरेड, कुही आणि भिवापूर तहसिलीत सर्वाधिक पाऊस होतो, तर जिल्ह्यातील अन्य तहसिलींच्या तुलनेत काटोल आणि नरखेड तहसिलींमध्ये कमी पाऊस होतो.
भेट देण्यासारखी स्थळे
नवेगाव येथील कुंवारा भिवसेन बाबा मंदिर :नागपूर जिल्ह्याच्या पारसिवनी तहसीलमध्ये हे मंदिर आहे. मध्य भारतातील गोंड िंकवा अन्य आदिवासी समाज आणि इतकेच काय, तर िंहदू भाविकांची पावलेही चैत्र महिन्यात या मंदिराची वाट धरत असतात. गोंड आदिवासींचे चौथे धर्मगुरू असलेले कुंवारा भिवसेन बाबा यांचा हा जयंतीचा काळ असल्याने त्यांच्या या मंदिराकडे चेत्र महिन्यात दररोजच हजारो भाविक दर्शनासाठी जात असतात. मनातील इच्छा पूर्ण झालेले भाविक येथे वेगवेगळ्या स्वरूपाचे उत्सव साजरे करीत असतात. यात ढोल वाजवून नृत्य करणे, जनावरांचा बळी देणे आणि मांसाहाराचे जेवण शिजवून ते प्रसाद म्हणून खाणे आदी परपंरांचा यात समावेश आहे. या मंदिरात चैत्र महिन्यात भव्य भिवसेन जत्रा भरत असते. पेंच जलाशयाच्या किनार्यावर असलेल्या या मंदिरातील जत्रेच्या काळात महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेशातून हजारो भाविक येथे येत असतात. भिवसेन हे भगवान महादेवाचे अंश आहेत, असा गांेंड समाजाचा विश्वास आहे.
सती अनुसया माता मंदिर, पारडिंसगा :श्री वैदेही सती अनुसया माता यांचा जन्म 5 मे 1926 रोजी काटोल तहसिलीच्या पारडिंसगा येथील माता अनाई आणि पिता रामजी यांच्या घरी पाचव्या कन्येच्या रूपात झाला. पारडिंसगातील नागरिकांसोबत राहताना, त्यांच्यासोबत खेळताना, गाणी म्हणताना अनुसया माता यांनी त्यांच्यावर सहा दशके प्रेम केले, त्यांना आपुलकी दिली, त्यांची सर्व दु:खे नष्ट केली, त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या आणि प्रत्येेक कुटुंबातील प्रमुख म्हणून त्यांनी कर्तव्य पार पाडले. अनुसया मातेच्या हृदयात प्रत्येकांविषयी असलेलेे प्रेम पाहून पारडिंसगावासियांना कधीच दुसर्या कोणत्याही देवाची गरज भासली नाही. त्यांनी माता अनुसयाचेच मंदिर गावात बांधले.
गुरुद्वारा सिंग सभा, कामठी रोड, नागपूर: नागपूरच्या उत्तरेकडे तीन किलोमीटर अंतरावर कामठी मार्गावरील गुरुद्वारा सिंग सभा हे शहरातील सर्वात जुने गुरुद्वारा आहे. या गुरुद्वाराची वास्तू संगेमरमरने बांधण्यात आली असून, 12 हजार चौरस फुट जागेत भोजनाची व्यवस्था आहे. येथील स्वयंपाकघर अतिशय अत्याधुनिक आणि स्वच्छ आहे. मुख्य दिवानखाना 14 हजार चौरस फुटाचा असून, तो पूर्णपणे संगेमरमरचा आहे. गुरुद्वाराचे मुख्य द्वार 30 फूट उंच आहे. भेेटीस येणार्यांसाठी 15 खोल्या असून, गुरुद्वाराच्या वरच्या मजल्यावर सेवाभावी लोकांच्या राहण्याची व्यवस्था आहे.
गुरुद्वारा िंसग सभाच्या अस्तित्वामागे एक इतिहास आहे. 1885 मध्ये नागपुरात स्थायी झालेली एक धार्मिक व्यक्ती सरदार बुध िंसग यांनी 1915 मध्ये गुरुद्वाराची मुख्य इमारत बांधली. 1927 मध्ये काही शिख कुटुंब पंजाबहून स्थलांतरित होऊन नागपूरात स्थायीक झाले. त्यांनी रेल्वे अभियंता असलेले निर्मल तेजसिंगजी यांच्या मार्गदर्शनाखाली पंजाबी लाईन भागात आणखी एका गुरुद्वाराचंी निर्मिती केली. 1948 च्या काळात दोन्ही गुरुद्वारा एकाच व्यवस्थापनाअंतर्गत आणण्यात आले. 1998 मध्ये या गुरुद्वारांचे नूतनीकरण करून त्याचा विस्तार करण्यात आला आणि त्याला गुरुद्वारा श्री गुरू िंसग सभा असे नाव देण्यात आले.
बोहरा मशिद, नागपूर :कलाकृतीची असाधारण वास्तू असलेली बोहरा मशिद डोळ्यांचे पारणे फेडणारी अशीच आहे. नागपूरच्या शांतीनगर भागात ही मशिद आहे. इतवारी भागात असलेली ही मशिद मूळची नागपूरच्या दाऊदी बोहरा समाजाची आहे. या समुदायाचे सदस्य हे इस्लामची उपशाखा असलेल्या बोहराशी संबंधित आहेत. इस्लामवर विश्वास ठेवणारे जगभरातील असंख्य लोक प्रत्येक शुक्रवारी या मशिदीत नमाजासाठी एकत्र येऊ लागले. मशिदीच्या संकुलात समुदायासाठी भव्य सभागृह आहे. या समुदायाच्या महोत्सव, लग्न समारंभ आणि अन्य कार्यक्रमांसाठीही या सभागृहाचा वापर होत असतो.
हजरत ताजुद्दिन बाबा दर्गा, नागपूर : ताजुद्दिन बाबा (21 जानेवारी 1861 ते 17 ऑगस्ट 1925) हे सुफी गुरू होते. त्यांचे अनुयायी त्यांना सद्गुरू या नावाने ओळखायचे. ते नागपुरात राहात होते. ताजुद्दिन हे तरुण वयातच अनाथ झाले. आजी आणि काका अब्दुल रेहमान यांनी त्यांचा सांभाळ केला. नागपूरजवळील कामठी येथे असलेल्या मदारशात ते सहभागी झाले. तिथे त्यांची भेट हजरत अब्दुल्ला शाह यांच्यासोबत झाली. त्यांनी ताजुद्दिन यांना धार्मिक मार्ग दाखविला. शाह यांनी त्यांना सुकामेवा खायला दिला आणि ‘कमी खा, कमी झोपा, कमी बोला व कुराण वाचा’ हा मंत्र दिला. शाह यांच्या वास्तव्यात ताजुद्दिन यांना नवा अनुभव मिळाला, नवी दिशा मिळाली. ते स्वत:लाही विसरून गेले. यानंतर युवाकाळात ताजुद्दिन अवलियासारखेेच वागू लागले. त्यांनी आपल्या अंगातील वस्त्रेही काढून टाकली.त्यावेळी एका ठिकाणी ब्रिटीश पोलो हा खेळ सुरू होता. ताजुद्दिन तिथपर्यंत विवस्त्रावस्थेत गेले. या स्पर्धेत सहभागी असलेल्या ब्रिटीश महिलांना त्यांना या अवस्थेत पाहून धक्का बसला आणि त्यांना वेडा समजून नागपुरातील मानसिक उपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. या रुग्णालयात ते संत म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांची ही ओळख रुग्णालयाच्या बाहेरपर्यंत गेली. मोठ्या संख्येत लोक ताजुद्दिन बाबांच्या दर्शनासाठी रुग्णालयात येऊ लागले. कालांतराने त्यांना माफ करण्यात आले आणि महाराज रघुजी भोसले यांनी त्यांना रुग्णालयातून बाहेर आणले आणि आपल्या महालात नेले. भोसले यांनी सक्करदरा येथील आपली लाल कोठी ताजुद्दिन बाबांना अर्पण केली. ताजुद्दिन बाबा आजही मुस्लिम आणि िंहदू या दोन्ही समाजासाठी पूज्यनीय आहेत.
तेलनखेडी शिव मंदिर, नागपूर : भगवान शिवशंकराचे असलेले हे शिवमंदिर येथील प्रसिद्ध हनुमान मंदिराच्या अगदी समोर आहे. शिवभक्तांसाठी हे मंदिर प्रख्यात धार्मिक स्थळच बनले आहे. मंदिराच्या प्रवेश द्वारावरच नंदीची भव्य मूर्ती आहे. या मंदिराचे बांधकाम लहान असले, तरी मंदिर आणि मंदिराचा परिसर अतिशय आकर्षक आहे. हे मंदिर फार प्राचिन आहे. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी होत असते. या परिसराच्या सभोवताल िंहदू देवी—देवतांची अनेक मंदिरे आहेत.
श्री शांतीनाथ जैन मंदिर, रामटेक, नागपूर : रामटेक याच नावाने गावाबाहेर वसलेले रामटेक हे प्राचिन स्थळ श्री शांतीनाथ दिगंबर जैन अतिशया क्षेत्र या नावाने ओळखले जाते. यात 15 मंदिरांचा समावेश असून, हा संपूर्ण परिसर िंभतीने वेढलेला आहे. भगवान शांतीनाथांची मूर्ती शांतीनाथ मंदिरात आहे. या मंदिरात आलेल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी या मंदिराची महंती आहे. कवी कालीदासांनी आपल्या मेघदूत या काव्यातही रामटेकचे वर्णन केलेले आहे. प्रभू श्रीरामचंद्रांनी या ठिकाणी एकदा भेट दिली असे म्हणतात, आणि म्हणूनच या परिसराचे नाव रामटेक असे पडले.
याबाबत अशी कथा आहे की, नागपूरचे राज्यकर्ते अप्पासाहेब भोसले आपले मंत्री वर्धमान सवाजी यांच्यासोबत सुमारे 400 वर्षांपूर्वी रामटेकला आले होते. श्रीरामाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी सवाजी यांना आपल्यासोबत जेवण करायला बोलावले. पण, जैन असलेले सवाजी यांनी आपल्या देवाच्या दर्शनाआधी जेवण करण्यास नकार दिला. त्यामुळे भोेसले यांच्या आदेशानुसार त्यांच्या धार्मिक स्थळाचा शोध सुरू झाला. एका झाडाच्या खाली भगवान शांतीनाथ यांची मूर्ती आढळून आली. या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर सवाजी यांनी जेवण घेतले. जिथे भगवान शांतीनाथाची मूर्ती आढळून आली, त्याच ठिकाणी जैन मंदिर बांधण्याचे आदेश अप्पासाहेब भोसले यांनी दिले. जवळच्या एका टेकडीवर रामाचे मंदिरही बांधण्यात आले.
ड्रॅगन पॅलेस विहार, कामठी, नागपूर: नागपूरजवळील कामठी येथे असलेले ड्रॅगन पॅलेस हे बौद्धांचे विहार असून, तथागत बुद्धाला ते अर्पण करण्यात आले आहे. हे विहार शिल्पकृतीचे असाधारण प्रतीक आहे. जपानच्या मदर नोरिको ओगावा सोसायटीने या विहारची स्थापना केली.
अद्वितीय कलाकृतीचे हे एक सर्वोत्तम प्रतीक आहे. पर्यटकांचे आकर्षण ठरलेले नागपूरजवळच्या कामठी येथील हे सर्वात लोकप्रिय स्थळ आहे. जपानच्या ओगावा सोसायटीच्या मॅडम नोरिको ओगावा यांनी ड्रॅगन पॅलेस विहारच्या बांधकामात मोठे आर्थिक योगदान दिले असल्याने नागपूर जिल्हा हा भारत—जपान मैत्रीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. नागपूरचे लोटस मंदिर अशीही या विहारची ओळख आहे. हिरवळ, रंगिबेरंगी फुलांचा बगिचा आहे. यामुळे हा परिसर सुशोभित आणि आल्हाददायक झालेला आहे. या विहाराच्या भिंतींना पांढरा शुभ्र रंग देण्यात आला असून, तो शांतता, समानता आणि धर्माचे प्रतीक आहे.
श्री साईबाबा मंदिर, वर्धा रोड नागपूर: शिर्डीच्या साईबाबांना अर्पण करण्यात आलेले हे मंदिर नागपुरातील वर्धा मार्गाला लागून असलेल्या विवेकानंद नगर परिसरात वसलेले आहे. साईबाबा हे योगी आणि फकीर होते. भगवान कृष्णाचा अवतार म्हणून िंहदू भाविक त्यांची श्रद्धेने पूजा करतात. इस्लाम भाविक त्यांना मुस्लिम फकीर म्हणून ओळखतात. असे म्हणतात की, या मंदिरावर साईबाबांचे आर्शीवाद आहेत. या मंदिरात दररोज सुमारे दोन हजार भाविक दर्शनासाठी येत असतात. पण, गुरुवारी भाविकांची संख्या 25 हजारांच्या घरात जात असते.
श्री महालक्ष्मी जगदंबा माता मंदिर, कोराडी : नागपूरच्या उत्तरेकडे 15 किलीमीटर अंतरावर कोराडी तलावाच्या किनार्यावर हे मंदिर वसलेले आहे. देवी महालक्ष्मीला अर्पण करण्यात आलेले हे एक ऐतिहासिक मंदिर आहे. नवरात्री उत्सवाच्या काळात सर्वच नऊ दिवस या मंदिरात दिवस—रात्र भाविकांची अलोट गर्दी असते. या काळात रात्रीच्या सुमारास सुमारे 50 हजार दीप जळत असतात.
धापेवाडा विठोबा मंदिर, नागपूर :चंद्रभागा नदीच्या किनार्यावर धापेवाडा हे गाव आहे. विठोबाचे मंदिर हेच या गावाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. या मंदिरातून संपूर्ण नदीचे सौंदर्य न्याहाळता येते. राजा बाजीराव भोसले यांचे दिवान उमाजी आबा यांनी हे मंदिर स्थापन केले आहे. विदर्भाची पंढरी म्हणूनही धापेवाडाची ओळख आहे.
आदासा गणपती मंदिर, नागपूर : सावनेर—कळमेश्वर मार्गावर नागपूरच्या वायव्येकडे 43 किलोमीटर अंतरावर असलेले आदासा हे अतिशय लहानसे गाव. अनेक प्राचिन आणि ऐतिहासिक मंदिरांसाठी हे गाव प्रख्यात आहे. अतिशय प्राचिन आदासा गणपती हे येथील मुख्य मंदिर आहे. अष्टविनायकापैकी एक अशी या मंदिराची ओळख आहे. 12 फूट उंच आणि 7 फूट व्याप्ती असलेला आदासा गणपती स्वयंभू प्रगट झाला असल्याचे म्हटले जाते. या मंदिराशिवाय, सुमारे 10 हेक्टरच्या या परिसरात आणखी 20 लहान मंदिरेही आहेत. गावाला लागूनच एक टेकडी आहे आणि त्यावर महादेवाचे मंदिर आहे. यात तीन स्वयंभू लिंग असून, ती जमिनीतून वर आली असल्याचे बोलले जाते.
श्री पोद्दारेश्वर राम मंदिर, नागपूर :नागपूर रेल्वे स्थानकापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर सेंेट्रल एव्हेन्यू मार्गावर असलेले हे मंदिर भगवान श्रीराम आणि भगवान महादेवाला समर्पित आहे. राम मंदिरात भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांची मूर्ती आहे. जमनाधर पोद्दार यांनी 1923 मध्ये या मंदिराची स्थापना केली आहे.
या मंदिराचे जो कुणी दर्शन घेईल, त्यांच्या मनाला शांतता मिळते, या विश्वासाने देशाच्या कानाकोपर्यातून भाविक या मंदिरात येत असतात. या मंदिराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे, रामनवमीच्या दिवशी या मंदिरातून निघणारी भव्य शोभायात्रा होय.
टेकडी गणपती मंदिर, नागपूर: रेल्वे स्थानकाजवळ असलेले हे गणपती मंदिर हे नागपुरातील अतिशय प्राचिन आणि लोकप्रिय मंदिर आहे. हे मंदिर टेकडंीवर बांधण्यात आले असल्याने त्याला टेकडी गणपती मंदिर असे म्हटले जाते. नागपूरच्या राजे भोसले यांनी हे मंदिर बांधले असून, ते सुमारे 250 वर्षे जुने असल्याचे समजते.
दीक्षा भूमी, नागपूर :जगभरातील बौद्ध बांधवांचे हे अतिशय पवित्र आणि श्रद्धेचे ठिकाण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे 3 लाख 80 हजार अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 रोजी बोद्ध धम्म स्वीकारला होता. त्यांनी स्वीकारलेली ही दीक्षा आजही देशातील असंख्य लोकांसाठी प्रेरणादायी आहे.
भारतातील भीमबांधवांसाठी दीक्षाभूमी हे श्रद्धास्थळच आहे. प्रत्येक वर्षी अशोक विजया दशमी आणि 14 ऑक्टोबर रोजी (बाबासाहेबांनी दीक्षा स्वीकारली तो दिवस) येथे लाखो बौद्ध बांधव भेट देत असतात. या जागेवर भव्य स्तूप उभारण्यात आलेला आहे.
भारतातील भीमबांधवांसाठी दीक्षाभूमी हे श्रद्धास्थळच आहे. प्रत्येक वर्षी अशोक विजया दशमी आणि 14 ऑक्टोबर रोजी (बाबासाहेबांनी दीक्षा स्वीकारली तो दिवस) येथे लाखो बौद्ध बांधव भेट देत असतात. या जागेवर भव्य स्तूप उभारण्यात आलेला आहे.
जागेत बौद्धधमांची दीक्षा स्वीकारतात, ती जागा. बाबासाहेबांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या असलेल्या दोन जागांपैकी एक म्हणजेदीक्षाभूमी असून, दुसरी म्हणजे, मुंबईतील चैत्य भूमी आहे. अतिशय सुंदर असे वास्तूशिल्प आणि ऐतिहासिक महत्त्व यामुळे संपूर्ण जगात दीक्षाभूमी प्रसिद्ध आहे. भारतातील पर्यटकाचेही हे मुख्य केंद्र आहे.
गड मंदिर (राम मंदिर), रामटेक: रामटेक येथे भगवान श्रीरामाचे ऐतिहासिक मंदिर आहे. वनवासाच्या काळात श्रीरामांनी ज्या—ज्या ठिकाणी काही काळ विश्रांती घेतली होती, त्यातील एक स्थळ म्हणजे रामटेक आहे, असे म्हटले आहे. रामटेकच्या जवळच महान अगस्त्य ऋषींचे आश्रम होते, अशीही आख्यायिका आहे. या आश्रमात ऋषी तप करायचे आणि राक्षस त्यांची तपश्चर्या उद्ध्वस्त करायचे. भगवान श्रीरामांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संपूर्ण श्रृष्टी राक्षसांपासून मुक्त करण्याची प्रतिज्ञा घेतली.
स्थानिक भाषेत टेकचा अर्थ प्रतिज्ञा असा होत असल्यामुळे या जागेला रामटेक असे नाव पडले आहे. त्यामुळे असे म्हटले जाते की, रामटेक येथे जो कुणी प्रतिज्ञा घेत असतो, त्याची प्रतिज्ञा पूर्ण होत असते. अनेक शतकांपासून येथे श्रीरामाच्या पादुका पूजेसाठी ठेवल्या जातात, असेही म्हटले जाते.
छिंदवाड्यातील देवगड किल्ला सर केल्यानंतर नागपूरचे राजे रघुजी भोसले यांनंी या मंदिराची स्थापना केली असल्याचे सांगितले जाते. महान कवी कालिदास यांच्या वास्तव्यामुळेही या जागेला ऐतिहासिक महत्त्व आहे. रामटेकच्या टेकडीवर बसूनच कालिदासांनी ‘मेघदूतम’ लिहिले आहे. दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातूनच लोकसभेची निवडणूक लढविली होती.
श्रीक्षेत्र शिवमंदिर, अंभोरा, नागपूर :नागपूरच्या पूर्वेकडे सुमारे 74 किलोमीटर अंतरावर असलेले अंभोरा हे गाव कुही तालुक्यातील वैनगंगा नदीवर वसलेले आहे. अंभोरा गावचे वैशिष्ट म्हणजे, येथे असलेले प्रसिद्ध चैत्यनेश्वराचे अर्थातच हरिनाथाचे मंदिर होय. भगवान शिवाला आणि िंहदू संत हरहर स्वामी यांची समाधी आहे.
जामा मशिद, नागपूर: नागपुरातील मोमिनपुरा भागात ही मशिद आहे. या भागातील ही सर्वात मोठी मशिद आहे. मध्यभागी मोठा कळस आहे. मागील बाजूला दोन लहान आणि दोन मोठे मनोरे आहेत. उत्तरेकडे मशिदीच्या समोर बगिचा आहे.
रामधाम, तालुका रामटेक:रामटेकमध्ये भगवान श्रीरामाचे ऐतिहासिक मंदिर आहे. वनवासात असताना प्रभू श्रीरामांनी रामटेक येथे काही काळ विश्रांती घेतली होती, असे म्हटले जाते. नागपूरपासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या रामटेकजवळील मन्सर येथे असलेले रामधाम हे भारतातील पहिले आणि एकमेव धार्मिक पर्यटन स्थळ ठरले आहे. देशभरातील धार्मिक यात्रा करू न शकणार्या गरीब व्यक्तीला एकाच ठिकाणी देशभरातील धार्मिक स्थळांचे दर्शन घेणे शक्य व्हावे, या कल्पनेने रामधामची निर्मिती करण्यात आली आहे. येथे येणार्याला मानसिक शांतता मिळते. देशातील सर्व तीर्थ विदर्भ आणि महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या छत्रछायेत येथे एकत्र आणण्यात आले आहेत. याशिवाय, भारतातील 12 ज्योेतिर्लिंग, माता वैष्णोदेवीचे मंदिरही येथे असलेल्या मनुष्यनिर्मित चंद्र पर्वतावर पाहायला मिळते.
जगातील सर्वात मोठे 350 फूट लांब ‘ॐ’ हे रामधामचे प्रमुख वैशिष्ट आहे. या ॐ च्या आत चित्रस्वरुपात रामायण पाहायला मिळते. तर बाहेर कृष्णलीलाचे वर्णन आणि हनुमान, साईबाबा व गजानन महाराजाची मूर्ती आहे.
ऑल संत कॅथेड्रल चर्च : नागपूरचा मध्यवर्ती भाग असलेल्या सदरपासून दोन किलोमीटर अंतरावर बिशप कॉटन स्कूलजवळ हे चर्च आहे. 19 शतकातील गोथिक पद्धतीने स्थापन करण्यात आलेले हे चर्च उत्तर भारतातील कॅथेड्रल चर्च आहे. लेफ्ट. जनरल सर रिचर्ड हेराम सांके यांनी 1851 मध्ये संगेमरमरचा वापर करून या अद्भूत चर्चची स्थापना केली होती. यानंतर 1879 मध्ये ब्रिटीश शिल्पकार जी. एफ. बॉडली यांनी व्याप आणि परिसर वाढवून या चर्चची फेररचना केली. ऑल संत कॅथेड्रल चर्च हे नागपुरातील सर्वात आकर्षक असे चर्च असून, येथील खिडक्या आणि त्यांना असलेली तावदाने बाहेरून जाणार्यांचेही मन वेधून घेतात. आर्ट अॅण्ड कॉमर्स कॉलेजला हिस्लॉप कॉलेज असे नाव देण्यात आले असून, येथील प्रख्यात मूर मेमोरिअल हॉस्पिटरचा कारभारही याच चर्चच्या माध्यमातून चालत असतो.
अर्थव्यवस्था
भारतातील महानगर आणि धनाढ्य लोकांचे शहर म्हणून नागपूरचा झपाट्याने विकास होत आहे. अगदी सुरुवातीच्या दिवसांपासून नागपूर हे विदर्भातील मुख्य व्यावसायिक केंद्र राहिले आहे. येथे अनेक महत्त्वाची व्यापारी केंद्रे आहेत. इन्स्टिट्युट फॉर कॉम्पिटेटीव्हनेसने आपल्या 2012 च्या अहवालात नागपूर शहराला देशातील अकरावे आघाडीचे स्पर्धात्मक शहर असा दर्जा दिला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे प्रादेशिक कार्यालय नागपुरात असल्याने बँकींग क्षेत्रासाठीही हे शहर अतिशय महत्त्वाचे आहे. 10 सप्टेंबर 1956 रोजी रिझर्व्ह बँकेचे प्रादेशिक कार्यालय येथे स्थापन झाले होते. रिझर्व्ह बँकेच्या नागपुरात दोन शाखा आहेत. यातील एका शाखेत भारतातील संपूर्ण सोन्याचा साठा ठेवण्यात आला आहे.
नागपूरचे हृदयस्थान समजल्या जाणा-या मध्य नागपुरात सीताबर्डी बाजारपेठ आहे. शहरातील ही मुख्य व्यावसायिक बाजारपेठ मानली जाते. याशिवाय, इतवारी, महाल आणि कळमना येथे मोठ्या प्रमाणात लहान बाजारपेठा असून, खरेदीसाठी त्या प्रसिद्ध आहेत.
बुटीबोरी ओद्योगिक वसाहत ही आकारमानाच्या तुलनेत आशियातील सर्वात मोठी वसाहत मानली जाते. येथील सर्वात मोठा औद्योगिक घटक म्हणजे इंडो रामा सिंथेटिक्स होय. या औद्योगिक वसाहतीतील अन्य घटकांमध्ये ट्रॅक्टर निर्मिती क्षेत्रातील महिंद्रा ्र अॅण्ड महिंद्रा देशातील सर्वात मोठा कास्टींग ग्रुप असलेली निको लिमिटेड, बजाज ऑटो, कॅन्डिको, अजंटा टूथब्रश आणि सनविजय उद्योग समुह आदींचा समावेश आहे. आईसक्रिम उत्पादन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेली दिनशॉ ही मूळची नागपूरचीच आहे. याशिवाय, सुकामेव्याचे निर्माते हल्दिराम तसेच आयुर्वेदिक उत्पादनांची कंपनी विको आणि बैधनाथ या कंपन्याही नागपूरच्याच आहेत.
आयसीडी नागपूर : देशाच्या मध्यभागी असलेले नागपूर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कार्गो वाहतुकीकरिता भारतीय उपखंडासाठंी नैसर्गिक लॉजिस्टीक हब बनले आहे. नागपुरातील झिरो माईल ही केवळ भौगोलिक सत्यताच नसून, लॉजीस्टिक पायाभूत सुविधांचे केंद्रही आहे. देशाच्या रेल्वे आणि रस्ता वाहतूक नेटवर्कचे हे शहर एक केंद्रही आहे. कॉन्कर्सचे (सीओएनसीओआर) इनलँड कंटेनर डेपो नागपूरच्या नरेंद्र नगर भागातील सेंट्रल रेल्वेच्या अजनी मार्शिंलग यार्डजवळ आहे. रेल्वेने याचा संबंध ईस्ट—वेस्ट आणि नॉर्थ—वेस्टशी जोडला गेला असल्याने येथून भारताच्या सर्वच भागांमध्ये रेल्वे नेणे शक्य झाले आहे. येथील रिंग रोड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 (मुंबई ते कोलकाता) आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांत 7 शी (वाराणसी ते कन्याकुमारी) जोडला गेला आहे.
फळ प्रक्रिया उद्योग -संत्र्यावर आधारित उद्योग :— संत्र्यांच्या उत्पादनात प्रसिद्ध असलेल्या नागपूर शहराची ओळख देशात ‘संत्रा नगरी’ अशी असल्यामुळे संत्रा उत्पादनावर आधारित लघू उद्योग स्थापन करण्यासाठी नागपूर जिल्ह्यात बराच वाव आहे. नागपूर जिल्ह्यातील खालील तहसिलींमध्ये संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. यात नागपूर ग्रामीण भागातील काटोल, नरखेड, कळमेश्वर, सावनेर, भिवापूर आणि कारंजाचा समावेश आहे. या भागात उत्पादित होणारा संत्रा देशाच्या विविध भागातील बाजारपेठांमध्ये पाठविला जातो. प्रक्रिया केलेला संत्रा निर्यातीकरिता योग्य राहात असल्याने नागपूर जिल्ह्यात संत्रा प्रक्रिया युनिट उभारण्याबाबत विचार करता येऊ शकतो. येथे संत्र्यावर आधारित प्रक्रिया उद्योग स्थापन करण्यास बराच वाव आहे. काटोल, नरखेड आणि कळमेश्वर तालुक्यात अशा प्रकारचे उद्योग उभारले जाऊ शकतात.
तेल उद्योग:नागरिकांच्या ढासळत्या आरोग्याच्या पार्श्वभूमीवर सोयाबिनवर आधारित उत्पादन घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यात सोयामिल्क, सोया वडी, सोयाबिन तेल, सोया बिस्कीट आणि अन्य उत्पादनांचा समावेश आहे. सोयाबिनचा वापर जनावरांच्या खाद्याचे उत्पादन करण्याकरिताही केला जाऊ शकतो. यामुळेच नागपूर जिल्ह्यात सोयाबिन उद्योग स्थापन करण्यास बराच वाव आहे.
नागपूर जिल्ह्यात उपलब्ध असलेली संसाधने
या संसाधनांचे खालील गटांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते.
1) कृषी:नागपूर जिल्हा हा मुळातच कृषी अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जातो आणि येथील ग्रामीण अर्थव्यवस्था ही जिल्हा अर्थव्यवस्थेचा आधार आहे. या जिल्ह्याचा एकूण भौगोलिक प्रदेश 9892 किलोमीटर इतका असून, यातील 644 हेक्टर भाग पिकाऊ आहे. या जिल्ह्यातील मुख्य पिके धान, जवार, कापूस, तूर आणि सोयाबिन आहे.
फुलोत्पादन : रोखीचे पिक घेण्याची संकल्पना झपाट्याने रूढ होत गेल्याने या जिल्ह्यात विविध प्रकारच्या फुलांचे उत्पादनही सातत्याने वाढत गेले. विविध सण आणि उत्सवांच्या काळात फुलांनी सुशोभित करण्याची समाजाची मानसिकताही वाढू लागली आहे. फुलोत्पादनात एकूण 22742 हेक्टर इतकी जमीन उपयोगात आणण्यात आली आहे. गुलाब, शेवंती, झेंडू, निशिगंधा, ग्लॅडिओलाय, पांढरी लिली, गोल्डनरॉड, डेझी, मोगरा यासारख्या फुलांचे एकूण 1365.53 मेट्रिक टन इतके उत्पादन घेतले जाते. कॅमोमाईल, गुलाब, मोग्रा, लिली आणि मॅरिगोल्ड यासारख्या फुलांचे उत्पादन ओद्योगिक उपयोगासाठी नागपूर जिल्ह्यात घेतले जाऊ शकते. पर्फ्युम, गुलाबजल आणि गुलकंदच्या निर्मितीसाठी या फुलांचा वापर होऊ शकतो.
जमिनीचा वापर : जिल्ह्याचे एकूण क्षेत्र 986000 हेक्टर असून त्यापैकी 159000 हेक्टर क्षेत्र वनाखाली आहे ,644000 हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे. खनिज संसाधने:नागपूर जिल्हा हा खनिज, कोळशाचे साठे, मँगनिझ, डोलोमाईट, लाईमस्टोन, लोखंड, क्ले, कॉपर, क्रोमाईट्स, जस्त, तुंगस्थ आदी कच्च्या खनिजांनी समृद्ध आहे. या जिल्ह्यात ही खनिजे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. नागपूर जिल्ह्याच्या उत्तर—पश्चिम पट्ट्यात अर्थातच सावनेर ते कन्हान या भागात कोळशाचे साठे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. उमरेड तहसिलीतही उच्च दर्जाचा कोळसा आढळून येतो. नागपूर जिल्हा हा कच्च्या मँगनिजने समृद्ध आहे. कच्च्या मँगनिझच्या उत्पादनाने संपूर्ण देशात जिल्ह्याला अतिशय महत्त्व आहे. कच्चे मँगनिझ हे प्रामुख्याने रामटेक आणि सावनेर तालुक्यात आढळून येतात. कांद्री आणि देवलापार येथे चांगल्या दर्जाचे लाईमस्टोन आढळून येतात. नागपूर जिल्ह्यात मिका आणि तुंगस्थाचे साठेही आढळून येतात. इमारती बांधण्याकरिता जी उच्च दर्जाची वाळू आवश्यक असते, ती कन्हान नदीत आहे.
मत्सोद्योग: नागपूर जिल्ह्यातील एकूण भौगोलिक भूभागापैकी 15037 हेक्टर इतका भाग मत्सोद्योगासाठी वापरला जाऊ शकतो. 650 किलीमीटरचा प्रदेश हा नदीच्या पाण्याखाली आहे. 2005—06 या कालावधंीत नागपूर जिल्ह्यातील मत्स उत्पादन 8310 मेट्रिक टन इतके होते. हा व्यवसाय सुमारे 2070 लाख रुपये इतका होता. ते पाहू जाता महाराष्ट्र सरकारने मत्स व्यवसायाकरिता विविध विकासात्मक योजना/प्रकल्प हाती घेतले.
रेशम उद्योग: रेशम उद्योग हा भारतातील जैविक—कृषी उद्योग होय. फार जुन्या काळापासून हा उद्योग करण्यात येत आहे. कच्च्या सिल्क उत्पादनात भारताचा क्रमांक जगात तिसरा आहे.
व्यवसायासाठी उपयुक्त असलेल्या सिल्कच्या सर्व तिन्ही उत्पादनाचे वितरणही भारत करीत असतो. यात मलबेरी, तस्सार आणि इरी—मुर्गा या जातींचा समावेश आहे. ताज्या अहवालानुसार, मलबेरी आणि तस्सारच्या उत्पादनात महाराष्ट्र राज्य हे भारतात तिसर्या क्रमांकावर आहे. नागपूर जिल्ह्यात रेशम उद्योगांतर्गत सध्या 141.00 हेक्टर इतका भूभाग येतो. हा भाग नागपूर, कळमेश्वर, काटोल, नरखेड आणि रामटेक परिसरात येतो.
लोकसंख्या : 2011 च्या जनगणनेनुसार, 14 तालुकांचा समावेश असलेल्या नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या 46 लाख 53 हजार 171 इतकी होती. यातील नागपूर शहराची लोकसंख्या 24 लाख 5 हजार 911 इतकी होती. तर, उर्वरित जिल्ह्याची लोकसंख्या 24 लाख 5 हजार 421 इतकी होती. या जिल्ह्यातील स्त्रि—पुरुष प्रमाण एक हजार पुरुषांमागे 948 महिला असे होते. 2001 च्या जनगणनेनुसार हे प्रमाण एक हजारामागे 932 महिला इतके होते. 2011 नुसार साक्षरतेचे सरासरी प्रमाण 89.52 टक्के इतके होते. 2001 च्या जनगणनेत हे प्रमाण 84.03 टक्के इतके होते. यात पुरुष साक्षरतेचे प्रमाण 93.76 टक्के आणि स्त्रि साक्षरतेचे प्रमाण 85.07 टक्के इतके होते. नागपूरच्या लोकसंख्येतील 52.5 टक्के लोकसंख्या 15 ते 59 वर्षे वयोगटातील आणि 10.35 टक्के लोकसंख्या सहा वर्षाच्या आतील वयोगटात होती.
2011 च्या जनगणनेनुसार, नागपूर जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी 68.30 टक्के लोकसंख्या जिल्ह्याच्या शहरी भागात राहात असल्याचे दिसून आले आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, नागपूर जिल्ह्याच्या शहरी भागातील स्त्रि—पुरुष प्रमाण एक हजार पुरुषांमागे 951 महिला इतके होते, तर ग्रामीण भागात हेच प्रमाण एक हजार पुरुषांमागे 942 स्त्रियाअसे होते
शिक्षण
नागपूर हे मध्यभारतातील प्रमुख शिक्षण केंद्र आहे. नागपुरातील कृषी महाविद्यालय हे देशातील सर्वात जुने महाविद्यालय आहे. तत्कालंीन ब्रिटीश सरकारे 1906 मध्ये या महाविद्यालयाची स्थापना केली होती. महाराजबागेतील ऐतिहासिक आणि वारसा वास्तू असलेल्या व्हिक्टोरिया इमारतीत हे विद्यापीठ आहे. (इंग्लंडच्या महाराणी व्हिक्टोरिया यांच्या मुक्कामासाठी 1856 मध्ये ही इमारत बांधण्यात आली होती.) त्याचप्रमाणे 1923 मध्ये स्थापन करण्यात आलेले नागपूर विद्यापीठ हेदेखील देशातील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक आहे. नागपूर विद्यापीठाचे नंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले. नागपूर शहरात महानगर पालिकेतर्फे चालविण्यात येणार्या सरकारी शाळा आणि ट्रस्ट िंकवा खाजगी व्यक्तींतर्फे चालविण्यात येणार्या खाजगी शाळा अशा दोन्ही प्रकारच्या शाळा आहेत. या शाळांना काही प्रकरणांमध्ये सरकारकडून अनुदान मिळत असते. शहरातील शाळांमध्ये10+2+3/4 अशी शिक्षण व्यवस्था आहे. शाळेतील दहा वर्षे पूर्ण केल्यानंतर अर्थातच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना असतो. त्यानंतरचा तीन ते चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम त्याने निवडलेल्या क्षेत्रावर अवलंबून असतो.
पायाभूत सुविधा
ऊर्जा, बँक आणि उद्योग यासारख्या पायाभूत सुविधा प्लॉट्स आणि शेड्सच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. उद्योगांच्या सर्वांगिण विकासाकरिता दळणवळण, दूरसंसार आणि प्रशिक्षण संस्था हे महत्त्वाचे घटक आहेत. कुठल्याही क्षेत्राच्या आर्थिक विकासाचा महत्त्वाचा घटक हा तेथील पायाभूत सुविधाच असतो. याशिवाय, सामग्री आणि मनुष्य बळ हा घटकही तितकाच महत्त्वाचा ठरत असतो.
एनटीपीसी ऊर्जा प्रकल्प, मौदा
मोदा तहसीलच्या कुंभारी गावाजवळ असलेला हा प्रकल्प एनटीपीसीचा महाराष्ट्रातील पहिला ग्रीनफिल्ड प्रकल्प आहे. पहिल्या टप्प्यात 500 मेगावॅटचे दोन प्रकल्प उभारण्यात येत आहेत. दुसर्या टप्प्यात 600 मेगावॅटचे आणखी दोन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाची एकूण क्षमता 2320 मेगावॅट इतकी होणार आहे.
कोराडी औष्णिक वीज प्रकल्प :
कोराडी औष्णिक वीज प्रकल्प हा नागपूरजवळील कोराडी येथे आहे. विदर्भातील चार प्रमुख ऊर्जा प्रकल्पांपैकी हा एक आहे. हा ऊर्जा प्रकल्प 1974 मध्ये कार्यान्वित झाला आहे. महाराष्ट्र सरकारचाच घटक असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेडतर्फे (महाजेनको) हाताळल्या जाणार्या नऊ ऊर्जा प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. कोराडी प्रकल्पात सात युनिट्स असून, त्यांची एकूण वीज निर्मितीची क्षमता 1080 मेगावॅट इतकी आहे. हे प्रत्येक युनिट 660 मेगावॅट क्षमतेचे आहेत.
खापरखेडा औष्णिक ऊर्जा प्रकल्प:
महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्यात हा प्रकल्प आहे. महाजेनकोच्या कोळशावर आधारित ऊर्जा प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या सावनेर आणि डुमरी खुर्द खाणींमधून या प्रकल्पांना कोळसा उपलब्ध करण्यात येतो. या प्रकल्पाला लागणार्या पाण्याची आवश्यकता पेंच जलाशयातून पूर्ण केली जाते. हे पाणी कोराडी थर्मल पॉवर स्टेशनच्या कालव्यातून पुरविले जाते. या प्रकल्पात चार युनिट्स असून, त्यांची वीज निर्मितीची एकूण क्षमता 840 मेगावॅट इतकी आहे. येथील प्रत्येक युनिटला 500 मेगावॅट क्षमतेचा बनविण्याचा प्रस्ताव आहे.
नागपुरात येऊ घातलेले खाजगी ऊर्जा प्रकल्प :
आयडिअल ऊर्जा प्रकल्प, बेला, नागपूर (270 मेगावॅट)
लेनेक्सिस ऊर्जा प्रकल्प, खुर्सापार, नागपूर (1320 मेगावॅट)
मंत्री पॉवर लिमिटेड, बेला, नागपूर (540 मेगावॅट)
विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर, बुटीबोरी, नागपूर (300 मेगावॅट)
अभिजित एमएडीसी नागपूर एनर्जी प्रा. लि., खैरे खुर्द, नागपूर (271 मेगावॅट)
वाहतूक
नागपूर मेट्रो रेल
महाराष्ट्र सरकारने नागपूर शहराकरिता जाहीर केलेला हा प्रकल्प आहे. दोन टप्प्यातील हा प्रकल्प 4400 कोटी आणि 3800 कोटी रुपये खर्चाचा आहे. या प्रकल्पांतर्गत सीताबर्डी ते मिहान आणि बुटीबोरी मार्गे विमानतळ असे 25 किलोमीटरचे अंतर आणि सीताबर्डी ते ऑटोमोटिव्ह चौक, कामठी असे 20 किलोमीटर इतके अंतर व्यापले जाणार आहे. दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाचे तज्ज्ञ सल्लागार नागपूरच्या या प्रस्तावित प्रकल्पाचा अभ्यास करीत असून ते आपला अहवाल लवकरच सादर करणार आहेत.
नागपूर सुधार प्रन्यासच्या (एनआयटी) पुढाकाराने या प्रकल्पासाठी मार्च 2012 मध्ये जागेची पाहणी करण्यात आली आहे. एनआयटी, नागपूर महानगर पालिका, महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळ यांच्या अधिकारांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या नागपूर मेट्रो ट्रान्सपोर्ट कंपनी लिमिटेड या नव्या कंपनीतर्फे सुमारे 10 हजार कोटींचा हा प्रकल्प राबविला जाणार आहे. ही कंपनी सध्या मिहान प्रकल्पाचा विकास करीत आहे. एमआयडीसी आणि सिडको या अन्य दोन भागीदार कंपन्या आहेत.
रस्ते
भारताचे दोन मुख्य राष्ट्रीय महामार्ग कन्याकुमारी—वाराणसी (महामार्ग क्रमाक 7) आणि हाजिरा—कोलकाता (महामार्ग क्रमांक 6) नागपुरातूनच जात असल्याने नागपूर हे महामार्गांचे मुख्य जंक्शन आहे. आणखी एक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 69 हादेखील नागपूरला भोपाळजवळील ओबेदुल्लागंजने जोडला गेला आहे. याशिवाय, नागपूर हे दोन आशियाई महामार्गांचेही जंक्शन आहे. हे आशियाई महामार्ग म्हणजे एएच—43 (आग्रा ते मातारा, श्रीलंका) आणि एएच—46 (खडगपूर ते धुळे) आहेत.
नवा राज्य महामार्ग म्हणजे, नागपूर—औरंगाबाद—मुंबई एक्सप्रेस हायवे होय. राष्ट्रीय महामार्ग तत्वावर हा महामार्ग बांधण्यात आला आहे. या महामार्गालाही राज्य आणि केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या महामार्गाने राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला औरंगाबाद मार्गे जोडले आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग 6 आणि महामार्ग 3 वरून या दोन शहरांचा प्रवास करण्यास लागणारा कालावधीही कमी झालेला आहे.
राज्य आणि केंद्र सरकारने कोल्हापूर ते नागपूर असा असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 204 च्या विस्तारीकरणाला मंजुरी दिली असून, यामुळे सोलापूर, तुळजापूर, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, बुटीबोरी ही शहरेही या मार्गाला जोडण्यात येणार आहे.
हवाई वाहतूक
नागपूर हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष हा भारतातील सर्वात व्यस्त कक्ष आहे. 2004 मध्ये नागपूरच्या आकाशातून दररोज 300 विमाने उड्डाण घेत असायची. ऑक्टोबर 2005 मध्ये नागपूरच्या सोनेगाव विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्याची घोषणा करण्यात आली आणि डॉ. बाबासाहेब आंबेेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे या विमानतळाचे नामकरण करण्यात आले.
नागपूर विमानतळावरून दररोज मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगलोर, हैदराबाद, चेन्नई, पुणे, इंदूर, अहमदाबाद, गोवा, जयपूर, कोची, नांदेड, औरंगाबाद, रायपूर आदी शहरांमध्ये एअर इंडिया, जेट एअरवेज, इंडिगो, गोएअर, स्पाईसजेट यासारख्या विमान कंपन्यांची विमाने उड्डाण घेत असतात. याशिवाय, एअर अरेबिया आठवड्यातून चार वेळा नागपूर ते शारजा या दरम्यान सेवा देत असते.
नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील सोनेगाव येथे भारतीय हवाई दलाचे तळ आहे. येथे एमआय—8 आणि भारतीय हवाई दलाची आयएल—76 ही विमाने ठेवली जातात.
महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची (एमएडीसी) स्थापना सिटी अॅण्ड इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (सीडको), नागपूर सुधार प्रन्यास (एनआयटी) महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमआयडीसी), महाराष्ट्र राज्य मार्ग वाहतूक महामंडळ (एमएसआरटीसी) आणि नागपूर महानगर पालिका (एनएमसी) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. िंसगापूर येथील चांगी विमानतळाची या प्रकल्पाकरिता सल्लागार म्हणून निवड करण्यात आली होती. विशेष म्हणजे, भारतीय हवाई दलही आपल्या गजराज प्रकल्पासह मिहान परिसरात येण्याच्या तयारीत आहे.
भारताच्या रेल नेटवर्कसोबत कार्गोला जोडण्यासाठी भारतीय रेल्वेही मिहानजवळ आपले नवे स्थानक उभारणार आहे. यानंतर एमएडीसी विमानतळाकरिता महाराष्ट्रात महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. हे विमानतळ भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे (एएआय) िंकवा भारतीय हवाई दलाचे (आयएएफ)चे नसणार. मुंबईजवळ सिडको शहर यशस्वीपणे वसविणार्या सिडकोची यासाठी निवड करण्यात आली आहे.
हा प्रकल्प जसजसा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे, तसतसे स्थलांतरितांची संख्याही वाढत असून, यामुळे नागपूरच्या लोकसंख्येतही वाढ होत आहे. शहरातील विद्यमान बससेवा इतक्या मोठ्या लोकसंख्येला सामावून घेण्यात सक्षम नसल्याने, एनएमसी, एनआयटी, एमएसआरटीसी आणि एमआयडीसीच्या संयुक्त सहकार्याने व्यापक अशी नवीन बस वाहतूक प्रणाली सुरू करण्याच्या दिशेने पुढाकार घेण्यात आला आहे. एनएमसी आणि एनआयटी नागपूर महानगरातील नागरी प्रशासनाची जबाबदारी सांभाळतील, तर एमएसआरटीसी आणि भारतीय रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासाची जबाबदारी पार पाडतील. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्र: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने 1992 मध्ये नागपूरपासून 28 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर बुटीबोरी औद्योगिक वसाहतीची स्थापना केली होती. या वसाहतीअंतर्गत एकूण 2345.65 हेक्टर इतक्या जमिनीचा विकास करण्याचे निर्धारित होते. यात 16 गावांमधील खाजगी जमिनीचा समावेश आहे. या वसाहतीत 1839 औद्योगिक भूखंड तयार करण्यात आले असून, यातील 1471 भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. व्यावसायिकांना प्रेरित करण्यासाठी एमआयडीसीने 46 वर्क शेड्स उभारले आहेत.
या औद्योगिक वसाहतीला पंचतारांकित दर्जा देण्यात आलेला आहे. या वसाहतीत 20 हेक्टर जागेत आयटी पार्क, 204 हेक्टर जागेत टेक्सटाईल पार्क, 68 हेक्टर जागेत पोशाख पार्क, 147 हेक्टर जागेत विणकर पार्क उभारण्याचा प्रस्ताव आहे.
िंहगणा औद्योगिक वसाहत: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने 1962 मध्ये ही वसाहत उभारली होती. नागपूरपासून 7 किलोमीटर अंतरावर ही वसाहत आहे. या ओद्योगिक वसाहतीत अनेक इंजिनीअरींग उद्योग, इलेक्ट्रिकल व्यवसायावर आधारित उद्योग, अन्नधान्यावर आधारित उद्योग आहेत. महाराष्ट्र राज्य वीज मंडळाने या वसाहतीत आपले दोन उपकेंद्रे स्थापन केली आहेत. दूरसंचार खात्याने आधीच इलेक्ट्रॉनिक एक्सचेंजच्या माध्यमातून आपली सेवा उपलब्ध करून दिली आहे. व्यावसायिक आणि कामगारांना येथेच पोस्ट ऑफीस, बँक, पोलिस ठाणे, पेट्रोल पम्प, कँटीन, बस सेवा आदी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. या वसाहतीत पुढील विकासासाठी आता िंकचितही जमीन उपलब्ध नाही.
सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क, नागपूर: माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पर्यावरणाला अनुकूल असे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क विकसित करण्यावर एमआयडीसीने आपले लक्ष केंद्रित केले आहे. एमआयडीसीने राज्यात 18 पेक्षा जास्त आयटी पार्क विकसित केले आहेत. यातील एक आयटी पार्क नागपुरातील परसोडी येथे आणि दुसरा आयटी पार्क सदर भागात आहे. नागपुरात सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क विकसित करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे, संगणकाकरिता डेटा कम्युनिकेशन सुविधा, सरकारी परवान्यांकरिता िंसग िंवडो क्लिअरन्स शक्य व्हावे, हा होय. उपरोक्त टेक्नॉलॉजी पार्कमध्ये उपरोक्त सेवा देण्यासाठी विविध प्रकारची संकुले उपलब्ध आहेत.
मिहान
राज्यातील प्रादेशिक असमतोल दूर करण्याच्या दृष्टीने महाराष्ट शासनाने नागपूर येथे आंतरराष्ट्रीय प्रवासी व माल वाहतूक हब विमानतळ (मिहान प्रकल्प) विकसीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या संयुक्त प्रकल्पांतर्गत नागपूर येथे अस्तित्वात असलेल्या विमानतळाचा एक आंतरराष्ट्रीय बहुविध प्रवासी व मालवाहतूक हब विमानतळामध्ये विकास करण्याबरोबरच विमानतळालगतचा परीसर विशेष आर्थ्कि क्षेत्रामध्ये (स्पेशल इकॉनॉमिक झोन-एसइझेड) विकसीत करावयाचा आहे.
विशेष आर्थिक क्षेत्र (स्पेशल इकॉनॉमिक झोन-एसइझेड):
मिहान प्रकल्पांअंतर्गत सध्या अस्तित्वात असलेल्या विमानतळा लगतच्या अंदाजे 2000 हेक्टर परीसरात एमएडीसी भव्य विशेष आर्थिक क्षेत्र विकसीत करीत आहे. आर्थिक उलाढालीचा विकास करण्याच्या दृष्टीने तयामध्ये नियातीशी निगडीत माहिती तंत्रज्ञान उद्दोग सौंदर्य प्रसाधने व दागिने, वस्ञोदृोग, इलेक्ट्रॉनिक वस्तू, औषधे, अन्न धान्य प्रकिया, उदृोग आणि अशाच स्वरुपाच्या अन्य उदृोगाचा समावेश आहे. त्यामध्ये समारे 900 ट्रक एकाचवेळी ठेवता येतील एवढा वाहनतळ, मोठे भांडारग़ृह शीतसाठा खुले गुरांचे गोठे असलेला विस्तीर्ण थांबा आणि त्यालगतच ज्यावरुन एकाचवेळी दोन रेल्वे धावू शकतील अशी रेल्वे लाइनची ही सुविधा आहे.
अशाप्रकारे मिहान हा विमानतळ, रस्तेविकास, रेल्वे विकास, विशेष आर्थिक क्षेञ आणि त्याबरोबरच निगडीत विविध सेवा सुविधा उदा. गृहनिर्माण आरोग्यदायी निवास व्यवस्था, आंतरराष्ट्रीय शाळा आणि अन्य यांचा समावेश असलेला संयुक्त प्रकल्प आहे.
विशेष आर्थिक क्षेत्र (एसइझेड) पायाभूत सुविधा
- सहापदरी, चारपदरी, तीनपदरी व दोनपदरी रस्त्यांचे जाळे.
- कला- दूरसंचारण विस्तार.
- रहिवासी/बिगर रहिवासी कारणाकरीता पाणीपूरवठा व्यवस्था (100 एमएलडी क्षमतेची)
- सांडपाण्याची निचरा व्यवस्था.
- 246 मेगावॅटचा व 25 एम डब्ल्य डिझेल बॅकअपचा विदृूत पकल्प
- करमणुकीची साधने- बहुविध चित्रपटगृह, गोल्फ कोर्स, पत्यांचा क्लब.
- मिहान प्रकल्पाअंतर्गत काम करणा-या नोकरवर्गासाठी राहण्याची सुविधा
- सांस्कृतीक व प्रदर्शनीय केंन्द्र, मुल्यवर्धक व आर्थिक सेवा केंन्द्र
- प्रकल्पासाठी खर्च –अंदाजे रु 2581 करोड (सन 2002 च्या दरानुसार)
- आगामी 5 वर्षातील गुंतवणूक सुमारे – 20,000 करोड
- मिहान प्रकल्पाव्दारे सन 2020 पर्यंत निर्माण होणारी प्रत्यक्ष रोजगार निर्मिती- सुमारे 1,20,000 नोक-यांचेी संधी.
- आगामी 10 वर्षातील अप्रत्यक्षरित्या निर्माण होणारा रोजगार सुमारे 2,40,000 ते 3,60,000 नोक-यांची संधी.
एमएडीसी ने विशेष आर्थिक क्षेत्रात सर्व पायाभूत सुविधा पूर्ण केलेल्या आहेत. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे. :
• विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये एम ए डी सी ने रस्ते, पाणीपुरवठा व्यवस्था, विद्दूत संचारण व वितरण व्यवस्था, सांडपाणी निचरा व्यवस्था, दूरध्वनींच्या तारांचे जाळे, अग्निशामक केंन्द्र, मध्यवर्ती सुविधा केंन्द्र, आणि इतर निगडीत सोयी सुविधा पूर्ण केलेल्या आहेत. विद्दूत प्रकल्पांचे काम ए एम एन इ पी एल या कंपनीस देण्यात आलेले आहे. एम ई आर सी यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या वितरण परवान्यास मान्यता दिली आहे. एम ई आर सी कडील कराबाबतच्या विनंती अर्जास मान्यता मिळताच येत्या दोन महिन्यात विद्दूत पुरवठा सुरु होईल.
मिहान प्रकल्पांतर्गत पायाभूत सुविधांसाठी रु 800 करोड तर सुमारे 2865 हे. भूसंपादनासाठी रु 300 करोड खर्च करण्यात आला असून विद्दूत प्रकल्पाच्या उभारणीसाठी सुमारे 1400 करोड रु.खर्च करण्यात आला.
महाराष्ट्रु विमानतळ विकास कंपनी लि. (एम ए डी सी.) :
महाराष्ट्र शासनाने मिहान प्रकल्पापची अंमलबजावणी जलद गतीने करता यावी व त्यावबरोबरच राज्यायतील प्रमुख जिल्हाी मुख्यालये व राजधानी विमानसेवेव्दाारा जोडण्याजकरीता अन्यन ठिकाणीही विमानतळे विकसीत करण्या्साठी (एअरपोर्टस अथोरिटी ऑफ इंडिया व इंडियन एअर फोर्स यांच्याय मालकीची नसलेली) महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. एमएडीसी ही विशेष उद्देश कंपनी स्पेफशल परपज कंपनी गठीत केली आहे.
Post a Comment