वर्धा जिल्हा

 वर्धा जिल्हा हा चारही बाजूंनी महाराष्ट्रातीलच इतर चार जिल्ह्यांनी वेढलेला आहे. जिल्ह्याची कोणतीही सीमा दुसऱ्या राज्याला लागून नाही. पूर्व व उत्तरेस नागपूर जिल्हा, पश्चिमेस अमरावती जिल्हा आणि दक्षिणेस यवतमाळ जिल्हा  चंद्रपूर जिल्हा आहे. वर्धा नदी हीअमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा  चंद्रपूर जिल्हा या जिल्ह्यांना वर्धा जिल्ह्यापासून वेगळे करते.

जिल्ह्यातील तालुके

·         आर्वी

·         आष्टी

·         सेलू

·         समुद्रपुर

·         कारंजा (घाडगे)

·         देवळी

·         वर्धा

·         हिंगणघाट

जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ

·         वर्धा,

·         हिंगणघाट,

·         देवळी,

·         आर्वी 

वर्धा जिल्ह्याचा इतिहास

बेरार

वर्धा जिल्ह्याच्या इतिहासाबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे. पण वर्धा नदीचा उल्लेख ई.पु. २ शताब्दी मध्ये आढळतो. विदर्भाचा राजा बेरार च्या संबंधाने वर्धा नदीचा उल्लेख आढळतो. विदर्भ (बेरार) प्रदेश हा वर्धा नदीने विभागल्या जाऊन बेरार आणि त्याचा भाऊ माधवनसेना यांच्यात वाटला गेला.

चालुक्य आणि राधात्रकुट राजा

वर्धा आणि उर्वरित बेरार प्रांतात चालुक्य राजपूत घराण्याने ई.स. ५५० ते ७५० मध्ये राज्य केले. त्याची राजधानी आधुनिक बिजापूर येथे होती व नंतर ती नाशिक ला हलविण्यात आली.

या राजघराण्याशी सबंधित ताम्र पत्रे बैतुल जिल्ह्याच्या मुलताई आणि वर्धा जिल्ह्याच्या देवळी येथे सापडली. देवळी येथे सापडलेली पत्रे ई. ९४० ची असून त्यात नागापूर-नंदिवार्धाम जिल्ह्यातील तलपुरुम्शक हे गाव काणारेसे ब्राह्मणाला दान केल्याचा उल्लेख आहे.

बहमनी साम्राज्य

वर्धा तदनंतर सोलापु आणि बिदर जवळील गुल बर्ग च्या राजाच्या प्रांतात सामील करण्यात आला. या राजाने मुहम्मद तुघलक शी बंडखोरी केलेली होती आणि तो एक ब्राम्हण किवा ब्राम्हण सेवक होता. सर ए. लिअल म्हणतात "बेरार चे बहमनी साम्राज्य सातपुडा ते दक्षिणेकडे गोदावरी पर्यंत आणि खानदेश व दौलताबाद ते पूर्वेकडे गोदावरी पर्यंत पसरलेले होते.

इमाद शाही राजवंश

इ.स. 1437 मध्ये गुजरातच्या राजानी बेरार वर आक्रमण केल्याचा प्रारंभिक उल्लेख आहे ज्यात गोंडवाना च्या राजाने (वर्धा ओलांडून) मदद केली व तो चांदा येथील होता. इ.स. 1518 मध्ये बहमनी साम्राज्याच्या पतनानंतर काही काळ बेरार वर इमाद शाही राजपुत्राने इल्लीचपुर येथून राज्य केले.

मुघल साम्राज्य

नव्वद वर्षांच्या स्वतंत्र अस्तित्व नंतर 1572 मध्ये अहमदनगर राजानी इल्लीचपुर साम्राज्य नष्ट केले आणि १५९४ मध्ये बेरार अहमदनगर पासून सम्राट अकबर च्या साम्राज्याला जोडण्यात आले.

मराठा स्वारी

1822 मध्ये भोसल्याद्वारे वर्धा नागपूर मध्ये समाविष्ट करण्यात आला त्याचबरोबर गवळीगड आणि नरनाळा हे किल्ले व काही भूभाग निझामच्या ताब्यात देण्यात आला.

जिल्हा निर्मिती

ब्रिटीश्‍शांच्या काळात 1862 पर्यंत वर्धा हा नागपूरचाच एक भाग होता.प्रशासकिय कारणाने वर्धा वेगळा करण्यात आला. पुलगाव जवळील कवठा येथे जिल्हा मुख्यालय उभारण्यात आले पण नंतर 1866 मध्ये वर्धा हे पालकवाडी जवळ वसविण्यात आले. जिल्हयाला वर्धा हे नाव वर्धा नदीवरुन देण्यात आले.

भौगोलिक स्थान

वर्धा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर पूर्व बाजूस स्थीत आहे. 1962 पर्यंत जिल्हा नागपूर जिल्ह्यातील भाग होता; कालांतराने तो एक स्वतंत्र जिल्हा करण्यात आला.

Wardha district lies between 20o18’ North and 21o21’ North latitudes and 78o4’ East to 79o15’ east longitudes.

वर्धा जिल्ह्याच्या पश्चिम आणि उत्तर कडे अमरावती जिल्ह्या आहे तर दक्षिणेकडे यवतमाळ जिल्हा आहे, दक्षिण पूर्वेकडे चंद्रपूर जिल्हा असून पूर्वेकडे नागपूर जिल्हा आहे. अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यासोबतच्या सीमारेषा वर्धा नदी ठरवते.

क्षेत्र आणि प्रशासकीय विभाग

वर्धा जिल्ह्या नागपूर महसूल विभागातील एक भाग आहे. भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर इत्यादी जिल्हे नागपूर महसूल विभागात समाविष्ट आहे.

जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्राच्या 2% आहे जे 6309 चौ किमी, क्षेत्र समाविष्टीत आहे.

प्रशासकीय सोयीसाठी वर्धा जिल्हा तीन उप विभागात विभाजीत पोट केले गेले. प्रत्येक उपविभागात २ ते ३ तहसील आहेत.

उप विभागाचे नाव

समाविष्ट तहसील

वर्धा

वर्धा, सेलु, देवळी

हिंगणघाट

हिंगणघाट, समुद्रपूर

आर्वी

आर्वी, आष्टी, कारंजा

वर्धा जिल्ह्यात 1387 गावे, 507 ग्राम पंचायत आणि 6 नपा शहरे आहेत.

गांधीजींचा वर्धा जिल्हा

सेवाग्रामची प्रार्थना ,पौणारची यात्रा, आष्टीची स्वातंत्र्याची चळवळ ,हा देखावा नसून वर्धा जिल्हाच्या आत मध्यें वसणारा आत्मा आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये बाकी जिल्ह्यांच्या तुलनेत वर्धा जिल्हा जरी लहान असला तरी त्याची प्रसिद्धी आणि कीर्ती हि महान आहे. .

१८६२ पर्यंत वर्धा जिल्हा हा नागपूर जिल्हयाचा भाग होता .नंतर त्याला सुविधाजनक प्रशासकीय हाताळणीसाठी नागपूर जिल्हया पासून वेगळा करण्यात आला आणि पुलगाव जवळील कवठा येथे प्रशासकीय जिल्हा हेड क़्वार्तर बनविण्यात आले. १८६६ मध्ये जिल्हा हेड क़्वार्तर तेथून हलविण्यात आले आणि पालकवाडी नामक गावी प्रस्थापित करण्यात आले. आणि सध्या तिथेच प्रस्तापित आहे. आणि तेच नंतर वर्धा शहर बनले.वर्धा जिल्हया मध्ये तीन डिविजन असुन आठ तालुके आहेत

वर्धा जिल्हा हा महाराष्ट्राच्या दक्षिण पूर्वेस व वर्धा वैनगंगा नदीच्या पश्चिम खोरयात स्थित आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे सातपुडा पर्वत रंग असून पश्चिम भाग हा पूर्ण नदीच्या खोरयात व्याप्त आहे. नागपूर जिल्हा उत्तरेकडे असून वर्धा नदी उत्तर, दक्षिण आणि पश्चिम सीमेवरून वाहते.

राजकीय महत्ता

1934 मध्ये महात्मा गांधी वर्धेला आले होते.त्यांनी त्यांच्या कामकाजारिता सेगाव येथील जमुनालाल बजाजची जागा निवडली .तीच आता सेवाग्राम या नावाने ओळखल्या जाते. त्यानंतर वर्धा जिल्हाला अनंन्यसाधारण महत्व आले. भारतातच नवे तर विश्वात सुधा त्याच्या स्वतंत्र्याच्या चळवळी मध्ये सेवाग्राम आणि वर्धा अजरामर होवून गेला. गांधीजी च्या निर्देशा नुसार आचार्य विनोबा भावे यांनी त्यांच्या मागोमाग पौणार येथे धाम नदीच्या तीरावर ,वर्धा -नागपूर महामार्गावर आश्रम स्थापित केले

वर्धा जवळील गोपुरी गावात बराच काळ आचार्य विनोबा भावे यांचे वास्तव्य राहिले . आज जिथे गीताई मंदिर चे निर्माण झाले आहे तिथेच स्वर्गीय जामुनालालजी बजाज एका छोट्याश्या झोपडीत राहत होते.

राष्ट्राध्यक्ष राजेंद्र प्रसाद, मौलाना अब्दुल कलाम आझाद, पं. जवाहरलाल नेहरू, आचार्य कृपलानी, लाल बहादूर शास्त्री, सावरकर, सुभाषचंद्र बोस, खान अब्दुल गफ्फार खान, नारायंजी अग्रवाल, राजश्री टंडन, डॉ राधाकृष्णन, इंदिरा गांधी, आचार्य अर्यनायाकम, डॉ जे सी कुमारप्पा, कामराज, आचार्य धर्माधिकारी, कवी केशवसुत, वीर राम मनोहर लोहिया, सरोजिनी नायडू इत्यादी महान नेते वर्ध्याच्या राजकीय, सामाजिक तसेच शैक्षणिक महत्वामुळे वर्ध्याला भेट देऊन गेले.

भारतीय स्वातंत्र्य चळवळ संबंधित विविध महत्त्वपूर्ण निर्णय सेवाग्राम आश्रमात घेतले गेल. त्यामुळे वर्धा हि भारताची गैर सरकारी राजधानी होती. विविध देशातील शिष्टमंडले आणि राजकीय, सामाजिक, धार्मिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी गांधीजीना भेटले.

स्वातंत्र्यलढ्यात सहभाग

वर्ष 1934 पासून महात्मा गांधी वर्धा मध्ये राहले होते, भारताच्या भविष्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय त्या वातावरणात काढण्यात आले आहेत. गांधीजीनी त्यांचा वैयक्तिक 'सत्याग्रह' 1940 मध्ये आश्रमातून सुरू केला. विनोबा भावे हे चळवळीतील पहिले भारतीय सत्याग्रही होते.

१९४० मध्ये श्रीमती सर्युती धोत्रे यांनी वर्धा स्टेशन येथे स्वातंत्र्य सैनिकांना संबोधित केले व लगेच त्यांना व इतर स्वातंत्र्य सैनिकांना अटक करण्यात आली. त्यानंतर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात श्री जंगलुजी ढाले आणि चीन्नाबाई जे गांधी चौकात तिरंगा ध्वज फडकाविण्यास गेले होते ते यात शहीद झाले. या घटनेनंतर ब्रिटीश पोलिसांनी लोकांवर शिक्षा म्हणून अधिक कर वसूल केले.

१६ ऑगस्ट क्रांती

१६ ऑगस्ट १०४२ रोजी नागपंचमीच्या दिवशी हि क्रांती आष्टी तालुक्यातील सर्व गावांमधून सुरु झाली. 'पत्थर सारे बोंब बनेंगे, भक्त बनेगी सेना' अशी घोषणा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिली. या दिवशी आष्टी येथे ब्रिटीशांनीगोळीबार केला ज्यात ६ स्वतंत्र सेनानी शहीद झाले व ४ गंभीर जखमी झाले. ११२ जणांना तुरंगात डांबण्यात आले.

म्हणून १६ ऑगस्ट हा दिन हुतात्मा दिन म्हणून आष्टी येथे पाळला जातो. वर्धा जिल्ह्यातील आष्टी, पेठ, अमडापूर, वडाला, खडकी, साहूर, आर्वी, वर्धा, सेवाग्राम येथे हुतमता स्मारक आहेत.

वर्धा जिल्हाची संस्कृती

विदर्भामध्ये ,वर्धा जिल्हात नेहमी कलेला , पारंपारिक ,संस्कुतिक ,सामाजिक,साहित्यिक क्षेत्राना प्रोसहान देण्यात येते.हि भूमी प्रसिद्ध कलाकार,तत्त्वज्ञानी लोकांची उपज आहे.हि भूमी गांधीजी च्या सत्याग्रही विचाराची आहे .हि भूमी विनोभाजी च्या भूदान आंदोलनाच्या पद्चीन्हाची साक्षी आहे.

सुप्रसिद्ध निर्माता-निर्देशक राजदत्त ,संजय सुरकर,मूर्तिकार ,आणी चित्रकार बी विठल,हरिःअर पांडे, टी.जी. पाटणकर,प्रसिध्द लेखक वामनराव चोरघडे,वराडी शब्द्कोशानिर्माता प्रा.देविदास सोटे ,संगीतकार डॉ.प्रकाश संगीत ,कामालाभाई भांडे , बासरीवादक नरेंद्र शाह, इत्यादी लोकांनी वर्धा जिल्हा मधूनच आपल्या कामाला सुरुवात केली होती. प्रा. शाम मानव यांनी अंधश्रद्धा निर्मुलना चे काम वर्धा जिल्हामधून सुरुवात केली,आणि आता त्याचे रूप स्वपूर्ण भारतभर दिसत आहे.

थियेटर आणि नाटक

वर्धा जिल्हामधील संस्कृती कलेला,पारंपारिक संस्कृती ला जोपासण्याचे आणि त्यांना अविरत जिवंत ठेवण्याचे श्रेय थियेटर आणि नाटकाला जातो.प्रसिद्ध थियेटर कलाकार स्वर्गीय एम. डी. देशमुख ,पुरुषोत्तम दारवेकर,दिनकरराव देशपांडे आणि इतत्यादि लोकांनी आपले अमोल्य असे योगदान देवून थियेटरचा वर्धा जिल्हामध्ये पाया रचला आणि श्री.एम.डी.देशमुख यानी तो अविरत चालत राहावा या करिता जीवन भर कार्यरत राहिले.

साहित्य आणि तत्वज्ञान

महात्मा गांधी ,आचर्य विनोभा भावे,काका कालेलकर ,आचार्य दादा धर्मादिकारी ,कुंदर दिवाण ,निर्मला देशपांडे इत्यादी वरिष्ट लेखकांनी स्वताचे तत्वज्ञान आणि जिवंत रसपूर्ण साहित्य मराठी आणि हिन्दी भाषेमध्ये मांडले.डॉ.श्रीमान नारायण अग्रवाल ,श्री क्रीशनदासजी जाजू ,माडसा नारायन,ठाकूरदासजी बंग ,नारायणदास जाजू,भंते आनंद,कौशाल्यायन,उमाशंकरशुक्ला ,आसाराम वर्मा ,डॉ.सुरेंद्र बिरलींगे, पद्माकर चितळे ,मनोहर वरारपांडे,डॉ.सदाशिव डांगे, दामोदरदास मुंदडा ,डॉ. एम.जी.मोर्के इत्यादी.लेखकांनी रस युक्त साहित्य मराठी आणि हिंदी तासेच इंग्रजी मध्ये पसिद्ध केले.विनोभा भावे यांचे "गीताई"हे मराठी साहित्य फार प्रसिद्ध आहे.

संगीत

सुप्रसिद्ध पेटीवादक बाबूजी भट्ट हे आर्वीचे होते.रासुलाबाद्चे बापूराव रापते मनोहरराव देवूलकर हे प्रसिद्ध तबलावादक होते .वर्धा येतील महिलाश्रम संस्थामधील शिक्षक जे.एल.रानडे हे प्रसिद्ध गायक होते. १९४१ मध्ये रामदास शास्त्री ,भास्करराव संगीत यानी "शिवानंद संगीत शाळा " सुरु केली.

प्रहार

हि एक संस्था आहे जी शाळा ,महाविद्यालये मधील तरुण विद्यार्थ्यांमध्ये प्रकृती बद्दल ,निसर्गाबद्दल प्रामाणिकपणा ,सैनिकी मानसिकता,देशभक्ती या सारखे गुण निर्माण करण्या करिता मदत करते.ले.कर्नल सुनील देशपांडे यांनी नागपूर येथे प्रहार महासंघाची सपना केली होती,आणि प्रा. मोहन गुजर यानी प्रहारची उपशाका वर्धा येते स्थापन केली.प्रहार हि फक्त तरुण विध्यार्थी वृन्दांमध्ये सैनिकी मानसिकता निर्माण करते त्याचबरोबर प्रशिक्षन शिबिरांचे सुध्दा आयोजन करते.आणि त्या प्रसिक्षनामध्ये राष्ट्रीय अखंडता ,मौलीकधिकार,आदर्श नागरिकता ,शहरी सुरक्षितता ,देखरेख ,घोडेस्वारी,जंगल भटकंती ,पर्वतारोहण, इत्यादीचे प्रशिक्षन दिल्या जाते.तसेच मौलिक अधिकार ,आदर्श नागरिकता ,राष्ट्रीय अखंडता,धर्मानिर्पेक्षता,उन्न्हाळीकथा ,थोर नेथांची गाथा,सामान्,निबंद प्रतियोगिता ,समूह चर्चा ,नेतृत्व,स्पुर्तीदायक गायन,आणि बरेच काही महत्वाची चर्चा ,या बद्दल चे घडण प्रहार मध्ये केले जाते

सहकार चळवळ

सावकारापासून शेतकऱ्याला मुक्तता मिळून देण्याकरिता सहकारी चढवळी ची स्थापना करण्यात आली.किंवा असेही मानता येयील की सहकार चढवळीमुळे शेतकरी वर्ग सावकार पासून मुक्त झाला.सहकार चढवळ शेतकऱ्याला त्याच्यायाचा मालाची उत्पादकता वाढविण्याला आणि भौतिक विकास करण्याला मदत करते. जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यानंतर २६ जानेवारी १९६२ मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी अधिनियम १९६० लागू केला आणि त्यावर अंमल सुद्धा केला .आणि ह्या कायद्याला नागरिकाकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला .राज्य सरकारने सहकारी क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती आणि 'लवाद' ची स्थापणा केली .त्यामुळे खाजगी क्षेत्राच्या समस्या सोडविण्याकरिता रामबाण इलाज मिळाला त्यामुळे सहकारी चळवळीला स्वतः उभे राहण्याकरिता चांगले समर्थन मिळाले.

वर्धा जिल्हा मध्ये सध्या १५३४ वगवेगळ्या सहकारी संघटना कार्यरत आहे.जिल्हा सहकारी बँक, आणी जिल्हा सहकारी भू विकास बँकमुळे शेतकऱ्यांना नवी दिशा मिळाली आणि शेतकऱ्यांना परिपूर्ण वित्तीय मदत मिळण्याकरिता सुविधा झाली.स्वर्गीय बापूराव देशमुख यांचा सहकारी चळवळी मध्ये महत्वाचा वाटा आहे.

बापू कुटी, सेवाग्राम

सन 1940 साली गांधीजींनी सेगाव या गावाचे नामकरण सेवाग्राम केले. महात्मास गांधीच्या पदस्पर्श आणि वास्तव्याने पुनीत झालेले क्षेत्र म्हणजे सेवाग्राम. वयाच्या 67 व्या वर्षी म्ह्णजेच 30 एप्रिल 1936 च्या पहाटे महात्मा गांधी वर्ध्या पासून आठ किलोमीटर अंतरावरील सध्याच्या सेवाग्राम या ठिकाणी पोचले. पाच ते सहा दिवस ते याठिकाणी राहिले. येथील ग्रामस्थांना त्यांनी त्यांच्या येण्यामागील उद्देश सांगितला. तसेच भूमिका विषद केली. त्या्नंतर हळूहळू सेवाग्राम आश्रम भारताच्या स्वातंत्र्य संग्राम चळवळीचे केंद्र बनले. सेवाग्रामचे पूर्वीचे नाव सेगाव होते. हे गाव पूर्ण जंगलाने वेढलेले होते. ना पोस्ट ऑफिस ना टेलिग्राफ ऑफिस. केवळ सेवाग्राम गावाकडे येण्यासाठी एक पादचारी आणि बैलगाडीचा रस्ता होता.

आश्रमातील कुटी

सेवाग्राम येथे गांधीजी येण्यापूर्वीच मीरा बेन येथे वास्तंव्यास होत्याह. सेवाग्रामकडे येण्यासाठी त्याकाळात पक्का रस्ताही नव्हाता. परंतु जेव्हा गांधीजी सेवाग्राम येथे आले तेव्हा तत्काळ येथे एक बगल रस्ता तयार करण्यावत आला. गांधीजींनी त्यांच्या वास्तयव्यासाठी उभारण्यातत येणा-या कुटीकरीता 500 रुपयांहून अधिक खर्च लागणार नाही ही अट घालून कुटी उभारण्याएसाठी परवानगी दिली. या कुटीलाच आदि निवास म्हणून ओळखले जाते. या कुटीमध्ये महात्मा गांधीजी, कस्तुरबा गांधी, सरहद्द गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राहायचे. याच कुटीतून पुढे महात्मा गांधी बापू कुटीत राहायला गेले.

बापू’ कुटी आणि ‘बा’ कुटी

आदि निवासात गावक-यांची संख्या. दिवसेंदिवस अधिक वाढल्याने गांधीजींच्या अनुयायी मीरा बेन यांनी त्यांच्या कुटीच्या पूर्वेला अजून एक नवीन कुटीची निर्मिती केली. ही कुटीही गांधीजींच्या कार्यालयाकरीता देऊन त्यांनी गावाजवळच स्थलांतर केले. या कुटीलाच आज बापू कुटी आणि बापू ऑफिस असे संबोधले जाते.


गांधीजींना भेटायला बहुसंख्येने अनुयायी येत असत. याच कुटीत कस्तुरबाही राहत. त्यामुळे कस्तु रबांजींची अडचण लक्षात घेऊन बापूजींनी बाजूलाच कस्तुजरबाजींसाठी कुटी उभारली. महिलांसाठी निवासस्थानाची सोय यामुळे झाली. या कुटीलाच ‘बा’ कुटी म्हसणून ओळखले जाते. जेव्हा आपण या कुटीकडे पाहतो तेव्हा गाधींजींचे साधे राहणीमान आपल्या् डोळयासमोर उभे राहते.

कुटीला बांबू, तट्टयांचे आच्छादन आहे. भिंती पांढ-या मातीने सारवलेल्या. आहेत. मीरा बेन यांनी कुटीच्यार भिंतीवर ओम, बांबूंचे वृक्ष, मोर, चरखा, निसर्गाची चित्रे रेखाटली होती. ती आजही कायम आहेत. खिडक्याम, दरवाजे बांबूनींच बनवून स्थानिक पद्धतीने सजविण्यात आलेले आहेत. ग्रामस्थांनी बनविलेल्या तट्टयांचा वापर कुटीच्या आच्छादनासाठी करण्यात आलेला आहे. सिंदीच्या‍ झाडापासून तयार करण्या‍त आलेल्या चटयांचा वापर गांधीजी करत असत.

बापूंच्या कार्यालयीन कुटीमध्येंच आपणाला तत्कालीन दूरध्व नीही पाहावयास मिळतो. गांधीजी वापरत असलेले सुंदर पेपर वेटही याठिकाणी पाहावयास मिळतात. तसेच चिनीमातीतील तीन माकडे सर्वांचे आकर्षण ठरते.

प्रार्थना स्थळ

सेवाग्राम आश्रमात सकाळ आणि सायंकाळ आजही प्रार्थना होते. महात्मा गांधीजींनी निर्माण केलेले हे प्रार्थनास्थपळ खुल्या ठिकाणी आहे. गांधीजी या ठिकाणी प्रार्थनेनंतर आश्रमातील, देशातील समस्या तसेच विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन करून उपस्थितांच्या शंकांचे निरसन करत.

परचुरे कुटी

बापूकुटी आणि कार्यालयीन कुटीच्या पूर्वेला परचुरे कुटी आहे. परचुरे हे सामाजिक कार्यकर्ते आणि संस्कृ्तचे गाढे अभ्यापसक होते. तत्काळात कुष्ठिरोगामुळे नागरिक त्रस्त होते. परचुरेही या रोगामुळे बाधित झाले. त्यांमनी आत्महत्या करण्या्चा विचार मनात आणला होता. तत्पूर्वी त्यांनी गांधीजींची भेट घेतली. त्यायनंतर गांधीजींनी या रोगावर उपचारासाठी नर्सिंग आणि स्वच्छतेवर भर दिला. तसेच बाधित परचुरेंची याच कुटीत सेवा केली.

मनोहरजी दिवान यांनी तर अशा रोगींसाठी गांधीजींच्या सूचनेवर पूर्ण आयुष्य व्यतित केले. त्यांसनी कुष्ठुरोग्यांसाठी सेवाग्राम, दत्तपपूर येथे रुग्णांची सेवा करण्यासाठी संस्था उभारली. परचुरेंनाही याठिकाणी हलविण्यात आले. परचुरेंची मृत्यूपर्यंत याचठिकाणी सेवा करण्याचत आली.

महादेव कुटी

धार्मिक वृत्ताचे, गुजराती आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्वी असलेले महादेवभाई देसाई. गांधीजींचे सचिव आणि अत्यंत जवळचे. ते त्यांच्या कुटुंबासह बापू कुटी जवळ राहत. त्यांच्या कुटीला महादेव कुटी म्‍हणून ओळखल्या‍ जाते. पुण्याहतील आगाखान पॅलेस तुरुंगात जेव्हा गांधीजी होते त्योलवळी 15 ऑगस्टा 1942 ला महादेवभाई देसाई यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याोने महात्मा गांधींना अति दुःख झाले होते.

किशोर कुटी

गांधी विचारांचे अभ्यासक, काही काळ, गांधीजींचे सचिव असलेले किशोरभाई मश्रूवाला यांना दम्याचा त्रास होता. म्हणून त्यांना पावसाळयात अधिक त्रास होऊ नये याचा विचार करुन बापू कुटीच्या इशान्य दिशेला कुटी उभारण्यालत आली. या कुटीलाच किशोर कुटी म्हणून ओळखल्या जाते.

सरहद्द गांधी

आजारी रुग्णांची सेवा त्याचबरोबर इतर कर्तव्येही चोखपणे पार पाडणारे. गांधीजींनी ज्यांना वर्ध्यात येण्याचे निमंत्रण दिले होते असे अत्यंत साधी राहणी असणारे अब्दूंल गफार खान. आदि निवासात राहणा-या व्यक्तीला मांसाहार करण्याची गांधीजींनी परवानगी दिली होती. परंतु त्यांनी मांसाहार केला नाही. आश्रमाच्याद शिस्तीचे कठोरपणे पालन करत असत. ते स्वातःला भगवंताचा सेवक मानत असत.

संत तुकडोजी महाराज

महात्मां गांधीजींसोबत एक महिना आदि निवासात वास्ताव्यानस राहिलेले संत तुकडोजी महाराज. त्यांची प्रेरक प्रार्थना असंख्यर ग्रामस्थं ऐकायला येत असत. सेवाग्राम आश्रमातून परतल्या नंतर संत तुकडोजी महाराजांनी महात्मास गांधीजींच्या् विचारांशी जुळणारा ग्रामोदयी आकृतीबंध त्यांच्या आश्रमात सुरु केला. सकाळ, सायंकाळ दररोज ते याठिकाणी प्रार्थना करत.

आश्रमासाठी अधिष्ठानरूप एकादशव्रत

  • सत्‍य
  • अहिंसा
  • ब्रम्‍हचर्य
  • अस्‍तेय
  • असंग्रह

युगानुरूप नव्‍याने जोडली गेलेली सहा व्रते              

  • शरीरश्रम
  • अस्‍वाद
  • निभर्यता
  • सवधर्मसमभाव
  • स्‍वदेशीचा स्‍वीकार
  •  स्‍पृश्‍यास्‍पृश्‍यता मिटविणे

सर्वोदयाचे सिद्धांत

1.     सर्वांच्‍या कल्‍याणात आपले कल्‍याण आहे.

2.     सर्वांना आपल्‍या कामातून आपली रोजीरोटी कमावण्‍याचा समान हक्‍क.

3.     श्रमयुक्‍त जीवन म्‍हणजे एक शेतकरी किंवा हस्‍तोद्योग करणारा यांचे जीवन हेच खरे जीवन आहे.

बापूजींचा दैनंदिन दिनक्रम

  • पहाटे 4 वाजता – झोपेतून उठणे.
  • 4.20 वाजता – सामुदायिक प्रार्थना, लिखाण आणि विश्रांती.
  • 7.00 वाजता – न्यादहारी, मॉर्निंग वॉक, स्ववयंपाकासाठी मदत करणे, प्रसाधन गृह, भांडयांची स्वच्छता, भाजीपाला निवडणे आदी.
  • 8.30 – भेटी, लिखाण किंवा वाचन.
  • 9.30 – सूर्यप्रकाशात तेल मसाज, टब बाथ.
  • 11.00 – पाच पदार्थांपेक्षा अधिक नसलेले भोजन.
  • दुपारी 1.00 वाजता – प्रतिनिधींशी भेटीगाठी.
  • 4.30 – विणकाम.
  • सायंकाळ 5.00 वाजता – सायंकाळचे भोजन.
  • 6.00 – सायंकाळची प्रार्थना.
  • 6.30 – काहीवेळेला सोयीनुसार फेरफटका.
  • 9.00 – काम संपल्यासनंतर झोपणे.

बापूंचे वास्तव्य

महात्मा गांधींचे सेवाग्राम आणि वर्ध्यामध्ये 2 हजार 588 दिवस वास्तव्य, होते.

यात्री निवास आणि गांधी चित्र प्रदर्शनी

सेवाग्राम आश्रमाच्या‍ पश्चिमेला मुख्ये रस्याा वर गांधीजींच्याा जीवनावर आधारीत गांधी चित्र प्रदर्शनी आहे. तसेच यात्री निवासातही पर्यटकांसाठी प्रदर्शन भरविण्यारत आलेले असते.

सेवाग्रामशी संबंधित इतर संस्‍था

1.     गांधी सेवा संघ, सेवाग्राम

2.     सर्वसेवा संघ, महादेवभाई भवन, सेवाग्राम

3.     नई तालीम समिती, आश्रम, सेवाग्राम

4.     ब्रह्म विद्यामंदिर, पवनार, वर्धा

5.     महारोगी सेवा समिती, दत्‍तपूर, वर्धा

6.     ग्रामसेवा मंडळ, गोपुरी, वर्धा

7.     मगनसंग्रहालय, वर्धा

8.     अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ, गोपुरी, वर्धा

9.     आचार्यकुल, गोपुरी, वर्धा

10.खादी मिशन, गोपुरी, वर्धा

11.शिक्षा मंडळ, वर्धा

12.महिला आश्रम, वर्धा

13.गांधी ज्ञान मंदिर, वर्धा

प्रेक्षणिय स्थळे

केळझर

विदर्भातील अष्टाविनायकांपैकी एक असलेले वरद विनायकाचे मंदिर येथे आपणाला पाहावयास मिळते. या मंदिरात आर्य कालीन गणरायाची मूर्ती आहे. तिला एक चक्रा गणेश म्हणतात. या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची रीघ असते. येथे पांडवकालीन गणेश कुंडही आहे.

विश्वआशांती स्तूंप

सन 1935 मध्येा जपानच्या फुजी गुरुजींनी वर्ध्या मध्येक महात्मात गांधीजींची भेट घेतली. बौध्दध समुदायासाठी भारतात प्रार्थनेकरीता स्तूयप उभारावेत, अशी अपेक्षा त्यांयनी भेटी दरम्या न व्यफक्तत केली. त्यांाची ही इच्छां गांधीजींनी मान्यक केली. त्यांमुळे वर्ध्या्मध्ये विश्वप शांती स्तुतपाची उभारणी जपानच्या सहकार्याने करण्यात आली. त्या्मुळे भारतातील आठ शांती स्तू पांपैकी एक शांती स्तूप वर्ध्याणतही उभारण्या्त आला.

गीताई मंदिर

गीताई मंदिराला छत नाही की भिंती नाहीत. गायीच्या आकारासारखे हे मंदिर आहे. विनोबा भावे यांनी भगवद्गीतेचे भाषांतर केले. त्यांच्या भाषांतरीत गीताई पुस्त कातील अध्याय या मंदिरात उभ्या दगडांवर कोरले आहेत. मंदिराच्या बाजूलाच शांती कुटी आहे. त्याभमध्येद महात्माल गांधी, जमनालाल बजाज यांच्या आठवणी प्रदर्शनीच्या स्वारुपात जपण्याेत आल्या आहेत.

गांधी ज्ञान मंदिर

बजाजवाडीतील हे सार्वजनिक ग्रंथालय आहे. ग्रंथालयाचे वैशिष्टळये म्हगणजे महात्मा गांधींनी लिहिलेले पुस्ताके आपणाला येथे वाचावयास मिळतात. तसेच महात्मा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी पुस्तथकेही या ग्रंथालयात उपलब्धा आहेत. तसेच साहित्यव, अर्थशास्त्र , राज्यथशास्त्र , सामाजिक शास्त्रक आणि इतरही विषयांचे संदर्भ साहित्यल याठिकाणी पाहावयास मिळतात.

सन 1950 साली डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यारहस्तेन या ग्रंथालयाच्या कोनशिलेचे अनावरण झाले. तर 1954 साली पंडित जवाहरलाल नेहरु यांनी या ग्रंथालयाचे उद्घाटन केलेले आहे. त्या्वेळी नेहरूजींनी उघडलेले कुलूप आजही सुस्थितीत असून जपण्यात आले आहे.

सेवाग्राम

स्वधर्गीय जमनलाल बजाज यांच्या् विनंतीवरुन सन 1936 साली महात्मां गांधी वर्ध्याला आले. त्यांनी आश्रम तत्कानलीन सेगावात करण्याचे निश्चित केले. सेवाग्राम आश्रमातूनच देशाची स्वा्तंत्र संग्राम चळवळ पूर्णअर्थाने सुरु होती. आजही गांधीजींचे उपयोगातील साहित्य सेवाग्राम येथील आश्रमात पाहावयास मिळते. आश्रमाच्या परिसरातच आदी निवास, बापू कुटी, ‘बा’कुटी, आखरी निवास, महादेव कुटी, किशोर कुटी आदी ऐतिहासिक ठेवा जपण्याात आलेला आहे. या सर्वांची देखरेख आश्रम ट्रस्टि करत असते. सेवाग्राम आश्रमाच्या बाजूलाच गांधीजींच्याय जीवनावर आधारीत चित्रप्रदर्शनी आहे. तसेच भारत सरकारच्या पर्यटन आणि विकास खात्यांतर्गत पर्यटकांसाठी आश्रमाच्यार परिसरातच यात्रेकरूंसाठी निवासाची सोयही आहे. महात्मा गांधींच्या स्मरणार्थ सन 1944 साली कस्तुवरबा रुग्णायलयाची स्थाकपनाही सेवाग्राम येथे करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर डॉ. सुशीला नायर यांनी सन 1969 साली महात्माग गांधी वैद्यकीय महाविद्यालय सेवाग्राम येथे सुरु केलेले आहे.

परमधाम आश्रम, पवनार

वर्ध्याचपासून पाच मैलाच्या अंतरावर धाम नदी काठावर पवनार हे गाव आहे. याठिकाणी आचार्य विनोबा भावेंनी 1934 साली परमधाम आश्रमाची स्थावपना केली. स्वोशांती, ब्रम्हामच्याच शोधात निघालेल्या विनोबाजींवर महात्माऊ गांधीजींच्यार विचारांचा प्रभाव पडला. त्यायमुळे त्यां नी अंतर्मनाचा ठाव लक्षात घेऊन पदयात्रा, भूदान चळवळ राबविली. तसेच येथूनच भारत छोडो आंदोलनाचे नेतृत्व् केले. आणखीन एक वैशिष्टतय म्हचणजे महात्माद गांधीजींच्या अस्थीचे या धाम नदीतच विसर्जन करण्याणत आले होते.

बोर धरण

सेलू तालुक्यारतील बोरी गावाजवळील बोर नदीवर बोर धरण बांधण्यात आलेले आहे. वर्धा शहरापासून 32 किलोमीटर अंतरावर हे पर्यटन स्थळ आहे. धरणाजवळ सुंदर असा बगीचा आहे. वनक्षेत्रही राखीव असल्याने हे धरण पर्यटकांचे आकर्षण ठरते. शिवाय जवळच बोर अभयारण्य आहे.

हयू एन सँग धम्मत शिबिर केंद्र व स्तूरप

सेलू तहसील क्षेत्रांतर्गत येणा-या डोंगराळ भागात तैवान आणि इंग्लं डच्या आर्थिक सहकार्याने धम्मा केंद्राची स्था पना बोर धरण परिसरात करण्या त आलेली आहे. भगवान गौतम बुध्दां च्या विविध भावमुद्रा याठिकाणी आपणास पाहावयाला मिळतात. सुंदर असे येथे स्तूयप आहे. निसर्गरम्यत असा हा परिसर पाहण्यालसाठी असंख्यन पर्यटक देशविदेशातून याठिकाणी येत असतात. दरवर्षी याठिकाणी शिबिराचे आयोजन करण्या्त येत असते.

गारपीट

कारंजा तहसील कार्यक्षेत्रांतर्गत गारपीट परिसर येतो. वर्ध्यालपासून 64 कि.मी अंतरावर गारपीट हे गाव आहे. परिसरात घनदाट जंगल असून टेकडीवर विश्रामगृहाची व्यवस्थात आहे. त्याटमुळे जंगलातील विविध प्राणी याठिकाणाहून पाहायला मिळतात.

गिरड

वर्ध्या पासून 59 किलोमीटर अंतरावर समुद्रपूर तहसीलमध्ये गिरड हे गाव आहे. याठिकाणी शेख फरीद बाबाचा दर्गा आहे. दर्ग्याजवळ तलाव आहे. गावात भोसलेकालीन राम मंदिरही आहे. रामनवमीला याठिकाणी यात्रा भरते. तसेच दहा दिवसीय मोहरम उत्संवही येथे भरतो. सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हयणून या गावाकडे पाहिले जाते.

ढगा

सातपुडा पर्वत रांगातील धामनदीच्यात उपनदीजवळ ढगा हे जंगलक्षेत्र आहे. या पर्यटन क्षेत्रापासून तीन किलोमीटर अंतरावर शिव मंदिर आहे. महाशिवरात्रीला मोठया उत्साहात याठिकाणी भाविक येत असतात. तसेच येथे यात्रेचेही आयोजन करण्यातत येत असते.

मगन संग्रहालय

ग्रामोद्योग आणि ग्रामविकासाच्या संकल्पलनेवर आधारीत असलेले हे ऐतिहासिक असे संग्रहालय आहे. महात्मास गांधींनी 30 डिसेंबर 1938 रोजी मगन संग्रहालयाचे उद्घाटन केले. वर्धा शहराच्याआ मधोमध असलेल्या या संग्रहालयात अनेक ऐतिहासिक आहे. या संग्रहालयात गांधीजींशी संबंधित वस्तूह सं‍ग्रहित करून ठेवण्यातत आलेल्याह आहेत. डॉ. कुमारप्पाय आणि आर्यनयकम यांच्यां अथक परिश्रमातून जनतेसमोर हा ऐतिहासिक ठेवा जपण्याकत आलेला आहे.

राष्ट्रमभाषा प्रचार समिती

हिंदी राष्ट्रीभाषेचा प्रसार आणि प्रचार व्हालवा. या उद्देशाने राष्ट्रकभाषा प्रचार समितीची स्थारपना करण्या‍त आली. समितीद्वारे देशभरात हिंदी परीक्षांचे आयोजन करण्यारत येत असते. नागपूर येथील हिंदी साहित्ये संमेलनात घेतलेल्या् ठरावानुसार डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यात काळात 1936साली राष्ट्र भाषा प्रचार समितीची सुरुवात वर्ध्याडत करण्याजत आली.

लक्ष्मीस नारायण मंदिर

भगवान विष्णू. आणि महालक्ष्मी चे हे मंदिर आतील बाजूने पूर्ण संगमरवरी असे आहे. हरिजनांसाठी स्वकर्गीय जमनालाल बजाज यांनी मंदिर खुले केले. 19 जुलै 1928 साली या खुल्या् केलेल्याल मंदिराच्याि शेजारीच गोरगरीबांसाठी औषधीचे दुकानही त्यांनी उघडले. या मंदिराची बांधणी 1905 मध्ये करण्यात आली होती.

बजाजवाडी

स्वहर्गीय जमनालाल बजाज यांचे बजाजवाडी येथे निवासस्थान आहे. महात्माज गांधीजींच्याव भेटीसाठी डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लहभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, खान अब्दुल गफार खान, डॉ. सुभाषचंद्र बोस, स्वाितंत्र्य संग्रामातील नेते वर्ध्याजत आल्यानंतर ते बजाजवाडीतील विश्रामगृहातच मुकामी राहत असत. विशेषत्वाने पंडित जवाहरलाल नेहरु बजाजवाडीतील बंगल्यांतच राहत.

आष्टी

राष्ट्रीसंत तुकडोजी महाराजांच्याम आरती मंडळाचे आष्टी हे केंद्रबिंदू आहे. त्या्च्यायच प्रेरणेने आष्टीातील तरुणांनी 16 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. त्याटतच त्यांजनी देशासाठी हौतात्म्‍य पत्कलरले. भारतीय इतिहासात आष्टी या गावाला खूप मोलाचे असे स्थासन आहे. स्वातंत्र्य संग्रामातील आष्टीतील शहीदवीरांना मानवंदना देण्यासाठी, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्या साठी येथे हुतात्मा दिन आयोजित करण्यात येतो. नागपंचमीच्याळ दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यानत येत असते.

सोनेगाव (आबाजी)

नागपूर-मुंबई रेल्वे- लोहमार्गावरील दहेगाव रेल्वेय स्थानक आहे. या स्थानकापासून 7 कि. मी. अंतरावरील देवळी तहसीलांतर्गत सोनेगाव (आबाजी) हे गाव येते. आषाढी, कार्तिकी यात्रेतील आबाजी महाराजांच्या आठवणी जागृत ठेवण्याबसाठी आबाजी महाराजांच्या. स्मातरकाची निर्मिती याठिकाणी करण्याणत आलेली आहे. जुन्या पद्धतीतील घरे, भगवान श्रीकृष्ण आणि लक्ष्मी-नारायणाचे मंदिरही या ठिकाणी भाविकांना आकर्षित करत असतात.

कापशी

सन 1890 मध्ये संत नानाजी महाराजांनी सुंदर असे लक्ष्मी –नारायणाचे मंदिर कापशी या ठिकाणी बांधले. यातील मूर्तीचे शिल्प काळया दगडावर 91 सेमी उंचीचे कोरण्यात आलेले आहे. वर्ध्यापासून केवळ 34 किलो‍मीटर अंतरावर कापशी हे गाव येते. हिंगणघाट तहसीलांतर्गत असलेले हे गाव वर्धा नदीकाठावर वसलेले आहे.

कोटेश्ववर

देवळी तहसील अंतर्गत असलेले हे तीर्थक्षेत्र वर्ध्यापपासून 40 किलोमीटर अंतरावर आहे. वर्धा नदीच्या् उत्तर दिशेला किना-यावर हेमाडपंथी असे भगवान शंकराचे मंदिर याठिकाणी आहे. वशिष्ठर ऋषींनी येथे कोटी यज्ञ केल्याशची आख्याठयिका आहे. मंदिराशेजारील नदीची वाळूही यज्ञातील भस्मातशी साधर्म्य‍ साधते. तसेच या ठिकाणी वर्धा उत्तारवाहिनी वाहत असल्या ने या तीर्थाला काशीसारखे महत्व प्राप्त आहे, असेही सांगण्यात येते.

पोथरा धरण

वर्धा शहरापासून 65 कि. मी. अंतरावर पोथरा हे धरण असून ते हिंगणघाट तहसील अंतर्गत येते. सुंदर असा निसर्गाने नटलेला पोथरा धरणाचा परिसर आहे. विविध पक्षांनाही हा परिसर हवाहवासा वाटतो. त्यामुळेच या ठिकाणी आपणाला विविध रंगी पक्षी पाहावयास मिळतात. धरणाच्यात जलाशयाची पातळी सर्वत्र सारख्या प्रमाणातच याठिकाणी दिसते.

पारडी

हिंगणघाट तालुक्यातील वेणा नदीच्याय काठावर पारडी हे गाव आहे. वर्ध्यापासून 28 कि. मी. अंतरावर ते आहे. भगवंत मुरलीधराचे येथे प्राचीन मंदिर आहे. संत नागाजी महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ गोकुळाष्टमी उत्सरवही मोठया उत्साहात येथे भरल्या जातो.

पोहणा

प्रवेरसेन (पहिला) यांचा नातू तथा रुद्रसेन यांचा पूत्र पृथ्वीसेन याने पोहणा गावाची निर्मिती केली. पित्यावच्या आठवणीसाठी रुद्रसेन मंदिराची स्थाीपना पृथ्वी सेनाने याठिकाणी केली. प्राचीन काळातील हे मंदिर वर्धा नदीच्याच काठावर आहे. हिंगणघाट तालुक्यातील पोहणा हे गाव वर्ध्या्च्याच उत्तवरेकडून 50 किलोमीटर अंतरावर आहे. शिवपिंडीवर सव्वा खंडी धान्य मावते. येथे रूद्रसेनाच्या किल्याचेही अवशेष आहेत. शिव मंदिर परिसरात ब्रम्ह्देवाची मूर्तीही मिळाली आहे.

मांडगाव

वर्ध्याच्या इशान्य दिशेला 31 किलोमीटर अंतरावर मांडगाव आहे. समुद्रपूर तहसीलांतर्गत असलेल्या मांडगावात नद्यांचा त्रिवेणी संगम पाहावयास मिळतो. वेणा, वर्धा आणि यशोदा नद्यांचा याठिकाणी संगम होतो. संत मांडो या ठिकाणी बरेच काळ वास्तरव्यास असल्या्ने मांडगाव असे गावाचे नाव पडले, असे सांगितल्या जाते. येथे प्राचीन राम मंदिर आहे. शिवाय येथे पंचमुखी शिवलिंग आणि संत ब-हाणपुरे महाराजांची समाधी आहे.

महाकाली

आर्वी तहसील अंतर्गत येणारे महाकाली धरण वर्ध्यांपासून केवळ 35 किलोमीटर अंतरावर आहे. खरांगना-कोंढाली रस्त्यावरील ग्रामसूर टेकडीतून उगम पावलेली धाम नदी आणि त्यावरील महाकाली धरण, महाकाली देवीचे मंदिर आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. धाम नदीवर महाकाली धरण बांधण्या्त आलेले आहे. धरणाच्या. पायथ्याशीच गर्द झाडीत, निसर्गरम्य असे महाकाली देवीचे मंदिर आहे. हा निसर्गरम्या असा हा परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. शासनही या पर्यटस्थळाला विकसित करण्याकचा प्रयत्नर करत आहे. विश्रामगृह, बगीचा, बोटिंग आदी सुविधा येथे पर्यटकांसाठी आहेत. महाकाली देवीचे मूळ मंदिर पाण्या्खाली गेले आहे. या मंदिरात महाकाली, महासरस्वदती आणि महालक्ष्मीयच्याख बाण स्वरूपात मूर्ती मंदिर उघडे पडल्यानवर दिसतात.

हिंगणघाट

दिल्ली - चेन्नई रेल्वे लोहमार्गावर हिंगणघाट हा तालुका आहे. वर्या पासून 55 किलोमीटर अंतरावर हे तालुक्याचचे ठिकाण आहे. हिंगणघाट शहराजवळूनच वेणा नदी वाहते. भोसले घराण्याितील सरदार दादोबा बोरकर यांनी त्यांच्या आईच्या स्म्रणार्थ सन 1792 ते 1805 या कालावधीत मल्हारी-मार्तंड या मंदिराची उभारणी याच ठिकाणी केली आहे. मंदिरासाठी त्यां नी वरोरा, भंडक, भटाला आदी ठिकाणाकडून शीळा आणल्यां. राजस्थातनातील शिल्पाकारांनी या मंदिराची कलाकूसर केली. मंदिराच्या नक्षीकामातून रामायण, महाभारतातील घटना मांडण्याचा प्रयत्न यातून करण्यात आलेला आहे.

बन्‍सीलाल कोचर यांनीही सन 1955 साली याठिकाणी अतिशय सुरेख काचेच्‍या साहित्‍यापासून जैन मंदिराची उभारणी ही हिंगणघाट येथेच केली आहे. येथूनच कापसाची इंग्लंडमध्‍ये निर्यात होत होती. शिवाय येथील कापड उद्योग नावलौकिकास आला होता.

No comments

Hindi vyakaran Mock Test

Scholarship Exam 2024 PAPER 1/2 : Hindi अनेकार्थी शब्द Start The Quiz Time's Up score: Next question See Your Result Total Quest...

Powered by Blogger.