सजीवांची लक्षणे

 सजीवांची लक्षणे

  • सजीवांमध्ये प्राणी आणि वनस्पती यांचा समावेश होतो. पेशीमय रचना असणे हे सजीवांचे लक्षण असून काही सजीव एकपेशीय असतात तर काही सजीव बहुपेशीय असतात. अमिबा, पॅरामेशिअम, क्लोरेला, यीस्ट हे एकपेशीय असून निर्जिवांमध्ये अशी रचना नसते.
  • सर्व सजीव स्वयंप्रेरणेने हालचाल करतात. प्राणी एका ठिकाणाहून दुसरीकडे हालचाल करू शकतात तर वनस्पती जागच्या जागीच हालचाल करतात. वेल आधाराच्या दिशेने झुकते ही वनस्पतीची हालचालच होय. निर्जीव वस्तू स्वताहून हालचाल करीत नाहीत.
  • सभोवताली असणाऱ्या घटकांकडून चेतना मिळाली की सजीव प्रतिसाद देतात.सजीवांच्या याच गुणधर्माला चेतनाक्षमता असे म्हणतात.
  • माणसाची वाढ जन्मापासून वयाच्या 18 ते 25 वर्षांपर्यंत होते. वनस्पतींच्या वाढीला अशी कालमर्यादा नसते कारण त्या जिवंत असेपर्यंत वाढू शकतात.

श्वसन हे सजीवांचे एक प्रमुख लक्षण असून सर्व सजीवांमध्ये श्वसनक्रिया सतत चालू असते. निर्जीवांमध्ये श्वसन क्रिया नसते. तर वनस्पती हीच क्रिया अवयवांवरील सूक्ष्म छिद्रांद्वारे करतात.

  • सजीव स्वतःसारखाच दुसरा जीव निर्माण करतात या क्रियेला प्रजनन किंवा पुनरुत्पादन असे म्हणतात.
  • शरीरासाठी पोषक नसणारे पदार्थ शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जनअसे म्हणतात. ही क्रिया फुप्फुसे, मूत्रपिंड, आतडे आणि त्वचा यांच्यामार्फत प्राणी उत्सर्जन करतात. बाभूळ, कडूलिंब, शेवगा अशा वनस्पती खोडातून डिंक बाहेर टाकतात.
  • जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा कालखंड म्हणजे सजीवांचा जीवकाळ असून प्राण्यांचे वनस्पतीचे हे आयुष्य ठराविक असते. सर्व सजीवांना मृत्यू असून हे सजीवाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सजीवांप्रमाणे निर्जीवांना मरण येत नाही.
प्राणी आणि आयुर्मर्यादा:


क्र. प्राणी आयुर्मर्यादा
1. घरमाशी 1 ते 4 महिने
2. कुत्रा 16 ते 18 वर्षे
3. शहामृग 50 वर्षे
4. हत्ती 70 ते 90 वर्षे


सजीवांचे वर्गीकरण

  • वनस्पतींच्या वर्गीकरणाचे श्रेय कॅरोलस लिनियस या शास्त्रज्ञास जाते. कारण 1758 मध्ये 'द्विनाम पद्धती' ही वनस्पतींच्या वर्गीकरणाची पद्धत शोधून काढली. या पद्धतीचा वापर सध्या सर्वत्र केला जातो.
  • सजीवांतील साम्य, भेद आणि विविधता असे निकष लक्षात घेऊन त्यांचे वर्गीकरण केले जाते.
  • फुले न येणाऱ्या वनस्पतींना अपुष्प वनस्पती म्हणतात. स्पायरोगायरा, नेचे, भूछत्रे यासुद्धा अपुष्प वनस्पती आहेत.
  • जास्वंद, शेवंती या वनस्पतींना फुले येतात अशा फुले येणाऱ्या वनस्पतींनासपुष्प वनस्पती म्हणतात. आंबा, धोतरा, रातराणी, जाई, मोगरा, सदाफुली, गुलबाक्षी या काही सपुष्प वनस्पती आहेत.
  • ज्या वनस्पती अनेक वर्षे जगतात त्यांना बहुवार्षिक किंवा बहुवर्षजीवी वनस्पतीम्हणतात.


क्र. नाव व्याख्या उदाहरण
1. वृक् खूप उंच वाढणाऱ्या टणक, मजबूत ष खोड असलेल्या वनस्पतींना वृक्ष म्हणतात. आंबा, वड, ताड, माड
2. झुइप टणक व मजबूत खोडाच्या पण मध्यम उंचीच्या वनस्पतींना झुडुपे म्हणतात. संत्रे, लिंबू,जास्वंद, कन्हेर इत्यादी
3. रोपटे मऊ आणि लवचिक खोड असलेल्या वनस्पतींना रोपटे म्हणतात तुळस, गवती चहा, हरभरा, मिरची, तीळ इत्यादी.
4. वेल कमकुवत खोड असणाऱ्या, आधाराने वाढणाऱ्या वनस्पतींना वेल म्हणतात कारले, घोसाळे, काकडी, भोपळा, द्राक्षे


द्विवार्षिक वनस्पती

  • मुळा, गाजर, बीट यासारख्या काही वनस्पतींचे जीवनचक्र दोन वर्षांत पूर्ण होते. त्यांना फुले आणि फळे एकदाच येतात अशा वनस्पतींना द्विवार्षिक किंवा द्विवर्षजीवी वनस्पती म्हणतात.
  • सूर्यफूल, झेंडू, ज्वारी, बाजरी, मका या वनस्पतींचे जीवनचक्र एका वर्षात पूर्ण होते. त्यांना एकदाच फुले आणि फळे येतात. त्यानंतर त्या वाळतात. या वनस्पतींना वार्षिक किंवा वर्षजीवी वनस्पती म्हणतात.
  • राहण्याच्या ठिकाणावरून प्राण्यांचे वर्गीकरण भूचर, जलचर आणि उभयचर असे केले जाते. घोडा, कोल्हा, मांजर हे प्राणी जमिनीवर राहतात त्यांना भूचर म्हणतात. मासा, जेलीफिश, ऑक्टोपस हे प्राणी पाण्यात राहतात त्यांना जलचर तर बेडूक जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहू शकतात त्यांना उभयचर म्हणतात.
  • आपल्या पाठीच्या मध्यावरून बोट फिरवल्यास हाडांची माळ असल्यासारखे जाणवते त्याला पाठीचा कणा म्हणतात. पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांना पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांना अपृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतात.
  •  पृष्ठवंशीय प्राण्यांच्या तुलनेत अपृष्ठवंशीय प्राण्यांचा मेंदू कमी विकसित झालेला असतो. उदा. अमिबा, कृमी,गांडूळ,गोगलगाय इत्यादी

  • त्वचेवरील आच्छादनावरून प्राण्यांचे खवले, पिसे आणि केस असलेले प्राणी असे प्रकार पडतात.

    मासा, साप, सरडा, कासव इत्यादी प्राण्यांच्या शरीरावर खवले असतात. खवल्यांना शल्क असेही म्हणतात. व या प्राण्यांना शल्क असलेले प्राणी म्हणतात, वानर, अस्वल या प्राण्यांच्या अंगावर केस असतात. त्यांना केस असलेले प्राणी म्हणतात. गरुड,घार, पोपट, मोर अशा प्राण्यांच्या शरीरावर पिसे असतात. त्यांना त्यांना पिसे असलेले प्राणी म्हणतात.

  • प्राण्यांच्या प्रजनन क्रियेवरून त्यांचे अंड्यातून जन्माला येणारे म्हणजे अंडज व बाळांना किंवा पिल्लांना जन्म देणारे म्हणजे जरायुज असे दोन प्रकार पडतात.

वनस्पती व अवयव
  • वनस्पतींचे मूळ, खोड, पान, फूल, फळ हे अवयव आहेत. बिजामध्ये आदिमूळ

    आणि अंकुर हे भाग असतात. बीजांकुरण होताना आदीमुळापासून मुळाची वाढ जमिनीखाली होते. मुळाच्या टोकाच्या भागावर केसासारखे धागे असतात त्यांना मूलरोम म्हणतात.

  • बीजातील अंकुरापासून खोडाची वाढ जमिनीच्या वर होते अंकुर जस जसा वाढतो तसतशी खोडाची लांबी वाढते. खोडांवर पेरे असतात. ज्या ठिकाणी खोडांवर पेरे असतात तेथे पाने फुटतात. खोडाच्या दोन पेरांतील भागाला कांडे म्हणतात.

  • पानाच्या पसरट भागाला पर्णपत्र म्हणतात. पर्णपत्राच्या कडेला पर्णधारा म्हणतात.पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला पर्णाग्र म्हणतात.

  • फूल ज्या ठिकाणी देठाला येते तो भाग सामान्यतः पसरट व फुगीर असतो. त्याला पुष्पधार असे म्हणतात. फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग त्या पुष्पधारावर असतात. निदलपुंज, दलज, पुमंग आणि जायांग हे फुलाचे इतर भाग आहेत.


No comments

Hindi vyakaran Mock Test

Scholarship Exam 2024 PAPER 1/2 : Hindi अनेकार्थी शब्द Start The Quiz Time's Up score: Next question See Your Result Total Quest...

Powered by Blogger.