
ठाण्याचे पूर्वीचे नाव श्रीस्थानक होते. भारत देशात पहिली आगगाडी (रेल्वे) ही दि. 16 एप्रिल 1853 साली मुंबई ते ठाणे येथे सुरु झाली. सागरी, डोंगरी व नागरी अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना ठाणे जिल्ह्याला लाभली आहे. ठाणे जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्यादेखील मोठ्या प्रमाणावर आहे. 6 महानगरपालिका, 2 नगरपालिका, सिडको, एमआयडीसी आदी नियोजन प्राधिकरणे असलेला ठाणे हा राज्यातला एकमेव जिल्हा आहे. सर्वाधिक महसूल उत्पन्न देणारा जिल्हा म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो. ठाणे जिल्हयात 18 आमदार आणि 3 खासदार एवढे लोकप्रतिनिधी आहेत. सर्वाधिक धरणं असल्यामुळे पाणी पिकवणारा जिल्हा अशी ठाणे जिल्हयाची ओळख आहे. शहापूर तालुका हा तर धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. केंद्र शासन अंगीकृत दारु गोळा व शस्त्र निर्मिती करणारा कारखाना अंबरनाथ या तालुक्यात आहे. ठाणे जिल्हयातील भिवंडी हे शहर हातमाग यंत्रावर कपडे विणण्यासाठी प्रसिध्द आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने ठाणे जिल्हयात 10औद्योगिक वसाहती विकसित केल्या आहेत. तीन राष्ट्रीय महामार्ग व तीन लोहमार्ग ठाणे जिल्हयातून जातात. तलावांचे शहर अशी ठाणे शहराची ओळख आहे. हाजीमलंगगड, गोरखगड, माहुली इ. ऐतिहासिक किल्ले ठाणे जिल्ह्यात आहेत.2014 मध्ये या जिल्ह्याचे विभाजन करुन पालघर या नविन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे.
| मुख्यालय | ठाणे |
| तालुके | १. ठाणे शहर (महापालिका क्षेत्र),२. कल्याण,३. मुरबाड,४. भिवंडी,५. शहापूर्,६.उल्हासनगर,७. अंबरनाथ, |
| क्षेत्रफळ | ९,५५८ चौरस किमी (३,६९० चौ. मैल) |
| लोकसंख्या | १,१०,५४,१३१ (२०११) |
| लोकसंख्या घनता | १,१५७ प्रति चौरस किमी (३,००० /चौ. मैल) |
| साक्षरता दर | ८५% |
| प्रमुख शहरे | कल्याण, भिवंडी, उल्हासनगर |
चतुःसीमा
· पश्चिम- अरबी समुद्र
· उत्तर- गुजरात, वलसाड जिल्हा
· पूर्व- अहमदनगर जिल्हा, नाशिक जिल्हा
· दक्षिण- रायगड जिल्हा, मुंबई जिल्हा
| ठाणे जिल्हा पर्यटन |
| |
| |
| | | सिद्धिविनायक महागणपती मंदिर, टिटवाळा | | | कल्याण-कसारा मार्गावर काळूनदीच्या काठावर असलेल्या टिटवाळा येथे श्री महागणपतीचे जागृत मंदिर आहे. चिमाजीअप्पा यांनी वसई येथे पोर्तुगिजांवर विजय मिळविल्यानंतर श्रीमहागणपतीचे हे मंदिर बांधले. महागणपती मंदिर व विठ्ठल मंदिर यामुळे माहात्म्य प्राप्त झालेले एक यात्रास्थान आहे. टिटवाळा येथील गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील आठ प्रसिध्द गणपती मंदिरापैकी एक आहे. येथे पूर्वी कण्वऋषींचा आश्रम होता. | | | | | शकुंतलेने याच महागणपतीची पुजा केली असे सांगितले जाते आणि म्हणुनच या श्री महागणपतीस 'विवाहविनायक' असे म्हटले जाते. | | | | मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकावरून सूटणा-या कसारा, आसनगाव व टिटवाळा ह्या गाड्यांनी या प्रसिद्ध मंदिरात जाता येते. स्टेशनपासून हे गाव थोडे दूर आहे. तेथे बससेवा उपलब्ध आहे. सदरचे मंदिर टिटवाळा स्टेशनपासून 3 कि.मी. अंतरावर आहे. मंदिराकडे जाण्यासाठी स्टेशनपासून रिक्षा किंवा घोडागाडीचा उपयोग होतो. | | | | | | | ............................................................................................................................................................................................ | | | हाजीमलंग गड, कल्याण | | | ठाणे जिल्हयातील कल्याणच्या दक्षिणेस सुमारे 15 कि.मी. अंतरावर मलंगगड किल्लाआहे. मलंगगड हे धार्मिक स्थान श्री मलंग किंवा हाजी मलंग या नावाने ओळखले जाते. मलंगगड हा किल्ला शिलाहार राजाने बांधला. येथे मच्छिंद्रनाथांचे पुरातन मंदिर आहे आणि हाजीमलंग या मुसलमान साधूची कबर आहे. या कबरीच्या पूजेचा मान आजही हिंदूकडेच आहे. माघ पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते. | | | | | रायगड जिल्हयातील अन्य किल्ल्याप्रमाणेच माथ्यावर अवघड सुळका, व खाली थोडी माची आहे. ठाणे जिल्हयाच्या व रायगडजिल्हयाच्या सरहद्दीवर या किल्यावर बाबामलंग यांची समाधी आहे. किल्ल्यावरील पुजास्थानाच्या वर बराच उंच डोंगर आहे. तेथेतटबंदी, प्रवेशद्वार पाण्याची तळी, बुरुज आढळतात. अगदी उंचावरुन आजूबाजूला पाहिल्यास कुर्ला-मुंबईचा परिसर,पनवेलपर्यंतचा प्रवेश, तसेच माथेरानचा प्रदेश दिसतो. कल्याण स्थानकावरुन गडाच्या पायथ्याशी जाण्यासाठी बसचा उपयोगहोतो. मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकाहून अर्ध्या तासात बसने गडाच्या पायथ्याशी पोहचता येते. गडाच्या निम्म्या उंचीवर तेथील सुप्रसिद्ध हाजीमलंग दर्गा आहे. गडावर जाण्यासाठी पायथ्यापासून २ तास लागतात. | | | | | | | | | | शिवमंदिर - अंबरनाथ | | | | | | इ.स. 1060 साली चित्राराजा यंानी या मंदिराची स्थापना केली. व हे मंदिर सर्वांत जुनं व ऐतिहासिक मंदिर म्हणून ओळखल जात. अंबरनाथचे शिवमंदीर हे संपूर्ण भारतवर्षातील पहिले भूमिज मंदीर जे अत्यंत कलात्मक आहे. शिल्पवैभवाची साक्ष देत वर्षानुवर्षे उन-पाऊस आणि काळाचा आघात सहन करत असलेले स्थापत्यशास्त्राचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे "अंबरनाथचे शिवमंदिर". अंबरनाथच्या या प्राचिन शिवमंदिराचा समावेश | | | | | युनेस्कोने जाहीर केलेल्या २१८ कलासंपन्न वास्तूत झाला आहे. हे मंदिर पूर्ण दगडानी कोरलेलं असून, मंदिराची जमिन ही वाघाच्या कातडीपासून कोरलेलं आहे. अंबरनाथ हा तालुका शिवमंदिरामुळे प्रसिध्द झाला आहे. | | | | | | ............................................................................................................................................................................................ | | | | | वज्रेश्वरी | | | | | | ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी हे गाव गरम पाण्याच्या आरोग्यवर्धक कुंडांमुळे महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांमधील महत्त्वाचे स्थळ आहे. हे स्थळ तानसा नदीकाठी वसलेले असून येथे श्रीनित्यानंद महाराजांची समाधी आहे. येथे चिमाजी अप्पांनी बांधलेले वज्रेश्वरी देवीचे मंदिरही प्रसिद्ध आहे. येथील पर्यटकांचे मुख्य आकर्षण म्हणजे अकलोली व गणेशपुरीतील गरम पाण्याचे झरे. या झर्यांतून औषधी गुणधर्म असलेले गरम पाणी वाहत असल्याचे मानले जाते. | | मध्य रेल्वेच्या अंबरनाथ स्टेशनपासून हे मंदीर जवळ आहे. | | | | | |
| ............................................................................................................................................................................................ |
| | माळशेज घाट | | | | | | हा मुरबाड तालुक्यातील सह्याद्रीच्या रांगेतील घाट असून येथील परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे. हा राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील घाट आहे. सैबेरियातून येणाऱ्या गुलाबी रंगाचे फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे जुलै ते सप्टेंबर महिन्यात येतात. पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा आपल्याला दिसतो. तीन धारांमध्ये कोसळणारा हा धबधबा पहाण्यासाठी फक्त पावसाळ्यातच जावे लागेल. | | | हे ठिकाण पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध व विकसित झाले आहे. प्रामुख्याने पावसाळ्यात पर्यटक येथे गर्दी करतात. जिथे घाट रस्ता सुरू होतो तिथे दरीत घुसलेल्या एका पठारावर पर्यटकांच्या सोयीसाठी एमटीडीसीचे रिसॉर्ट आहे. जवळच खुबी गावाजवळ पिंपळगांव धरणाचा सुंदर जलाशय आहे. माळशेज हा मुख्य घाट रस्ता असल्याने एसटी च्या बऱ्याच गाड्या पुणे मुंबईहून ये - जा करत असतात. | | | | |
Post a Comment