जालना जिल्हा

 

जालना जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी असून मराठवाडा विभागात येतो. आधी औरंगाबाद जिल्ह्याचा भाग असणारा जालना जिल्हा १ मे १९८२ रोजी वेगळा केला गेला. जालना जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७६१२ चौ.कि.मी आहे तर लोकसंख्या १६,१२,३५७ इतकी आहे.

हा जिल्हा संकरित बियाणे-प्रक्रिया सारख्या कृषि-आधारित उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. महिको, महिंद्रा, बेंजो शीतल हे संकरित बियाणे उद्योग जिल्ह्यात आहेत. जालना जिल्ह्यातील तालुके- जालना, अंबड, भोकरदन, बदनापूर, घणसवंगी, परतूर, मंठा  जाफराबाद.

जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६५०-७५० मिमी इतके आहे. अनेक वेळा जिल्ह्यात दुष्काळ पडतो. जिल्ह्याचा उन्हाळा कडक असतो. जिल्ह्याचा ९५% भाग हा गोदावरी नदीच्या खोऱ्यात येतो. जिल्ह्याची ७५% जमिनीवर खरीप पिके निघतात, तर त्यांतली ४०% रब्बी पिकांखाली येतो. ज्वारी, गहू व इतर धान्ये,कापूस ही प्रमुख पिके आहेत.

जालना जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय जालना (शहर) असून ते महत्त्वाचे हातमाग  यंत्रमाग द्वारे कापड बनविण्याचे केंद्र आहे. बिडीचेही कारखाने आहेत.

याशिवाय येथे स्टील रीरोलिंगचा व्यवसाय चालतो.

जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्ती - शिवाजी महाराजांचे गुरू समर्थ रामदास स्वामी, जनार्दन मामा, बद्रीनारायण बारवाले, दासू वैद्य इत्यादी. .

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- राजूर येथील श्री गणेश मंदीर, अंबड येथील मत्स्योदारी देवी, जळीचा देव (जयदेववाडी).

 

जालना जिल्‍हयाची थोडक्‍यात माहिती

 

 

 

जालना जिल्‍हा

क्षेत्रा

७६१२ स्‍क्‍वे. कि.मी.

भौगोलीक स्‍थान

१९.१ ते २०.३ उत्‍तर अक्षांस. ७५.४ ते ७६.४ पुर्व रेखांश.

हवामान

किमान तापमान १० .५० अंश से.

सरासरी पर्जन्‍य

688.3mm

जनगणना (2011)

एकूण :->

19.58 लाख

पुरूष :->

10.15 लाख

स्‍त्री :->

9.43 लाख

घनता :->

255 प्रति कि.मी.

स्‍त्री/पुरूष प्रमाण ->

929 /1000

साक्षरता

एकूण :->

73.61 %

पुरूष :->

85.25 %

स्‍त्री :->

61.28 %

एकूण तालुके (8)

जालना, बदनापूर, भोकरदन, जाफ्राबाद, परतूर, मंठा, अंबड, घनसावंगी.

उपविभाग (4) 

जालना, परतूर , अंबडभोकरदन 

शहरे (4)

जालना, भोकरदन, अंबड व परतूर.

एकूण गावे.

970

पंचायत समिती (8)

जालना, बदनापूर, भोकरदन, जाफ्राबाद, परतूर, मंठा, अंबड, घनसावंगी.

नगर पालीका (4)

जालना, भोकरदन, अंबड, परतूर

ग्राम पंचायत

७८१

पोलीस स्‍टेशन

१६

पोलीस चौकी.

आरोग्‍य    

 

सामान्‍य रूग्‍णालय

ग्रामीण रूग्‍णालये

प्राथमीक आरोग्‍य केंद्र

४०

शिक्षण

जिल्‍हा परषिद, प्राथमीक शाळा

१५३०

जिल्‍हा परषिद, माध्‍यमीक शाळा

३२

माध्‍यमीक शाळा

२०५

वरिष्‍ठ महाविद्यालये

तांत्रिक शिक्षण

शासकीय औद्योगीक प्रशिक्षण केंद्र

खाजगी औद्योगीक प्रशिक्षण केंद्र

प्रवेश क्षमता

८००

तंत्रानिकेतन

तंत्रानिकेतन प्रवेश क्षमता

१९०

व्‍यावसायीक शिक्षण महाविद्यालय .

प्रवेश क्षमता

२४०

खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालय

उद्योगधंदे 

नोंदणीकृत उद्योगधंदे

२१७

नोंदणीकृत कार्यान्‍वीत उद्योगधंदे

१९०

सहकारी साखर कारखाने

सहकारी साखर कारखान्‍यांचे उत्‍पादन

,०९,००० टन

सुत गिरणी

मार्ग व दळणवळण

रेल्‍वे मार्ग

८८ कि.मी.

राष्‍ट्रीय महामार्ग

२२ कि.मी.

राज्‍य महामार्ग

१०५४ कि.मी.

जिल्‍हयातील मुख्‍य रस्‍ते

८५५ कि.मी.

Other District Roads

७२९ कि.मी. .

ग्रामीण रस्‍त्‍यांची लांबी

७९८ कि.मी.

एकूण रस्‍त्‍यांची लांबी

३५५९ कि.मी.

पशुपालन

एकूण पशुधन

,३५,०००

बैल व गायी

,५७,०००

म्‍हशी

८६,०००

मेंढी

५१,०००

शेळी

,८७,०००

कुक्‍कुट

,३३,०००

सहकार

सहकारी संस्‍था

१८९४

प्राथमीक कृषि सहकारी पतसंस्‍था

५६९

प्राथमीक कृषि सहकारी संस्‍था सदस्‍य

२६६०००

सहकारी दुग्‍ध संस्‍था

२६०

प्राथमीक कृषी पतसंस्‍थेमार्फत कर्ज

२९.२३ करोड

 

 

 

जालना जिल्‍हा  स्‍वतंत्र  भारताच्‍या महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या मध्‍यभागी आहे. तसेच मराठवाडयाच्‍या उत्‍तर दीशेस स्‍थीत आहे. जिल्‍हयाचे अक्षवृत्‍तीय व रेखावृत्‍तीय स्‍थान म्‍हणजे 1901 उत्‍तर ते 2103 उत्‍तर अक्षवृत्‍तीय व 7504 पुर्व ते 7604 पुर्व रेखावृत्‍तीय. जालना जिल्‍हा हा पुर्वी निझाम राज्‍याचा भाग होता. नंतर मराठवाडा मुक्‍ती संग्रामानंतर औरंगाबाद जिल्‍हयामधील एक जालना तालुका झाला.

जालना हा औरंगाबादचा पुर्वेकडील तालुका 1 मे 1981 रोजी जिल्‍हा म्‍हणून स्‍थापीत झाला, व औरंगाबाद जिल्‍हयातील जालना, भोकरदन, जाफ्राबाद, अंबड तालुका व परभणी जिल्‍हयातील परतूर असे पाच तालुके जिल्‍हयामध्‍ये समावेश करण्‍यात आले. जालना जिल्‍हयाच्‍या पुर्वेस परभणी व बुलढाणा जिल्‍हा स्थित आहे, औरंगाबाद पश्‍चीम दीशेला आहे, तसेच जळगाव उत्‍तरेकडे असून दक्षीणेस बीड जिल्‍हा आहे. 

    जालना जिल्‍हा 7612 चौ.कि.मी. क्षेत्राने व्‍यापलेला आहे, जे राज्‍याच्‍या एकूण क्षेत्राच्‍या तुलनेत 2.47 % एवढा आहे. जालना जिल्‍हयाचे मुख्‍यालय जालना असून राज्‍याच्‍या व देशाच्‍या राजधाणींशी ब्रॉडगेज रेल्‍वे लाईनने जोडलेले आहे. तसेच राज्‍यातील मुख्‍य शहरे देखील राज्‍य महामार्गाने जोडलेले आहेत. जिल्‍हा हा हायब्रीड सीडस् साठी प्रसिध्‍द असून स्‍टील रिरोलींग मिल, बिडी उद्योग, शेतीवर आधारीत उद्योगधंदे उदा. दाल मील, बि.बीयाने इ. तसेच मोसंबीसाठी देखील राज्‍यामध्‍ये जालना जिल्‍हा प्रसिध्‍द आहे.

    जालना जिल्‍हयातील जनतेने मराठवाडा मुक्‍ती संग्रामामध्‍ये महत्‍वाची भूमीका पार पाडली होती. श्री जनार्धन मामा नागापूरकर यांनी मातृभूमीसाठी आपल्‍या प्राणांची आहुती दिली

श्री राजुरेश्वर गणपती

राजुर,ता.भोकरदन

स्थान व भौगोलिक परिस्थिती

भौगोलिकद्ष्टया जालना जिल्हा राज्याच्या मध्यभागी येत असल्याने केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने जालना शहराजवळील इंदेवाडी येथे उपग्रह अनुश्रवण भूकेंद्र ऊभारले आहे. अंतराळात सोडलेल्या उपग्रहांशी सातत्याने संपर्क ठेवणे सोईचे ठरते. जालना जिल्हा 19.1 ते 20.3 या उत्तर अक्षांश व 75.4 रेखांश  ते 76.4  या पूर्व रेखांशामध्ये वसलेला आहे.  जिल्हयाचे स्थान राज्यात साधारणपणे मध्यभागी आहे. जिल्हयाच्या उत्तर सीमेवर जळगाव, पुर्वेस बुलढाणा व परभणी, दक्षिणेकडे बीड, व पश्चिमेकडे औरंगाबाद हे जिल्हे वसलेले आहेत.

2011 च्या जनगणनेनुसार जिल्हयाचे एकूण क्षेत्रफळ 7718 चौ.कि.मी. असून ते महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत 2.51 % आहे. एकूण क्षेत्रफळाच्या 1.32 % म्हणजे 102.0 चौ.कि.मी क्षेत्रफळ नागरी विभागाचे व उरलेले 98.68 % म्हणजे 7616 चौ.कि.मी. क्षेत्रफळ ग्रामीण विभागाचे आहे. प्रशासकीय सोयीसाठी या जिल्हयात भोकरदन, जाफ्राबाद, जालना, बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा असे एकूण 8 तालुके असून, या आठ तालुक्याच्या आठ तहसिल करीता दोन उपविभाग असून, प्रत्येक उपविभागासाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय, जालना व परतूर येथे आहे. जालना उपविभागांतर्गत जालना, बदनापूर , भोकरदन व जाफ्राबाद तहसिल असून, परतूर विभागात परतूर, अंबड, घनसावंगी व मंठा तहसिल येतात. प्रत्येक तहसिलस्तरावर एक तहसील कार्यालय व एक पंचायत समिती कार्यालय आहे. जिल्हास्तरावर जिल्हापरिषद असून त्यांच्या अधिपत्याखाली (8) पंचायत समित्या  कार्यरत आहेत.

जनगणना 2011 नुसार जिल्हयात एकूण 971 गावे असून त्यापैकी 963 गावे वस्ती असलेली व 8 ओसाड गावे आहेत. जिल्हयात 806 स्वतंत्र ग्रामपंचायती व 157 गटग्रामपंचायती आहेत.  जिल्हयात जालना, अंबड परतूर व भोकरदन या चार ठिकाणी नागरी क्षेत्र असून त्यासाठी नगरपरिषदा आहेत. जाफ्राबाद, बदनापूर, मंठा व घनसावंगी या तहसीलच्या ठिकाणी नागरी विभाग नसल्याने नगरपरिषदा नाहीत. जालना नगरपरिषद '' वर्गीय असून अंबड, परतूर, भोकरदन, या तीन नगरपरिषदा '' वर्गीय आहेत. जालना जिल्हयात जालना, अंबड, भोकरदन परतूर व मंठा  या पाचही ठिकाणी कृषि उत्पन्न बाजार समिती  कार्यरत आहे. जिल्हा मुख्यालय जालना येथे असून या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच विविध खात्यांची जिल्हास्तरीय कार्यालये आहेत.

नदी नाले

        जिल्हयाच्या दक्षिण सिमेलगत गोदावरी नदी अंदाजे 60 कि.मी. इतकी जिल्हयातुन वाहते. त्यामुळे जिल्हयाचा दक्षिण भाग गोदावरीच्या खो-यात मोडतो.   दुधना    गल्हाटी या गोदावरीच्या उपनदया मध्य भागातून  तर  उत्तर भागातून पुर्णाखेळणा    गिरजा  या उपनदया वाहतात. कुंडलिका ही दुधनाची उपनदी जालना शहरातुन वाहते.

जमिनीचा प्रकार

      जिल्हयातील    जिल्हयातील जमीन सुपीक व काळी असूुन कापसाच्या पिकासाठी योग्य आहे. जालना, बदनापुर, भाेंकरदन व जाफ्राबाद या तहसीलमधील जमीन हलक्या प्रतीची व मुरमाड आहे. या भागात प्रामुख्याने खरीपाची पिके घेतली जातात. जिल्हयाच्या दक्षिण व दक्षिणपुर्व भागातील अंबड, घनसावंगी, परतूर व मंठा या तहसीलमध्ये जमीन काळी व सुपीक आहे. या जमीनीत कापुस व रब्बीचे पिके चांगल्या प्रमाणात येतात. जिल्हयाच्या उत्तर भागाात विहीरी खोदल्या जाऊ शकत असल्या तरी जमीनीतील पाण्याची पातळी अतिशय खोल असुन भुगर्भातील पाणी अपु-या प्रमाणात आढळते ते बारमाही पिकासाठी अपुरे पडते.


वने

     जिल्हयात वनक्षेत्र फारच कमी व तुरळक असूुन उत्पादनाच्या दृष्टीने हलक्या दर्जाचे आहे. उपवनसंरक्षक, वनविभाग, औरंगाबाद, याचेकडील उपलब्ध माहितीनुसार जालना जिल्हयातील जंगलव्याप्त क्षेत्र 101.18 चौ.कि.मी. आहे. एकूण भौगोलीक क्षेत्राच्या ते 1.31 % येते. महाराष्ट्र राज्यात 5214 हजार हेक्टर जंगलव्याप्त क्षेत्र असुन त्याची भौगोलीक क्षेत्राची  टक्केवारी 16.95 % आहे. राज्यातील बाकी एकूण जंगलव्याप्त क्षेत्राशी जिल्हयाच्या वनक्षेत्राशी तुलना करता फक्त 0.12 % येते. यावरुन जिल्हयातील जंगलव्याप्त क्षेत्र खुपच कमी असल्याचे दिसून येते. सामाजिक वनीकरण विभागामार्फत गावातील गायरान जमीनी व रस्त्याच्या कडेने वर्गीकरण केले जात आहे.

पर्यावरणाच्या समतोल राखण्याच्या दृष्टीने जंगलव्याप्त क्षेत्र साधारणपणे 33 % असणे आवश्यक आहे.  जिल्हयातील वनक्षेत्र अतिशय कमी आहे.

विद्युत निर्मिती, विद्युत पुरवठा, व विजेचा वापर

विद्युत निर्मितीचा एकही प्रकल्प या जिल्हयात नाही. राज्य विद्युत मंडळामार्फत कोयना, पारस, परळी  अशा नजीकच्या प्रकल्पापासुन वीज पुरवठा केला जातो. जिल्हयात चारही शहरांचे विद्युतीकरण पुर्ण झालेले आहे. जिल्हयात 100 % विद्युतीकरणामुळे वीजेची मागणी वाढत असुन, या वर्षाच्या अखेरपर्यंत 227000 कनेक्शन देण्यात आले आहे.

खाणी व कारखाने

जिल्हयात  एकूण 116 नोंदणी झालेले कारखाने असुन या कारखान्यातील कामगार संख्या 2667 इतकी आहे. त्यापैकी 14 कारखाने बंद आहेत. 2008 मध्ये तर दर लाख लोकसंख्येमागे या कारखान्यातील कामगारांची संख्या 165 होती. धान्य गिरणी उत्पादनांसंबधी 20 चालु कारखाने असुन त्यात 229 कामगार आहेत. मुलभुत लोह व पोलाद चे उत्पादन करणारे 34 चालु कारखाने असुन त्यात 1519 कामगार आहेत.  जिल्हयातील चालु कारखान्यातुन 2008 वर्षात कामगारांनी काम केलेल्या श्रमदिनाची संख्या 4.73 लक्ष आहे, ही मागील वर्षीपेक्षा कमी आहे.

आर्थिक गणना

          1998 नंतर आर्थिक गणना 2005 मध्ये घेण्यात आली.  1998 च्या गणनेनुसार  जिल्हयात कृषि व बिगर कृषि उद्योग मिळुन एकूण 40,477 उद्योग आहेत. त्यापैकी 29,830 स्वयंकार्यरत उद्योग तर 10,647 आस्थापना होत्या. 2005 च्या गणनेनुसार जिल्हयात कृषि व बिगर कृषि उद्योग मिळुन एकूण 60,183 उद्योग आहेत. त्यापैकी 35,848 स्वयंकार्यरत उद्योग तर 24,335 आस्थापना आहेत. मालकीच्या प्रकारानुसार सर्वात जास्त म्हणजे 55,328 खाजगी, 4,377 सार्वजनिक व 478 सहकारी उद्योग आहेत.  खाजगी उद्योगाची एकूण उद्योगाशी टक्केवारी 91.92% येते.  या उद्योगापैकी 44,350 (73.68 %) ग्रामीण तर 15,833 (26.32 %) नागरी भागात आहेत.  अनुसुचित जाती, जमातीच्या लोकांची उद्योगाचे मालक म्हणुन एकूण संस्थेची टक्केवारी अनुक्रमे 7.44 3.90 येते. जागेविरहीत कार्यान्वित असलेल्या उद्योगांची एकूण उद्योगांशी टक्केवारी 30.53 आहे. शक्तीवर चालणा-या उद्योगांची एकूण उद्योगांशी टक्केवारी 12.54 येते. जिल्हयात या गणनेनुसार 1,67,920 कामगार आहेत. त्यापैकी 94,295 (56.15 %) वेतनावर काम करणारे आहेत. प्रती आस्थापना कामगारांची सरासरी संख्या 7 आहे. जिल्हयात दर लाख लोकसंख्येमागे आस्थापनांची संख्या 1510 आहे.

शिक्षणाच्या सोयी

         जालना जिल्हयात 1589 प्राथमिक 217 माध्यमिक व 30 उच्च माध्यमिक शाळा होत्या  त्यापैकी बहुतांश प्राथमिक शाळा ग्रामीण भागात आहेत. दर लाख लोकसंख्येमागे 99 प्राथमिक  तर 15 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, वर्ष 2009-10 मध्ये जिल्हयात 42 महाविद्यालये असुन त्यातील विद्यार्थ्यांची संख्या 9354 आहे. एकूण 407829 विद्यार्थ्यांपैकी 57.64 % विद्यार्थी प्राथमिक शाळेत, 39.91 % विद्यार्थी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत तर उर्वरीत 2.45 % विद्यार्थी महाविद्यालयात आहेत.  जिल्हयासाठी प्राथमिक शाळेतील प्रति शिक्षकी विद्यार्थ्यांचे प्रमाण 34 आहे, व माध्यमिक शाळांमधील  प्रति शिक्षकी विद्यार्थ्यांचे प्रमाण 34 आहे. 
 

वैद्यकीय व आरोग्य सेवा

         जिल्हयातील वैद्यकीय सेवा राज्य शासन, स्थानिक संस्था व खाजगी संस्थामार्फत पुरविण्यात येते. जिल्हयात 12 रुग्णालये, 12 दवाखाने व 40 प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत होती. या सर्व संस्थांमधुन 1163 खाटांची सोय उपलब्ध होती. त्यात 72100 आंतर रुग्ण व 740300 बाहय रुग्णांनी उपचार घेतले. सामान्य रुग्णालय, जालना  यांचे  अंतर्गत 8 ग्रामीण रुग्णालये आहेत. 40 प्राथमिक आरोग्य केंद्रे जिल्हा परिषदेमार्फत चालविली जातात. 1,47,000 लोकसंख्येसाठी 1 रुग्णालय तर 40324 ग्रामीण लोकसंख्येमागे 1 प्राथमिक आरोग्य केंद्र व दर लाख लोकसंख्येमागे 72 खाटा  असे प्रमाण आढळते.

धार्मिक स्थळे व पर्यटन -

         जालना जिल्हयात महत्वाची/प्रसिध्द पर्यटन केंद्रे विकसित होत आहेत त्यातील काही धार्मिक तीर्थक्षेत्रे, यात्रास्थळे आहेत.  जालना शहराची मंमादेवी, आनंदस्वामी मठ, दुर्गामाता मंदीर प्रसिघ्द असुन, अंबड येथे मस्त्याच्या आकारातील डोंगरावर मत्स्योदरी देवीचे हेमाडपंथी मंदिर असून, अंबड येथे जवळपास 400 वर्षापूर्वीचा चौघाडा व कल्याणस्वामींचा म्दंग तसेच वेणूबाईचा तानपूरा संगीतप्रेमींनी केलेल्या संग्रहात आढळतो. मराठवाडयातील अष्टविनायकापैकी एक गणपती राजुर येथे आहे. जाम तालुका घनसांवगी येथे समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान असून, त्यांचे मंदीर ही  आहे.  हेलस तालुका मंठा हे शिल्पकलेचे प्रणेते हेमाद्रीपंत यांचे गाव आहे. भोकरदन तालुक्यातील अन्वा या गावात पुरातन भव्या हेमाडपंथी शिवपंदिर असून, येथे कोरीव शिल्पही आहेत.  शिवाय रऊनापराडा ता.  अंबड येथे प्रसिध्द दर्गा असुन तेथे दरवर्षी मोठा ऊरुस भरतो.

जालना जिल्हयात महत्वाची/प्रसिध्द पर्यटन केंद्रे विकसित होत आहेत त्यातील काही धार्मिक तीर्थक्षेत्रे, यात्रास्थळे आहेत. जालना शहराची मंमादेवी, आनंदस्वामी मठ, दुर्गामाता मंदीर प्रसिघ्द असुन, अंबड येथे मस्त्याच्या आकारातील डोंगरावर मत्स्योदरी देवीचे हेमाडपंथी मंदिर असून, अंबड येथे जवळपास 400 वर्षापूर्वीचा चौघाडा व कल्याणस्वामींचा म्दंग तसेच वेणूबाईचा तानपूरा संगीतप्रेमींनी केलेल्या संग्रहात आढळतो. मराठवाडयातील अष्टविनायकापैकी एक गणपती राजुर येथे आहे. जाम तालुका घनसांवगी येथे समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान असून, त्यांचे मंदीर ही आहे. हेलस तालुका मंठा हे शिल्पकलेचे प्रणेते हेमाद्रीपंत यांचे गाव आहे. भोकरदन तालुक्यातील अन्वा या गावात पुरातन भव्या हेमाडपंथी शिवपंदिर असून, येथे कोरीव शिल्पही आहेत. शिवाय रऊनापराडा ता. अंबड येथे प्रसिध्द दर्गा असुन तेथे दरवर्षी मोठा ऊरुस भरतो

 

गणपती मंदीर, राजूर 

गणपती मंदीर, राजूर हे जिल्‍हयाच्‍या उत्‍त्‍ारेस 25 कि.मी. अंतरावर स्‍थीत आहे. प्रत्‍येक चतुर्थीला अनेक भावीक दर्शनासाठी येतात. अंगारखी चतुर्थी निमीत्‍त बहुतांश भाविक गणपतीचे दर्शन घेण्‍यासाठी मंदिरामध्‍ये हजेरी लावतात. 
          राजूर हे गणेशाचे एक पूर्ण पिठ म्‍हणून गणेश पुराणामध्‍ये मानले गेले आहे. तसेच इतर पिठ म्‍हणून मोरगाव, चिंचवड (पुणे) असून राहिलेले अर्धे पिठ पदमालय हे आहे. राजूर मंदिराचे नुतनीकरणाचे काम सुरू असून सध्‍या ते अखेरच्‍या टप्‍यामध्‍ये आहे.

 

मत्‍स्‍योदरी देवी मंदिर, अंबड

अंबड येथील मत्‍स्‍योदरी देवीचे मंदिर हे जालना शहराच्‍या दक्षीणेस 21 कि.मी. अंतरावर स्थित आहे. देविचे मंदिर हे ज्‍या टेकडीवर स्थित आहे त्‍या टेकडीचा आकार मासोळी (मत्‍स्‍य) सारखा आहे. त्‍यामुळे या देवीस मत्‍स्‍योदरी देविचे मंदिर म्‍हणून ओळखले जाउ लागले. हे मंदिर जवळपासच्‍या क्षेत्रातील अत्‍यंत जुन्‍या मंदिरांपैकी एक आहे. 
          ऑक्‍टोबर महिन्‍यामध्‍ये नवरात्र महोत्‍सवाच्‍या निमीत्‍ताने दरवर्षी या मंदिरामध्‍ये मोठी यात्रा भरते

 

 

जांबसमर्थ, घनसावंगी 

जांबसमर्थ येथे संत रामदास स्‍वामी यांचा जन्‍म झाला. हे ठिकाण जालना जिल्‍हयातील घनसावंगी तालुक्‍यामध्‍ये आहे. समर्थ रामदास स्‍वामी यांचा जन्‍म चैत्र शुक्‍ल नवमी शके 1530 (हिंदू दिनदर्शिकेनुसार) सायं. 12 झाला होता. अगदीरामजन्‍माचे वेळी. राम मंदिरामध्‍ये दर वर्षी राम नवमी निमीत्‍त यात्रा भरते. हे राम मंदिर रामदास स्‍वामी यांच्‍या घरामध्‍ये स्‍थीत आहे.           समर्थ मंदिर हे संत रामदास स्‍वामी यांच्‍या आठवणीमध्‍ये बनविण्‍यात आले आहे. एका संस्‍थेमार्फत या मंदिराचे व्‍यवस्‍थापन पाहिले जाते. ज्‍याची स्‍थापना 1943 साली नानासाहेब देव यांनी केली. 55 सदस्‍य व 11 ट्रस्‍टी या संस्‍थेव्‍दारे करण्‍यात आले. आता संस्‍थेची स्‍वतःची 240 हेक्‍टर जमिन आहे. संस्‍थेमार्फत येथे राहण्‍याची सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहे. ही ईमारत माता राणी होळकर, इंदोर यांच्‍या स्‍मृतीप्रित्‍यर्थ देवी अहिल्‍याबाई होळकर यांनी दिलेल्‍या देणगीमधून बनविण्‍यात आली आहे.

जाळीचादेव (श्री चक्रधर स्‍वामी), जयदेववाडी 
जाळीचा देव हे महानुभाव पंथामधील भाविकांसाठी अत्‍यंत महत्‍वाचे धार्मीक ठिकाण आहे. या धार्मीक ठिकाणी श्री चक्रधर स्‍वामी यांचे काही काळ वास्‍तव्‍य होते. हे ठिकाण भोकरदन तहसील कार्यालयाच्‍या उत्‍तरेकडे आहे.

आनंदीस्‍वामी मंदीर, जालना 
आनंदी स्‍वामी मंदीर हे 250 वर्षापुर्वीचे मंदीर आहे. हे मंदीर मराठा साम्राज्‍याचे महादजी शिंदे यांनी तयार केले होते. जुना जालना या ठिकाणी श्री संत आनंदी स्‍वामी यांनी समाधी घेतली होती. प्रत्‍येक आषाढी एकादशीनिमीत्‍त येथे मोठया प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात

मम्‍मादेवी मंदीर, जालना

हे मंदीर जुना जालना येथे मस्‍तगड भागामध्‍ये आहे. मंदीरामध्‍ये रोज किर्तन, भजन वधार्मीक कार्यक्रम होत असतात. विशेषतः अनेक लोक नवरात्रामध्‍ये दर्शनासाठी हजेरी लावतात.

संभाजीउद्यान (मोती बाग), जालना 

जुना जालना मध्‍ये नगर पालिकेचे असलेले संभाजी उद्यान हे मोती बाग या नावाने प्रसिध्‍द आहे. हे उद्यान जालना शहर वासियांसाठी एक आकर्षनाचे ठिकाण आहे. उद्यानामध्‍ये सुंदर हिरवळीने युक्‍त बगीचा आहे तसेच रंगीबेरंगी फुलांची झाडे व इतर अनेक प्रकारची झाडे आहेत. लहान मुलांना खेळण्‍यासाठी खेळणी असून झुकझुकगाडीचे मुख्‍य आकर्षण मुलांना उद्यानाकडे आकर्षीत करते. उद्यानाच्‍या मागे व उत्‍तरेस मोती तलावाचा सुंदर किनारा आहे. तसेच उद्यानामध्‍ये संगीत कारंजे असून ते देखील उद्यानाचे मुख्‍य आकर्षन आहे


कालीमस्‍जीद, जालना 

जुना जालना मधील कचेरी रोड परिसरामध्‍ये अत्‍यंत जुनी असलेली मस्‍जीद आहे, जी काली मस्‍जीद म्‍हणून ओळखली जाते. मुस्‍लीम समाजामधील लोक रोज नियमीतपणे नमाज पडण्‍यासाठी येथे एकत्र येतात. त्‍याचप्रमाणे ईदच्‍या दिवशी देखील नमाज व धार्मीक कार्यक्रम आयोजीत केले जातात. ही मस्‍जीद जवळपास 400 वर्षांपुर्वीची असून ती काळया दगडांमध्‍ये धार्मीक गुरू जमशेद खान यांनी बांधलेली आहे.

 

गुरूगणेश भवन, जालना 

 

जैन धर्मातील बांधवांसाठी जालना शहरामधील गुरू गणेश भवन हे एक महत्‍वाचे पवित्र ठिकाण आहे. गुरू गणेश भवन हे कर्नाटक केसरी या नावाने देखील ओळखले जाते. श्री वर्धमान स्‍थानकवासी जैन श्रावक संघ या जैन ट्रस्‍टमार्फत या धार्मीक स्‍थळाची देखरेख व विकासाची कामे केली जातात. या ट्रस्‍टमार्फत शालेय संस्‍थान, महाविद्यालय, अंधांची शाळा, ग्रंथालय, गोशाला चालविल्‍या जातात. संस्‍थानची गोशाला ही मराठवाडयामध्‍ये सर्वात मोठी गोशाला आहे.

श्रीजगदंबा देवी मंदीर, मंठा

मंठा शहरापासून उत्‍तरेकडे दोन कि.मी. अंतरावर उंच टेकडीच्‍या ठिकाणी श्री जगदंबा माता मंदीर स्‍थीत आहे. हे मंदीर 300 वर्षांपुर्वीचे आहे. विशेषतः दर मंगळवारी भावीक दर्शनासाठी येतात. मंदीरामध्‍ये दर वर्षाला नवरात्र व चैत्र पोर्णीमाच्‍या निमीत्‍ताने यात्रेसाठी भाविकांची गर्दी होते

 

श्री बालाजी मंदिर

जुना जालना परिसरातील कचेरी रोड येथे, श्री. बालाजीचे दोनशे वर्षे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचा जिर्णोध्‍दार (नुतनीकरण) सन २०१० ते २०१५ या पाच वर्षांच्‍या कालावधीमध्‍ये संस्‍थानचे विश्‍वस्‍त आणि सर्व भाविकांच्‍या मदतनिधीतून दि. १२ मार्च, २०१५ रोजी पूर्ण करण्‍यांत आले. या मंदिरातील पंचधातुंच्‍या मुर्ती मंदीर विश्‍वस्‍तांच्‍या पुर्वजांनी तिरुपती बालाजी येथून आणून त्‍यांची प्रतिष्‍ठापना केली. या पंचधातूंच्‍या श्री. बालाजी, श्री लक्ष्‍मी व श्री पद़मावती यांच्‍या असून त्‍या १७व्‍या शतकातील आहेत. याचे प्रमाणपञ भारतीय पुरातत्‍व विभागाने मंदिराचे विश्‍वस्‍तांना दिलेले आहे. या मंदिरामध्‍ये नवराञ उत्‍सवात याञा भरते तसेच विजयादशमीचे (दसऱयाचे ) दिवशी श्री. बालाजींची पालखी मिरवणूक राञी काढण्‍यांत येते. या मंदिराचा जिर्णोध्‍दार प्रसिध्‍द वास्‍तु शिल्‍पविशारद श्री. चंद्रप्रकाश शर्मा यांच्‍या मार्गदर्शनाखाली करण्‍यांत आलेला आहे. हे मंदिर बांधताना ते नागरी शैलीमध्‍ये बांधण्‍यात आले आहे. एकूण १६०० चौ. फुटावर मंदिराची उभारणी करण्‍यांत आली असून मुख्‍़य गाभारा, अंतराल, सभागृह, अशी रचना आहे. मंदिराचे तीन स्‍वतंञ कळस आहेत, ज्‍यांची उंची ३५ फुटांपर्यंत जाते. मंदिरातील कोरीवकाम हे प्राचीन मंदिराच्‍या रचनेनुसार राजस्‍थानमधील कलाकारांच्‍या चमुने पुर्ण केले आहे. दरम्‍यान मंदिराचा जिर्णोध्‍दार पूर्ण झाला असला तरी, अद्यापही या मंदिराचे दोन सभागृह मंदिर परीसरातच उभारण्‍याचे काम शिल्‍लक आहे. या मंदिराची नोंदणी न्‍यास नोंदणी कार्यालयाकडेकेलेली असून याचा नोंदणी क्रमांक J-११८४ असा आहे.

मझर-इ-मौलया नुरुद्दीन साहेब दर्गा शरीफ 


मौलया नुरुद्दीन यांची समाधी मझर-इ-मौलया, डोणगांव ता. अंबळ, जि. जालना येथे आहे. मौलया नुरुद्दीन यांची "वली अल-हिंद" (भारतीय प्रतिनिधी / काळजीवाहू) या पदावर “दाऊदी बोहरा दावत”, Dā'ī, येमेन केंद्रातर्फे नियुक्त करण्यात आले होते. मौलया नुरुद्दीन हे शिक्षण घेण्यासाठी, कैरो, इजिप्त गेले. ते 467 AH मध्ये भारतात परत आले आणि डेक्कन गेला. त्यांचा मृत्यू “जुमादी-अल-उला 11” मध्ये डोणगांव ता. अंबड, जि. जालना येथे मृत्यू झाला.

 

औद्योगीक माहिती

जालना जिल्हाची औद्योगिक पार्श्वभुमी चांगली असुन मुख्यता बी-बियाणे व लोह उद्योगामध्ये जिल्हयाचे नाव जागतिक स्तरावर पोहोचले आहे. जिल्ह्याचा औद्योगिक विकास हा अभियंत्रिक, प्लास्टिक व कृषी उद्योगावर अवलंबुन आहे.

दालमिल, तेल गिरणी व शुधिकरण, लोह पुनरुतपदान, प्लास्टिक, टाइल्स आणि सिमेंट पाइप, खत उद्योग, किटनाषके आणि सहकारी साखर कारखाण हे सुद्धा औद्योगिक विकासात महत्वाचे योगदन करतात.

येथे कापसाच्या सुत गिरण्या आणि प्रेसींग कंपण्या आहेत, त्याच बरोबर बाजार समित्या मार्फत मोठ्या प्रमाणावर कृषी उत्पादन केले जाते, जसे कापुस. औद्योगिक विकासासाठी राज्य सरकारने छोठ्या व मोठ्या उद्योगाना प्रोत्साहीत कारण्यासाठी विकास आराखडा तयार केला आहे. या आराखडा अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) ने औद्योगिक वसाहत निर्माण केली असुन तेथे लघु,मध्यम आणि मोठे उद्योग आहे. येथे सर्वातजासत लोह व बी-बियाणे उत्पादन कंपण्या, जसे महिको,महिंद्रा, बैजु-शितल कंपण्या असुन बॉल बेरींग, कृषी संबंधीत, जसे दालमिल कंपण्यासुधा आहेत. MIDC न जाहिर केले आहे,कि येथे खाजगी क्षेत्राच्या मदतीने जैव प्रद्योगिक क्षेत्र विकसित करणार आहे. त्यामुळे क्षेत्राच्या विकासाला गती मिळेल.

महिको, महिंद्रा, बेजो-शितल ह्या कंपण्या अग्रक्रमित कंपण्या पैकि काही आहे.

NRB बेअरींग लिमीटेड ही एक अग्रगण्य कंपनी असुन ते ओटोमोबाइल व अवजड उद्योगाना पुरवठा करते.

जालना जिल्ह्यामध्ये एकुण चार सहकारी साखार कारखाने आहे,

जालना सह्कारी साखर करखाना, रामनगर, जालना.

समर्थ सह्कारी साखर करखाना, समर्थनगर, अंबड.

बागेश्वरी सह्कारी साखर करखाना, परतुर.

रामेश्वरी सह्कारी साखर करखाना, भोकरदन . .

समृद्धी साखर कारखाना, देबी दहेगाव , घनसावंगी

सागर साखर कारखाना

व्‍यक्‍तीमत्‍वे...

 

 

 

 

 

व्‍यक्‍तीमत्‍वांच्‍या योगदानामुळे जालना जिल्‍हा आज औद्योगीक, वाणीज्‍य व सांस्‍कृतीक क्षेत्रामध्‍ये जालना जिल्‍हा राज्‍यामध्‍ये आघाडीवर आहे. त्‍यापैकी काही महत्‍वाची व्‍यक्‍तीमत्‍वे खालील प्रमाणे आहेत. 

 

 

 

श्री समर्थ रामदास स्‍वामी :

श्री समर्थ रामदास स्‍वामी यांचा जन्‍म चैत्र शुक्‍ल नवमी शके १५३० (हिंदू दिनदर्शिकेनुसार)जांब समर्थ ता. घनसावंगी येथे झाला. सुर्याजीपंत ठोसर कुळकर्णी व रेणूबाई यांचे ते थोरले चिरंजीव होते. त्‍यांचे मुळ नाव नारायण होते.

- रामदास स्‍वामी यांनी ''दासबोध'', ''मनाचे श्‍लोक'' व इतर श्‍लोक लिहले. त्‍याचबरोबर ''जय जय रघुविर समर्थ'' हे बोधवाक्‍य दिले. 

तरूणांना एकत्रीत आणण्‍याच्‍या उद्देशाने त्‍यांनी महाराष्‍ट्रातील अनेक गावांमध्‍ये हनुमान मंदीरांची स्‍थापना केली. 

 

 

 

श्री जनार्धन मामा :

श्री जनार्धन मामा हे जालना जिल्‍हयास लाभलेले थोर स्‍वातंत्रसेनानी होते. त्‍यांनी मराठवाडा मुक्‍ती संग्रामामध्‍ये महत्‍वाचे योगदान देवून आपल्‍या मातृभूमीसाठी प्राणाची आहुती दिली.

त्‍यांचे नाव जनार्धन नागापूरकर असून त्‍यांना जनार्धन मामा म्‍हणून सर्व ओळखत होते. जालना शहराच्‍या मध्‍यभागी चौकामध्‍ये त्‍यांच्‍या स्‍मरणार्थ पुतळा बांधुन त्‍या चौकास त्‍यांचे नाव ''मामा चौक'' असे नाव दिलेले आहे.

 

श्री बद्रीनारायण बारवाले :

श्री बद्रीनारायण बारवाले महाराष्‍ट्र हायब्रीड सीडस् कंपनीचे (महिको) हे संस्‍थापक असून त्‍यांनी जालना जिल्‍हयाचे नाव जागतीक पटलावर प्रसिध्‍द केले. आणि ते स्‍वातंत्रसेनानी देखील होते. त्‍यांनी भारतीय शेतक-यांना चांगल्‍या दर्जाची बियाणे उत्‍पादनासाठी व वाढीसाठी महत्‍वाची भूमीका पार पाडलेली आहे. २००१ साली ''पद्मभूषण'' हा पुरस्‍कार देवून भारत सरकारने त्‍यांना सन्‍मानीत केलेले आहे. तसेच १९९८ साली त्‍यांना वर्ल्‍ड फूड प्राईज फाउंडेशन अमेरीका यांच्‍या तर्फे ''वर्ल्‍ड फुड प्राईज'' हा बहुमान मिळाला आहे. याव्‍यतीरीक्‍त त्‍यांच्‍या जीवनामध्‍ये खालील पुरस्‍कार त्‍यांना प्राप्‍त झालेले आहेत.

 

 

No comments

Hindi vyakaran Mock Test

Scholarship Exam 2024 PAPER 1/2 : Hindi अनेकार्थी शब्द Start The Quiz Time's Up score: Next question See Your Result Total Quest...

Powered by Blogger.