नैसर्गिक साधनसंपत्ती


जमीनजलसंपत्तीऊर्जा-उद्गमखनिज पदार्थवनसंपत्तीपशुधन व सागरी संपत्ती यांचा यात समावेश होतो.

जमीन : प्रत्यक्ष लागवडीखालीलसध्या पडीत असलेलीवृक्षांच्या लागवडीखालीलवनांखालीलकायमची कुरणे व गवताळ प्रदेशमशागतयोग्य पडीतडोंगराळ भागातील व इतर मशागतीस अयोग्य आणि बिगरशेती अशी जमिनीची वर्गवारी करतात. महाराष्ट्रात ५ टक्के जमीन लागवडीखाली आणता येण्यासारखी आहे. १९८२ साली महाराष्ट्रात १.९८६ कोटी हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली होती आणि भारतातील लागवडीखालील क्षेत्रात महाराष्ट्राचा वाटा १२ टक्के होता.  भारतातील एकूण कृषिउत्पादनक्षमतेच्या मानानेमहाराष्ट्राची कृषीउत्पादनक्षमता कमी आहे. अपुरे सिंचनपावसाची अनिश्चितता आणि पर्जन्यच्छाया प्रदेशात मोडणारा रच भागही यामागील काही कारणे आहेत. 

जलसंपत्ती : जमिनीवरील व जमिनीखालील पाण्याचा उपयोग सिंचनवीजनिर्मितीघरगुती व औद्योगिक वापर आणि वाहतूक यांसाठी करता येतो. महाराष्ट्रात बहुतेक पाऊस ठराविक काळातच पडतो. शिवाय महाराष्ट्रातील दक्षिण ट्रॅप’ या शेलसमूहाच्या रचनेमुळे भूजल संपत्तीवर मर्यादा पडल्या आहेत त्यामुळे पाण्याच्या वापरावरहीमर्यादा पडतात. शिवाय नद्या बारमाही वाहत नसल्याने धरणे मोठी बांधावी लागतात आणि कालव्यांची लांबीही वाढतेपरिणामी खर्च वाढतो. जलवाहतुकीच्या दृष्टीने महाराष्ट्रात परिस्थिती अनुकूल नाहीविशेषतः औद्योगिक सांडपाण्यामुळे प्रदूषणाचा प्रश्नही निर्माण झालेला आहे. 

सिंचन : महाराष्ट्राची सिंचनक्षमता ४५ लाख हेक्टर असून १९८१ साली २३ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली होते. १९६० पासून राज्यात सिंचनाचे बरेच प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. सु. ५० टक्के सिंचन विहिरींद्वारे होते. त्याखालोखाल कालवेतलाव (मुख्यत्वे भंडाराचंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत)उपसा जलसिंचन (मुख्यतः सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत) व कूपनलिका यांद्वारे सिंचन केले जाते. 

ऊर्जा-उद्गम : दगडी कोळसाखनिज तेलनैसर्गिक वायूपाणी (वीजनिर्मितीसाठी) व अणुइंधने हे प्रमुख ऊर्जा-उद्गम आहेत. यांपैकी महाराष्ट्रात दगडी कोळसा व पाणी हे उपलब्ध आहेत. अर्थात बाँबे हाय व त्यालगतच्या तेलक्षेत्रातील खनिज तेल व नैसर्गिक वायू यांचा राज्याला उपयोग होत आहे. तारापूरची अणुवीज महाराष्ट्राला मिळत असलीतरी येथे अणुइंधनाच्या दृष्टीने उपयुक्त असलेली खनिजे आढळलेली नाहीत. या ऊर्जा साधनांशिवाय शेण (गोबर वायू गोवऱ्या)जैव वायूलाकूडलोणारी कोळसातसेच पशूंची व मानवी श्रमशक्ती ही ऊर्जेची साधनेही महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. 

सूर्याचे प्रारणवाराभरती-ओहोटीलाटा व पृथ्वीतील उष्णता हे ऊर्जा-उद्गम वापरण्यासाठी अनुकूल अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या काही भागांत आहे. वर्षातील बराच काळ महाराष्ट्रात चांगले ऊन पडते (उदा.मुंबई येथे दर दिवशी दर चौ. सेंमी. क्षेत्रावर सरासरी ७०१ कॅलरी उष्णता पडत असते) आणि महाराष्ट्रातीखडक व माती गडद रंगाची असल्याने त्यांच्याद्वारे पुरेशी उष्णता शोषली जाते. किनारी भागात भरती-ओहोटीचा व लाटांचातर डोंगराळ आणि किनारी भागांत वाऱ्याचा ऊर्जा निर्मितीसाठी वापर करता येण्यासारखा आहे.

दगडी कोळसा : भारतातील दगडी कोळशाच्या एकूण साठ्यापैकी सु. ४ टक्के (५०० कोटी टन) कोळसा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील सर्व दगडी कोळसा अकोकक्षम आहे. मात्र काही थर पहिल्या व दुसऱ्या प्रतींचे असून त्यांतील कोळसा झरिया येथील कोकक्षम कोळशात १५ ते २० टक्के या प्रमाणात मिसळून वापरात येण्यासारखा आहे.  नागपूरगडचिरोलीचंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांत मुख्यतः दगडी कोळसा आढळतो व तो गोंडवनी संघाच्या दामुदा मालेतील बाराकार समुदायातील खडकांत आढळतो. याची प्रमुख क्षेत्रे पुढील आहेत : (१वैनगंगा खोरे (कामटीउमरेड इ.); (वर्षा खोरे (बांदरवरोडावुनबल्लारपूरदुर्गापूरवणी इ.) आणि (३यवतमाळचंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांचा एकमेकांना लागून असलेला सीमावर्ती भाग (घुगुसतेलवासा). 

खापरखेडाबल्लारशा व पारस येथील औष्णिक वीज केंद्रांततसेच उद्योगधंदे व रेल्वे यांसाठी महाराष्ट्रातील दगडी कोळसा वापरला जातो. काही कोळसा प्रोड्यूसर नावाचा जळणाचा वायू निर्माण करण्यासाठी वापरता येण्यासारखा आहेतर काही कोळशाचे कार्बनीकरण करून कोकइंधन वायूहलके तेलअमोनियम सल्फेट इ. पदार्थ मिळविता येऊ शकतील. [कोळसादगडी]. 

जलविद्युत् : महाराष्ट्रातील एकूण विजेपैकी ५० टक्क्यांहून जास्त वीज जलविद्युत् केंद्रामधून मिळते. १९८१ साली या विजेची अधिष्ठापित क्षमता १,२९७ मेवॉ. होती. पश्चिम घाटाची जलविद्युत् निर्मितिक्षमता १,०४० मेवॉ. काढण्यात आली असून कोयना(५४०मेवॉ.),खोपोलीमिरा व भिवपुरी (२७४ मेवॉ.)येलदरी (२२.५ मेवॉ.)राधानगरी (४.८ मेवॉ.) व भाटघर (१ मेवॉ.) ही या भागातील जलविद्युत् केंद्र होत. पूर्व महाराष्ट्रातील डोंगराळ भागीची काढण्यात आलेली जलविद्युत् निर्मितिक्षमता १,९०० मवॉ. आहे. 

महाराष्ट्रात एकूण २,०९३.८ कोटी किवॉ. ता. (१९८२-८३वीजनिर्मिती होत असलीतरी उद्योगधंदेशेतीवाहतुकघरगुती वापर यांकरिता ती उपयोगात आणली जाते व राज्यात विजेचा नेहमी तुटवडा पडतो. यावर उपाय योजले जात असलेतरी ते कमीच पडतात. मध्य प्रदेशकर्नाटक या शेजारच्या राज्यांतून वीज काही प्रमाणात घेतली जाते. 

अणुवीज : महाराष्ट्रात तुर्भे व तारापूर येथे अणुप्रकल्प केंद्राच्या वापरांकरिता होते. तारापूर येथील अणुवीज निर्मितिकेंद्राची अधिष्ठापित क्षमता ४२० मेवॉ. असून येथे निर्माण होणारी वीज महाराष्ट्र व गुजरात या राज्यांना पुरविण्यात येते. १९८२-८३ सालात या केंद्रामध्ये ६७.८९५ कोटी किवॉ. ता. एवढी वीज निर्मिती झाली. 

खनिजसंपत्ती : खनिज पदार्था  पासून इंधनाशिवाय धातूविविध उद्योगांसाठी लागणारा कच्चा मालबांधकामाची सामग्री इ. मिळतात. महाराष्ट्रात दगडी कोळशाशिवाय मँगॅनिजाची आणि लोखंडाची धातुके बऱ्याच प्रमाणात आढळतात. तसेच बॉक्साइटचुनखडी,इल्मेनाइटक्रोमाइट व बांधकामाचे खडक यांचे महत्त्वपूर्ण साठे महाराष्ट्रात असून डोलोमाइटकायनाइटसिलिमनाइटसिलिकायुक्त वाळू व उद्योगधंद्यांत वापरल्या जाणाऱ्या मृत्तिका या खनिजपदार्थांचेही थोडे साठे महाराष्ट्रात आहेत. 

महाराष्ट्राच्या १२.३३ टक्के क्षेत्रात खनिज पदार्थ आढळतात व त्यांपैकी १६.४ टक्के क्षेत्राचे भूवैज्ञानिक मानचित्रण झालेले आहे. महाराष्ट्रातील बहुतेक खनिजसंपत्ती दक्षिण ट्रॅपखडकाच्या बाहेरील क्षेत्रात आणि मुख्यत्वे स्फटिकी व रुपांतरित खडकांत आढळते. पूर्व विदर्भ (चंद्रपूरगडचिरोलीभंडारानागपूर व यवतमाळ जिल्हे) व दक्षिण महाराष्ट्र (सिंधुदुर्गरत्नागिरीकोल्हापूररायगड व ठाणे जिल्हे) या दोन भागांत महाराष्ट्रातील खनिज संपत्ती एकवटलेली आहे. 

पूर्वी भंडारा व रत्नागिरी (मालवण) जिल्ह्यांत लोणारी कोळसा वापरून लोखंड बनविण्याच्या छोट्या भट्ट्या होत्या. त्यांकरिता इंधन व क्षपणकारक [ क्षपण] म्हणून लोणारी कोळसा वापरीत. मोठ्या कारखान्यांच्या स्पर्धेमुळे हा उद्योग बंद झाला. चंद्रपूर भागात दगडी कोळसा काढण्यास एकोणिसाव्या शतकाच्या मध्यासतर मँगेनिजाचे धातुक काढण्यास १९०० च्या सुमारास सुरूवात झाली. तांब्यासाठी चंद्रपूर व रत्नागिरी जिल्ह्यांत आणि हिरेसोनेशिसेअँटिमनी वगैरेंचा इतरत्र शोध घेण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. आता महाराष्ट्रातील खनिज संपत्तीच्या समन्वेषणाचे काम भूविज्ञान व खाणकाम संचालनालयातर्फे केले जाते. त्यासाठी भूवैज्ञानिक मानचित्रणवेधनगर्तन (खड्डे घेणे)खंदक खोदणे व रासायनिक विश्लेषण करणे ही कामे केली जातात. यांतून महत्त्वाच्या खनिजपदार्थांचा शोध लागू शकतो व त्यांच्या साठ्यांविषयी अंदाज करता येतात. हे संचालनालय खनिज पदार्थविषयीच्या माहितीचे संकलनही करते. शिवाय काही महत्त्वाच्याखनिजां च्या पूर्वेक्षणाचे कामही संचालनालयाने केले आहे (उदा.१९७५७७ या काळात नागपूर जिल्ह्यात दगडी कोळसाकाही धातू व सोने यांचेतर भंडारा जिल्ह्यात कायनाइटसिलिमनाइट यांच्यासह सर्व खनिज पदार्थांचे पूर्वेक्षण करण्यात आले होते). महाराष्ट्रातील खनिजसंपत्तीचे उत्पादन वमूल्य कोष्टक क्र. १ वरून स्पष्ट होईल. पुढे महाराष्ट्रातील काहीखनिज पदार्थाची माहिती थोडक्यात दिली आहे. 

मँगॅनीज धातुके : भारतातील यांच्या साठ्यांपैकी सु ४० टक्के साठे महाराष्ट्रात आहे. हे साठे मुख्यतः भंडारा जिल्ह्यात असून येथील काही साठे भारतातील मोठ्या साठ्यांपैकी आहेत. थोडे साठे नागपूर जिल्ह्यात आहेत. या भागातील धातुके गोंडाइट मालेच्या खडकांशी निगडीत असून सिलोमिलेन हे त्यांतील मुख्य खनिज आहे. बहुधा उघड्या खाणींतून व मानवी श्रमाचा वापर करून येथील धातुके काढण्यात येतात. कन्हान व तुमसर येथे फेरोमँगॅनीज बनविण्याची संयंत्रे उभारण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मँगनीज धातुक परदेशी निर्यात होते. रत्नागिरी व सातारा जिल्ह्यांतही कमी दर्जाचे थोडे धातुक आढळते. 

लोह धातुक : देशातील २ टक्के लोह धातुकांचे साठे महाराष्ट्रात आहेत. हे सारे भंडाराचंद्रपूरगडचिरोलीनागपूर व सिधुदुर्ग या जिल्ह्यांत आहेत. उच्च दर्जाचे धातुक धारवाडी संघाच्या खडकांशी निगडित असून हेमेटाइट हे यातील महत्त्वाचे खनिज आहे. हे मँगॅनिजाच्या धातुकाप्रमाणेच काढण्यात येते. टॅकोनाइट व जांभ्यात कमी दर्जाचे धातुक आढळते. पैकी टॅकोनाइट चंद्रपूरगडचिरोली,नागपूर व भंडारा या आणि जांभा रायगडकोल्हापूररत्नागिरीसिंधुदुर्ग व सातारा या जिल्ह्यांत आढळतात. 

बॉक्साइट :  महाराष्ट्रात याचे ६.५ कोटी टन साठे असावेत. मुख्यतः कोल्हापूररायगडसिंधुदुर्गरत्नागिरी व ठाणे आणि थोड्या प्रमाणात सांगली व सातारा या जिल्ह्यांत हे आढळते. भारतातील याच्या उत्पादनापैकी २०% उत्पादन महाराष्ट्रात होते. 

इस्मेनाइट : हे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांच्या सु. ४० किमी. लांबीच्या किनारी भागातील वाळूत आढळते. हा साठा २० लाख टन असावा. या वाळूत २० ते ७४ टक्क्यांपर्यंत इल्मेनाइट असून शुद्धीकरण केल्यास तिचा उपयोग करता येईल. त्रावणकोर किनाऱ्यावरील वाळूच्या मानाने येथील वाळू कमी दर्जाची असून येथे तिच्यात झिर्कॉन आढळत नाही. 

क्रोमाइट :  महाराष्ट्रात या खनिजाचे ५.५ कोटी टन साठे असून ते भंडारासिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांत आहेत. 

चुनखडीकंकर व डोलोमाइट : यांचा महाराष्ट्रातील साठा भारताच्य ९ टक्के व उत्पादन २ टक्के आहे. यवतमाळगडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांतील यांचे साठे विंध्यन खडकांतील आहेत. अंतरा-ट्रॅपी थरांमधील चुनखडीतसेच कंकर बहुतेक (विशेषतः नागपूर,नांदेड,सांगलीसिंधुदुर्ग व सातारा) जिल्ह्यांत आढळतात. डोलोमाइट गडचिरोलीनागपूरचंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांत आढळते. 

 कायनाइट व सिलिमनाइट : ही दोन्ही खनिजे मुख्यत्वे भंडारा जिल्ह्यांत आढळतात. भारतातील कायनाइटच्या उत्पादनापैकी सु. १५ टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. 

यांशिवाय महाराष्ट्रात पुढील खनिज पदार्थही थोड्या प्रमाणात आढळतात. सिलिकामय वाळू मुख्यतः सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत आढळते व १९८१ साली ७४ हजार टन वाळू काढण्यात आली. बांधकामासाठी उपयुक्त असे खडकही महाराष्ट्रात आढळतात. पैकी बेसाल्ट सर्वत्र आढळतो. कोकणातील जिल्हेतसेच कोल्हापूरसाताराभंडाराचंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत जांभा आढळतो. चंद्रपूरगडचिरोलीसिंधुदुर्ग या जिल्ह्यांत ग्रॅनाइट व पट्टीताश्मनागपूरअमरावती व चंद्रपूर जिल्ह्यांत वालुकाश्मभंडाऱ्यात क्वॉर्टसाइट आणि नागपूर जिल्ह्यात थोडा संगमरवरहे खडक आढळतात. विटांची मातीवाळूरेतीचुनखडी इ. बांधकामास उपयुक्त सामग्रीही सर्वत्र आढळते. यांशिवाय चिनी माती (केओलीन)लिथोमार्ज तसेच गेरू (काव)पिवडीसारखी रंगद्रव्ये व पांढरी मातीही बऱ्याच ठिकाणी आढळते. अभ्रकाच्या दृष्टीने कडवळ (सिंधुदुर्ग) येथील साठा महत्त्वाचा असून पूर्व विदर्भातही ते थोड्या प्रमाणात आढळते. टंगस्टनतांबेशिसेजस्तअँटिमनी इत्यादींची उपयुक्त खनिजे क्वॉर्ट्रझफेल्स्पारबराइट तसेच बेसाल्टच्या पोकळ्यांत साचलेली कॅल्सेडोनीअकीकजमुनियाओपल यांसारखी उपरत्नेकुरूविंदगार्नेटसोपस्टोनफ्लिंटचर्टग्रॅफाइटअँडॅल्यूसाइटविविध प्रकारची झिओलाइटे इ. उपयुक्त खनिजेही महाराष्ट्रात आढळतात. यांपैकी काही खनिजे उच्चतापसह (उच्च तापमानाला न वितळता टिकून रहाणारे) व अपघर्षक (घासून वा खरवडून पृष्ठभाग गुळगुळीत करणारे) पदार्थ म्हणून आणि खतांसाठी उपयुक्त आहेत. शिवाय भंडाऱ्यातील अभ्रककायनाइट व सिलिमनाइटयुक्त   क्वॉर्ट्झाइटात  .५ टक्का व्हॅनेडियमनागपूर जिल्ह्यातील काही मँगॅनीज धातुकांत गॅलियम आणि भंडाऱ्याच्या हिरवट अभ्रकात सिझियम ही दुर्मिळ मूलद्रव्ये थोड्या प्रमाणात आहेत. 

किनारी भागातविशेषतः  रायगडठाणे व मुंबईलगतच्या भागात मीठ बनविण्यात येते. खाण्याशिवाय रासायनिक उद्योगांत व खते बनवितानाही याचा वापर होतो. शिवाय रायगडठाणेरत्नागिरीसिधुदुर्ग इ. जिल्ह्यांत आढळणाऱ्या उन्हाळ्यांतील (गरम झऱ्यांतील)खनिज जल हे काही रोगांवर उपयुक्त असल्याचे मानतात. 

वनसंपत्ती : महाराष्ट्राचे २१ टक्के क्षेत्र (१९८१-८२ साली सु. ६३,९५३ चौ. किमी.) वनांखाली असून यापैकी ५६,१३३ चौ. किमी. वनक्षेत्र खात्याकडे,१३९ चौ. किमी. महसूल खात्याकडे,२५५ चौ. किमी. वनविकास आयोगाकडे वर्ग केलेले आणि १,४२६ चौ. किमी. खाजगी क्षेत्र वनखात्याकडे आलेले आहे. चंद्रपूरगडचिरोलीभंडाराअमरावतीयवतमाळधुळेनासिकठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत दाट व महत्त्वाची वने आहेत. 

इमारती व जळाऊ लाकूडबांबूडिंकमधलाखचंदनराळवैरण (गवते)कातपाने (तेंडूपळसचौरा)तंतू (घायपातभेंडी इ.)तेले (सिट्रोनेलारोशा ही गवतेपिशानिंबकरंज इ. वृक्ष)सावरीचा कापूस इ. अनेक उपयुक्त वस्तू वनांपासून मिळतात. शिवाय जमिनीची धूप थांबणे आणि सुपिकता टिकणेपूरनियंत्रणहवामानाचा समतोल राखला जाणेवन्य जीवांचे रक्षण इ. अप्रत्यक्ष फायदेही वनांपासून होतात. 

चौथ्या पंचवार्षिक योजनेपासून वनविकासाच्या दृष्टीने पुढील प्रकाराचे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत : वठलेल्या वनांच्याजागी नवीन वनांची लागवड करणेवनसंपत्ती मिळविणे व तिचा अपव्यय टाळणेउद्योगधंद्यांच्या दृष्टीने वनविकास करणे वगैरे. नवीन वनक्षेत्रेही निर्मिण्यात येत आहेत (उदा. पुळण असलेल्या भागात खडशेरणीचीतर पडीत व हलक्या जमिनीत निलगिरीसुबाभूळ इ.वृक्षांची लागवड करण्यात येत आहे). शिवाय ग्रामवनांच्या विकासासाठी प्रयत्न चालू आहेत. राज्यात ३० रोपवाटिका असून त्यांच्याकडून रोपे पुरविण्यात येतात आणि रोपांची निवडनिगा व लागवड यांविषयी माहिती देण्यात येते. 

वन्य प्राणी व वने यांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी अभयारण्ये व राष्ट्रीय उद्याने निर्मिण्यात आली आहेत. ताडोबापेंचनवेगाव बांधबोरिवली (संजय गांधी) ही राष्ट्रीय उद्याने व मेळघाटनागझिराकिनवटरेहेकुरीश्रीगोंदाराधानगरीबोरयावलतानसा इ. वैशिष्ट्यपूर्ण अभयारण्ये महाराष्ट्रात आहेत. शिवाय सागरेश्वर व कोयना उद्यानेराजगड अभयारण्य इ. उभारण्याच्या योजना आहेत. 

 राज्यातील जलविद्युत प्रकल्प

प्रकल्प

जिल्हा

प्रकल्प

तिल्लारी

कोल्हापूर

भंडारदरा

भाटपर, पाणशेत

पुणे

पवना व वीर

खोपोली व भीवपुरी

रायगड

येलदरी

भिरा अवजल प्रवाह

रायगड

कोयना व धोम

कन्हेर, येवतेश्वर

सातारा

माजलगांव

अहमदनगर

पेंच

नागपुर

पुणे

भातसा

ठाणे

परभणी

वैतरणा

नाशिक

सातारा

जायकवाडी

औरंगाबाद

बीड

चांदोली (वसंत सागर)

कोल्हापूर

महाराष्ट्राचे आंतरराज्यीय प्रकल्प व सहकारी राज्य

प्रकल्प

सहकारी राज्य

प्रकल्प

सहकारी राज्य

पेंच

म. प्रदेश

भोपाळपट्टनम

छत्तीसगढ (इंद्रसागर)

दुधगंगा

कर्नाटक (शाहु सागर)

तिल्लारी

गोवा

लेंडी

आंध्रप्रदेश

लोअर पेनगंगा

आंध्रप्रदेश

कालीसागर

म. प्रदेश

बावथडी

म. प्रदेश

नर्मदा

म.प्रदेश, गुजरात, राजस्थान

 

 

महाराष्ट्राती औष्णिक विद्युत वीज केंद्रे

विद्युत केंद्र

जिल्हा

चंद्रपूर

चंद्रपूर

पोकारी (भुसावळ)

जळगांव

खापरखेडा

नागपुर

पारस

अकोला

बल्लापूर

चंद्रपूर

तुर्भे

मुंबई

चोला (कल्याण)

ठाणे

परळी-वैजनाथ

बीड

डहाणू

ठाणे

कोराडी

नागपुर

एकलहरे

नाशिक

·         भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प – तारापूर (ठाणे) १९५९

·         महाराष्ट्रातील पहिला पवन उर्जा प्रकल्प – जमसांडे (देवगड – सिंधुदुर्ग)

·         सौरउर्जा प्रकल्प – खोपडी (सिन्नर)

·         आशियातील मोठा पवन उर्जा प्रकल्प वनकुसवडे (सातारा)

·         सार्वाधिक क्षमतेचे औष्णिक वीज केंद्र – चंद्रपूर

·         सौर उर्जेत अग्रेसर जिल्हा – औरंगाबाद

·         राज्यातील पहिले जलविद्युत केंद्र – खोपोली (रायगड)

खनिज संपत्ती

·         महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भात खोरे व कोकणात खनिजे सापडतात.

·         देशातील खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा३.३%, महाराष्ट्रात ३८,००० चौ.कि.मी. (१३.३७%) क्षेत्रात खनिजे सापडतात.

·         महाराष्ट्रात देशाच्या ५०% बॉक्साईट साठे, व २१% उत्पादन होते. महाराष्ट्रात ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली व सातारा इ. ठिकाणी बॉक्साईटच्या खाणी आहेत.

·         देशातील मँगनिज (मंगल) च्या साठ्यांपैकी ४०% साठे महाराष्ट्रात आढळतात. महाराष्ट्रात तुसर, बुझुरग व चिखलगाव (भंडारा), सावनेर व रामटेक (नागपूर), सावंतवाडी, व वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) येथे खाणी आहेत. महाराष्ट्रात देउळगाव (गडचिरोली), चंद्रपूर, भंडारा, नागपूर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी व रेडी (सिंधुदुर्ग) येथे खाणी आहेत. रेडी या बंदरातून लोह खनिज निर्यात केले जाते.

·         देशाच्या ४% कोळसा महाराष्ट्रात सापडतो. हे साठे वर्धा वैनगंगेच्या खो-यात आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक कोळशाचे साठे – बल्लारपूर (चंद्रपूर) येथे आहेत. तसेच कामठी व उम्रेड (नागपूर), वणी (यवंतमाळ), गडचिरोली जिल्ह्यातही कोळसा सापडतो.

·         कायनाईटचे १५% साठे महाराष्ट्रात आह्ते. भंडारा जिल्ह्यात साकोली तालुक्यात  देहगाव, पिंपळगांव, मोगरा, मीरगा इ. तसेच गार्काभोंगा तालुक्यात कयनाईट व  सिलिमिनाईटचे साठे आहेत.

·         कायनाईटचे उपयोग हि-यांना पैलू पाडणे, काच, रसायन उद्योगात होते.

·         भारताच्या ९% चुनखडीचे साठे व २% उत्पादन महाराष्ट्रात होते. यवतमाळ जिल्ह्यात मांजरी, वांजरी, शिंदोला, मुकवटन येथे चुनखडीचे सर्वाधिक साठे आहेत. तसेच चंद्रपुर, अहमदनगर व गड्चोरोली येथेही साठे सापडतात.

·         महाराष्ट्रातील मँगनिज शुध्दीकरण प्रकल्प – तुसर (भंडारा) व कन्हान (नागपूर) येथे आहेत.

·         हिरव्या अभ्रकात सिलियम भंडारा जिल्ह्यात सापडते.

·         देशातील क्रोमाईटच्या साठ्यांपैकी १०% साठा महाराष्ट्रात असुन प्रामुख्याने भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यात साठे आहेत. टाका (नागपूर), मौली (भंडारा), कनकवली, जानोली (सिंधुदुर्ग), क्रोमाईटचा उपयोग धातू उद्योगात किंमती खड्यांवर प्रक्रिया करण्याच्या उद्योगात होतो.

खनिज

उत्पादक जिल्हे

खनिज

उत्पादक जिल्हे

चुनखडी

यवतमाळ

कायनाईट

देहगाव (भंडारा)

तांबे

चंद्रपूर

बरायटीस

कोल्हापुर, रत्नागिरी

शिसे, जस्त, गंलियम

नागपूर

गारहोटी व सिलिका

सिंधुदुर्ग

ग्राफाईट

सिंधुदुर्ग

क्वॉर्टझाईट

भंडारा

क्लोराईट

चंद्रपूर

व्हँनेडियम

भंडारा, गोंदिया

चिनीमाती

रत्नागिरी

सिझियम

भंडारा, गोंदिया

जिप्सम

सिंधुदुर्ग, अहमदनगर

अँसबेस्टॉस

अहमदनगर

संगमरवर

अमरावती, नागपूर

रसायने निर्माती

अंबरनाथ

नैसर्गिक वायु

उरण

बॉक्साईट

कोल्हापुर

कोळसा

चंद्रपूर, नागपुर

लोह

चंद्रपुर, गडचिरोली

खनिज तेल

रत्नागिरी, बॉम्बेहाय

क्रोमाईट

भंडारा, सिधुदुर्ग

भट्टीचीमाती

सिधुदुर्ग

भांड्यांची माती

चंद्रपूर, नागपुर

डोलोमाईट

चंद्रपुर, यवतमाळ

क्रोमाईट

भंडारा, सिधुदुर्ग

उद्योगधंदे

·         उद्योगधंद्यात महाराष्ट्र भारतात अग्रेसर आहे. भारताच्या एकुण औद्योगिक उत्पादनाच्या स्थुल मुल्यांपैकी २१% स्थुल उत्पादन मुल्य महाराष्ट्रात होते.

·         उद्योगधंद्यांना विकसित भूखंड, रस्ते, पाणी, तयार गाळे ई. सोयी पुरविणारे महामंडळ – महाराष्ट् औद्योगिक विकास महामंडळ-१९६३

·         एम.आय.डी.सी. व सिडकोने राज्यात ३६ आय.टी.पार्क विससीत केले असून खाजगी २५३ आय.टी. पार्क पैकी ४६ आय.टी. पार्क चे काम सुरु आहे.

·         ३१ मार्च २०१० प्रर्यंत एम.आय.डी.सी. ने २६० औद्योगिक वसाहती विकसित केल्या होत्या. त्यात ३०,३३५ कारखाने होते व ८.८० लाख इतका रोजगार उपलब्ध करुन दिला.

·         अविकसित भागात नव्याने उद्योग स्थापण्यासाठी मध्यम व मोठ्या उद्योगांना वित्तीय सहाय्य पुरविणारे तसेच प्रदेशस्थ भारतीयांना भारतात गुंतवणुकीसाठी आकर्षित करणे, एकत्रित प्रोत्साहन योजना राबविणारे महामंडळ महाराष्ट्र राज्य औद्योगिक गुंतवणुक महामंडळ (सिकॉम) १९६६

·         लघु व मद्यम उद्योगांना स्थावर मालमत्ता घेण्यासाठी गिर्घकालीन वित्त पुरवठा करणारी संस्था – महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ -१९६२

·         महावित्तचे कार्यक्षेत्र – महाराष्ट्र, गोवा, दीव व दमण

·         लघुउद्योगांना कच्चा मल पुरविणे, त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीची, साठवणुकीची व्यवस्था, करणे. आयातीस सहाय्य व निर्यातीस प्रोत्साहन देते – महाराष्ट्र राज्य लधुउद्योग विकास महामंडळ-१९६२

·         राज्यातील एम.एस.एस. आय.डी.सी.ची २००९-१० मध्ये उलाढाल – ३२७.५१ कोटी

·         स्टिल अँथँरिटी ऑफ इंडियाच्या लोखंड व पोलाद वितरणासाठी राज्यातील जबाबदारी – महाराष्ट्र राज्य लघु विकास महामंडळाची

·         महाराष्ट्र ईलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन (मेल्टॉन) – मुंबई (१९७८)

·         लघु व कुटिर उद्योगांना सर्व सहाय्य एकत्रितपणे मिळण्यासाठी केंद्राने सुरू केलेली योजना – जिल्हा उद्योग केंद्र (१९७८) (जॉर्ज फर्नांडिस)

·         जगातील कानाकोप-यात मराठी व्यावसायिक व उद्योजकांना एक्त्र क्रुन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्थापन झालेली संस्था – मरठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अँन्ड इंडस्ट्रिज (१९९४ च्या जागतिक मराठी परिषदेच्या अधिवेशनात स्थापन)

·         महाराष्ट्राचे माहिती व तंत्रज्ञान धोरण – १५ ऑगस्ट १९९८

·         महाराष्ट्र शासनाचे माहिती तंत्रज्ञान वर्ष १९९९

·         महाराष्ट्रात एकूण १०४ कापड गिरण्या आहेत. त्यापैकी एक्ट्या मुंबईत ५४ गिरण्या आहेत.

·         भारताच्या मागांच्या संख्येत महाराष्ट्र पहिला, चात्यांच्या संख्येत दुसराव कापड गिरण्यांच्या संख्येत तिस-या क्रमांकावर आहे.

·         महाराष्ट्रातील हातमागांची प्रमुख केंद्रे – नागपूर व सोलापूर

·         राज्यात सर्वाधिक हातमाग – मालेगाव

·         महाराष्ट्र राज्य हातमाग विकास महामंडळ – नागपूर

·         महाराष्ट्रातील वीज मागावर कापड निर्मिती करणारी प्रमुख केंद्रे – भिवंडी, मालेगाव, इचलकरंजी

·         भारतातील सर्वांत मोठी सहकारी सुतगिरणी इचलकरंजी

·         महाराष्ट्र राज्य यंत्रमाग माहामंडळ – पुणे

·         महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ – मुंबई

·         देशातील पहिली सहकारी सुतगिरणी जिल्हा विणकर सहकारी संस्था (इचलकरंजी) कोहापुर

·         महाराष्ट्र राज्य साखर उत्पादनात देशात आघाडीवर असून ३४% जास्त साखर उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते.

·         महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना १९२० मध्ये बेलापूर (अहमदनगर) येथे सुरु झाला.

·         देशातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर (लोणी-अहमदनगर) येथे १९४९ मध्ये सुरु झाला.

·         भारतातील सर्वाधिक सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रात आहेत.

·         प्रादेशिक दृट्या विचार करता पश्चिम महाराष्ट्रात साखर उद्योग केंद्रीत झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत.

·         आशिया खंडातील सर्वाधिक गाळण क्षमता असणारा साखर कारखाना – वसंतदादा सहकारी साखर कारखाना, सांगली

·         २००८ मध्ये भारतात एकूण ६१५ साखर कारखाने होते. त्यापैकी महाराष्ट्रात १८८ साखरकारखाने होते. सध्या राज्यात २०१ नोंदणीकृत साखर कारखाने असून त्यापैकी १७२ सहकारी क्षेत्रातील आहेत. २०१ कारखान्यांपैकी १४१ कारखाने चालू असून त्यापैकी १०३ कारखाने तोट्यात आहेत.

·         २००६-०७ मध्ये देशात ३१७ सहकारी साखर कारखाने होते. पैकी महाराष्ट्रात १६५ सहकारी साखर कारखाने होते.

·         साखर उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्राची साखर उत्पादन ९०.९९ लाख टन होते. तर उर्वरित भारताचे १९२ लाख टन होते.

·         १ मार्च २००२ च्या शासनाच्या धोरणानुसार खुल्या बाजारातील साखार व लेव्ही साखरेचे प्रमाण –  ९:१

·         महाराष्ट्राच्या औद्योगिक उत्पादनात रसायने व रासायनिक पदार्थांच्या सर्वाधिक वाटा (१८.७%) आहे. त्यानंतर खाद्यवस्तू (१४.५%), सुती कापड व तयार कपडे (८.३%) यांचा क्रमांक लागतो.

·         रासायनिक वस्तुंचे ४०% उत्पादन एक्ट्या महाराष्ट्रात होते.

·         महाराष्ट्रातील पहिला सिमेंट कारखाना – चंद्रपुर

·         वनस्प्तती तूप निर्मिती पाचोरा (जळगांव) येथे होते.

·         देशातील सर्वात मोठी सहकारी औद्योगिक वसाहत – इचलकरंजी

·         सैनिकांनी सैनिकासाठी चालवलेली एकमेव सहकारी बँक सातारा

·         सिडकोची स्थापना १९७०

·         महाराष्ट्रातील विशेष आर्थिक क्षेत्र – १) द्रोणगीरी (नवी मुंबई) २) बुटीबोरी (नागपुर) ३) कागल (कोल्हापुर) ४) सिन्नर (नाशिक) ५) शेंद्रे (औरंगाबाद) ६) गुहागार (रत्नागिरी)

·         शेतमाल निर्यात क्षेत्र – पुणे, नाशिक, सांगली, अहमदनगर व सातारा

·         हिरे व अभूषणे पार्क – नवापूर (नंदुरबार)

·         टेक्साटाईल पार्क व मिहान प्रकल्प (कलकूड) – मणेराजूरी (सांगली), बुटीबोरी (नागपुर) फ्लोरिकल्चर पार्क – तळेगांव (पुणे),

·         भारतातील प्रमुख आय.टी. पार्क – साल्टलेक सिटी (कोलकाता), सायबराबाद (हैद्राबाद), पुणे, अहमदाबाद, बंगळ्रुर, कोहिमतपूर

उद्योग

प्रमुख केंद्र

शेती अवजारे व ऑईल इंजिन

सातारा,पुणे,इचलकरंजी,कोल्हापूर,किर्लोसकरवाडी

कागद गिरण्या

बल्लारपूर(चंद्रपूर), खेपोली (रायगड), भिगवन (इंद्रापूर), थेरगाव (चिंचवड-पुणे)

खत कारखाने

तुर्भे(मुंबई) व थळ वायशेत (रायगड)

कचेच्या वस्तू

चंद्रपूर, तळेगाव (पुणे), ओगलेवाडी, बागणी (सांगली)

आडकित्ते

उद्गिर (लातूर)

·         डिसेंबर २०१० अखेर २३३ विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) चे प्रस्ताव प्रप्त झाले होते. त्यापैकी १४३ प्रस्ताव मान्य करण्यात आले आसून ६३ पूर्वीच अधिसूचित झालेले आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रस्ताव आय.टी. क्षेत्रात आहेत.

लघुउद्योग

केंद्र

लघुउद्योग

केंद्र

पीतांबर व पैठण्या

येवले (नाशिक)

साड्या व लुगडी

इचलकरंजी

हिमरु शाली

औरंगाबाद

सुती व रेशमी साड्या

नागपूर, अहमदनगर

पैठण्या व शालू

पैठण

पामतेल गिरणी

सिंधुदुर्ग

खेळणी

सावंतवाडी

विडी उद्योग

सिन्नर, गोंदिया

चर्मोद्योग

कोल्हापूर

गुजराती फेटे

पैंठण

वीज निर्मिती

·         २००९-१० मध्ये महाराष्ट्राची स्थापीत क्षमता – १) औष्णिक विद्युत – ८८२५ मे.वॅ. २) जलविद्युत – २९१६ मे.वॅ. ३) नैसर्गिक वायु – १७२२ मे.वॅ. ४) बंदिस्त – १०५१ मे.वॅ. ५) अपारंपारिक – २८०७ मे.वॅ. ६) अणु विद्युत - ३९३ मे.वॅ. अशी एकूण १७३७१ मे.वॅ. इतकी क्षमता आहे.

·         २०१०-११ या वर्षात एकुण १६,६१५ मे.वॅ. इतकी मागणी होती. त्यामुळे ५४९६ मे.वॅ. इतकी लोड शेडींग करावी लागली.

·         २००७-०८ या वर्षात १७,४९८ मे.वॅ. इतक्या विजेच्या मागणीमुळे ४६१८ मे.वॅ. विजेचे लोड शेडींग करण्यात आले.

·         राज्याची ट्रान्समिशनमधील विजेची गळती २००९-१० मध्ये – ४.४%

·         राज्याची २००९-१० मधील वितरणामधील विजेची गळती – २००६%

·         महाराष्ट्राने २०१२ प्रयांत भारनियमानातून मुक्ती मिळविण्यासाठी ६५०० मे.वॅ. विज निर्मितीचे नियोजन केले आहे.

·         महाराष्ट्रात वीज निर्मितीचे स्त्रोत्र – ५१% वीज औष्णिक, १७% जलविद्युतपासून, ११% नैसर्गिक वायुपासून व % अणूपासून मिळते.

·         विजेचा वापर (२००९-१० च्या आकडेवारीनुसार)- १) औद्योगिक – ३९% २) कृषी – १८% ३) घरगुती – २३% ४) वाणिज्यीक – ११.२% ५) रेल्वे ३.२% आणि ६) इतर ४.२% असा होता.

·         भारतातील पहिली अणूभट्टी ४ ऑगस्ट १९५६ रोजी तुर्भे येथे सुरु झाली. तिचे नाव अप्सरा असे आहे. त्यानंतर १९६० मध्ये सारस, १९६१ मध्ये झर्लिन व पुर्णिमा या अणूभट्ट्या य्द्योगांना वीज पुरवठा करते.

·         वीजमंडळाच्या पुरर्रचनेबाबत राज्य सरकारने डॉ. माधवराव गोडबोले. यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. समीतीने जुलै २००१ मध्ये आपला अहवाल दिला होता.

·         महाराष्ट्र राज्य वीज नियमन आयोगाची स्थापना – १९९९

·         कोयना प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यात १३ मार्च १९९९ मध्ये ऑर्वेजियन तंत्रज्ञानाने लेक टॅपिंगचा आशिया खंडातील पहिला प्रयोग केला. त्यातून या प्रकल्पाची वीज निर्मितीची एकूण क्षमता १९२० मे.वॅ. झाली.

·         केंद्रिय जलविद्युत संशोधन संस्था – खडकवासला

·         महाराष्ट्राच्या ग्रामीण विद्युतीकरणाचे उदिष्ट्ये साध्य – मार्च १९८९ अखेर.

No comments

Hindi vyakaran Mock Test

Scholarship Exam 2024 PAPER 1/2 : Hindi अनेकार्थी शब्द Start The Quiz Time's Up score: Next question See Your Result Total Quest...

Powered by Blogger.