महाराष्ट्रातील वने
महाराष्ट्रातील वनश्रीचे आढळणारे विविध प्रकार आणि विविधता यांचे अस्तित्व स्थानिक परिसरात असलेली भौगोलिक परिस्थिती, पर्जन्यमान, जमिनीचा मगदूर, चढउतार, समुद्रसपाटीपासून उंची यावर अवलंबून असलेले दिसतात. वनश्रीच्या जडणघडणीमध्ये वरील नैसर्गिक कारणांप्रमाणे काही अनैसर्गिक कारणांचाही म्हणजे बेकायदा जंगलतोड, अनिर्बंध गुराढोरांची चराई, वणवे इ. मोठा भाग असतो. या कारणांमुळे विद्यमान वनश्रींच्या प्रकारात पूर्णपणे आविष्कार झालेली वने फारच क्वचित ठिकाणी, अतिदुर्गम ठिकाणी अथवा देवरायांतून आढळतात. शास्त्रीय दृष्ट्या महाराष्ट्रातील वनश्रींचे ढोबळमानाने खालील प्रकार सांगता येतील : (१) सदाहरित वने, (२) निमसदापर्णी वने, (३) आर्द्र पानझडी वृक्षवने, (४) शुष्क पानझडी वृक्षवने, (५) खाजणवने, (६) नदीकाठची वने, (७)रूक्ष प्रदेशातील काटेरी खुरटा झाडोरा आणि (८) लागवडीखालील वनशेती.
(१) सदाहरित वने : महाराष्ट्रात हा प्रकार फारच तुरळक आढळतो. साधरणतः १,२०० ते १,४०० मी. उंचीवरील विपुल पर्जन्यमानाच्या प्रदेशात जेथे स्थानिक भू-भागाला संरक्षण आहे अशा दुर्गम पठारी अथवा दऱ्याखोऱ्यातून सदाकाळ हिरवीगार असलेली वने आढळतात. या भागात पर्जन्यमान ३६० ते ६०० सेंमी. असते. या प्रकारची वने महाबळेश्वर, खंडाळा, माथेरान, भीमाशंकर, अंबोली अशा ठिकाणी आढळतात. पठारावर जरी वृक्षांची उंची कमी असली, तरी दऱ्याखोऱ्यातून हेच वृक्ष भरपूर उंच झालेले दिसतात. या वनांत खालील सदाहरित वृक्ष मुख्यत्वेकरून आढळतात : जांभूळ, पिशा, पारजांब, हिरडा, अंजन, आंबा, लाल देवदार वगैरे. झुडपांमध्ये फांगळा, रामेठा, बामणी, दिंडा, सुरंगी, फापटी वगैरे आढळतात. विकसित झालेल्या उंच वृक्षांच्या जंगलात ओंबळ, गारबी,पळसवेल, वाटोळी वगैरे अजस्त्र वेली आढळतात. भरपूरछाया आणि ओलावा असणाऱ्या ठिकाणी आमरी, नेच्यांचे विविध प्रकार दिसतात. अशा जंगलातून आंबा, फणस, कोकम, हिरडा वगैरे वृक्ष, शिकेकाईसारख्या वेली व जळाऊ लाकूड यांपासून काही अल्प प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळते. निसर्गसौंदर्याच्या दृष्टीने ही वने मोहक असली, तरी अर्थप्राप्तीच्या दृष्टीने तितकीशी महत्त्वाची नाहीत. तरी पण घाटमाथ्यावर होणाऱ्या प्रचंड पर्जन्यवृष्टीपासून पाणलोट भागातील मृदा संरक्षणाच्या दृष्टीने ही वने महत्त्वाची आहेत.
(२) निम-सदापर्णी वने : सदहरित वनांच्या खालच्या बाजूस जेथे पर्जन्यमान २०० ते ३६० सेंमी. आहे आणि उष्णतामान थोडेसे जास्त असलेल्या कोकणचा प्रदेश, घाटमाथ्याच्या नजिकचा प्रदेश येथे साधारणतः हिरवीगार राहणारी अरण्ये असतात. या जंगलात उंच वृक्ष नेहमी पानझडी असतात. मात्र मध्यम आकाराच्या वृक्षांच्या जातींमध्ये सदाहरित वृक्षांचा भरणा अधिक असतो. उंच वृक्षांमध्ये किंजळ, नाणा, ऐन, बेहडा, सावर, किन्हई, जांबत वगैरे तर मध्यम आकाराच्या वृक्षांमध्ये आंबा, जांभूळ, चांदडा, अंजन, गेळा वगैरे झाडोरा आढळतो. सदाहरित वनांप्रमाणेच आर्थिक दृष्ट्या ह्या वनांपासून फारसे उत्पन्न मिळत नाही; परंतु सह्याद्रीच्या उतारांवरील जमिनीची धूप थांबविण्याच्या दृष्टीने या वनांचे महत्त्व फार आहे.
(३) आर्द्र पानझडी वने : घाटमाथ्यावरून खाली उतरल्यानंतर सदापर्णी वनांच्या खालील बाजूस डोंगर उतारावर, काही वेळी सपाटीवर सुद्धा या प्रकारची वने आढळतात. पर्जन्यमान १५० ते २०० सेंमी., निचऱ्याची जमीन, उष्णतामान यांमुळे सागवान वृक्ष असलेली पानझडी वृक्षांची जंगले या भागात आढळतात. जमिनीच्या मगदुराप्रमाणे झाडोऱ्याची उंची ३०-३५ मी. पर्यंत असू शकते. व्यापारी दृष्ट्या अशा वनांचे महत्त्व फार आहे. वनव्यवस्थापनाच्या दृष्टीने अशा किंमती वनांची खास देखभाल केली जाते. उंच वृक्षांमध्ये सागवान व त्याच्याबरोबरच शिसम, सावर, वीजा, हळदू , कळंब, ऐन, बोंडारा, शिरीष, अर्जुनसादडा, धावडा इ. उपयुक्त वृक्ष सापडतात. सागवानी इमारती लाकडाचे इतर जातीच्या इमारती मालांपेक्षा कित्येक पटींनी जास्त उत्पन्न असल्याने वनव्यवस्थापनामध्ये त्याच्याकडे जास्त लक्ष पुरविले जाते. अशा वनात नेहमी पाणी असणाऱ्या ओढ्यांच्या काठी साधारणतः काटेरी बांबूंची बेटे आढळतात.
(४) शुष्क पानझडी वृक्षवने : या प्रकारच्या वनराजीत पानझडी वृक्षांचे प्रमाण सर्वांत जास्त असते. उन्हाळ्यामध्ये तर अशा वनराजीमध्ये सर्वच वृक्षांचे पर्णहीन खराटे दृष्टीस पडतात. अशा रानात सागवान वृक्षही आढळतात; पण त्याची प्रत एवढी चांगली नसते. असाणा, तिवस, सावर, चारोळी, आवळा, बेहडा, कोशिंब, शेंदरी, चेरा, पळस, बारतोंडी, धामण, टेंबुर्णी वगैरे वृक्ष सापडतात. बाकीच्या झाडोऱ्यात बोर, बाभूळ, कुडा, आपटा, तांबरट वगैरे मध्यम आकारांचे वृक्ष अथवा झुडपे आढळतात. इमारती लाकडाच्या दृष्टीने या प्रकारच्या वनांना कमी महत्त्व असले, तरी भरपूर जळाऊ लाकडाचा पुरवठा करणारी जंगले म्हणून ही राने उपयुक्त मानली जाता. अशा तऱ्हेच्या रानातील वृक्षांची वाढ अतिशय हळू असल्याने जर अनिर्बंध लाकूडतोड सुरू झाली, तर सर्व प्रदेश वैराण होण्यास वेळ लागत नाही. अशा वनात दुय्यम उत्पन्न देणाऱ्या वनस्पती म्हणजे तेंडू, गवते, औषधी वनस्पती इ. लावून अशा जंगलाचे महत्त्व वाढविता येईल.
(५) खाडीकाठची खाजण वने : कच्छ वनश्री (मँग्रोव्ह फॉरेस्ट) कोकण प्रदेशातील काही खाड्यांच्या आसपास पाणथळ अथवा गाळ असलेल्या भूभागात खाजण किंवा खारपुरीची जंगले आढळतात. भरतीच्या वेळी जमीन खाऱ्यापाण्याखाली असते. अशारानातील वृक्षांची उंची ४ ते ६ मी. असते. पाणथळ जमिनीमुळे वृक्षाच्या आसपास जमिनीतून बाहेर आलेली श्वसन मुळे दिसतात. अशा वनराजीपासून जळाऊ लाकूड चांगले मिळते. या भागात वाढणाऱ्या वनस्पतींपासून टॅनीन मिळत असल्याने कातडी कमावणे, मासेमारीची जाळी धुणे यांकरिता त्यांचा उपयोग केला जातो. पर्यावरणाच्या दृष्टीने ही जंगले समुद्र लाटांनी होणारी जमिनीची धूप व आक्रमण थांबवतात. या रानातील प्रमुख वृक्ष म्हणजे तिवर, आंबेटी, मारुडी, काजळा, समुद्रफळ इत्यादी.
(६) नदीकाठची वने : बारमाही पाणी असणाऱ्या नद्यांच्या अथवा ओढ्यांच्या काठी अरुंद उंच सखल भागात ह्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात. गाळाची माती व पाण्याची विपुलता यांमुळे या वनांची वाढ चांगली होते. काही वेळा अशा ठिकाणी असणाऱ्या देवरायांमधून ३०−४० मी. उंचीचे वृक्ष आढळतात. अशा रानातील झाडोऱ्यात नेहमी हिरवेगार असणारे वृक्ष असतात. उदा., करंज, आंबा, जांभूळ, उंबर, पाडळ, पुत्रजीवी वगैरे. इतर झाडोऱ्यात अटक, करवंद, दिंडा, गिरनूळ वगैरे झुडपे सापडतात. काही ठिकाणी काटस बांबूची बेटे व बाभळीची वने चांगली पोसतात. अशा रानातून आणि विशेषतः देवरायांतून स्वच्छ पाण्याचे झरे आढळतात. व्यापारी दृष्ट्या या रानांस महत्त्व नसले, तरी जमिनीची धूप थांबविणे, भूभागातील पाण्याचा साठा वाढविणे ही कार्ये अशा वनांमुळे होतात. नदीकाठचा सर्व प्रदेश लागवडीखाली जाऊ लागल्याने पूर्वी नदीकाठी कशा तऱ्हेची वनराजी असावी, याचा अंदाज अशा वनांच्या अभ्यासातून घेता येतो.
(७) रुक्ष खुरटी वने : अतिशय कमी पर्जन्यमानाच्या, नेहमी पाण्याचे अवर्षण असलेल्या प्रदेशात खुरट्या, काटेरी वनस्पती आढळतात. चराऊ प्राण्यापासून बचाव करण्यासाठी, तसेच पाण्याचे दुर्भिक्ष टाळण्यासाठी अशा वनस्पती खुज्या आणि तीक्ष्ण काटे असलेल्या आढळतात. तरी पण मानव इंधनाकरिता अशी झुडपेदेखील काढून नेतो व त्यामुळे अधिक वैराण असलेला प्रदेश उजाड होतो. वाळवंटी हवामानास उपयुक्त अशा वनस्पतींची अशा ठिकाणी पद्धतशीर लागवड करून या प्रदेशाचा विकास साधता येईल.
(८) वनशेती : समुद्र किनाऱ्यावरील रेतीमध्ये काही ठिकाणी गेली कित्येक वर्षे वन विभागातर्फे खडशेरणीची लागवड केली जाते. यापैकी काही लागवडीची सुरूवात १८८९-९० साली झाली असून ही लागवड व्यापारी दृष्ट्या किफायतशीर समजली गेली आहे. आपण जसे नियमितपणे पीक काढतो त्याप्रमाणे १५-२० वर्षांच्या आवर्तनानंतर वृक्ष तोड करून पुनर्लागवड आयोजन कार्य वनविभागातर्फे होत असते. हल्ली सामाजिक वनीकरण प्रकल्पाखाली ठिकठिकाणी जनतेच्या सहकार्याने वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन व संरक्षण या गोष्टींचे महत्त्व पटत चालले आहे. युकॅलिप्टस, सुबाभूळ, विलायती बाभूळ वगैरे जलद वाढणाऱ्या व इंधनाच्या दृष्टीने किफायतशीर असणाऱ्या वृक्ष जातींची लागवड सुरू आहे व त्याला मर्यादित प्रमाणात यश येऊ लागले आहे.
महाराष्ट्रात एकूण ३,००० पेक्षा जास्त सपुष्प वनस्पतींच्या जाती आहेत. त्यांत १,२०० च्या वर प्रजातींची, १५० च्या वर कुलांची संख्या जाईल. सपुष्प वनस्पतींच्या मानाने पाइन, देवदार व नेचे वर्गातील वनस्पतींची संख्या अत्यंत अल्प आहे.
जंगलांचे फायदे :
जंगलांचे अनेक फायदे आहेत. जमीन धुपण्यापासून वाचवणे, पुरावरनियंत्रण,हवामानात समतोल आणणे, प्राणी व वनस्पतींची जपणूक करणे हे प्रमुख फायदेहोतात. शिवाय इमारत, जळण, फनिर्चरसाठी, घरेशाकारणीसाठी लाकूड, निरनिराळयाप्रकारची तेले, खैर, डिंक, काथ्या, मध, लाख इत्यादी अनेक गोष्टी जंगलापासूनमिळतात. महाराष्ट्रात लाकूडतोडीचा व्यवसाय कंत्राटदारी पध्दतीने चालतो. आईन, खैर,शिसव, साग, बाभूळ इत्यादी जातीचे लाकूड कठीण असल्यामुळे त्याचा उपयोगइमारतीच्यालाकडासाठी फनिर्चर व शेतीची अवजारे तयार करण्यासाठी केलाजातो. बाभूळ, चिंच,खैर, हिरडा याचे लाकूड जळण्यासाठी वापरले जाते.
जंगलाचा दुसरा प्रमुख उपयोग कागद निमिर्तीसाठी होतो. उदा.चंद्रपूर जिल्ह्यातबल्लारपूर (कागजनगर) येथील कागद गिरणीलालगद्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचापुरवठा आजूबाजूच्या जंगलातून केला जातो. आपटयाची व टेंभुर्णीची पाने विडयावळण्याकरिता उपयोगातआणली जातात. महाबळेश्वर परिसरात मधुमक्षिकापालन व्यवसायचालतो. शेकडो प्रकारच्या औषधी वनस्पती, डिंक व मध महाराष्ट्रात सर्वत्र गोळाकेला जातो. कोकण प्रदेशात कारवीचा उपयोग घराच्या भिंती बांधण्यासाठी व नारळव ताडाच्या झावळयांचा उपयोग घरे शाकारण्यासाठी केला जातो.
लाकूड कापणीच्या 50 पेक्षा जास्त गिरण्या महाराष्ट्रात आहेत. त्यांच्याजास्त भरणामुंबई व नागपूर या ठिकाणी आढळतो. होडया तयारकरण्याचा उद्योग किनारी प्रदेशातचालतो. सावंतवाडी व पेण येथेलाकडी खेळणी तयार करण्याचा उद्योग आहे.
सद्यस्थिती
राष्ट्रीय धोरणानुसार व शास्त्रीय दृष्टिकोनातूनही एकूण क्षेत्रफळापैकी निदान 33क्षेत्र जंगलाखाली असावे असे मानले जाते. परंतु महाराष्ट्रात हे प्रमाण फक्त 21इतकेच आढळते. सर्व भारताची सरासरी 23 आहे. उपग्रहाव्दारेघेतलेल्या छायाचित्रांनुसारराज्यातील फक्त 9 क्षेत्र प्रत्यक्ष वनाखालीआहे. गेल्या काही दशकात वाढत्यालोकसंख्येच्या दबावामुळे फार मोठयाप्रमाणावर जंगले तोडली गेली. कंत्राटदारांनीकेलेल्या चोरटया जंगलतोडीचे प्रमाणही मोठे आहे. वाढत्या लोकसंख्येमुळेजास्तीतजास्त जमीन शेतीखाली आणली गेली. तसेच जाळण्यासाठी, रस्त्यांसाठीमोठयाप्रमाणावर झाडे तोडली गेली. शहराच्या भरमसाठ वाढीत त्यालगतची जंगले नष्ट झाली.धरणयोजना पार पाडतांना वनक्षेत्रावर आक्रमण होते. याशिवाय बेदरकारपणे गुरेचारल्यानेही जंगलांचे अतोनात नुकसान झाले.
जंगलाखालील जमिनीचे क्षेत्र वाढविण्यासाठी सर्व पातळयांवर प्रयत्न व्हायला हवेत.किनारपटट्ीलगत पुळण मातीत केलेली खडशेरणीची लागवड किंवा देशावर पडीक वकमी प्रतीच्या जमिनीवर केलेली युकॅलिप्टस्व सुबाभूळ यांची लागवड करण्यासाठीस्वयंसेवी संस्थांचेही साह्य मोठया प्रमाणावर घेतले जात आहे. वनमहोत्सवाकरीतालागणारी रोपे व त्यांचे वाटप करण्यासाठी राज्यातील वनविभागाने राज्यभररोपवाटिका निर्माण केल्या आहेत. तेथे रोपांची निवड, लागवड, निगायासंबंधीमाहिती मिळते. राज्यात अशा सुमारे 330 रोपवाटिका आहेत. सन 1974 मध्ये महाराष्ट्रवनविकास मंडळाची स्थापना झाली.
वनांच्या विकासात उपाययोजना :
1) उद्योगाभिमुख वनविकास. या मध्ये वन उत्पादनावर आधारित उद्योगांचाविकासअभिप्रेत आहे.
2) प्रतिबंधक वनविकास. यात पूर नियंत्रण, मृदासंधारण असे कार्यक्रम येतात.
3) वन्यप्राणी व परिसर संरक्षण
4)सामाजिक वनीकरण : यात पर्यावरणाच्या गरजांच्या दृष्टीनेवनविकास अभिप्रेतआहे. आठव्या योजनेत वनीकरणावर रू. 405 को. वसामाजिक वनीकरणावर रू. 102 को.खर्च अभिप्रेत आहे.
5) महाराष्ट्रवनीकरण प्रकल्पास जागतिक बॅंकेने मंजुरी दिली आहे. 1992-98याकालावधीत हा प्रकल्प राबवला गेला व त्याचा एकूण खर्च रू. 431 कोटीहोता.त्यापैकी 87 जागतिक बॅंकेकडून येणार आहे.
विकासाच्या एकूण गरजा लक्षात घेता पर्यावरणातील 'वनस्पती' याघटकावर यापुढेनेहमीच ताण पडणार आहे. त्यामुळे वनांचाप्रकषिर्क वापर करून त्यातून उत्पादन आणिउत्पन्न वाढत्या प्रमाणावरअपेक्षित असेल तरी यावर केव्हा तरी मर्यादा पडणारच. तेव्हाकालांतरानेनष्टप्राय होणाऱ्या महत्त्वाच्या उत्पादन घटकांना कृत्रिम पर्याय शोधणेअटळराहील. कागद गिरणीमध्ये बांबूऐवजी कृत्रिम धाग्याचा लगदा व उसाच्याचिपाटाच्याचोयटया किंवा तांदूळ निराळा केल्यानंतर उरणाऱ्या साळीयांचा व्यापारी तत्त्वावर वापरझाल्यास वनस्पतींवरील ताण हलका होईल.त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे शहरी व ग्रामीणजनतेची जळाऊ लाकडाचीगरज ही गोबर गॅस, नैसगिर्क वायू आणि सौरशक्तीचीउपकरणे अशांसारख्या मार्गांनी काही प्रमाणात भागविली गेली तरच परिस्थितीकाबूतराहिल.
सरकारतर्फे वन महोत्सव, वन्यजीवन सप्ताह, वनदिन, पर्यावरणदिन साजरे केलेजातात. त्यांना प्रदर्शने, व्याख्याने, फिल्म शो, स्लाईडशो, परिसंवाद, दौरे, टि.व्ही.कार्यक्रम, स्टिकरतर्फे प्रचार यांची जोडदिली जाते.
वनांचे संरक्षण: वनांची हानी करण्यास कारणीभूत होणारे प्रमुख घटक पुढीलप्रमाणे आहेत : (१) पाळीव जनावरे व त्यांची अनियंत्रित चारणी, (२) वन्य पशू, (३) कीटक, (४) कवक (हरितद्रव्यरहित सजीव) किंवा बुरशी, (५) वादळ, पूर, बर्फवृष्टी, हिमतुषार, तडित् (वीज) व अवर्षण या नैसर्गिक घटना आणि (६) मानवी व्यत्यय. यांपैकी मानवी संपर्काचा वनांवर सर्वांत जास्त प्रभाव असतो. वनक्षेत्राचे विस्तीर्ण स्वरूप व त्यामानाने रक्षण करणाऱ्या मनुष्यबळाची कमतरता यामुळे अविवेकी आणि समाजकंटकी प्रवृत्तीच्या व्यक्तींना वनातील लाकडे व इतर साधनसंपत्ती चोरून नेणे सहज शक्य होते. अशा विध्वंसापासून वनांचे रक्षण करण्यासाठी जे कायदे केले जातात त्याची अंमलबजावणी परिणामकारक रीत्या होणे आवश्यक असते. चोरटी तोडणी व निष्कर्षण यांप्रमाणेच विकसनशील देशांत लोकसंख्या वाढीमुळे वनजमिनीवर शेतीसाठी अतिक्रमणे करण्याची प्रवृत्तीही वाढत्या प्रमाणात दिसून येते. पाळीव जनावरांच्या आणि शाकाहारी वन्य पशूंच्या अनियंत्रित चारणीमुळे वनातील पुनरुत्पादनाचे नुकसान होते व जमिनीची प्रत निकृष्ट होते. यासाठी चारणी क्षेत्राचे विभागवार नियंत्रण ठेवणे, पुनरुत्पादन क्षेत्रात चारणीस बंदी घालणे, शाकाहारी वन्य पशूंचे बेसुमार प्रजनन होत असल्यास त्यांच्या संख्येवर नियंत्रण घालणे अशा स्वरूपाचे उपाय योजावे लागतात. ज्या वन्य जीवांपासून वनांना व विशेषतः पुनरुत्पादनाला भारतीय वनांत उपद्रव होतो त्यात सांबर, चितळ, गवे, हत्ती, साळ, रानडुकरे, माकडे, अस्वले व उंदीर यांचा समावेश होतो.
वनविषयक कायदे: राष्ट्रीय वनधोरण ठरविल्यानंतर ते प्रत्यक्ष अंमलात अंमलात आणता यावे व धोरणाची उद्दिष्टे साध्य व्हावी यासाठी जी कार्यवाही व प्रयत्न करावे लागतात. त्यात वनधोरणाला अनुरूप असा वनविषयक कायदा करणे हे क्रमप्राप्त असते. निरनिराळ्या देशांतील परिस्थितीनुरूप ज्याप्रमाणे देशादेशांतील वनधोरणात तफावत असते त्याप्रमाणेच निरनिराळ्या देशांतील वनविषयक कायद्यांतही विविधता दिसते. भारतात शासकीय वनांचे सीमांकन व सर्वेक्षण सुरू झाले त्याच सुमारास म्हणजे १८६५ मध्ये पहिला भारतीय वन कायदा अंमलात आला. १८९७ ते १९१९ या काळात त्यात बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या, तर १९२७ साली त्यापूर्वीच्या सर्व संबंधित कायद्यांचे एकत्रीकरण करण्यात आले. हाच १९२७ चा ‘भारतीय वन अधिनियम’ त्यात निरनिराळ्या राज्यांनी वेळोवेळी केलेल्या फेरफारांसह सध्या भारताचा सर्व राज्यांत लागू आहे. महाराष्ट्रात या अधिनियमातील सर्वांत अलीकडील दुरूस्ती ‘भारतीय वन (महाराष्ट्र दुरूस्ती) अधिनियम १९८४’ या नावाने ओळखली जाते.
देशातील, विशेषतः हिमालय व इतर डोंगरी भागातील वनांचा व वृक्षराजींचा वाढत्या प्रमाणात नाश व अपकर्ष होत असल्याने भूपृष्ठीय मृदेची मोठ्या प्रमाणावर झालेली धूप, अनिश्चित पर्जन्यमान व वारंवार येणारे पूर, तसेच सरपणाची तीव्र टंचाई होण्याबरोबर महत्त्वाचे म्हणजे धुपलेल्या व निकृष्ट झालेल्या जमिनींची ऱ्हास पावलेली उत्पादनक्षमता या सर्वांचा विचार करून मुख्यत्वे अविवेकी निर्वनीकरण व वनांखालील जमिनींच्या वनेतर उद्दिष्टांकरिता उपयोग करण्यास प्रतिबंध करण्यासाठी १९८० मध्ये लोकसभेने ‘वन संरक्षण अधिनियम’ या नावाचा कायदा मंजूर केला आहे. यातील तरतुदींनुसार केंद्र शासनाच्या पूर्वसंमतीशिवाय राखीव वनातील कोणत्याही क्षेत्राच्या निर्वनीकरणावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.
सर्वसाधारण वनविषयक कायद्यांतील वनोपजांबाबतच्या तरतुदी या मुख्यतः राखीव व संरक्षित वनक्षेत्रातील उपजांपुरत्या मर्यादित असतात. म्हणून वन्य जीवांच्या सर्वंकष संरक्षणाच्या व संवर्धनाच्या दृष्टीने आणि अभयारण्ये व राष्ट्रीय उद्याने यांच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक अशा तरतुदी असणारा एक खास अधिनियम ‘वन्य जीव संरक्षण अधिनियाम १९७२’ या नावाने राज्यांच्या पूर्वसंमतीने लोक सभेने संमत केलेला आहे.
वरील तीन मुख्य अधिनियमांखेरीज वृक्षसंरक्षण व वने यांच्याशी संबंधित असे पुढील खास कायदे महाराष्ट्रात केलेले आहेत : (१) महाराष्ट्र वृक्ष तोडणी (नियंत्रण) अधिनियम १९६४ हा ग्रामीण क्षेत्राला लागू आहे; (२) महाराष्ट्र अदिवासींच्या झाडांची विक्री (नियंत्रण) अधिनियम १९६९; (३) महाराष्ट्र किरकोळ वनोपज (व्यापार नियंत्रण) अधिनियम १९६९; (४) महाराष्ट्र (शहरी क्षेत्र) वृक्षसंरक्षण अधिनियम १९७५; (५) महाराष्ट्र खाजगी वने (संपादन) अदिनियम १९७५ व (६) महाराष्ट्र आदिवासी आर्थिक परिस्थिती (सुधारणा) अधिनियम १९७६.
वनस्पती जीवन
· महाराष्ट्रातील जंगलांचे प्रकार – पाच
· महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी वनांखालील क्षेत्र – २१.१०%
· उपग्रह सर्वेक्षणानुसार प्रत्यक्ष दाट वने – ११ %
· भारताच्या वनक्षेत्रांपैकी महाराष्ट्रात असणारी वने – ८.७%
· महाराष्ट्रातील सर्वात कमी जंगले – लातूर
· सर्वात कमी वनक्षेत्रांखालील असणारा विभाग – मराठवाडा (३०६%)
· सागाची उत्कृष्ट जंगले सापडतात – चंद्रपूर (बल्लारशा)
· महाराष्ट्र वनविकास मंडळाची स्थापना – १६ फेब्रुवारी १९७४ (नागपूर)
· महाराष्ट्रातील जंगलाबाबतचे महाविद्यालय – अकोला
· अमरावतीतील प्रसिध्द सागवनी लाकडाचा बाजार – परतवाडा
· स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट २००३ नुसार महाराष्ट्रात ६०,९३९ चौ.कि.मी. क्षेत्र वनांखाली होते. त्यापैकी दाट वने १७.२%, विरळ वने ४३.४%, ओपन फॉरेस्ट होते.
· महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान – चांदोली (३१७ चौ.कि.मी.)
· सर्वाधिक क्षेत्र वनांखाली असणारा जिल्हा – गडचिरोली (७७%)
· एकून जमिनीपैकी सर्वाधिक क्षेत्र विभाग – विदर्भ (३७%)
· वनांचे प्रमाण वाढविण्यासाठी पुळणीवर लागवड केली जाणारी वनस्पती – खडशेरणी
· देशावर पडीत व कमी प्रतीच्या जमिनीवर लागवड करतात – निलगिरी व सुबाभूळ
· कोकण विकास महामंडळ मर्यादित रबर प्रकल्प – कळंबिस्त (सिंधुदुर्ग)
· औषधे व सुगंधित तेल निर्मितीसाठी उपयुक्त – सोशा गवत (धुळे जळगांव), मुशी गवत (ठाणे)
· संत तुकाराम वन ग्राम योजना शासनाने सुरु केली – २००६-०७
| उद्योग | ठिकाण | उद्योग | ठिकाण |
| मधुमक्षिका पालन | महाबळेश्वर | लाकडी खेळणी | पेण व सावंतवाडी |
| लाख निर्मिती | गोंदिया | सिट्रानेला तेल गाळणे | देवरुख (रत्नागिरी) |
| टॅनिन | आंबा (कोल्हापूर) | कात निर्मिती | मुंडवा, डाहणू,चंद्र्पूर |
| पामतेल | सिंधुदुर्ग | | |
· टेंभूर्णी व आपट्याच्या पानापासून विड्या वळणे – सिन्नर (नाशिक), गोंदिया, तिरांडा, देवरी, आमगांव व सालेकसा (गोंदिया), भंडारा, तुमसर, मोहाडी (भंडारा), ब्रम्हपुरी (चंद्रपूर) कामठी व नागरुर (नगपूर) व अहमदनगर
· महाराष्ट्रातील रेशिम उत्पादन – बापेवाडा, एकोडी (भंडारा), साबळी व नागभींड (चंद्रपूर), तसर (टनक – रेशिम – एनाची पाने खाऊन) अमरावती
· पश्चिम घाट बचाओ आंदोलन – बाबा फडके
· आप्पिक्को (अलिंगन) – पांडुरंग हेगडे. (कर्नाटक)
· चिपको आंदोलन – सुदर्लाल बहुगुणा व चंदीप्रसाद भट्टा
प्राणी संपत्ती/ अभयारण्ये/ राष्ट्रीय उद्याने
· महाराष्ट्राचा राज्य प्राणी – शेकरु (खार – भीमाशंकर)
· महाराष्ट्राचे राज्य फुल – मोठा बोंडारा
· महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान – चांदोली ३१७ चौ.कि.मी.
· महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान – संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (बोरिवली) ९० चौ.कि.मी.
· महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य – माळढोक पक्षी अभयारण्य (अहमदनगर व सोलापूर) ८५०० चौ.कि.मी.
· राज्यातील सर्वात लहान अभायारण्य – देउळ गांव- रेहेकुरी (अहमदनगर) ३ चौ.कि.मी.
· राज्यातील १ ले पक्षी अभयारण्य – कर्नाळा (रायगड)
· महाराष्ट्रातुन नाहिसे झालेले प्राणी – चित्ता, चींकारे व काळविट
· महाराष्ट्रातील मगर प्रजनन केंद्र – ताडोबा
· राज्यातील १ ले व देशातील ३ रे सागरी राष्ट्रीय उद्यान – मालवण (सिंधुदुर्ग)
· भारतातील सर्वात मोठे स्थलांतरीत व स्थानिक पाणपक्ष्यांसाठी राखीव अभयारण्य – केवलादेव पाणपक्षी अभयारण्य
· भारतातील १ ले व एकमेव मोर अभयारण्य – नायगांव (बीड)
· राज्यातील सर्वात जुने अभयारण्य – राधानगरी (१९१८)
महाराष्ट्रातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान :
| राष्ट्रीय उद्यान | जिल्हा | आढळणारे प्राणी |
| ताडोबा | चंद्रपूर | सांबर, गवा, हरिण, वाघ, निलगाय, चितळ |
| नवेगाव | गोंदिया | निलगाय, बिबट्या, भेकर, अस्वल |
| संजय गांधी | बोरिवली | बिबळे, वाघ, सांबर, भेकर, कोल्हे |
| पेंच (पं. जवाहरलाल नेहरु) | नागपूर | पट्टेदार वाघ, बिबटे, सांबर, चितळ |
| गुगामल/ढाकणे कोळखाज/मेळघाट | अमरावती | वाघ, जंगली रेडे, भेकर, सांबर, रानकोंबड्या |
| चांदोली | सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी | वाघ, बिबटे, गवे, अस्वल, सांबर |
| किनवट अभयारण्य | यवतमाळ व नांदेड | वाघ, बिबट्या, अस्वल, मोर |
| बोर | वर्धा | बिबट्या, सांबर |
| टिपेश्वर | यवतमाळ व नांदेड | मृगया |
| भीमाशंकर | पुने व ठाणे | शेकरु (खार) |
| राधानगरी | दाजिपूर – कोल्हापूर | गवे |
| नागझिरा | गोंदिया | वाघ, बिबट्या |
| देउळगांव – रेहेकुरी | अहमदनगर | काळवीट |
| माळढोक पक्षी | अहमदनगर, सोलापूर | माळढोक पक्षी |
| नांदुर – मध्यमेश्वर | नाशिक | पाणपक्षी |
| उजनी | सोलापूर | फ्लेमिंगो (रोहित) पक्षी |
| कर्नाळा | रायगड | पक्षी |
| तुंगारेश्वर | ठाणे | |
महाराष्ट्रातील प्रमुख अभयारण्य :
| अभयारण्य | जिल्हा | अभयारण्य | जिल्हा |
| कोयना | सातारा | फणसाड | रायगड |
| अंधारी | चंद्रपुर | कळसुबाई- हरिषचंद्र नगर | अहमदनगर |
| गौताळा-औटरामघात | जळगांव व औरंगाबाद | अनेर धरण | धुळे |
| यावल | जळगाव | तानसा | ठाणे |
| नर्नाळा | अकोला | चपराळा | गडचिरोलि |
| पेनगंगा | यवतमाळ व नांदेड | | |
महाराष्ट्रातील प्रमुख वनोद्यान :
| जिल्हा | वनोद्याने | जिल्हा | वनोद्याने |
| ठाणे | अर्नाळा, वज्रेश्वरी | सांगली | दांडोबा डोंगर |
| औरंगाबाद | हिमायतबाग, जायकवाडी, अजिंठा | नाशिक | गंगापुर, सप्तश्रृंगी |
| कोल्हापुर | तबकबाग (पन्हाळा) आळते | अमरावती | चिखलदरा |
| जळगांव | पाल, पद्मालय, पाटणादेवी | बुलढाणा | राणीबाग, लोणार, बुलढाणा |
| दिंधुदुर्ग | आंबोली, नरेंद्र डोंगर | सातारा | महाबळेश्वर, प्रतापगढ |
| अमरावती | चिखलदरा | नागपुर | रामटेक, सेमिनरी हिल |
| चंद्रपुर | माणिकगड | नंदुरबार | तोरणमाळ |
महाराष्ट्रातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य
ताडोबा राष्ट्रीय उद्यान
विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या ताडोबाच्या जंगलाला ताडोबा हे नाव येथील घनदाट जंगलात राहणा-या आदिवासी जमातींच्या तारू किंवा ताडोबा या देवदेवतांच्या नावावरुन पडले असावे असे स्थानिक लोक सांगतात. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रकल्प आहे. 625 स्क्वेअर किलोमिटर इतके मोठे याचे क्षेत्रफळ आहे. याचे प्रामुख्याने दोन मुख्य भाग असून 1955 पासून अस्तित्वात असलेले ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि 1986 मध्ये त्यात समाविष्ट करण्यात आलेले 508 स्क्वेअर किलोमिटरचे अंधारी अभयारण्य या दोन्हींचे मिळून बनलेले आजचे हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. या अभयारण्यातून अंधारी नावाची नदी वाहते. त्यावरुनही याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असे म्हणतात. यात प्रामुख्याने घनदाट जंगलांनी व्यापलेल्या टेकड्या या उत्तर आणि पश्चिम भागात आहेत. ताडोबा रिझर्व्ह मध्ये चिमुरच्या टेकड्यांचा परिसर येतो तर, अंधारी अभयारण्यात मोहर्ली आणि कोलसा टेकड्यांचा परिसर येतो. अंधारी नदीच्या व्यतिरिक्त असलेल्या पाणथळ जागा अर्थातच कोसला तळे जंगलाच्या मध्यवर्ती भागात आहे. ताडोबा हे मुख्यत्वे उष्ण कटिबंधीय जंगल प्रकारांमध्ये मोडते. याचा 87 टक्के भाग अतिसुरक्षित आहे. जंगलात ऐन, बीज, धौडा, हळदू, साल, सिमल, तेंदू, बेडहा, हरडा हे वृक्ष मोठ्या प्रमाणात असून महुआ, ब्लॅक प्लम, अर्जुन फळ, बांबू अशी वनसंपदाही आढळते.
नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान
हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेल्या कुशीत विसावलेला विस्तीर्ण जलाशय. दृष्टी जाईल तेथपर्यंत फक्त जलाशयाचे पाणी व हिरवळच दिसावी. हिरवळीचे प्रतिबिंब पाण्यामध्ये पडून जणू हे पाणी हिरवेगार दिसावे. अशा कातरवेळी निरव शांततेचा व त्या शांततेत आपलेच साम्राज्य भासवणाऱ्या असंख्य पक्षांचे अस्तित्व अनुभवायचे असेल तर नवेगावबांधला यायलाच हवे.
गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्वेस असलेला. वनराईने नटलेला. धानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यात निसर्गाने मुक्त हस्ताने विविध रंगाची उधळणी केली आहे. नवेगावबांधमधील मुख्य आकर्षणाचे केंद्र म्हणजे पक्षी होय. नवेगावबांधचा परिसर विशेषत्वाने डोंगराळ असून तेथील वनाचा एकूण विस्तार 133 चौरस किमी आहे. 1975 साली नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान म्हणून शासनाने घोषित केले. थोर साहित्यिक व्यंकटेश माडगुळकरांपासून ‘अरण्यऋषी’ नावाने प्रख्यात लेखक मारुती चितमपल्ली यांच्या लेखनीतून नवेगावचा निसर्ग श्रावणातील सरींप्रमाणे अक्षरश: रिमझीमला आहे.
नवेगावचा परिसर वनस्पतीसृष्टी, वन्यजीवसृष्टी आणि पक्षीसृष्टी यांनी समृद्ध व नटलेला आहे. हिवाळ्यात हजारोंच्या संख्येने स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन येथे होते. तेव्हा मात्र पक्षीप्रेमींना नवेगावची वाट खुणावल्याशिवाय राहत नाही.
सारसक्रेन, उघडचोच करकोचा, मध्यम व मोठा बगळा अशा पाणपक्ष्यांसोबत छोटा निळा खंड्या, पाणमोर, पाणकावळा, जांभळी पाणकोंबडी, टिटवा, पाणपिपुली ह्या छोट्या परंतू सुरेख पक्ष्यांची मालिका येथे आढळते. नवेगाव राष्ट्रीय उद्यानात बुलबुल, सुतारपक्षी, हुदहुद, शिकरा, दयाळ, कोतवाल, सातबहिणी, ससाणा, गरुड, घुबड, घार असे अनेकानेक पक्षी दिसून येतात. एकाकी व मनुष्यांची ये-जा नसल्यामुळे पक्ष्यांसाठी हे ठिकाण खरेच निवांत ठरते. येथे उभारलेल्या पक्षीदर्शक मनोऱ्यामुळे पक्षी प्रेमींना विविध पक्ष्यांना मनसोक्त न्याहाळता येते. पक्षी अभ्यासकांच्या मते महाराष्ट्रात केवळ नवेगाव येथेच सारस क्रोंच पक्ष्यांची वीण होते. येथील वनस्पतीतही विविधता आहे. त्यात साग, बिजा, धावडा, पळस, कवट, बेल, बोर, मोह, बेहडा, हिरडा, उंबर, जांभूळ यामुळे वनस्पतींची हिरवी झालरच असल्याचा भास होतो.
पर्यटकांची येथे राहण्याची सुविधा व्हावी. याकरीता युथ होस्टेलमध्ये बेडची सुविधा असून लॉगहट, रेस्टहाऊस, हॉलीडेहोम रेस्टहाऊस असून यांचे सार्वजनिक बांधकाम विभाग, उपवनसंरक्षक (वन्यजीव विभाग) यांच्या कार्यालयातून आरक्षण करता येते.
पक्षी मित्रांच्या दृष्टीने स्थलांतरीत पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी व वन्यप्राण्यांना बघण्यासाठी मार्च मे महिन्याचा कालावधी योग्य आहे. नवेगावबांध येथील हिरवे डोंगर, आरस्पानी व आरशासारखे सुरेख जलाशय, काळोख्या रात्रीत चांदण्याचे चमचमते पाणी सर्वकाही मन मोहून टाकणारे व मनातला कोलाहल जागे करणारी अनाहूत शांतता.
पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, पेंच (नागपूर) –
नागपूरपासून काही अंतरावर पवनी हे गाव आहे. त्यापासून २० किमी या अंतरावर पेंच हे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प आहे. पेंच नदीवर तोतला डोह या ठिकाणी विशाल धरण बांधले आहे. हिवाळ्यात तोतला डोह येथे अनेक स्थलांतरित पक्षी दिसतात.
० संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली (मुंबई उपनगर व ठाणे) –
मुंबईच्या उत्तरेस मुंबई उपनगरात ४० किमी अंतरावर बोरिवली येथे घनदाट राजीचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. या उद्यानाचा काही भाग ठाणे जिल्ह्य़ात येतो. या उद्यानात सदाहरित, निमसदाहरित व खारफुटी अशी तीन प्रकारची वृक्षवने आहेत. वसईच्या खाडीला लागून या उद्यानाचे २५ किमी क्षेत्र हे खारफुटी जंगलाने व्यापलेले आहे. त्यात अनेक प्रकारच्या जलवनस्पती आहेत. यात कोळंबी, बांगडा या माशांचे प्रजोत्पादन होते.
० गुगामल राष्ट्रीय उद्यान (अमरावती) –
या राष्ट्रीय उद्यानात रानमांजर, रानउंदीर, हरणांची पिल्ले, तसेच सांबर, रानगवे, पक्ष्यांमध्ये बगळे, बुलबुल, निळकंठ, इ. दिसतात.
० चांदोली राष्ट्रीय उद्यान (सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी) –
वारणा नदीवर चांदोली येथे एक धरण बांधण्यात आले आहे, त्याला चांदोली धरण असे म्हणतात. सांगली जिल्ह्य़ातील बत्तीस शिराळा या ठिकाणी हे धरण आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नसíगक जंगले आहेत. या ठिकाणी अनेक वन्यप्राणी आढळतात. नुकताच याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला.
० मालवण सागरी राष्ट्रीय उद्यान - सिंधुदुर्ग हे महाराष्ट्राचे पहिले सागरी उद्यान आहे. तर देशातील हे तिसरे सागरी राष्ट्रीय उदयान आहे, यात सर्जेकोट खाडीपासून मालवण बंदर, सिंधुदुर्ग किल्ला ते देवबागेपर्यंतच्या जल क्षेत्राचा समावेश होतो.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प :
महाराष्ट्राच्या प्रमुख अभयारण्य व व्याघ्रप्रकल्पांपैकी एक. गुगामल राष्ट्रीय उद्यान याच अभयारण्याचे पूर्वीचे गाभा क्षेत्र होते. येथील जंगल प्रकार हा पानगळी प्रकारात येतो. या अभयारण्यात सागाची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत.
अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडे सातपुडा पर्वतरांगा असून या रांगांच्या उत्तरेकडे मध्य प्रदेश राज्य आहे. चिखलदरा व धारणी या तालुक्यांतील हा डोंगराळ भाग मेळघाट नावाने ओळखला जात असून याच ठिकाणी हे अभयारण्य आणि व्याघ्रप्रकल्प आहे. या परिसरात कोरकू आदिवासी जमात राहत असून इतरही समाजांचे लोक राहतात. मेळघाटमध्ये 'सिपना' (अर्थ सागवान) नदी महत्त्वाची आहे. मेळघाट हा महाराष्ट्रातील एकमेव व्याघ्रप्रकल्प आहे. ह प्रकल्प अमरावती जिल्ह्यात आहे. इथे पट्टेवाले वाघ, बिबळे , रानगवे, सांबरे, भेकरे,रानडुकरे, वानरे, चितळ, नीलगायी, चौशिंगे, अस्वले, भुईअस्वले, रानमांजरे, कृष्णमृग, उडत्या खारी, तरस, कोल्हे, लांडगे, ससे असे पुष्कळ प्राणी आहेत. तसेच इथे मोर, रानकोंबड्या, राखी बगळा, भुरा बगळा, करकोचे, बलाक, बदके इत्यादी पक्षी आहेत. तसेच सर्पगरुड, ससाणे, घार, पोपट, सुगरण, पारवे, बुलबुल, सुतार, मैना असे रानपक्षीही आहेत.
कोयना अभयारण्य :
2012-13 हे वर्ष महाराष्ट्रातील अनेक पयर्टनस्थळांसाठी खुपच खास ठरले. कारण याच वर्षात जवळपास राज्यातली 30 स्थळे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समिवष्ट झाली. त्यात संपूर्ण पश्चिम घाटाचा समावेश झाल्याने तेथील अत्यंतिक निसर्ग सौदर्याने नटलेले कोयना अभयारण्यही अपोआपच यात समाविष्ट झाले.
कोयना अभयारण्य म्हणजे उभ्या पश्चिम घाटाच्या शिरपेचात खोवलेला मानाचा तुरा आहे. कोयना अभयारण्य हे सातारा जिल्ह्यात असून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वधिक घनदाट जंगलांमध्ये या जंगलाचा समावेश होतो. हे अभयारण्य कोयना धरणाच्या भिंतीमागील शिवसागर जलाशयाच्या कडेकडेने पसरले आहे. इतिहासात हे जंगल जावळीचे खोरे म्हणून ओळखले जाते. अभयारण्याचे एकूण 427 चौ. की. मी. आहे. 1985 साली या जंगलाला अभयारण्याचा दर्जा मिळाला. मात्र व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळावा म्हणून अद्यापही राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मात्र युनेस्कोच्या यादीत याचा समावेश झाल्याने पर्यावरणीय सुरक्षा आणि बायोडायव्हर्सिटी या गोष्टी पुढे अशाच टिकून राहतील अशी आशा आहे.
कोयना नगर ते महाबळेश्वरजवळील तापोळा या साधारणपणे 70 ते 75 किलोमिटरच्या पट्ट्यात हे अभयारण्य पसरले आहे. ढोबळमानाने याचे तीन प्रमुख भाग पडतात. पहिला महारखोरे, दुसरा वासोटा आणि तिसरा मेट इंदवली. त्यातही मुख्यत्वे इंदवली, कुसवळी, सिंधी, बलवण, मोरवी, म्हाळूंग, वाचावळे, कुसापूर, तापोळा, कंदाटकी खोरे या गावांचा समावेश होतो. शिवसागर जलाशयाची नैसर्गिक तटबंदी या अभयारण्याला लाभली आहे. कोयना धरणाच्या बॅकवॉटरमध्ये येथील बहुतांश जंगल पाण्याखाली गेले आहे. जलाशयाच्या पश्चिमेकडील बाजूसच अभयारण्याचा बहुतांश भाग येतो, जो अतिशय घनदाट आहे. एका बाजुला सह्याद्रीची मुख्य रांग आहे, तर दुस-या बाजूला उपरांग आहे. या दोन्हींच्या मधोमध कोयना नदी वाहते. मुख्य रांगेचा उतार नदीच्या बाजूला सौम्य आहे, तर पश्चिम बाजूला 90 अंशांचा कडा आहे. महाराष्ट्रातील दुस-या क्रमांकाचा उंच कडा म्हणून जो ओळखला जातो, तो बाबू कडा येथे आहे. दुसरीकडे अभयारण्यातील सर्वोच्च ठिकाण अर्थातच वासोटा किल्ला (उंची – 1100 मीटर) याच ठिकाणी आहे. त्याच्या पायथ्यापर्यंत फेरी बोटीतून जाता येते. एका बाजुला नैसर्गिक कडा, तर दुस-या बाजुला मानवनिर्मित जलाशय त्यामुळे या जंगलाला एका प्रकारे जंगलतोडीपासून अभयच मिळाले आहे. कोयनेसोबतच सोळशी व कांदाटी या नद्याही याच अभयारण्यातून वाहतात. जून ते सप्टेंबर दरम्यान इथे प्रचंड पाऊस पडतो. त्याची वर्षाची सरासरी सुमारे 5000 मी.मी. आहे.
कळसूबाई – हरीश्चंद्रगड अभयारण्य
सह्याद्री पर्वत रांगेतील महाराष्ट्रामधील सर्वोच्च शिखर कळसूबाई आणि नाणेघाटाच्या सानिध्यातील हरीश्चंद्रगड यांच्या आसपासचा सुमारे ३६१.७१ चौ.कि.मी चा डोंगराळ, दुर्गम परिसर महाराष्ट्र शासनाने इ.स १९८६ मध्ये अधिघोषित केला आहे. मुळा, प्रवरा, आढळा, म्हाळुंगी या नद्यांचे खोरे आणि उत्तुंग अशी गिरी शिखरे असा हा अप्रतिम सृष्टी सौंदर्याने नटलेला परिसर असून, इ.स १९१० ते १९२४ या काळात उभारण्यात आलेले भंडारदरा धरण आणि या धरणामुळे निर्माण झालेला सर आर्थर लेक हा जलाशय आणि त्याच्या सभोवतालचा परिसर अनेक देशी – विदेशी पक्ष्यांना आकर्षित करतो. येथे पक्ष्यांचा अधिवास ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेल्या या अभयारण्याला विपुल जैवविविधता लाभली आहे.
या क्षेत्रात दक्षिण उष्ण कटीबंधीय आर्द मिश्र पानगळीची वने, काटेरी वने तर काही भागात सदाहरित वने अशी वनांची विविधता येथे आढळून येते. या अभयारण्यात हिरडा, जांभूळ, चांदवा, बहावा, कुंभल, कुडल, सिरस, पांगारा, कराप, आवळा, अशिंद, बेहडा, खारवेल, कळंब, सावर, सादडा, अर्जुन, धामण, अशी नानाविविध वृक्षसंपदा येथे आढळते.
या अभयारण्यात बिबळे, रानमांजरी, ताडमांजर, मुंगुस, तरस, कोल्हे, लांडगे, रानडुक्कर, भेकर, ससा, सांबर, शेकरू, घोरपड हे वन्यप्राणी देखील येथे बघायला मिळतात. विविध प्रजातीचे साप व सरडे सुद्धा येथे दिसून येतात. येथील जलाशय परिसरात करकोचे, बगळे, शराटी असे पाणपक्षी देखील येथे निदर्शनास येतात.
भंडारदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटन संकुलात पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहात तसेच वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात तसेच वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात पर्यटकांच्या निवासाची सोय उपलब्ध आहे. तसेच भंडारदरा धरण परिसरात खासगी रिसॉर्टस देखील आहेत.
अभयारण्याच्याच परिसरात रतनगड, मदनगड, अलंग, कुलंग, बिजनगडपट्टा, कोंबड किल्ला हे ऐतिहासिक गड-किल्ले तर रंधा फॉल, अम्ब्रेला फॉल हे मोठे धबधबे देखील येथे आहेत. कळसूबाई – हरीश्चंद्रगड अभयारण्याच्या पर्यटनासाठी ऑगस्ट ते डिसेंबर हा काळ उत्तम आहे.
नागझिरा अभयारण्य
निसर्गाला पडलेलं एक सुंदर स्वप्न म्हणून नागझिराच्या औचित्यपूर्ण गौरव केला जातो. जंगलात एक तळ असावं, तळ्याकाठी आज्ञाधारक रक्षाकाप्रमाणे उभे असणारे सरळ बुन्ध्यचे वृक्ष असावे, त्या वृक्षाचा प्रतिबिंब तळ्यात पडलेलं असावं. तळाच्या काठानें जाणारी वाट असावी, आजूबाजूला डोंगररांगा असाव्या, असे सारे कल्पनेत वाटणारे, प्रत्यक्ष पाहण्यासाठी नागझीरालाच जावे. रानात राहून या सर्व सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी या अभयारण्यात आधुनिक दर्जाची निवासगृहे पर्यटकांच्या सेवेसाठी हजर आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील हे अभयारण्य पानझडी वृक्षाचे आहे. तब्बल १५३ चौ.कि. मी. इतक्या मोठया क्षेत्रात पसरलेल्या या परिसरावर निसर्गाने आपले सगळे रंग मुक्तहस्ते उधळले आहेत. या अभयारण्यात साग, अंजान, धावडा, ऐन, तिवस, सप्तवर्णी यांचे उंच वृक्ष आढळतात. शिवाय मोहफुले, चार, आवळा, बेहडा, तेंभूर्णी इ. फळझाडेही बघावयास मिळतात. अंगाचा ताठा कायम ठेवून आकाशाला भिडणारी बांबूची बेटे देखील नजरेस भुरळ पाडून जातात.
वन्य प्राण्यांच्या अस्तित्वामुळे या अभयारण्याचे अरण्यपण अधिकच गडद होताना दिसते. वाघ, बिबटे, रानगवे, चितळ, सांभर, नीलगाय, अस्वल इ. प्राणी इथे मुक्तपणे संचार करतात. येथील वनविभाग येणा-या पाहुण्यांच्या स्वागतासाठी नेहमीच तत्पर असतो. वनविभागाच्या वतीने जवळच्या पिटेझारी व चोर ख्म्बारा गावातील तरुणांना गाईड साठीचे प्रशिक्षण दिले गेले आहे. आग टेहळणी बुरुजावरून लांबवर पसरलेल्या या अभयारण्याचे विहंगम अवलोकन करताना त्याचा विशालतेची व विशेषतेची खात्री पटते. शिवाय टायगर पॉईंट, बंदर चूवा पॉईंट, वाकडा वेहाडा, हत्ती खोदारा रोड अशी विविध ठिकाणी निसर्गाची निरनिराळी रूपे पहावयास मिळतात. हे सारे निसर्गाचे सौंदर्य डोळ्यात साठवताना अक्षरशः कसरत करावी लागते. म्हणूनच महाराष्ट्रातील या वैविध्यतेने नटलेल्या अभयारण्याची वाट पुनःपुन्हा येण्यासाठी खुणावत राहते.
रेहेकुरी काळवीट अभयारण्य
हरणांमध्ये दिसायला सुंदर, चपळ, वेगवान, म्हणजे कृष्णमृग अर्थात काळवीट. या काळवीटांच्या संरक्षणासाठी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात रेहेकुरी येथे २.१७ चौ.कि.मी क्षेत्रात इ.स १९८० मध्ये या अभयारण्याची स्थापना करण्यात आली.
गवताळ कुरणे व बाभळीच्या वनाने अभयारण्याचा बहुतांश भाग व्यापलेला आहे. हिवर, खैर, तरवड, बाभूळ, बोर, कडुलिंब, हे येथील प्रमुख झाडे आहेत. तर मारवेल, पवन्या, फुली, शेड्या, कुसळी, डोंगरी, या गवती वनस्पती देखील येथे आढळतात.
काळवीट, लांडगे, कोल्हे, तरस, चिंकारा, साळींदर, मुंगुस, खोकड हे वन्य प्राणी तर धामण, नाग, अजगर, सरडे, घोरपड हे सरीसृप वर्गातील प्राणी येथे बघायला मिळतात. मोर, लावा, तितर, माळढोक, सातभाई, कापशी, घार, सुतार, चंडोल, भारद्वाज हे पक्षी देखील येथे आहेत.
रेहेकुरी येथे निरीक्षण कुटी असून विश्रांतीसाठी दोन कक्ष व युथ हॉस्टेल मध्ये पर्यटकांच्या निवासाची सोय उपलब्ध आहे. सिद्धटेक हे अष्टविनायक यात्रेतील प्रमुख गणपती मंदिर येथून ४० किमी अंतरावर आहे, तर राशीन येथे जगदंबा देवीचे मंदीर २५ किमी अंतरावर आहे. मार्च ते मे ह्या कालावधीत या ठिकाणी पर्यटनाचा आनंद अनुभवता येतो.
नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील खानगाव थडी येथे गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावर इ.स. १९११ च्या सुमारास दगडी बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे निर्माण झालेल्या जलाशयाच्या परिसरास, इ.स. १९८६ मध्ये अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. १००.१२ चौ.कि.मी. क्षेत्रात पसरलेल्या या अभयारण्यास जगप्रसिध्द पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांनी महाराष्ट्र राज्याचे भरतपूर म्हणून गौरवले आहे. नांदूरमध्यमेश्वर येथील पक्ष्यांच्या अधिवासामुळे तसेच दुर्मिळ पक्ष्यांच्या अस्तित्वामुळे हे क्षेत्र महत्त्वपूर्ण पक्षीक्षेत्र (IBA) म्हणून घोषित करण्यात आले आहे.
नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात विरळ सदाहरित जंगल आणि माळरान परिसर आढळून येतो. ४०० हून अधिक विविध प्रकारच्या वनस्पती प्रजाती येथे बघायला मिळतात. वेगवेगळ्या पाणवनस्पती, आसपासची हिरवीगार शेते, नदी किना-यावरची वनराई ह्या बाबी देशी- विदेशी पक्ष्यांना आकर्षित करत असतात.
नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य परिसरात उदमांजर, कोल्हे, लांडगे, बिबळे, मुंगूस, विविध प्रजातीचे साप, कासव हे वन्यप्राणी आढळतात. हिवाळ्यात रोहित, चक्रवाक, तलवार बदक, लालसरी, चतुरंग, सुरय, कादंब, झोळीवाला, करकोचे, शराटी, तुतारी, क्रौंच, गल, चिलखे, कुरल, हरीण इत्यादी पाणपक्षी भेट देत असतात. चमचा बदक, बगळे, चांदवा, कमळपक्षी, पाणकोंबडी, मुग्धबलाक, खंड्या, ससाणे, पाणबुडी हे स्थानिक पक्षी बघायला मिळतात.
पक्षी निरीक्षणासाठी येथे निरीक्षण मनोरे, स्पोटिंग स्कोप अशा सुविधा उपलब्ध आहेत. येथे पक्षी निरीक्षणासाठी प्याडल बोट अभयारण्य व्यवस्थापनेकडून उपलब्ध करून दिली जाते परंतु जलाशयातील पाण्याची पातळी, पक्षी जलाशयात विहार करत असल्यास ही बोट उपलब्ध नसते. तसेच ही बोट आपल्यालाच चालवावी लागते. अभयारण्य व्यवस्थापनेकडून कोणताही बोट चालक उपलब्ध करून दिला जात नाही. तसेच चापडगाव येथील स्वागतकक्षात फिल्ड गाईड, दुर्बिण आणि मार्गदर्शक उपलब्ध असतात. पर्यटकांना मुक्काम करण्यासाठी किंवा सूर्योदय आणि सूर्यास्त ह्या वेळचा अविष्कार बघायचा असेल तर अभयारण्यालगतच खानगाव थडी येथे सिंचन विभागाद्वारा विश्राम गृहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
पक्षी निरीक्षणासाठी डिसेंबर ते फेब्रुवारी हा उत्तम कालावधी असतो. तसेच नाशिक हे तिर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ असल्याने अभयारण्या सोबतच इतर ठिकाणी देखील फेरफटका मारता येतो.
सागरेश्वर अभयारण्य
काही वर्षापूर्वी तीर्थक्षेत्रांशीच निगडीत असा प्रवास व्हायचा. तथापि अलिकडे रस्त्यांची सुविधा, वाहनांची सुविधा, पर्यटनस्थळांचा विकास यामुळे पर्यटनाची व्याप्ती वाढली आहे. उन्हाळाच्या सुट्टीपुरतं असणारं पर्यटन आता उन्हाळी पावसाळी व हिवाळी या ऋतूमध्ये सुध्दा पर्यटक पर्यटनासाठी पर्यटनस्थळी गर्दी करताना आपल्याला दिसतात.
सध्याच्या काळात विशेषत: आबालवृध्दांबरोबरच तरूणाईला वर्षा पर्यटनाची विशेष ओढ दिसून येते. सिंधुदूर्गातील आंबोली धबधबा, पन्हाळा -पावनखिंड ट्रेकिंग,अंबा फोंडा ,करूळ असे सह्याद्री पर्वतातील घाट या ठिकाणी पावसाळ्यातही मोठ्या संख्येने पर्यटक भेटी देतात व वर्षा सहलीचा आनंद लुटतात.
सांगली जिल्ह्यातही सागरेश्वर हे ठिकाण वर्षा सहलीचा आनंद लुटण्यासाठी अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे. येथील सागरेश्वर मंदिरामुळे वर्षा सहलीबरोबरच श्रावणात येथे होणाऱ्या यात्रेमुळं पर्यटकांना भक्तीरसातही चिंब भिजण्याचा आनंद घेता येतो.
भरपूर पडणारा पाऊस, धुकट वातावरण, अंगाला झोंबणारा वारा, हिरवागार शालू परिधान केलेली धरतीमाता, पक्ष्यांचा किलबिलाट, वानरसेनेच्या या झाडावरून त्या झाडावरच्या उड्या, डोंगराच्या कपारीतून वाहणारे छोटे-छोटे झरे अशा निसर्गरम्य वातारवणाचा आस्वाद सागरेश्वर परिसरात आपल्याला अनुभवता येतो. विविध प्रकारच्या पक्षांबरोबरच हरिण,सांबरांचं दर्शनही आपल्याला या ठिकाणी होतं.
सागरेश्वर अभयारण्याच्या परिसरात विपुल अशी वनसंपदा आहे. वृक्षमित्र धो. म . मोहिते यांनी या अभयारण्याच्या विकासकामी अविश्रांत परिश्रम घेतले तेथे चंदन, हावडा,बाभूळ, याही वृक्षाबरोबरच जंगली वृक्षही पहावयास मिळतात .करवंद ,बोर, या रानमेव्यांच्या जाळयाही जागो-जागी आहेत. चिमणी पोपट ,जंगली कोंबडया ,मोर -लांडोर ,कोकीळ ,पोपट,आदी पक्षीही स्वच्छंदपणे विहारताना पहावयास मिळतात.
सागरेश्वरच्या माथ्यावर पोहचल्यावर आजूबाजूचा परिसर दिसतो. खालच्या बाजूला नागमोडी वाहणारी कृष्णा नदी पर्यटकांना मोहित करते. येथील किर्लोस्कर पॉईट वरून दिसणारा निसर्गरम्य परिसर शांतपणे डोळयात साठविता येतो. सुमारे 1हजार 87 हेक्टर क्षेत्रात या अभयारण्याचा विस्तार झाला आहे. महालगुंड ,विहार ,छत्री बंगला यासह अनेक निसर्गरम्य टिकाणे आहेत.
येथील अंतर्गत रस्ते चांगल्या पध्दतीने बनविण्यात आले आहे. पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रयत्नातून आलेल्या निधीच्या सहाय्याने या अभयारण्यातील जुन्या सर्व इमारतीची दुरूस्ती करण्यात आली आहे.याचबरोबर ठिकठिकाणी बांबूकुटी बांधण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी नव्याने उभारलेल्या बालोद्यानामुळे लहान मुलांची खेळण्याची चांगली सुविधा झाली आहे.
या अभयारण्यातील सागरेश्वर मंदिराच्या इतिहास प्राचीन आहे. या बाबतची आख्यायिका अशी आहे की,इ.स.न. पूर्व 2350 मध्ये कुंडलचे राजे सत्यवान हे होते.त्यांना ऋषीमुनींनी शाप दिला .त्यामुळे त्यांच्या अंगावर जखमा झाला. सत्यवान राजे शिकारीसाठी सागरेश्वरच्या जंगलात गेले होते. त्यांनी येथील कुंडात आंघोळ केली. आश्चर्य म्हणजे सत्यवान राजांनी येथील कुंडात आंघोळ केल्याबरोबरच त्यांच्या अंगावरील जखमा बऱ्या झाल्या. त्यानंतर सत्यवान राजांनी येथे मंदिराची उभारणी केली .यावेळी 108 पिंडी येथे निर्माण झाल्या,त्या आजही आपल्याला पहावयास मिळतात.
श्री क्षेत्र सागरेश्वर देवस्थानात बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते. येथे अंबाबाई, उजव्या व डाव्या सोंडेचे गणपती , कार्तिकस्वामी, करकटस्वामी , काशी विश्वेश्वर, रामेश्वर, सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर ,भीमेश्वर, सत्यनाथ, , ओंकारेश्वर , वीरभद्रेश्वर, विठ्ठल रुक्मिणी, नंदिकेश्वर,केदारेश्वर, ,सत्येश्वर,रामेश्वर,सिध्देश्वर ,धोपेश्वर आदी ज्योतिर्लिंगाच्या मंदिराबरोबरच इतर देवतांची मंदिरे ही आहेत. एकूण 47 मंदिरे व 13 ओवऱ्या आहेत. आंघोळीचे व पिण्याचे कुंड वेगवेगळे आहेत. या कुंडात वर्षभर पाणी ते केव्हाच कमी होत नाही.
दसरा व महाशिवरात्रीच्या वेळेस येथे पालखी सोहळा असतो. या पालख्या लिंगेश्वरचे दर्शन घेऊन पुन्हा सागरेश्वर येथे येतात. श्रावण महिन्यातील सोमवारी येथे मोठी यात्रा भरते. मुंबई -पुणे याचबरोबर पंचक्रोशीतील लाखो भक्तगण सागरेश्वर दर्शनासाठी गर्दी करतात आणि हा परिसर भक्तीरसात चिंब भिजून जातो.
या अभयारण्याचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य ... नामकरण करण्यात आले आहे. येथील किर्लोस्कर पॉइंर्ट वरून आसमंतात नजर फिरवली तर वाळवा, पलूस , खानापूर, कडेगाव तालुक्यातील विहंगम परिसर पाहता येतो. शाळेतील मुलांसाठी प्रवेश शुल्कात सवलत दिली जाते. दर मंगळवारी हे अभयारण्य बंद असते.सागरेश्वर अभयारण्य मिरज स्टेशन पासून 60 कि.मी ,कराड ,पासून 30कि.मी तर ताकारी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 5कि.मी अंतरावर आहे.
नायगाव अभयारण्य
बीड ही संतांची भूमी समजली जाते. पासोडीकार दासोपंत अंबाजोगाईचे... येथेच विराजमान आहे माता रेणुका. परळीला आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक वैद्यनाथ. स्थानिक बीडच्या जवळ आहे कपिलधारचा मोठा धबधबा. नवगणराजूरीचा बहुमूखी आणि नामलगावचा श्रीगणेश इथल्या लोकांचं श्रद्धास्थान.
बीड शहराबाहेर आहे खंडेश्वरी मंदिर, त्याला लागून असलेल्या दीपमाळा, शिदोड गावची रेणुकामाता आणि तिथे असलेली हलती दीपमाळ. जुन्या बीडमध्ये आहे एका पाषाणात कोरलेलं हेमाडपंथी कंकालेश्वर मंदिर, राक्षसभूवनचे शनी महाराज, धारूरचा किल्ला, कधीही न आटणारी खजाना बावडी अशा अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेलं हे शहर. या शहरात जो कुणी येईल त्याला पर्यटनाचा सर्वांगीण आणि तृप्त अनुभव आणि आनंद देणारं हे शहर आहे. यासर्वांबरोबर लक्ष वेधून घेणारी एक गोष्ट आहे ती म्हणजे नायगावचं मयूर अभयारण्य.
समजा आपण बसने किंवा कारने प्रवास करत आहोत आणि अचानक आपल्या गाडीसमोरून मोरांचे थवे उडत आडवे गेले तर? किंवा आपल्या दोन्हीबाजूंनी खिडकीबाहेर डोकावताच फुलवलेल्या पिसाऱ्यांनी नाचणारे, उडणारे मोर, मोरांचे थवेच्या थवे पाहायला मिळाले तर? लॉटरी लागल्याचा आनंद होईल की नाही...
हा आनंद मी लहानपणापासून अनुभवलेला... कारण आम्हा बीडकरांच्या हाकेच्या अंतरावर आहे नायगावचे मयूर अभयारण्य.
पहाटे पाच-साडेपाचला या रस्त्यावरून गेलं तर नायगावच्या रस्त्यावर दुतर्फा मोर-लांडोरांच्या जोड्याच जोड्या पहायला मिळतात.
पाणवठ्यावर आलेले मोर, झाडाच्या फांद्यांवर आपला भला मोठा पिसारा लोंबकळत सोडून बसलेले मोर, डोंगराच्या पायथ्याशी बसलेले मोरांचे थवे, असे मोरच मोर आपल्याला पहायला भेटतात तरी मन शांत होत नाही. “दिल मांगे मोर” अशी आपली भावस्थिती झालेली असतांनाच एखादा मोर आपला देखणा फुलोरा नाचवत थुई थुई चालत आपल्यासमोर येतो आणि आपल्याही नकळत आपण या चितचोर मोराला पाहून म्हणून जातो “अहाहा...क्या बात है.”
मुंबईहून बीडला जातांना प्रवासानं आळसावलेलं मन वाट पहात असतं ते सौताड्याचा घाट येण्याची. या सौताड्याच्या घाटात एक सुंदर महादेवाचं (रामेश्वर) मंदिर आणि भला मोठा धबधबा आहे... पावसाळ्यात खोल दरीत कोसळणारा पाण्याचा प्रपात पाहतांना निसर्गाचं हे रुप किती पाहू आणि किती नाही असं होतं... थोड पुढं गेलं की पाटोद्याच्या पठारावर ऊंच ऊंच उड्या मारत हुंदडणारे हरणांचे कळप दिसून येतात. त्याच्या थोडं पुढं गेलं की, रोहतवाडी नावाचं गाव लागतं... काळी मैना अर्थात करवंदांसाठी प्रसिद्ध असलेलं हे गाव त्याच्या साधेपणानं लक्ष वेधून घेतं.
रोहतवाडीचा छोटेखानी घाट उतरतांना आपण आपणहून एकटक नजरेने बाहेर पाहू लागतो कारण नायगाव जवळ आलेलं असतं आणि आपण मोरांच्या साम्राज्यातून बीडला जाणार असतो...
बीड शहराच्या पश्चिमेस २० किमी अंतरावर बीड-पाटोदा-नगर व बीड लिंबादेवी-डोंगरकिन्ही-नगर या दोन रस्त्याच्या बाजुला असलेल्या डोंगराळ भागात वसलेलं हे अभयारण्य. खुरट्या झाडोऱ्याने आणि गवताने आच्छादिलेलं. पावसाळ्यात हे डोंगर हिरवेगार झालेले असतात. या भागात मोठ्या प्रमाणात आढळून येणारे मोर लक्षात घेऊन शासनाने २९.९० चौ.कि.मी चा हा प्रदेश ८ डिसेंबर १९९४ रोजी ‘नायगाव मयूर अभयारण्य’ या नावाने संरक्षित केला. या परिसरात मदारशा दर्गा, डोंगरीचे गुरुकूल, डोंगकरकिन्हीचे नागेश्वर मंदिर ही पाहण्यासारखी स्थळे आहेत.
या अभयारण्यातील दररोजची सकाळ मोरांच्या केकारवाने गुंजत उगवते. विशेषत: पहाटेच्या गार वाऱ्यात मोर अगदी रहदारीच्या रस्त्यावर, रस्त्याकाठच्या झाडांवर येऊन बसलेले दिसतात.. जस-जसे ऊन वाढत जाते तस- तसे मोर दिसण्याचे प्रमाण कमी होते... हे मोर पुन्हा या झुडपांमध्ये दडून जातात..
नायगावचं मयूर अभयारण्याचं वन हे दक्षिण उष्ण कटिबंधीय शुष्क पानगळीच्या व काटेरी वनाच्या प्रकारात मोडते.. प्रादेशिक वन विभागाने या क्षेत्रात अंदाजे १२०० हेक्टर क्षेत्रावर विविध झाडांची लागवड केली आहे. यामध्ये प्रामुख्याने सुबाभूळ, लिंब, ग्लेरिसिडिया, शिरस, बोर, यासारख्या झाडांचा समावेश आहे. नैसर्गिकरित्या दिसणाऱ्या झाडांपैकी साग, तेंदू, सालई, मोवई, ऐन, बहावा, बेल, मोहा, आवळा, बिबा, पळस, खैर, मेडशिंग, बेहडा, चंदन यासारखी झाडं आपल्याला पहायला मिळतात.
अभयारण्याचे क्षेत्र हे डोंगर उताराचे आणि कमी पावसाचे क्षेत्र असल्याने डोंगरावरील झाडोराही खुरटा आहे. येथे कुसळी, पवना, शेडा, मारवेल यासारख्या गवताच्या प्रमुख जाती असून करवंद, घाणेरीची झडुपं आणि सीताफळाची जाळी दिसून येते.
या अभयारण्यात मोराबरोबर तरस, लांडगा, कोल्हा, खोकड, रानमांजर, काळवीट, ससे यासारख्या वन्य प्राण्यांचे अस्तित्त्व जाणवते. येथे मोरांची संख्या खुप मोठी आहे. त्यामुळेच या अभयारण्याला मयूर अभयारण्य असे नाव देण्यात आले आहे. येथे १०० हून अधिक प्रकारच्या पक्षांच्या प्रजाती आढळतात.
या अभयारण्याचे वैशिष्ट्य म्हणजे अभयारण्याला लागून असलेल्या गावकऱ्यांची आणि मोरांची झालेली मैत्री. उन्हाळ्यात मोरांची तहान भागवण्याचे आणि त्यांची भूक भागवण्याचे काम गावकरी मोठ्या उत्साहाने करतात. हा जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिलीमीटर आणि उन्हाळ्यातील कमाल तापमान ४५ अंश सेल्सियस, हिवाळ्यात हा पारा १० अंश सेल्सियस पर्यंत खाली जातो.
बोर व्याघ्र प्रकल्प
महाराष्ट्रात एकूण सहा व्याघ्र आहेत. त्यातील पाच विदर्भात आहेत. हे पाच आणि इतर राज्यातील आठ व्याघ्र प्रकल्प मिळून एकूण १३ व्याघ्र प्रकल्प विदर्भाच्या ३०० चौ.कि.मी च्या परिक्षेत्रात आहेत. त्यामुळेच विदर्भाला देशाची व्याघ्र राजधानी म्हटले जाते. स्टेटस ऑफ टायगर्स इन इंडिया च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील वाघांची संख्या सन २०१० च्या १६९ वाघांहून वाढून ती १९० इतकी झाली आहे.
महाराष्ट्रात जे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत त्यामध्ये बोर व्याघ्र प्रकल्प, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांचा समावेश आहे.
बोर अभयारण्याला ऑगस्ट २०१४ मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. भारतातील एक नवीन आणि सर्वात लहान असा हा व्याघ्र प्रकल्प आहे. आकाराने लहान असला तरी जैवविविधतेने संपन्न आणि वन्यप्राण्यांचा उत्तम अधिवास असलेले हे ठिकाण त्यामुळेच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.
२७ नोव्हेंबर १९७० रोजी बोरला अभयारण्य म्हणून घोषीत करण्यात आले. बोर व्याघ्र प्रकल्प हा नागपूर जिल्ह्याच्या दक्षिण सीमेस आणि वर्धा जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर आहे. याशिवाय ६१.१० चौ.कि.मी जलाशयाचा यात समावेश करण्यात आला आहे.
बोर हे सातपुडा-मैकल येथील संपन्न जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते. हे सातपुडा पूर्व-पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तर सीमेपसून सुरु होऊन कान्हा येथील मैकल टेकडीला मिळते.
वन्यप्राण्यांची शिकार होऊ नये आणि जैवविविधता टिकून राहावी तसेच ती संवर्धित व्हावी म्हणून १९७० मध्ये या क्षेत्राला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले.
कान्हा आणि पेंच अभयारण्याप्रमाणेच येथे तृणभक्षी व मांसभक्षी प्राण्यांची संख्या मोठ्याप्रमाणात आहेत. २०१४ च्या व्याघ्र गणनेनुसार येथे ४ ते ५ प्रौढ वाघांसह त्यांच्या बछड्यांचा आढळ आहे.
जुन्या बोर अभयारण्याचे क्षेत्र ६१.१०० चौ.किमी आहे. नवीन बोर वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र ६०.६९ चौ.कि.मी आहे तर नवीन बोर विस्तारित वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र १६.३१ चौ.कि.मी आहे.
फणसाड अभयारण्य
कोकणाला 720 किमी चा अथांग निळाशार समुद्र किनारा लाभला आहे. कोकणातील रायगड जिल्ह्यातील सागर किनाऱ्यावरील मुरुड-जंजिरा पर्यटनासाठी सुप्रसिद्ध आहे. मुरुडच्या अलीकडे असलेले एक घनदाट जंगल अर्थात फणसाड वन्यजीव अभयारण्य पर्यटकांचे खास आकर्षण ठरले असून जगभरातील पर्यटक व पक्षीप्रेमी येथील निसर्ग सौंदर्य वनसंपदा व वन्यजीव, प्राणी व पक्षी यांच्या सान्निध्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी वर्षभर भेट देत असतात.
मुंबईपासून 154 कि.मी अंतरावर पनवेल-पेण-अलिबाग मार्गावर व मुरुडच्यामध्ये 55 चौ.कि.मी. क्षेत्रावर विस्तारलेल्या ह्या अभयारण्याला जणू निसर्गाचा वरदहस्तच लाभलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ‘फणसाड अभयारण्याचे क्षेत्र मुरुड जंजिरा संस्थानाचे राखीव शिकार क्षेत्र होते. संस्थानाचे नवाब सिद्धी यांच्या मालकीचे शिकार स्थळ म्हणून सदर जंगलाचा वापर होत असे. या ठिकाणच्या जैवविविधतेचे संरक्षण व्हावे व निसर्गाचा अनमोल ठेवा सुरक्षित राहावा या हेतूने महाराष्ट्र शासनाने दिनांक 25 फेब्रुवारी 1986 रोजी फणसाड वन्यजीव अभयारण्य घोषित केले. जंगल संरक्षण, वन्यजीवांचे संवर्धन व व्यवस्थापन यासाठी पुढे हे अभयारण्य वन विभाग अलीबाग यांचेकडून वन्य जीवन विभाग ठाणे, यांचेकडे सन 1994 मध्ये हस्तांतरीत करण्यात आले. त्यानंतर या अभयारण्याचा खऱ्या अर्थाने विकास झाला.
शुष्क पानगळीची वने, सदाहरित वने, मिश्र सदाहरित वने व नदीकाठची वने अशा या वैविध्यपूर्ण जंगलात सुमारे 718 प्रकारचे वृक्ष, 17 प्रकारचे सस्तन प्राणी, 164 प्रकारचे रंगीबेरंगी पक्षी, 27 प्रकारचे साप व अनेक वन्य श्वापदे आढळतात. पश्चिम घाटाअंतर्गत येणाऱ्या या भूप्रदेशाचे उष्णकटीबंधीय हवामान असून तापमान किमान 25 ते कमाल 35 अंश सेल्सीयस इतके असते. सरासरी 2800 मिलीमीटर पावसाची नोंद येथे घेण्यात आली आहे.
पक्षांच्या 164 प्रजाती या ठिकाणी आढळतात. ब्राह्मणी घार, घुबड, तुरेवाला, सर्पगरुड, ससाणा, सफेद पाठीची गिधाडे इत्यादी शिकारी पक्षी व सातभाई, बुलबुल, रातवा, रानकोंबड्या, धनेश, कोतवाल यासह वेडाराघू, हळद्या, तांबट, खंड्या, खाटीक, सुभग, नीलपंख, स्वर्गीय नर्तक, सुतार, महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेले हरीयाल (हिरवे कबुतर) कोकीळ यासारखे गाणारे व रंगीबेरंगी पक्षी व खास करुन ओरीएंटल डवार्फ किंगफिशर जंगलातील सकाळच्या भटकंतीचा आनंद द्विगुणित करतात. याशिवाय येथील जंगलातील घनदाट भागात वास्तव्य असणारा खास पक्षी श्रीलंकन फ्रांगमाऊथ रात्रीच्या वेळी क्रियाशील असतो. याचे बेडकाच्या चेहऱ्यासारखे दिसणारे डोके वैशिष्ट्यपूर्ण असते. याचा आवाज कर्कश असतो. श्रीलंकेत प्रामुख्याने याचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. या जंगलातील आणखी एक आकर्षक पक्षी म्हणजे धनेश. ‘ओम्नीवोरस’ कुळातील हा पक्षी याच्या वैशिष्ट्यपूर्ण चोचीमुळे ओळखणे सोपे जाते. ‘ग्रे हॉर्नबील’ , ‘मलबार पाईड’ या दोन जाती येथे आढळतात. हा पक्षी जोडीने राहतो. या पक्षाच्या घरट्यात पिलांचे संगोपन करताना नर व मादी जंतू संसर्ग होवू नये म्हणून विशेष काळजी घेताना तज्ज्ञांच्या निरीक्षणात आढळले आहे. पर्यटकांचे खास आकर्षण असलेला बिबट्या येथे अगदी सहजपणे पहावयास मिळतो.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
ऊंच ऊंच पर्वत रांगा, खळाळत वाहणाऱ्या वारणा-कोयना सारख्या नद्या आणि हिरवीगार वनराई यामुळं पश्चिम घाटाचं क्षेत्र हे नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण राहिले आहे. नैसर्गिक जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले हे क्षेत्र आहे. येथे सुंदर अशा विविध फुलांनी नटलेले कास पठार आहे, कोयना- राधानगरी अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा हा परिसर जैवविविधतेच्यादृष्टीने समृद्ध तर आहेच पण पर्यावरणाच्यादृष्टीने अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
जंगलात वाघ असणं हे समृद्ध जंगलाचं प्रतिक आहे. जंगलात असलेल्या अन्नसाखळीमधील वाघ हा मुख्य घटक आहे. तसेच वाघांमुळे जंगलात असलेल्या वनस्पतींचे आणि इतर तृणभक्षी प्राण्यांचे समतोल साधण्याचे काम ही केले जाते. वाघांची संख्या ज्या जंगलात जास्त असते तिथे जंगल हे सर्वदृष्टीने परिपूर्ण मानले जाते. जंगल चांगले असल्याचा लाभ माणसास देखील मिळतो, पर्यावरण संतुलन राखण्याबरोबरच माणसाला आवश्यक असलेला निरोगी श्वासही त्यातूनच मिळतो.
जैवविविधतेच्या बाबतीत संपन्न असलेले हे क्षेत्र निम सदा हरित जंगल असून दुर्गम, अति उतार असलेले, डोंगराळ आणि घनदाट स्वरूपाचे हे जंगल आहे. या भागात सांबर, रानडुक्कर, लंगूर यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. पश्चिम घाटातील वनस्पती संपदा पाहिली तर थक्क व्हायला होते. जवळपास साडेचार हजार प्रजातीच्या वनस्पती येथे असल्याचा अंदाज आहे. यात स्थानिक, दुर्मिळ वृक्ष प्रजातींचा समावेश आहे.
ऑर्किड फुलाच्या २४५ प्रजाती येथे आढळतात. रानतेरडा वनस्पतीच्या ७२ तर कंदी फुलांच्या ४६ प्रजाती आढळतात. कारवी च्या १८ प्रजाती आढळतात. सस्तन प्राणी, स्थानिक आणि स्थालांतरीत होऊन येणारे पक्षी, सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी अशा किती तरी पशु-पक्षी आणि प्राण्यांनी हा प्रदेश संपन्न आहे. वन पर्यटकांना मनसोक्त आनंद देणारे आणि वन्यजीव अभ्यासकांचे औत्सुक्य अजून वाढवणारे हे क्षेत्र गडकिल्ल्यांच्या पर्यटनासाठी ही आकर्षणाचे ठिकाण आहे.
२०१० मध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात महत्वपूर्ण पाणलोट क्षेत्र आहेत. अनेक झरे तसेच वारणा आणि कोयना नद्या ही येथूनच उगम पावतात. वारणा आणि कोयना नद्यांवर धरणाची निर्मिती करण्यात आली असून कोयनेच्या पाण्यावर महत्वाचा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित आहे.
पश्चिम –दक्षिण महाराष्ट्रातील शेती या पाण्यावर अवलंबून आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा परिसर निम सदाहरित वृक्षराजीने नटलेला आहे. येथे वाघांचे अस्तित्त्व आहे. हा परिसर वाघांच्या अस्तित्त्वासाठी अत्यंत सुरक्षित मानला जातो. असं असलं तरी ऊंचसखल डोंगर रांगाचा हा प्रदेश असल्याने येथे व्याघ्र दर्शन दुर्मिळ आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प विदर्भाबाहेरील पहिलाच व्याघ्र प्रकल्प आहे.
चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे ३१७.६७० चौ.कि.मी आणि कोयना वन्यजीव अभयारण्याचे ४२३.५५० चौ.कि.मी असे मिळून हे क्षेत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथे वाघाबरोबरच गवा, चितळ, सांबर, हरीण, बिबटे असे प्राणीही पाहायला मिळतात. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगात कपारींमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती, प्राणी सापडत आहेत. त्याची जागतिक पातळीवर नोंद ही आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकलपामुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
टिपेश्वर अभयारण्य
यवतमाळ जिल्ह्याच्या मुख्यालयापासून अवघे ८० किलोमिटर अंतर असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात वाघांचे मनसोक्त दर्शन गेल्या काही दिवसांपासून होत आहे. दुर्मिळ प्राणी समजल्या जाणाऱ्या आणि सर्वांचे आकर्षण असलेल्या वाघांचे सहज दर्शन होऊ लागल्याने अभयारण्यात पर्यटकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर अंतर्गत संरक्षित क्षेत्रामध्ये टिपेश्वर अभयारण्याचा समावेश आहे. सन 1997 मध्ये अभयारण्य घोषित करण्याची अधिसुचना निघाली होती. केळापूर व घाटंजी तहसील अंतर्गत समाविष्ट असलेल्या या क्षेत्राची तिपाई देवीच्या नावावरून टिपेश्वर अभयारण्य असे नामकरण करण्यात आले. अभयारण्यात टेकडीवर तिपाईचे मंदीर आहे. या अभयारण्याचे क्षेत्र 14832 हेक्टर म्हणजे 148.64 चौरस किलोमिटर इतके आहे. अभयारण्य दक्षिणेस आंध्रप्रदेशच्या सिमेलगत अदिलाबाद जिल्ह्यास लागून असून डोंगरदऱ्यांनी व्यापले आहे तसेच जैवविविधतेने नटलेले आहे. राज्यातील वाघांच्या संरक्षणाच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचे अभयारण्य आहे.
गेल्यावेळी झालेल्या व्याघ्र गणनेनुसार अभयारण्यात दहा पट्टेदार वाघांचे वास्तव्य आहे. परंतु यापेक्षाही जास्त वाघ असल्याचा अंदाज आहे. टिपेश्वर अभयारण्यात समावेश नसलेल्या परंतु अभयारण्यास लागून असलेल्या झरी तालुक्यातील घनदाट जंगलातही जवळपास नऊ वाघ आहेत. या वाघांचा मुक्त संचार अभयारण्याच्या जंगलात असल्याने येथे येणाऱ्या पर्यंटकांना हमखास वाघ दिसण्याची शक्यता असते.
वाघांसोबतच अस्वल, चांदी अस्वल, निलगाय, रोही, सांबर, चितळ, काळवीट, भेडकी, रानडुक्कर, लांडगा, कोल्हा, सायाळ, काळतोंड्या माकड, मसण्याउद, रानमांजर, खवले मांजर इत्यादी प्रकारचे प्राणीसुद्धा आहेत. याशिवाय मोर, निलकंठ, हरीयल, पोपट, गरूड, घार, गिधाड, ससाना, घुबड, तीतर, बटेर, देवचिमनी, पानकोंबडी इत्यादी प्रकारचे पक्षीही मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात.
टिपेश्वर अभयारण्यात प्रामुख्याने साग या जातीची झाडे मोठ्या प्रमाणात आहे. तसेच निम, भुईनिम, बेल, वड, पिंपळ, बेहाळा, चंदन, पळस, खैर, धावडा, सालई, बाबुळ, आंजन, आवळा, चिंच, बोर, जांभुळ इत्यादी प्रकारच्या वृक्षांसह मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पतीही मुबलक प्रमाणात आहे. गेल्या काही दिवसात वाघांची संख्या वाढल्याने अभयारण्याला विशेष महत्त्व आले आहे. दरदिवशी अनेक पर्यटक टिपेश्वरला येत असून वाघाचे दर्शन होत असल्याने पर्यटकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून रोज वाघोबाचे दर्शन होत आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्प
खास वाघाला पाहण्यासाठी घनदाट जंगलातून जात असतांना अचानक वाघ समोर यावा आणि अंगावर रोमांच उभे राहावेत, या देखण्या-रुबाबदार प्राण्याला डोळ्यात साठवून घ्यावं आणि हा थरारक अनुभव गाठीशी घेऊन, समृद्ध वनपर्यटनाचा आनंद उपभोगून आपण होऊन घरी परतावं असा अनुभव देणारं राज्यातील वाघोबांचं आणखी एक गाव म्हणजे “पेंच व्याघ्र प्रकल्प”
भारत सरकारच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए)ने मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएशन ऑफ टायगर रिझर्व्ह इन इंडिया बाबत सन २०१४-१५ मध्ये केलेल्या अभ्यासात राज्यातील मेळघाट, पेंच आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला “व्हेरी गुड” असा दर्जा दिला आहे... म्हणजे काय तर व्याघ्रसंवर्धनासाठी इथे अत्यंत पोषक वातावरण असून त्याचा दर्जा अत्यंत उत्कृष्ट आहे.
या राखीव क्षेत्रातून उत्तर दक्षिण वाहणाऱ्या जीवनदायिनी पेंच नदीचे नाव या व्याघ्र प्रकल्पाला देण्यात आले आहे. हा व्याघ्र प्रकल्प पेंच नदीमुळे पूर्व पेंच आणि पश्चिम पेंच अशा दोन भागात विभागला गेला आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प २५७.२६ चौ.कि.मी क्षेत्रात विस्तारला आहे. १९७५ साली महाराष्ट्र शासनाने हे राष्ट्रीय उद्यान घोषित केले आणि फेब्रुवारी १९९९ मध्ये याला व्याघ्र प्रकल्पाचा अधिकृत दर्जा मिळाला.
नव्यानेच मानसिंगदेव वन्यजीव अभयारण्याचे १८२.५८० चौ.कि.मी. चे अतिरिक्त क्षेत्र या व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवरचा हा व्याघ्रप्रकल्प जैवविविधतेने संपन्न प्रदेश असून येथे गोंड आणि भिल्ल आदिवासी राहातात. त्यांच्या जगण्याच्या अनोख्या परंपराबरोबर पळसाच्या पानापासून तयार करण्यात येणारी पत्रावळ आणि द्रोण बनविण्याचे त्यांचे कौशल्यही पाहण्यासारखे असते.
२०१४ च्या व्याघ्र गणनेनुसार पेंच व्याघ्र प्रकल्पात २३ प्रौढ आणि १० प्रौढ होत असलेल्या वाघांबरोबर त्यांच्या बछड्यांची नोंद घेण्यात आली आहे. यावरूनच पेंच व्याघ्र प्रकल्प वाघांच्या अस्तित्वाने किती समृद्ध आहे हे लक्षात येते.
नागपूरहून अवघ्या ७० कि.मी. अंतरावर असलेले पेंच अभयारण्य निसर्गप्रेमींना पक्षी निरिक्षकांना, छायाचित्रकारांना आणि चार दिवस सलग सुट्टी असलेल्या सर्व निसर्ग पर्यटकांना सतत खुणावत असते. जैवविविधतेने समृद्ध अधिवास असलेल्या या प्रकल्पात वाघ, चित्ता, जंगली मांजर, जंगली कुत्रा, तरस, कोल्हा, सांबर, हरणं, गवे, नीलगायी, चार शिंग असलेले काळवीट, अस्वल, घुबड यासारखे प्राणी पाहायला भेटतात.
त्याबरोबरच सर्प गरुड, राखी डोक्याचा मत्स्य गरूड, मोहोळ घार, हळदया, तांबट, खंड्या असे जवळपास २२५ प्रजातींचे पक्षी येथे आढळतात. कोरड्या आणि दमट उष्णकटिबंधीय हवामानातील पानगळीचे वन या असलेल्या या क्षेत्रात साग आणि बांबूची झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात.
कोका अभयारण्य
महाराष्ट्राच्या नकाशावरील अगदी पूर्वेकडच्या कोपऱ्यात असणारा भंडारा जिल्हा. 11 लाखांच्यावर लोकसंख्या असलेला आणि नैसर्गिक सौदर्यासोबतच नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असा हा जिल्हा आहे. एवढ्या छोट्या जिल्ह्यात एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 1/3 क्षेत्र जंगलाने व्यापलेले आहे. या जिल्ह्यात न्यू नागझिरा, उमरेड कऱ्हांडला आणि कोका अशी तीन अभयारण्य नव्याने घोषित झाली आहेत. यामुळे पर्यटनाला चालना मिळू लागली आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या न्यू नागझिरा व नागझिरा अभयारण्याला लागूनच असलेले 10,013 हेक्टर वनक्षेत्र शासनाने 2013 मध्ये अभयारण्य म्हणून घोषित केले. या अभयारण्याला ‘कोका अभयारण्य’ असे नाव देण्यात आले. ब्रिटीश काळात ‘ओल्ड रिझर्व्ह फॉरेस्ट’ म्हणून जे जंगल ओळखले जात होते त्याच भागाला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे. हे अभयारण्य वन्य जीवांसाठी उत्कृष्ट अधिवास असल्याचे निदर्शनास आल्यामुळेच या जंगलाला वन्य प्राण्यांसाठी ‘संरक्षित’ केले आहे. या अभयारण्याच्या क्षेत्रात वाघ, बिबट, गवा, अस्वल, काळविट, नीलगाय, सांबर, रानकुत्रे, चितळ, रानडुकर इत्यादी प्राणी आहेत. त्याचबरोबर अनेक पक्षांच्या अधिवासाने व जैवविविधतेने जंगल श्रीमंत झाले आहे.या अभयारण्याचा विकास डिसेंबर 2013 पासून सुरु झाला असून 25 नैसर्गिक पाणवठे आहेत. ज्याठिकाणी वन्य प्राण्यांना पाणी उपलब्ध नाही, त्याठिकाणी विंधन विहीरी बांधण्यात आल्या आहेत. पाणी पिण्यासाठी सिमेंट टाक्या तयार करण्यात आल्या आहेत. टाकीत सतत पाणी रहावे म्हणून सौर ऊर्जेवर चालणारे पंप बसविण्यात आले आहेत. या अभयारण्यात जाण्यासाठी चंद्रपूर या गावी प्रवेशद्वार करण्यात आले आहे. पर्यटकांना जंगल सफारीसाठी 5-7 गाड्या सोडण्यात येत आहेत.
गावातीलच 12 वी पास मुलांना गाईडचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. अभयारण्यातील जंगल सफारीचा मार्ग 46.5 कि.मी.चा आहे. या अभयारण्यात वन्य प्राण्यांचे दर्शन सातत्याने होत असल्यामुळेच पर्यटकांचा ओढा या अभयारण्याकडे वळला आहे.
नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य
मोकळ्या आकाशात भरारी घेणारा बहिरी ससाणा...ध्यानस्थ साधूसारखा पाण्यात उभा असलेला बगळा... एरव्ही चटकन न दिसणारा नर्तक, धनेश, करकोचे असे विविध पक्षी इथे मनसोक्त बागडत असतात.
माणसांच्या सिमेंट-काँक्रिटच्या दुनियेपासून लांब या अभयारण्यामध्ये नेहमी भरते पक्ष्यांची शाळा... आणि ही अनोखी शाळा पहायची असेल तर एकदा तरी महाराष्ट्राचं भरतपूर असं ज्या अभयारण्याला संबोधलं जातं त्या ‘मधमेश्वर’ पक्षी अभयारण्याला भेट द्यायला हवी.
गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमाच्या प्रवाहावर नांदूर मधमेश्वर दगडी धरण बांधण्यात आले आहे. धरणाच्या खालच्या बाजूला नदी पात्रातील खडकावर नांदूर मधमेश्वराचे पुरातन मंदिर आहे. धरणातील जलाशयाचे पाणी दोन्ही बाजूने कालव्याद्वारे औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी गावांना देण्यात आले आहे.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, जागतिक वन्यजीव निधी आणि वनविभाग महाराष्ट्र यांच्या संयुक्तिक प्रयत्नाने निर्माण झालेलं नांदूर मधमेश्वर हे एक सुरेख पक्षी अभयारण्य आहे. संपन्न जैव विविधतेचा अनुभव घेण्यासाठी एक उत्कृष्ट असं स्थान आहे. नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यात हे अभयारण्य वसलेलं असून त्याचं एकूण क्षेत्रफळ १००.१२ चौ.कि.मी आहे. १९८६ साली हे क्षेत्र अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्यात आले.
जलाशयातील उथळ पाणी, पाण्यातील विपूल जलचर, विविध पाण वनस्पती, किनाऱ्याला असलेली वनराई आणि जवळच्या सिंचित शेतातील पिकं यामुळे पक्षांसाठी हे आकर्षणाचे ठिकाण झाले असून त्यांच्या निवासासाठी एक उत्तम स्थळ गणलं गेलं आहे. हे महाराष्ट्रातील एक उत्तम ‘पक्षीतीर्थ’ आहे. पक्षी निरीक्षणातून येथे २४० हून अधिक प्रकारचे पक्षी असल्याचे आढळून आले आहे. येथील जलाशयात २४ जातीचे मासे आहेत.
परिसरात ४०० हून अधिक प्रजातीच्या वनस्पतींची विविधता आहे.
या परिसरात उदमांजर, कोल्हे, मुंगूस, लांडगे, बिबटे, विविध प्रकारचे साप दिसून येतात. अभयारण्यात पक्षी सुची तयार करण्यात आली आहे आणि दरवर्षी पक्षी गणनेनंतर ती सुधारित (अपडेट) केली जाते. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यातील पक्षी अधिवासाची संपन्नता तसेच दुर्मिळ पक्ष्यांचे अस्तित्त्व लक्षात घेऊन हे क्षेत्र ‘भारतीय पक्षीतीर्थ जाळ्या’त समाविष्ट करण्यात आले आहे.
अभयारण्यात टिल्स, पोचार्ड, विजन, गडवाल, शॉवलर, पिनटेल, क्रेन, गारगनी, टर्नस, गुज, पेलिकन, गॉडविट, सॅण्ड पायपर, क्रेक, श्यांक, कर्ल्यु, हॅरियर, प्रॅटिनकोल, गल यासारखे स्थलांतरित पक्षी आढळतात. त्याचप्रमाणे पाणकोंबडी, मुग्ध बलाक, गायबगळे, मध्यम बगळे, खंड्या आयबीस, स्टॉर्क यासारखे पक्षीही दिसून येतात. जलाशयाजवळ गवतीमाळ असल्याने आणि मोठ्या प्रमाणात वृक्ष असल्याने अनेक जातीचे लहान मोठे स्थानिक-स्थलांतरित पक्षांचा वावर दिसून येतो. पाणकावळे, पाणडुबी, रोहित, चमचा, धनवर कुट यासारखे पक्षीही येथे आढळतात.
चित्तवेधक हालचाली, आवज आणि रंगसंगतीने लक्ष वेधून घेणारे हे विविध आकाराचे पक्षी या अभयारण्यात सहजतेने आपल्याला पहायला मिळतात. गोदावरीचा रम्य परिसर, हिरवीगार वनराई, दूरवर पसरलेला जलाशय आणि देश-विदेशातील पक्षी निरीक्षणाचा अभूतपूर्व आनंद यामुळे हे अभयारण्य पक्षी निरीक्षकांसाठी नंदनवनच ठरले आहे. या परिसरात सृष्टी सौंदर्यासोबत आध्यात्मिक सुरही गुंजत राहतात.
येथील मंदिरांनी या क्षेत्राला अधिकच सौंदर्य प्राप्त झाले आहे. नदीच्या काठावरील मधमेश्वर मंदिराचा उल्लेख हिंदू पुराणातही आढळतो. हिरवाईने नटलेल्या परिसरात आवश्यक साधने घेऊन मुक्तपणे भटकायचे, निसर्ग, वनस्पती व पक्ष्यांचे सौंदर्य कॅमेराबद्ध करायचे, जलाशयावरून येणारा गार वारा अंगावर झेलायचा... थोडं थकलं तर तिथेच झाडाखाली पक्षांच्या किलबिलाटात विश्रांती घ्यायची.... असा मनस्वी आणि मनमुराद आनंद देणारं हे अभयारण्य एकदा तरी पहायला हवं असं आहे.
सप्टेंबर ते मार्च हा या अभयारण्याला भेट देण्याचा उत्तम कालावधी आहे. नाशिक-नांदूर मधमेश्वर अभयारण्याचे अंतर ४० कि.मी. चे आहे. नाशिक चांदोरी फाटा-सायखेडा-शिंगवेमार्गे चापडगाव निरीक्षण गॅलरी व खाणगावथडी निसर्ग निर्वचन केंद्रात जाता येते. निफाड-नांदूर मधमेश्वर अभयारण्याचे अंतर केवळ १२ कि.मी. चे आहे. निफाड-दिंडोरी तास-नांदूर मधमेश्वरमार्गे खाणगावथडी निसर्ग केंद्र आणि चापडगाव निरीक्षण गॅलरीला जाता येते.
सिन्नर-नांदूर मधमेश्वर अभयारण्याचे अंतर २५ कि.मी. चे आहे. सिन्नर-बारगाव पिंप्री, मांजरगावमार्गे चापडगाव निरीक्षण गॅलरी आणि खाणगावथडी निसर्ग केंद्राला भेट देता येते.
दाजीपूर अभयारण्य
दाजीपूर एक छोटस, इवलस नाव परंतु या दाजीपूरात रम्य, दाट कीर्द झाङी, वृक्ष-वल्ली, शेकडो नमुन्याचे प्राणी आणि पक्षी पाहिले कि, या आरण्यात नित्य व्यवहारातील सर्व औपचारीक दैनंदिन व्यवहार विसरून निसर्गाच्या कुशीत लपलेला एका छोट्या मुलासारखी माया मिळते.हे या गावाचे वैशिष्ट.
कोल्हापूर नगरीच्या राधानगरी तालुक्यातील हे रम्य गाव. अगदी २ ते ३शे. लोकवस्तीचे हे स्थान कोल्हापूर सावंतवाडीच्या हमरस्त्यावर एकाकी झालेल हे गांव गेल्या कांही दिवसापासुन पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. गेल्या कित्येक वर्षात गवारेडा हा हुम दांडग्या परंतु वैशिष्ट्यपुर्ण जनावरासाठी या अरण्याची महाराष्ट्रात ख्याती आहे.
या अरण्यात गव्यांचा कळपच्या कळप आढळतो त्याचबरोबर हरिण,सांबर,चितळ यांचे कळप ही दिसतील,कधी कधी लाल मातीत बिबळ्या वाघाचे चाललेले ठसे दिसतील.
जंगलात साळींदर,अस्वले,साप,नाग यांची ही रेलचेल सुरूच असते.महाराष्ट्र राज्याच्या जंगल खात्याने याक़डे खास लक्ष देऊन या अभयारण्याची चांगली जोपासना केली आहे.त्याबरोबर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने दाजीपुरचे पर्यटन विकास केंद्र म्हणुन लक्ष केंद्रीत केले आहे.येथील युवक गृहाचे जंगल निवास म्हणुन रूपांतर केले आहे.पर्यटकांसाठी तंबु निवास सुविधा केली आहे.भोजन उपहार गृहे याचीही स्वंतंत्र व्यवस्था आहे.
राज्य परिवहन मंडळाच्या थेट गाड्या कोल्हापूर ते दाजीपूर येथे पर्यंत जातात.तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ही स्वंतंत्र खास गाड्यांची व्यवस्था केली आहे.
राधानगरी जलाशयाचा नैसर्गिक उपयोग करून अद्यावत असे विश्रामगृह उभारण्याचे काम सुरू केले आहे. या परिसरात सिंधुदुर्ग जिल्हा गगनगिरी महाराज मठ याचा भाग असुन ३७२ स्क्वेअर मिटरचा हा परिसर पर्यटकांचे खास आकर्षण ठरला आहे.
Post a Comment