डॉ. सलीम अली (१८९६ - १९८७), ज्ञानकोषकार केतकर (१८८४ – १९७३)
डॉ. सलीम अली (१८९६ - १९८७)
डॉ. सलीम अलींना पक्षी तज्ञ म्हणून जगभर प्रसिध्द मिळाली. १९६७ मध्ये वन्य प्राणी संरक्षणाबद्दलच्या जॉन फिलीप पुरस्कार मिळाला. १९७६ मध्ये वर्ल्ड वाइल्ड फंडतर्फे पॉल गट्टीहे सर्वाधिक मानाचे पारितोषिक मिळाले. त्यांचे द फॉल ऑफ अ स्पॅरो हे आत्मचरित्र निसग प्रेमींना प्रेरणादायक आहे.
पुस्तके – द बुक ऑन इंडियन बर्डस्, इंडियन हिल बर्डस्, बर्डस् ऑफ त्रावणकोर अँड कोचीन, फोल्ड गाईड टु द बर्डस् ऑफ हिमालयाज, बर्डस् ऑफ सिक्कीम, बर्डस् ऑफ कच्छ.
ज्ञानकोषकार केतकर (१८८४ – १९७३)
संपूर्ण नाव – श्रीधर व्यंकट केतकर .लेखक, समाजशास्त्र, थोर देशभक्त व व्यासंगी पंडित म्हणून प्रसिध्द होते. पुणे समाचार हे दैनिक तसेच विद्यासेवक हे मासिक काढले. त्यांची महाराष्ट्रासाठी मोलाची कामगिरी म्हणजे २३ खंडाचा मराठी ज्ञानकोष ही होय.
कादंब-या – गावसासु (१९२७), ब्राम्हण कन्या, गोंडवनातील प्रियंवदा, विचक्षणा, आशावादी भटक्या.

Post a Comment