बालगंधर्व (१८८८ – १९६७), साने गुरूजी (१८९९ – १९५०)
बालगंधर्व (१८८८ – १९६७)
संपूर्ण नाव – नारायण श्रीपाद राजहंस. ५० वर्षे नाट्यक्षेत्र आपल्या गायन व अभिनयाने गाजवले. त्यांना नटश्रेष्ठ, शापित गंधर्व व बालगंधर्व म्हणून ओळखतात.
साने गुरूजी (१८९९ – १९५०)
संपूर्ण नाव – पांडूरंग सदाशिव साने.धुळे येथील तुरूंगात असतांना त्यांनी विनोबांनी सांगितलेलीगीताई ही भगवतगीतेवरील समश्लोकी टिका लिहून घेतली. श्यामची आई ही कांदबरी गुरूजींनी नाशिक येथील तुरूंगात असताना लिहिली. त्यांचा पत्री हा साने गुरूजींचा पहिलाच काव्यसंग्रह छापून होताच ब्रिटिश सरकारने जप्त केला. १९२८ मध्ये त्यांनी विद्यार्थी नावाचे मासिक सुरू केले. १९३८ मध्ये काँग्रेस नावाचे साप्ताहिक काढले. १९४६ मध्ये पंढरपूर विठठल मंदिर हरिजनांना खुले व्हावे म्हणून त्यांनी प्राणंतिक उपोषण केले. १९४८ मध्ये साधना हे साप्ताहिक सुरू केले. विनोबांनी त्यांचा अमृताचा पुत्र म्हणून गौरव केली. प्र. के. अत्रे यांनी मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी या शब्दात गुरूजींचे वर्णन केले आहे.

Post a Comment