बीड जिल्हा
बीड जिल्हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या ३६ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी आहे. जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात मोडतो. जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बीड हे आहे. बीड हा महाराष्ट्रातील ऊसतोड़ कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर ऊसतोडीसाठी बहुधा बीडचा कामगार असतो. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे. बीड हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात मराठी व्यतिरिक्त हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषादेखील बोलल्या जातात.
बीड जिल्ह्याच्या चतुःसीमा
प्रशासकीय विभाग
बीड जिल्ह्याचे विभाजन २ उपविभागांमध्ये करण्यात आले आहे. त्यांचे विभाग पुढीलप्रमाणे आहेत.
· बीड उपविभाग
· अंबेजोगाई उपविभाग
या उपविभागांचे विभाजन ११ तालुकामध्ये पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे.
· बीड
· किल्ले धारूर
· अंबेजोगाई
· परळी-वैद्यनाथ
· केज
· आष्टी
· गेवराई
· माजलगाव
· पाटोदा
· शिरूर
· वडवणी
राजकीय संरचना
भौगोलिक माहिती
बीड जिल्हा समुद्रापासून दूर आहे. बीड जिल्ह्याचा अधिकांशी भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे. जिल्ह्यातील उत्तर भाग सपाट मैदानी आहे. जिल्ह्याच्या मध्य-दक्षिण भागात बालाघाटचे डोंगर आहेत. येथे चिंचोली, नेकनूर हे भाग येतात. या भागास मांजरथडी असेही म्हणतात. मांजरसुभाहून बीडकडे जाताना पालीघाट लागतो. गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. या भागास गंगथडी असेही म्हणतात. हा सुपीक भाग गाळापासून बनला आहे. यात गेवराई, माजलगाव व परळी या तालुक्यांचा समावेश होतो.
हवामान
जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणत: उष्ण व कोरडे आहे. उन्हाळा मोठा व कडक असतो तर हिवाळा कमी कालावधीचा पण सौम्य असतो. मे महिन्यात तापमान महत्तम असते. डिसेंबर महिन्यात तापमान कमीतकमी असते. उन्हाळ्यात दिवसा तापमान बरेच वाढत असले तरी रात्री ते कमी होते. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील उंचावरील बालाघाट डोंगराळ प्रदेशातील हवामान काहीसे थंड आहे तर सखल भागात ते उबदार व थोडेसे दमट आहे. अंबेजोगाई तालुक्यातील हवामान अधिकच आल्हाददायक असल्याचे दिसून येते.
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधील पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण अतिशय कमी असून पाऊस अनियमित स्वरूपाचा आहे. त्यामुळे जिल्ह्याचा बराचसा भाग अवर्षणग्रस्त आहे. जो पाऊस पडतो त्याचे जिल्ह्यातील वितरणही असमान आहे. पावसाचे प्रमाण पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होत गेलेले आढळून येते. जिल्ह्याच्या पूर्वेकडील अंबेजोगाई, केज, माजलगाव, परळी, धारूर आदी तालुक्यात तो तुलनात्मकदृष्टया अधिक पडतो तर गेवराई, आष्टी, पाटोदा, शिरूर यांसारख्या तालुक्यात तो खूपच कमी पडतो. जिल्ह्यातील गेवराई, पाटोदा, बीड, माजलगाव, केज, आष्टी या तालुक्यांचा केंद्र शासनाने निश्चित केलेल्या अवर्षणप्रवण क्षेत्रात समावेश होतो.
जलसिंचन
बीड जिल्ह्यात विहिरी, कूपनलिका व नद्या ही पाणीपुरवठ्याची मुख्य साधने आहेत. जिल्ह्यात बीड व आष्टी या भागात विहिरी तुलनात्मकदृष्टया अधिक आहेत. बीड शहरात माजलगाव तलाव व बिंदुसरा तलावातून पाणी पुरवठा होतो. बीड शहराला ऐतिहासिक पाणीपुरवठा करमारी खजाना विहिरीद्वारे होत असे.
नद्या
· गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. काही अंतरापर्यत तिने औरंगाबाद-बीड, जालना-बीड व परभणी-बीड अशा जिल्हा सीमा निश्चित केल्या आहेत. गोदावरीची वाहण्याची दिशा साधारणपणे वायव्येकडून आग्नेयेकडे आहे. ती जिल्ह्याच्या गेवराई, माजलगाव व परळी तालुक्यांतून वाहत जाते.
जिल्ह्यातील सिंधफणा, वाण, सरस्वती या गोदावरीच्या उपनद्या आहेत. रेना नदी, वाण नदी व सरस्वती नदी या बीड जिल्ह्यातील मध्य डोंगराळ भागात उगम पावतात व दक्षिणकडे वाहत जाऊन पुढे गोदावरीस मिळतात.
· मांजरा ही बीड जिल्ह्यातील दुसरी महत्त्वाची नदी आहे. ही नदी पाटोदा तालुक्यातील हरिश्चंद्र बालाघाटच्या पर्वतरांगामध्ये उगम पावते. ही नदी सुरुवातीस उत्तर - दक्षिण असा प्रवास करून नंतर जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहत जाऊन पुढे लातूर जिल्ह्यात प्रवेशते. तिचा बराचसा प्रवास गोदावरीला काहीसा समांतर असा होतो. बर्याच ठिकाणी या नदीने अहमदनगर-बीड, उस्मानाबाद-बीड व लातूर-बीड या जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमेचे काम केले आहे. मांजरा नदी सुमारे ७२५ कि.मी. अंतराचा प्रवास करत आंध्र प्रदेशात जाऊन गोदावरी नदीस मिळते. बीड जिल्ह्यातील केज, रेना, लिंबा व चौसाळा या मांजरा नदीच्या उपनद्या असून त्या बालाघाटच्या डोंगराळ प्रदेशात उगम पावून जिल्ह्यातच मांजरा नदीस मिळतात.
· सिधंफणा नदी पाटोदा तालुक्यात चिंचोली टेकड्यांत उगम पावते. प्रथम उत्तरेकडे, नंतर पूर्वेकडे व तदनंदर पुन्हा उत्तरेकडे, किंबहुना ईशान्येकडे प्रवास करीत माजलगाव तालुक्यात मंजरथजवळ गोदावरीस मिळते. बीड जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण सिधंफणा नदीवर आहे.
· बिंदुसरा नदी बीड तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावते. ही सिधंफणाची एक उपनदी आहे. बिंदुसरा नदीवर बीडजवळ जिल्ह्यातील मोठा धरणप्रकल्प आहे. ही नदी बीड शहरातून वाहत जाऊन पुढे सिंधफणेस मिळते. पुढे सिंदफणा गोदावरीला मिळते.
· कुंडलिका ही सिंधफणेची एक उपनदी बीड जिल्ह्यातच उगम पावून जिल्ह्यातच सिंधफणेस मिळते.
· सीना नदी जिल्ह्याच्या व आष्टी तालुक्याच्याही नैर्ऋत्य सीमेवरून वाहते. काही अंतरापर्यत तिने अहमदनगर व बीड जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमा म्हणून काम केले. आहे. त्याच वेळी तिने अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुका व बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका यांची सीमारेषाही स्पष्ट केली आहे.
· पाटोदा तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावणारी विंचरणा नदी वाहत जाते. पुढे सौताडा येथे विंचरणेचा प्रवाह सुमारे सत्तर मीटर उंचीवरून दरीत कोसळतो. येथील धबधबा प्रसिद्ध आहे.
धरण प्रकल्प
बीड जिल्ह्यात २ मोठे, १६ मध्यम व १२२ लघु प्रकल्प आहेत. माजलगाव व मांजरा हे मोठे प्रकल्प आहेत. बीड शहराला माजलगाव व बिंदूसरा प्रकल्पामधून पाणी पुरवठा होतो. इतर धरण प्रकल्प :- सिंदफणा (शिरूर), बेलपारा (शिरूर), महासांगवी (पाटोदा), वाण (परळी) ,बोरणा (परळी) ,बोधेगाव (परळी), सरस्वती (वडवणी), कुंडलिका (वडवणी), वाघेबाभूळगाव (केज), शिवनी (बीड), मणकर्णिका (बीड), सौताडा (पाटोदा), मेहकरी (आष्टी), कडा (आष्टी), कांबळी (आष्टी), रूटी (आष्टी), तलवार( आष्टी), हिंगेवाडी (शिरूर), नागतळवाडी, वेलतुरी, लोणी, पारगाव, कोयाळ, खुंटेफळ, पिंपळा, गोलंग्री, सुलतानपूर, कटवट, जरुड, जुजगव्हाण, ईट, मैंदा, अंबा, मन्यारवाडी, शिंदेवाडी, मादळमोही, दासखेड, इंचरणा, मस्साजोग, कारंजा, होळ, मुळेगाव, जनेगाव, तांदुळवाडी, पहाडीपारगाव, साळींबा, नित्रुड, शिंदेवाडी, वांगी, चिंचोटी, तिगाव, लोणी, सांगवी, ढालेगाव, मांजरा (धनेगाव), वगैरे..
पिके
· एकूण पिकाखालील क्षेत्र : ६६२ हजार हेक्टर
· एकूण ओलीतक्षेत्र : २३६ हजार हेक्टर
· एकूण वनक्षेत्र : २६ हजार हेक्टर
· एकूण पडीतक्षेत्र : १२३ हजार हेक्टर
· एकूण दुसोटाक्षेत्र : हजार हेक्टर
जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात वेगवेगळी पिके घेतात. ज्वारी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामात घेतले जाते. जिल्ह्यात ज्वारी हे महत्त्वाचे खरीप पीक आहे तर कापूस हे महत्त्वाचे खरीप नगदी पीक आहे. बाजरी, गहू, तूर, मूग, उडीद, तीळ, जवस, मसूर, सोयाबीन, मिरची, ऊस, कांदा, वगैरे. बीड जिल्हा हा तेलबिया व भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहे. खरीप जिल्ह्यात ज्वारीचे उत्पन्न खूप होते. जिल्ह्यातील पाटोदा, बीड, माजलगाव, अंबेजोगाई, केज, शिरूर, आष्टी या तालुक्यात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. बाजरीची शेती प्रामुख्याने पाटोदा, शिरूर, आष्टी, माजलगाव, केज या तालुक्यात केली जाते. भुईमुगाचे उत्पादन प्रामुख्याने आष्टी, अंबेजोगाई, केज येथे होते. कापूस उत्पादनात आष्टी, माजलगाव, बीड व गेवराई तालुके अग्रेसर आहेत.
ऱबी ज्वारीचे उत्पादन आष्टी, केज, माजलगाव, बीड, गेवराई व वडवणी या तालुक्यात घेतले जाते. आष्टी, केज, माजलगाव, बीड, गेवराई या तालुक्यात गव्हाचे उत्पादन होते. आष्टी, पाटोदा, बीड व केज येथे हरभर्याचे उत्पादन निघते. करडईची लागवड आष्टी, माजलगाव, गेवराई इत्यादी तालुक्यामध्ये केली जाते.
जिल्ह्यात बागायती शेतीसुद्धा थोड्या प्रमाणात होते. उसाची लागवड आष्टी, बीड, माजलगाव, गेवराई, अंबेजोगाई इत्यादी तालुक्यामध्ये केली जाते. बीड,अंबेजोगाई या तालुक्यात द्राक्षाचे उत्पादन होते. गोदावरी व मांजरा या नदयाकाठी कलिंगडाचे उत्पन्न घेतले जाते. आंबे उत्पादनात आष्टी, बीड, अंबेजोगाई, नेकनूर आघाडीवर आहेत. नेकनूर येथे काला पहाड व अंबेजोगाई येथे पेवंदी हे आंबे प्रसिद्ध आहेत. याशिवाय पेरू, मोसंबी, केळी यांचेही उत्पन्न घेतले जाते. या जिल्हय़ात २००८ झालेल्या पशुगणनेनुसार जवळपास साडेदहा लाख जनावरे आहेत. यात साडेसहा लाखांपर्यंत दुधाळ जनावरे आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दूधउत्पादन हा शेतकर्यांचा मोठय़ा प्रमाणावर जोडधंदा मानला जातो. आठ सरकारी व चार खासगी दूध संघाच्या माध्यमातून दूधसंकलन केले जाते.
दळणवळण
बीड जिल्ह्यातील वाहतूक प्रामुख्याने रस्तेमार्गाने चालते. बीड शहर राजधानी मुंबईपासून साधारणपणे ४५० कि.मी. अंतरावर वसले आहे.
· एकूण लोहमार्गाची लांबी : ४७.८६ कि.मी.
· एकूण राष्ट्रीय महामार्गाची लांबी : २२४ कि.मी.
· एकूण राज्य महामार्गाची लांबी : १००३ कि.मी.
· एकूण जिल्ह्या मार्गाची लांबी : १६३८ कि.मी.
· एकूण ग्रामीण मार्गाची लांबी : ४८१२ कि.मी.
लोहमार्ग
जिल्ह्यात परळी हे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे (२६१ कि.मी.) काम आगामी काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात लोहमार्ग अंबेजोगाई व परळीत आहे. येथे एक लोहमार्ग परभणी (गंगाखेड) तर एक लोहमार्ग लातूर (उदगीर) येथून येतो. घाटनांदूर हे रेल्वे स्थानक आहे.
रस्ते
राष्ट्रीय महामार्ग
· कल्याण-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ बीड जिल्ह्यातून जातो. या महामार्गावरून हा जिल्हा गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील शहरांशी जोडला गेला आहे.
· सोलापूर-औरंगाबाद-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ बीड जिल्ह्यातून जातो. हा महामार्ग औरंगाबाद, धुळे, उस्मानाबाद आणि सोलापूर ह्या शहरांना जोडतो.
प्रमुख रस्ते
· प्रमुख राज्य महामार्ग २ (महाराष्ट्र) हा महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख राज्य महामार्ग आहे. हा राज्य महामार्ग ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहराला, बीड शहरासोबत जोडतो व ठाणे,अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातुन जातो. हा राज्य महामार्ग कल्याणपासून राष्ट्रीय महामार्ग २२२ मार्गे अहमदनगर पर्यंत येतो व नंतर बीडकडे वळतो. हा महामार्ग कल्याण, मुरबाड, आळे फाटा, अहमदनगर आणि बीड ह्या शहरांना जोडतो.
· राज्य महामार्ग ४४ (महाराष्ट्र) हा महामार्ग शहापूर - कळसूबाई - अकोले - संगमनेर - श्रीरामपूर - नेवासा - गेवराई असा जातो.
· राज्य महामार्ग १६२ (महाराष्ट्र) हा महामार्ग अंबेजोगाई - तांडुलजा - मुरुड - कानेगाव - उजनी - अक्कलकोट असा जातो.
· राज्य महामार्ग १६९ (महाराष्ट्र) हा महामार्ग रेणापूर - घाटनांदूर - पार्ली असा जातो.
· राज्य महामार्ग १६८ (महाराष्ट्र) हा महामार्ग रेणापूर - नालेगाव - उदगीर - देगलूर असा जातो.
बीडपासून उत्तरेकडे जाणारा मार्ग गेवराईमार्गे जालना व शेवगावकडे जातो. बीडपासून पूर्वेकडे जाणारा मार्ग माजलगावमार्गे पाथरीकडे जातो. दक्षिणेकडे जाणारा मार्ग केजमार्गे कळंबकडे जातो तर दुसरा दक्षिणेकडे मांजरसुभामार्गे उस्मानाबाद व सोलापूरस जातो. बीडपासून पश्चिमेकडे जाणारा मार्ग आष्टीमार्गे अहमदनगरकडे जातो.
महत्त्वाचे उद्योग
बीड जिल्ह्यात साखर व उद्योग असे अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत. जिल्ह्यात १२६ कारखाने आहेत. जिल्ह्यात ७ साखर कारखाने आहेत. जिल्ह्यात ६ सुतगिरण्या आहेत. महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्र परळी येथे आहे.
साखर कारखाने
· परळी वैजनाथ सहकारी साखर कारखाना, परळी
· कडा सहकारी साखर कारखाना, आष्टी
· जय भवानी सहकारी साखर कारखाना, गेवराई
· माजलगाव सहकारी साखर कारखाना, माजलगाव
· गजानन सहकारी साखर कारखाना, बीड
· विखे पाटील सहकारी साखर कारखाना, केज
· अंबा सहकारी साखर कारखाना, अंबेजोगाई
बीड जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
· बीड:- जिल्ह्याचे मुख्य ठिकाण बिंदुसरा नदीकाठी वसले आहे. जिल्हयातील सर्वात मोठे शहर . शहरात कंकालेश्र्वराचे जलमंदिर आहे. सुरेख व कलात्मक बांधणीमुळे हे जलमंदिर प्रेक्षणीय ठरले आहे. शहराजवळच्या टेकडीवर खंडेश्र्वराचे प्राचीन मंदिर, आहे. शहरात पीर बालाशहा व मन्सूरशाह यांचे दर्गे आहेत. शहरापासून जवळच खजाना ही प्रसिद्ध विहिर आहे. या विहिरीस कायम पाणी असते. बीड शहराच्या पश्चिमेस सु. ४ किमी. वर प्रसिद्ध ‘खजाना विहीर' आहे. अलीकडील काळात बीड औद्योगिक व शैक्षणिक शहर म्हणूनही विकसित होत आहे.
· आंबेजोगाई:- आंबेजोगाई किंवा अंबेजोगाई तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले अंबाजोगाई शहर ही मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी आहे. येथे बऱ्याच शैक्षणिक संस्था असून एक वैद्यकीय आणि तंत्रशिक्षणाचे महाविद्यालय आहे. निजामी अमलात हे गाव मोमिनाबाद नावाने ओळखले जात असे.स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे (जे रझाकारांविरुद्ध लढले) या प्रसिद्ध व्यक्तींचा या शहराशी संबंध आला आहे. गावात जोगाई व खोलेश्र्वर यांची प्राचीन मंदिरे आहेत. जोगाईच्या मंदिरामुळे हे गाव अंबेजोगाई म्हणून ओळखले जाते. अंबाजोगाईचे योगेश्वरी देवीचे मंदिर आहे. अंबेजोगाई हे ठिकाण देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक मानले जाते.आद्यकवी मुकुंदराज व संतकती दासोपंत यांच्या समाधी येथे आहेत. ज्ञानेश्र्वरांनी येथील मुकुंदराजाच्या समाधीला भेट दिल्याचा उल्लेख सापडतो. दासोपंतांनी लिहिलेली बारा मीटर लांब व एक मीटर रुंदीची पासोडी येथे पाहावयास मिळते. येथील क्षयरोग रुग्णालय विख्यात आहे. क्षयरोग लवकर बरा होण्यासाठी येथील कोरडे हवामान उपयुक्त ठरते. अंबाजोगाईला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मध्यवर्ती बस स्थानक असून, महाराष्ट्र तसेच गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील शहरांशी जोडले गेले आहे. जवळील रेल्वे स्थानक परळी येथे आहे. जवळील विमानतळ लातूर येथे असून अंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई आहे.
· परळी वैजनाथ किंवा परळी वैद्यनाथ: भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ येथे आहे. परळी वैजनाथ तालुक्यातील ऐतिहासीक शिवमंदीर प्रसिद्ध आहे. बारा ज्योतीर्लिंगांपैकी हे (आद्य) ज्योतीर्लिंग आहे. हे तालुक्याचे मुख्य ठिकाण जिल्ह्यातील एकमेव रेल्वे जंक्शन येथील वैजनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायऱ्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैजनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. अंबाजोगाईपासून परळी वैजनाथ ५५ कि. मी. अंतरावर आहे तर परभणीपासून ६१ कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणापासून वाहनाची सतत सोय आहे. परळी येथील औष्णिक विद्युतकेंद्र राष्ट्रीय पातळीवरही महत्त्वाचे गणले जाते. येथे औद्योगिक वसाहत असून औद्योगिकदृष्ट्या परळी झपाटयाने विकसित होत आहे.
· भगवानगड:- श्रीक्षेत्र भगवानगड हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातील एक तीर्थक्षेत्र आहे. श्रीक्षेत्र भगवानगड हिंदू समाजाचे भाविकांमध्ये हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. बीड जिल्ह्यातील खरवंडीच्या बाजूलाच धौम्य ऋषीचा धौम्यगड होता. धौम्य ऋषी पांडवांचे पुरोहित होते. याठिकाणी भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड उभा राहिला.
· गहिनीनाथगड:- श्रीक्षेत्र गहिनीनाथगड हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातील एक तीर्थक्षेत्र आहे. श्रीक्षेत्र गहिनीनाथगड हिंदू भाविकांमध्ये हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे.
· कानिफनाथ गड खडकवाडी:- गावात एका टेकडीवर नाथ पंथातील नाथ कानिफनाथ भ्रमण करत असताना काही दिवस तपशर्या केली .जालिंदर नाथानी येवलवाडी ता.शिरूर जि.बीड येथे वास्तव्य केले.
· धर्मापुरी :- धर्मापुरी हे महाराष्ट्र राज्यातील गाव आहे. ते बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात आहे. हे ठिकाण अंबेजोगाई - अहमदपूर मार्गावरील मोठे गाव आहे. परळी, अंबाजोगाई, अहमदपूर, गंगाखेड आणि पानगाव शहरांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. इथे एक प्राचीन किल्ला असून एक तळे आहे. गावापासून जवळच मरळशीद मंदिर आहे. गावामधेच एक जुने राम मंदिर आहे.
· राक्षसभुवन:- गोदावरीकाठी गेवराई तालुक्यात वसले आहे. येथील शनिमंदिर प्रसिद्ध आहे. शनिअमावस्येस येथे मोठी यात्रा भरते. १७६३ मध्ये येथे झालेल्या लढाईत थोरल्या माधवराव पेशव्यांनी निजामाचा दारुण पराभव केला ही लढाई राक्षसभुवनची लढाईम्हणून इतिहासाच्या पानांवर कोरली गेली आहे. राक्षसभुवनची लढाई ऑगस्ट १०, इ.स. १७६३ रोजी राक्षसभुवन येथे मराठे व हैदराबादचा निझाम यांच्यात झाली. यात निझामाचा सडकून पराभव झाला.
· केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी:- केदारेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन शिवमंदिर आहे. याचे स्थापत्य चालुक्य शैलीत केले आहे. धर्मापुरीचे शिवमंदिर कोरीव शिल्पकामासाठी प्रसिद्ध आहे.
· कंकालेश्वर मंदिर, बीड ऐतिहासीक शिवमंदीर प्रसिद्ध आहे. दहाव्या ते 11 व्या शतकात चालुक्य राजा विक्रमादित्य (सहावा) याने हे मंदिर बांधले. हे दशावतारी मंदिर आहे. त्यावर ग्रीक शिल्पकलेची छाप आढळते. शतकांपूर्वी बीड नगरीवर राज्य होतं ते हैदराबादच्या निझामाचं. या काळात दसरा सण उत्साहात व्हायचा. लोक सीमोल्लंघनासाठी खंडेश्वरीला जात. निझाम सरकारच्या वतीने खंडेश्वरी मंदिरासमोर मंडप टाकले जात. जवळपास सर्व मुस्लिम अधिकारी, प्रतिष्ठित मुस्लिम नागरिक व व्यापारी या पेंडॉलमध्ये येत व पानसुपारी घेऊन एकमेकांना शुभेच्छा देत. धूलिवंदनाच्या दिवशी अंधर्शद्धा, अस्पृश्यता या सारख्या विषयावर व्ाख्याने होत. लोक चौकात एकमेकास प्रेमाने रंग लावत. शतकापूर्वी बीडची मंदिरे आजच्या सारखी नव्हती. नगरीतील मुख्य मंदिर कंकालेश्वर बंद होते. तिथे खनकाह होते. पुढे महाशिवरात्रीच्या जत्रेलाही बंदी घालण्याचा निर्णय निझामाच्या मंत्रिमंडळाने घेतला. निझामाने सरकारी हुकूम काढून शामबुवा पाठक या पुजाऱ्यास मंदिरात पूजेसाठी नियुक्त केले. ही कोंडी फुटायला 1915 उगवावे लागले. क्रांतिकारी तरुण पुरुषोत्तम गोडसे याने निझामाला भीक न घालता पोलिसांचे कडे तोडून कंकालेश्वर मंदिरातील पिंडीला अभिषेक केला. 17 सप्टेंबर 1948 अर्थात हैदराबाद स्वातंत्र्यदिनी दिवशी हे मंदिर खऱ्या अर्थाने मुक्त झाले.
· अश्वलिंग मंदिर, पिंपळवंडी पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथे अश्वलिंग संस्थानवर ऐतिहासीक शिवमंदीर प्रसिद्ध आहे.
· पुरूषोत्तमपुरी मंदिर, बीड महाराष्ट्राच्या धार्मिक जीवनात र्शावण महिन्यात माजलगाव तालुक्यातील पुरूषोत्तमपुरीत पुरूषोत्तमाच्या दर्शनास जातात. अधिक मासात या ठिकाणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यात पुरूषोत्तमपुरीचे मंदीर उल्लेखनीय ठरते. या मंदिराचे यादवकालीन वेगळे स्थापत्य की मंदिराच्या बांधकामात वापरलेल्या विटा चक्क पाण्यावर तरंगतात. इसवीसन 1310 मध्ये रामचंद्रदेव यादवांचा मंत्री पुरूषोत्तम याने हे मंदिर उभारले. त्यामुळे या भागास पुरूषोत्तमपुरी नाव पडले. मंदिरातील मुख्य देवतेलाही पुरूषोत्तम या नावाने ओळखल्या जावू लागले.
· येळंब, शिरूर मराठवाड्यातील एकमेव असलेल्या ब्रनाथ येळंब येथील ब्रनाथ महाराजांचा यात्रोत्सव र्शावण महिन्यात चौथ्या सोमवारी मोठय़ा उत्साहात पार पडला. या वेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी शिरूरतालुक्यातील येळंब येथे ब्रrानाथ महाराजांचे मराठवाड्यातील एकमेव मंदिर आहे. नगर-बीड या दोन जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील या मंदिरास शेकडो वर्षांची परंपरा आहे. सिंदफणा नदीच्या काठावर असणार्या ब्रrानाथ महाराजांच्या हेमाडपंती मंदिराचा सध्या जीर्णोद्धार करण्यात येत आहे. मूळ गाभारा दगडाचाच ठेवून सभागृह व अन्य कामे लोखंड व सिमेंटची करण्यात येत आहेत. र्शावण महिन्यात दर्शनासाठी येणार्या भाविकांची संख्याही मोठी असते. चैत्र महिन्यातील तिसर्या सोमवारी अंबिलचा कार्यक्रम होतो. या दिवशी सर्व जाती धर्माचे लोक महराजाच्या अंबिलाचा आस्वाद घेतात. चौथ्या सोमवारी युवकांनी गंगेहून आणले. या कावडीची मिरवणूक काढण्यात आली. कावडीच्या पाण्याने ब्रrानाथ महाराजांना अभिषेक करण्यात येतो. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
· सर्वेश्वर गणेश मंदिर, बीड ऐतिहासीक सर्वेश्वर गणेश मंदीर प्रसिद्ध आहे.
· राम मंदिर, बीड शाहूनगर भागातील गजानन कॉलनी येथे अर्धा एकर क्षेत्रफळ असलेल्या व 37 बाय 22 या जागेत लोकसहभागातून मंदिराचे तळघर व स्लॅबचे काम पूर्ण झाले. या मंदिरात राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान आणि गणपती या पाच मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. एक कासवही आणले जाणार आहे.
· जालिंदरनाथ देवस्थान, रायमोह बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रायमोह गावापासून केवळ चार किलोमीटर अंतरावर येवलवाडी येथे जालिंदरनाथांचे पुरातन मंदिर आहे. परिसरात विठ्ठल मंदिर, दत्त मंदिर, हनुमान मंदिर आहे.
· बर्हाणपूर, गेवराई बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील बर्हाणपूर येथे मावलाई देवीचे पुरातन मंदिर आहे. एप्रिल महिन्यात विविध ठिकाणी पंधरा, आठ आणि दोन दिवसांची यात्रा भरते.परंपरेनुसार याही वर्षी यात्रेत माणसांकरवी बारा गाड्या ओढल्या जाणार आहेत. यात्रेच्या दुसर्या दिवशी लोकवर्गणीतून कुस्ती स्पर्धा घेतली जाते. राज्यस्तरावर लिखान करणारे पत्रकार, राष्ट्रीय व राज्य खेळाडू तयार करणार्या संघटकाला येथील मावलाई बहुद्देशीय संस्थेच्या वतीने मावलाई राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो.
· दत्तमंदिर, बीड शहरातील सुभाष रोडवरील ऐतिहासीक दत्तमंदिर प्रसिद्ध आहे. दत्तमंदिराच्या सांस्कृतिक सभागृहाचे व जीर्णोद्धाराचे काम चालू
· कोळगांव (गेवराई तालुका, बीड जिल्हा) गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे सूर्यमंदिर देवगिरी संस्थान आहे. हनुमानमहाराज हाडुळे हे संस्थानचे मठाधिपती आहेत.
· तारकेश्वरगड, बीड जिल्हा येथे वेदांतचार्य सद्गुरू नारायण महाराजांची समाधी आहे.
· कपिलधार, बीड जिल्हा श्रीक्षेत्र कपिलधार हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातील एक निसर्गरम्य तीर्थक्षेत्र आहे. बीड शहराच्या दक्षिणेस १९ किमी मांजरसुंभा व तेथून दीड किलोमीटरवर छोट्या टेकड्यांच्या दरीत दहा मीटर उंचीवरून पडणाऱ्या जलप्रपाताच्या पायथ्याशी हे स्थान आहे. येथे मन्मथस्वामींचे या लिंगायतांच्या सत्पुरुषाची टुमदार समाधी मंदिर आहे. लिंगायतपंथीयां ते एक श्रध्दास्थान आहे. जवळच कपिलधार नावाचा धबधबा आहे. गर्द वनश्रीच्या सान्निध्यात येथे. तुलसीविवाहाच्या वेळी येथे पाच दिवस यात्रा भरते.
· नागनाथ मानूर, बीड:- सुमारे ७00 यादवकालीन आडाचा इतिहास असलेल्या शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र नागनाथ मानूर. कालौघात या गावातील तब्बल साडेसहाशे आड आज बुजून गेले आहेत तर उरले सुरले पाच पन्नास आड जुन्या इतिहासाची साक्ष देत कसेबसे आपले अस्तित्व जपत आहेत. या गावचा गत इतिहास पाहता त्रिकोनी, चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी अशा प्रकारचे आड येथे आहेत. काही भागात तर खापरी आड ही बघायला मिळतात. खापरापासून तयार करण्यात आल्यामुळे त्यांना खापरीआड म्हणत. सातशे आड आणि सातशे माड (मंदिर) असलेले मानूर हे परिसरात एकमेव गाव आहे.
· पिंपळवंडी (पाटोदा तालुका, बीड जिल्हा) पाटोदा तालुक्यात पिंपळवंडी या गावालगत डोंगरदरीत असलेल्या आणि कार्तिकस्वामी मंदिरामुळे अलीकडील काळात भाविकांची रीघ वाढल. तेराव्या शतकात यादव काळात निर्माण झालेल्या हेमाडपंती मंदिरांमध्ये पिंपळवंडी येथील अश्वलिंग, कार्तिकस्वामी मंदिराची उभारणी झाली. निझाम राजवटीत संकटांचा सामना करूनही हे देवस्थान आज तेवढय़ाच ताठ मानेने उभे आहे. भारती परंपरा आणि संन्याशी मठाची परंपरा लाभलेल्या या संस्थांचा कारभार सध्या महादेवानंद भारती (मधुकर शास्त्री महाराज) हे पाहत आहेत. पिंपळवंडीचे अश्वलिंग देवस्थान मात्र गेल्या दहा वर्षांपर्यंत तरी दुर्लक्षितच होते. याबरोबरच मागील दहा वर्षांपासून येथील कार्तिकस्वामी मंदिरही मराठवाड्यातील भाविकांच्या दृष्टिपथात आले. कार्तिक पौर्णिमेला दर्शनासाठी भाविक गर्दी करू लागले.
· तलवाडा (गेवराई तालुका, बीड जिल्हा) बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यात तलवाडा या गावी डोंगरावर र्शी त्वरिता देवीचे भव्य मंदिर आहे. भक्ताच्या हाकेला त्वरित म्हणजे लवकर धावते म्हणून देवीला त्वरिता देवी नाव पडले. हे मंदिर 1662 मध्ये निर्मित शिवकालीन मंदिर असल्याचा उल्लेख दीपमाळेवरील शिलालेखावर आहे. तलवाडा गावचे नाव निझाम राजवटीत त्वरितापूर होते असे म्हटले जाते. त्वरितापूर निवासिनी त्वरिता देवी असा उल्लेख इतिहासात आढळतो. देवीच्या चार हातात कमळ, खंजीर, गदा, परशु अशी चार आयुधे आढळतात. देवीची मूर्ती स्वयंभू सुमारे तीन फूट उंचीची आहे. त्वरिता देवीचे रूप विष्णुरूपी असून, मूर्ती चतुभरुज आहे. देवी चौरंगावर विराजमान आहे म्हणून त्वरिता देवी ही नारायणी वैष्णवीचा अवतार मानली जाते. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार उत्तराभिमुख आहे. गाभारा पूर्व-पश्चिम आहे. डोंगराच्या पायथ्याशी तुळजा देवी मंदिर आहे. मंदिरात देवीच्या दर्शनाला जाणार्यांसाठी एकाबाजूने 200 पायर्या आहेत व दुसर्या बाजूने मंदिरापर्यंत वाहन जाते. नारायणी त्वरिता देवीचे हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असल्याचे मानले जाते. दसरा, हनुमान जयंती चैत्रपौर्णिमेनंतर यात्रा महोत्सव भरतो. त्वरितादेवी ट्रस्ट या मंदिराची देखरेख करते.
· औरंगपूर (अंबाजोगाई तालुका, बीड जिल्हा) औरंगपूर तालुका अंबाजोगाई या गावाजळव कळंब-अंबाजोगाई रस्त्यावर उभा राहत असलेल्या सद्गुरू संत तुकाराम महाराज पावनधामवर तुकाराम बीजनिमीत्त फार मोठा धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात. संत तुकाराम मंदिर असलेले मानूर हे बीड जिल्ह्यात एकमेव गाव आहे. संत तुकाराम मंदिर महाराष्ट्र, कर्नाटकात कुठेच नाही. [३४]
· ज्ञानेश्वर आर्शम दगडवाडी-खरगवाडी (रायमोह, बीड जिल्हा) बीड जिल्ह्यात दगडवाडी-खरगवाडी या गावी डोंगरावर र्शी ज्ञानेश्वर आर्शमत्व आहे.
· रामगड, बीड जिल्हा बीड जिल्ह्यात शहरानजीक असलेल्या र्शीक्षेत्र रामगड येथे र्शीराम, लक्ष्मण व सीतामाई यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आहे. रामगडही प्रभू रामचंद्राने पाऊल ठेवलेली भूमी असून वनवासात असताना प्रभू रामचंद्रांनी मुक्काम केलेली जागा आहे.
· मोहिनीराज, बीड बीड तालुक्यातील बालाघाट डोंगर पट्टयामधील बोरफडी आणि हिवरा पहाडी गावाच्या मध्य ठिकाणी उंच डोंगरावर भगवान शंकराचे श्री क्षेत्र मोहिनीराज देवस्थान आहे.
· मंजरथ, बीड जिल्हा बीड जिल्ह्यात मंजरथ हे गोदावरीच्या काठावरील तीर्थक्षेत्र असून, या ठिकाणी गोदावरी आणि सिंदफणा या नद्यांचा संगम आहे. या गावास दक्षिण काशी असे संबोधले जाते. या ठिकाणी त्रिविक्रमाचे मंदिर आहे. ४00 वर्षांपूर्वी अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला ८00 फूट लांब आणि ६0 फूट उंच घाटही
· रामगड, बीड जिल्हा बीड जिल्ह्यात शहरानजीक असलेल्या बाजारपुल जैनभवनाजवळ येथे मुक्ताईचे आजोबा गोविंदपंत यांच्या समाधीस्थळ आहे.
· चिंचवण (महिकावती नगर), बीड:-येथे मंकावती देवीचे मंदिर शुद्धा येथे पहावयास मिळते.
· राजाहरिश्चंद्र मंदिर, बीड राजाहरिश्चंद्र यांचे जागृत आणि भारतातील एकमेव मंदिर हरिश्चंद्र पिंपरी ता.वडवणी, जी.बीड येथे आहे.
· मांजरसुभा, बीड हे गाव बीड तालुक्यात आहे. बीड, अहमदनगर उस्मानाबाद व अंबेजोगाईस जाणारे रस्ते या ठिकाणी एकत्र येतात.
गोदाकाठी राक्षसभूवन, पुरूषोत्तमपुरी, मंजरथ, गंगामसला येथे प्राचीन मंदिरे आहेत.
· नायगाव अभयारण्य:- भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांसाठी प्रसिद्ध असलेले नायगाव अभयारण्य बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात आहे.
· आष्टी :- आष्टी तालुक्याचे मुख्य ठिकाण. येथील हजरतशाह बुखारी यांचा दर्गा अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
· सौताडा :- हे स्थळ पाटोदा तालुक्यात असून येथील विंचरणा नदीवरील धबधबा प्रसिद्ध आहे. विंचरणेचा प्रवाह येथे सुमारे सत्तर मीटर उंचीवरून दरीत कोसळतो. (६८.५९ मी.) असून त्याच्या पायथ्याशी रामेश्वर मंदिर आहे. तेथे श्रावणात तिसऱ्या दिवशी मोठी यात्रा भरते. 350 फूट उंचावरून पडणारा रामेश्वर धबधबा आणि निसर्गरम्य रामेश्वर मंदिर कायमच पर्यटकांना खुणावत असते. विविध प्रकारची वनराई फुलवतानाच पर्यटकांना जाण्या-येण्यासाठी छोटे रस्ते, पॅगोडा, वाहनतळ, व्ह्युह पॉइंट तसेच लहान आकाराचे साठवण बंधारे बांधण्यात आले आहेत. वनविभागाच्या बीड परिक्षेत्राच्या पाटोदा उपवन विभागामार्फत रामेश्वर परिसरात पर्यटनस्थळ विकास करण्यात आला आहे.
शिवदरा येथील शिवमंदिर शिवद-याच्यानिसर्ग रम्य परिसरात शिवमंदीरासह विठ्ठल रूक्मीणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, कार्तीक स्वामी मंदिर आहे. शिरूरकासार येथे महाशिवरात्रीनिमित्त धाकटी अलंकापुरी सिद्धेश्वर संस्थानवर भाविकांनी दर्शनासाठी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली.
याशिवाय धारूर (धारूर तालुक्याचे मुख्य ठिकाण) हे एक . ऐतिहासिक स्थळ आहे. येथे फतेहबाद नावाचा डोंगरी किल्ला आहे. सोन्याचांदीच्या व्यापारासाठीही प्रसिद्ध. अमळनेर (पाटोदा तालुक्यात . तांब्या पितळेच्या भांडयासाठी प्रसिद्ध या उद्योगाचे येथे सु. ११ कारखाने असून त्यांतील विविध प्रकारच्या भांड्यांचा महाराष्ट्रात सर्वत्र पुरवठा केला जातो.), धर्मपुरी (अंबेजोगाई तालुकयात केदारेश्र्वराचे हेमाडपंती मंदिर), पांचाळेश्र्वर ( गोदावरीकाठी, महानुभावपंथीयांचे दत्त मंदिर, हे स्थळ गोदावरी नदीच्या तीरावर असून नदीपात्रात मध्यभागी दत्तमंदिर आहे. हे ठिकाण दत्तात्रेयाचे भोजनस्थळ म्हणून मानले जाते. येथे चैत्र वद्य सप्तमीस मोठी यात्रा भरते ), चिंचोली ( पाटोदा तालुक्यात थंड हवेचे ठिकाण,सर्वांत उंचावर (८८९ मी.), गहिनीनाथाचे मंदिर ), नवगण -राजूरी ( बीड तालुक्यात नऊ गणेशमूर्ती असलेले मंदिर) ही जिल्ह्यातील अन्य महत्त्वाची स्थळे आहेत.
शहरातील खंडोबा मंदिरासमोरील उंच दीपमाळा प्रेक्षणीय आहेत. येथील शहेनशावली,बालाशाह इ. दर्गे प्रसिद्ध आहेत. नारायणगड हे उंच ठिकाण निसर्गसुंदर आहे. येथे विठ्ठल व महादेव यांची मंदिरे असून कार्तिक पौर्णिमेस मोठी यात्रा भरते. येथील मंदिरे व समाध्या दगडी कामासाठी प्रसिद्ध आहेत. यांशिवाय बीडपासून ७ किमी. अंतरावरील वडवनी हे गाव हातमागावरील टेरिकॉटच्या कापडासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात या कापडास मोठ्या प्रमाणात मागणी असते.
बीड शहरातील ऐतिहासीक स्थान: बारादरी : सरदार सुलतानजी निंबाळकर यांचे निवासस्थान. निजामाने त्याचे रूपांतर न्यायालयात केले. मदरसे - फोकानिया : 100 वर्षांपूर्वी निजामाने सर्वात पहिल्या सरकारी शाळेचा पाया रचला. (नंतरची मल्टिपर्पज हायस्कूल) देशमुख यांची हवेली : बीडचे वतनदार सिद्धोजी नाराोजी देशमुख यांची 100 वर्षांपूर्वीची हवेली. जुनी तहसील : बहमनी कालखंडात या ठिकाणी टाकसाळ होती, असे मानले जाते. निजामाने या इमारतीचे रुपांतर रुग्णालयात केले. निजामाची सनद : खंडेश्वरीचे पुजारी बीडकर यांना निजामाने ही सनद दिल्याचा दावा बीडकर करतात. दीपमाळ : खंडेश्वरी मंदिराच्या परिसरातील ह्या दीपमाळ. अनेक वर्षांपासून ऊन वाऱ्याला तोंड देत इतिहास मनात साठवत आहेत. बीडचे जहागीरदार सुलतानजी निंबाळकर यांनी शहराच्या पूर्वेकडील बाजूस उभारलेल्या खंडोबा मंदिरापासून सहा फुट अंतरावर 70 फुट उंचीच्या दोन दीपमाळा उभारल्या. या दीपमाळीवर एकाच वेळी 400 दिवे लावण्याची व्यवस्था आहे. खंडोबाचे मंदिर उभारण्यासाठी जहागीरदार निंबाळकर यांना मराठा सरदार महादजी शिंदे यांनी मदत केली होती. दीड एकराचा हा भाग असून त्यावर ही इमारत आहे. दहा बाय दहा फुट चौथरा असून चुन्याचे बांधकाम आहे. अतिशय नयनरम्य परिसरातील ही वास्तू आजही बीडच्या वैभवाची साक्ष देते. राज्यासह आंध्र, कर्नाटक आदी राज्यातून बीड जिल्ह्यात येणारे नागरिक या ठिकाणी आवर्जून येतात. जवळच खंडेश्वरी देवीचे मंदिर आहे. नवरात्रात हा परिसर लक्ष दिव्यांच्या रांगोळीने उजळून निघतो. या दीपमाळीवर विविध देवतांची शिल्पे आहेत. पूर्वी दीपमाळेच्या टोकावर तुळशीवृंदावन होते ते भग्नावस्थेत आहे. रचना आठ कोनात असून प्रत्येक कोनाला एक खिडकी आहे. दीपमाळेवरुन पूर्ण बीड शहर दिसते.
शहरातील धार्मिक स्थळांचे स्वरूप शतकापूर्वी आज सारखे नव्हते. कंकालेश्वरचे खनकाह होते. दत्त मंदिर मात्र बीडच्या तरुण क्रांतिकारकांचे मुख्य स्थळ होते. असंख्य तरुण इथे व्यायामासाठी येत व राष्ट्रभक्तीवर चर्चा करीत. याच मंदिरात शहरातील पहिला सार्वजनिक गणपती बसवला. पुढे पुरुषोत्तमराव गोडसे यांनी त्या मंडळाचे नेतृत्त्व केले. निझामाच्या कचाट्यातून बीड मुक्त झाल्यावर भारतीय सैन्याचे प्रमुख जनरल चौधरी यांचा सत्कार झाला होता. तो याच मंदिरात..
बीड शहरात मुस्लिम बांधवा ईदगाह नाका, गरीब मस्जिद, कादरिया मस्जिद, ईदगाह इस्लामपुरा येथे सामूहिक नमाज अदा करण्यात येते.
Post a Comment