सह्याद्रीच्या उपरांगा
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर भागातील सह्याद्रीचा एक फाटा. दख्खनच्या पठारी प्रदेशाच्या पश्चिम कडेवर उत्तर-दक्षिण पसरलेल्या सह्याद्री (पश्चिम घाट) या पर्वतश्रेणीच्या मुख्य रांगेपासून पूर्वेस किंवा आग्नेयीस अनेक डोंगररांगा किंवा सह्याद्रीचे फाटे गेलेले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या सीमे अंतर्गत तापी-पूर्णेच्या दक्षिणेस सातमाळा-अजिंठा, हरिश्चंद्रगड-बालाघाट व महादेवाचे डोंगर या तीन प्रमुख डोंगररांगा आहेत [बालाघाट; महादेवाचे डोंगर]. उत्तरेकडील तापी व दक्षिणेकडील गोदावरी नदी यांदरम्यान सातमाळा-अजिंठा, उत्तरेस गोदावरी व दक्षिणेस भीमा नदी यांदरम्यान हरिश्चंद्रगड-बालाघाट, तर उत्तरेस भीमा व दक्षिणेस कृष्णा नदी यांदरम्यान महादेवाचे डोंगर आहेत. सह्याद्रीच्या मुख्य समूहात या सर्व श्रेण्यांचा प्रारंभ होत असून त्या पूर्व किंवा आग्नेय दिशेस पसरल्या आहेत.
सातमाळा-अजिंठा डोंगररांगा
सातमाळा-अजिंठा डोंगररांगा ही सह्याद्री पर्वतरांगेच्या ज्या तीन प्रमुख डोंगररांगा आहेत, त्यापैकी एक आहे. ही डोंगररांग तुटक तुटक असून तिची साधारण दिशा पश्चिम-पूर्व आहे. ही डोगररांग गोदावरी व तापी नदिच्या खोऱ्यांना वेगळी करते. हिची सुरुवात नाशिक जिल्ह्याच्या वायव्येकडील सुरगाणा तालुक्यात होते. या डोंगररांगेच्या पश्चिम भागाला सातमाळा डोंगर तर नाशिक जिल्ह्यातीलच मनमाडपासून पुढे अंकाई-टंकाईपासून या रांगांनाच अजिंठा डोंगर म्हणून ओळखतात. या डोंगररांगांचा उतार उत्तरेकडे तीव्र असून दक्षिणेकडे गोदावरी नदिच्या खोऱ्याकडे मंद उतार आहे. देवगिरीचा किल्ला व अजिंठा-वेरूळची लेणी याच डोंगरात आहेत.
महाराष्ट्र राज्यातील या प्रमुख डोंगररांगांपैकी सर्वांत उत्तरेकडील, साधारणतः पश्चिम-पूर्व दिशेस पसरलेल्या तापी व गोदावरी यांदरम्यानच्या, डोंगररांगा ‘सातमाळा-अजिंठा’ या नावाने ओळखल्या जातात. सामान्यपणे या डोंगररांगांच्या पश्चिमेकडील भागास सातमाळा व पूर्वेकडील भागास अजिंठ्याचे डोंगर असे संबोधले जाते. सातमाळा डोंगररांगांना चांदवड, चांदोर किंवा इंध्याद्री म्हणूनही ओळखतात. या डोंगररांगांचा प्रारंभ नासिक जिल्ह्याच्या वायव्य भागामध्ये सह्याद्रीच्या मुख्य समूहात होतो. मुख्य सह्याद्रीपासून पूर्वेस ८० किमी. पर्यंत बेसॉल्ट खडकातील विलक्षण अशा कटक व सुळक्यांच्या स्वरूपात ही रांग पसरली आहे. मनमाडजवळील मंद उताराच्या खळग्यानंतर पुन्हा या डोंगररांगा मैदानी भागापासून १८२ मी. उंचीपर्यंत वाढत गेलेल्या आहेत. अजिंठ्याच्या पुढे काही किमी.वर या डोंगररांगा दक्षिणेस वळून पठारी प्रदेशात विलीन होतात. नांदेड जिल्ह्यातील यांच्या विस्तारित डोंगररांगांना निर्मळ आणि सातमाळा डोंगररांगा असे म्हणतात. यांचा विस्तार पुढे आंध्र प्रदेशात झालेला दिसतो.
नासिक, औरंगाबाद, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यांत सातमाळा-अजिंठा डोंगररांगांचे फाटे पसरले आहेत. नासिक जिल्ह्याच्या साधारण मध्यातून या डोंगररांगा गेल्या असून तेथे त्यांची स.स.पासून सरासरी उंची १,१००–१,३५० मी. दरम्यान आढळते. धोडप व सप्तशृंगीसारखी काही शिखरे सस.पासून १,४००मी. पेक्षा उंच आहेत. अचल व जावाता हे किल्ले या रांगेत आहेत. औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तर सरहद्दीवरून गेलेल्या या डोंगररांगांना अजिंठ्याचे डोंगर असे म्हणतात. अंजिठा, पाटणा, चांदोर येथील डोंगरकपाऱ्यांत कोरलेली बौद्घ लेणी ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. बुलढाणा जिल्ह्याच्या साधारण मध्यातून या डोंगररांगा गेलेल्या आहेत.
सातमाळा डोंगररांगामध्ये काही अरण्यांचे पट्टे आढळतात. काही भागांतील डोंगरांचे उतार उघडे असून काही भागांत विखुरलेल्या वनस्पती पहावयास मिळतात. डोंगररांगांच्या दरम्यान असलेल्या प्रवाहांच्या पात्रांत व काठावरील भागात दाट झाडी व झुडूपे आढळतात. प्रामुख्याने उष्णकटबंधीय शुष्क पानझडी प्रकारची वृक्षराजी या भागात आढळते. साग, ऐन, हिरडा, कुसुम, आवळा, पळस, खैर, शिसव, अंजन, शिरीष, शेवरी इ. वृक्षप्रकार येथील जंगलांत पहावयास मिळतात. अरण्यमय प्रदेशात वन्य पशु-पक्षी आढळतात. वाघ, कोल्हा, रानडुक्कर, ससा, भेकर, मुंगूस, काळवीट, सायाळ इ. प्राणी व मोर, रानकोंबडा, चंडोल, पोपट, कोकिळ, ससाणा, दयाळ इ. पक्षीही तेथे आढळतात.
सातमाळा डोंगररांगांपैकी उत्तरेकडील काही सोंडींच्या उताराच्या भागात तसेच मुख्य रांगेच्या पायथ्यापर्यंत लागवडीखालील क्षेत्र आहे. या डोंगररांगांमध्ये भिल्ल, गोंड, परधान, कोलाम या आदिवासी जमातींचे लोक राहतात. चाळीसगावजवळील रांजणगाव किंवा औलाम खिंड आणि अंजिठा खिंड या दोन खिंडींमधून प्रमुख मार्ग गेलेले आहेत. पश्चिमेकडील डोंगररांगांमध्ये निसर्गसुंदर गिरिस्थाने आढळतात. विंध्य पर्वताच्या पश्चिमेस मध्य प्रदेश व गुजरात राज्यांच्या सरहद्दीदरम्यान असणाऱ्या डोंगररांगांनाही सातमाळा या नावाने ओळखले जाते.
हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग:
पुणे व नगर जिल्ह्याच्या सीमेवरून पूर्वेकडे जाणारी गोदावरी व भिमा नदीचे खोरे वेगळे करणारी रांग म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग होय .पश्चिम भागास हरिश्चंद्र घाट आणि पूर्व भागास बालाघाट या नावाने ओळखले जाते .
शंभू महादेव डोंगररांगा :
सह्यांद्रीच्या पर्वतापासून रायरेश्वरापासून शिंगणापूर पर्यंत पसरलेल्या रांगेला शंभूमहादेव रांगम्हणतात. या डोंगररांगा सातारा सांगली जिल्ह्यातून पुढे कर्नाटकात जातात. भीमा नद्याच्या खोऱ्यात दक्षिणेस शंभू महादेव रांग आहे. यामुळे भीमा व कृष्णा या नद्यांची खोरे वेगवेगळी झालेली आहेत. महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठी शंभूदेव डोंगररांग आहे. उदा. वाईजवळील पाचगणी व महाबळेश्वर (टेबल लैड) असे म्हणतात.
सातपुडा डोंगररांगा :
सातपुडा ही भारताच्या मध्यभागी असलेली व तिच्या उत्तरेला असलेल्या विंध्य पर्वतरांगांना समांतर अशी पर्वतरांग आहे. या सातपुड्याच्या उत्तरेला नर्मदा व दक्षिणेला तापी या नद्यांची खोरी आहेत. या पर्वतरांगेला सात घड्या आहेत, म्हणून हिचे नाव सातपुडा पडले. उत्तरेकडून येताना सातपुडा ओलांडला की महाराष्ट्रात प्रवेश झाला असे समजले जाते.
दक्षिणी गुजरातच्या पूर्व सरहद्दीपासून या पर्वतरांगांची सुरुवात होऊन ती महाराष्ट्रातीलट्र (खानदेश व विदर्भ)पर्यंत आणि मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यांपर्यंत पूर्व-पश्चिम पसरलेली आहे. पर्वतरांगांच्या पूर्व भागात पर्जन्यमान पश्चिम भागापेक्षा जास्त आहे.प्रचंड जंगलतोड झाली असली, तरी अजूनही बराच वनप्रदेश (मुख्यतः छत्तीसगढ भागामध्ये) अबाधित आहे. तोरणमाळ , पंचमढीहे प्रसिद्ध पर्यटन स्थळ याच पर्वतरांगात आहेत.नर्मदा व तापी नद्यांची खोरे वगळी करणारी ही पर्वतरांग उत्तर सीमेवर आहे. सातपुडा पर्वातास आमरावती जिल्ह्यात गाविलगड, तर नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ पठार (तोरणमाळ १४६१ मी.) म्हणतात.
महाराष्ट्रात सातपुडा पर्वत रांगेचा फारच भाग समविष्ट आहे. पूर्व पश्चिम दिशेने पसरलेल्या सातपुडा पर्वत रांगेमुळे नर्मदा व नदीचे खोरे झालेले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात पश्चिम भागात तोरणमाळ हे एक लहान आकाराचे पठार असून त्यांची उंची १०३६ मी आहे. तर त्या भागातील सर्वात उंचीचे शिखर अस्तंभ डोंगर असून त्याची उंची १३२५ मी आहे. सातपुडा पर्वत रांगेचा काही भाग अमरावती जिल्ह्यात आढळतो. त्यास गाविलगड टेकड्या असे म्हणतात. त्यांची रुंदी २० ते ४० कि मी आहे. या ठिकाणी डोंगराची उंची १००० मी पेक्षा जास्त आहे. येथील वैराट हा डोंगर महत्वाचा आहे. वैराट डोंगराची उंची ११७७ मी तर चिखलदराची उंची १११५ मी आहे. अमरावतीच्या गाविलगड टेकड्यांचा दक्षिण उतार अतिशय तीव्र स्वरूपाचा आहे. याची उंची १२०० ते ३०० मी पर्यंत प्रदेशाची उंची कमी होते.
अन्य डोंगररांग किंवा टेकड्या -
धुळे जिल्ह्यात गाळणा डोंगर, औरंगाबाद - वेरूळ डोंगर, हिंगोली - नांदेड - हिंगोली मुदखेडच्या टेकड्या, नागपूर- गरमासुर टेकड्या, गोंदीया- दरकेसा टेकड्या, भंडारा- गायखुरी डोंगर, गडचिरोली - चिरोली टेकड्या, भामरागड- सुरजगड डोंगर,
Post a Comment