राज्यातील पर्यटन स्थळे व इतर

 महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ : महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने स्थापिलेले महामंडळ. महाराष्ट्रात पुरातन कला व शिल्प, निसर्गसौंदर्य धार्मिक व ऐतिहासिक ठिकाणे, वन्य पशुपक्ष्यांची अभयारण्ये इ. पर्यटकांसाठी आकर्षक स्थळे आहेत. मुंबई शहर जगाच्या प्रमुख सामुद्री व हवाई मार्गांवर असून ते भारतातील इतर शहरांशी खुष्कीच्या व हवाई मार्गांनी जोडलेले असल्याने भारताला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांपैकी ५४ टक्के पर्यटक मुंबईला व महाराष्ट्राला भेट देतात. त्यामुळे महाराष्ट्रात पर्यटनव्यवसायाला चालना देऊन त्याचा विकास करण्यासाठी व तत्संबंधीच्या शासकीय बाबींची योग्य व्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पर्यटन संचालनालय नेमलेले आहे. या संचालनालयाची प्रचालनात्मक आणि वाणिज्यिक स्वरूपाची कामे करण्यासाठी ‘ महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडाळा ‘ ची २० जानेवारी १९७५ रोजी स्थापना झाली असून संचालनालयाकडे आता फक्त नियामक व शासकीय स्वरूपाची कार्ये आहेत.

महामंडळ पुढील कार्ये करते : 

(१) सहली : पर्यटकांच्या दृष्टीने महाराष्ट्रातील व गोव्यातील ठिकाणांना भेट देण्यासाठी महामंडळाने मुंबई व पुणे येथून दैनंदिन, व्दिसाप्ताहिकी किंवा मोसमी सहलींची व्यवस्था  केली आहे. याशिवाय इतर राज्यांतील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी त्याचप्रमाणे पर्यटक-समूहांसाठी त्याच्या इच्छेनुसार महामंडळ सहली आयोजित करते. सहलींसाठी महामंडळाच्या मालकीच्या आराम बसगाड्या, वातानुकूलित बसगाड्या व प्रवासी टॅक्सी-गाड्या आहेत.

(२) पर्यटक निवास, हॉटेले व उपाहारगृहे : महाराष्ट्रात पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या २५ ठिकाणी महामंडळाने एकूण ३,००० च्या वर  पर्यटकांची सोय होईल, असे पर्यटक निवास व शिर्डी येथे पहिल्या दर्जाचे हॉटेल बाधंलेले आहे. औरंगाबाद येथे आशियामधील एक आदर्श म्हणून वाखाणलेले युवक वसतिगृह आहे. याशिवाय पुणे येथे महानगरपालिकेकडून भाडेपट्ट्याने घेतलेले ‘हॉटेल सारस ’ महामंडळ चालविते. त्याचप्रमाणे काही पर्यटक निवासांतील उपाहारगृहांचे व्यवस्थापनही ते करते.

(३) स्मरणवस्तू : कागद, धातू, लाकूड, काच, कापड इत्यादींपासून स्मरणवस्तू तयार करून त्यांची विक्री करणे.

(४) प्रसिद्धी : पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या ठिकाणांची माहिती प्रसृत करणे व निरनिराळ्या प्रकारचे माहितीवजा साहित्य, चित्रपट, माहितीपट, श्राव्य दृश्ये तयार करणे इत्यादी. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये यांपैकी काही कृतींना पारितोषिके मिळाली आहेत.

(५) विकास कार्य : निरनिराळ्या प्रकारच्या स्थानांचा पर्यटकीय दृष्टिकोनातून विकास करण्यासाठी तेथे पर्यटक-निवास व इतर प्रकारची वसतिस्थाने बांधणे व त्या स्थानांची शोभा वाढविणे.

महामंडळाचे ३१ मार्च १९८० रोजी भरणा झालेले भाग भांडवल १·७५ कोटी रु. होते. याशिवाय ९६·४ लक्ष रु. कर्ज शासनाने पुरविले होते. याव्यतिरिक्त महामंडळास वित्तीय संस्थांकडून कर्जे उपलब्ध होतात. ३१ मार्च १९८० रोजी महामंडळाकडे भांडवल, कर्जे व दायित्वे आणि तरतुदी मिळून ४·५८ कोटी रु. वित्त होते. सुरुवातीपासून बरेचसे पर्यटक-निवास व्यवहार आतबट्ट्याचे असल्याने महामंडळ तोट्यात असून ३१ मार्च १९८० पर्यंत तोट्याची एकूण रक्कम १·६९ कोटी रुपये झाली होती. परंतु त्यानंतर पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे ही परिस्थिती हळूहळू सुधारत गेली

महाराष्ट्रातील अष्टविनायक

स्थळ

गणपती

स्थळ

गणपती

मोरगाव (पुणे)

मोरेश्वर

रांजनगांव (पुणे)

श्री महागणपती

थेऊर

चितामणी

मढ / महड (रायगड)

श्री विनायक

ओझर (पुणे)

विघ्नहर

पाली (रायगड)

बल्लाळेश्वर

लेण्याद्री (पुणे)

गिरिजात्मक

सिध्द्टेक (अहमदनगर)

सिध्दीविनायक

विदर्भातील अष्टविनायके

·         नागपूर - नागपूर

·         अदासा - नागपूर

·         रामटेक - नागपूर

·         मेंढा - भंडारा

·         पौनी - भंडारा

·         केळझर - वर्धा

·         कळंब - यवतमाळ

·         चंद्रपूर - चंद्रपूर

लेणी

लेणी

जिल्हा

लेणी

जिल्हा

पितळखोरा

औरंगाबाद

बेडसा

कामशेत-पुणे

वेरुळ-अजिंठा

औरंगाबाद

भाजे

मळवली-पुणे

एलिफंटा

घारापुरी- रायगड

कार्ला

पुणे

पांडव लेणे

नाशिक

खरोसा

लातूर

पातुर

अकोला

तेर

उस्मानाबाद

धाराशिव

उस्मानाबाद

कान्हेरी

ठाणे

  • महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा – सिंधुदुर्ग
  • महाराष्ट्राचे पर्यटन धोरण  जाहिर – २००६
  • महाराष्ट्रातील पुळणी – जुहू (मुंबई), मार्व, वर्सोवा, मनोरी (मुंबई, उपनगर), गणपती पुळे (रत्नागिरी), मुरुड व किहिम (रायगड) व अकलोली (ठाणे), उनकेश्वर (ठाणे), उनकेश्वर (नांदेड), सालबर्डी (अमरावती), कापेश्वर (यमतमाळ), उन्ह्वरे – ताम्हले, खेड, अरवली, तुरळ, गोळवली मठाराजवाडी, फणसवणे (रत्नागिरी)
  • महाराष्ट्राचे शासकीय मध्यवर्ती संग्राहालय नागपूर
  • प्रादेशिक वस्तु संग्राहालय औरंगाबाद, नाशिक
  • चंद्रकांत मांडरे कला संग्राहालय – कोल्हापूर
  • प्रिन्स ऑफ वेल्स संग्राहालय मुंबई

·         महात्मा फुले वस्तू संग्रहालय व राजा केळकर वस्तू संग्रहालय – पुणे

·         तेरणा नदी काठी असणारे संत गोरा कुंभार यांची समाधी असणारे ठिकाण तेर (जि. उस्मानाबाद)

·         महादेव भाई व कस्तुरबा गांधींची समाधी असणारे ठिकाण – आगाखान पॅलेस (पुणे)

·         महाराष्ट्रातील लजदुर्ग – सुवर्णदुर्ग (रत्नागिरी), मुरुड, जंजिरा, पद्मदुर्ग (रायगड), अर्नाळा (ठाणे)

·         संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतलेले ठिकाण आळंदी (पुणे)

·         ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली ते प्रवरा काठचे ठिकाण – नेवासे

·         नाग पंचमीच्या दिवशी मोठी यात्रा भरणारे ठिकाण बत्तीस शिराळा (सांगली)

·         विवेकसिंधू (मराठीतील आद्यग्रंथ) हा ग्रंथ लिहिणारा मुकुंदराव व ओव्या, अभंग लिहिणारा दासोपंत यांचे जन्मस्थान व समाधी स्थळ – अंबाजोगाई (बीड)

महाराष्ट्रातील संतांची समाधीस्थाने

·         गाडगे महाराज         अमरावती

·      

·         रामदासस्वामी          सज्जनगड 

·         एकनाथ                  पैठण 

·         गजानन महाराज        शेगाव

·         द्यानेश्वरी                आळंदी 

·         गोरोबा कुंभार            ढोकी

·         चोखा मेळा              पंढरपूर

·         मचिन्द्रनाथ             सप्तशृंगी

·         तुकडोजी महाराज      मोझरी

·         संत तुकाराम             देहू

·         साईबाबा                 शिर्डी

·         जनार्दनस्वामी          दौलताबाद

·         निवृत्तीनाथ            त्र्यंबककेश्वर

·         दामाजी पंत             मंगळवेढा

·         श्रीधरस्वामी            पंढरपूर

·         गुरुगोविंदसिंह           नांदेड

·         रामदासस्वामी           जांब

·         द्यानेश्वर                आपेगाव

·         सोपानदेव              आपेगाव

·         गोविंदप्रभू               रिधपुर 

·         जनाबाई                गंगाखेड

·         संत तुकाराम            देहू

·         निवृत्तीनाथ            आपेगाव

·         नरसी                  हिंगोली

महाराष्ट्रातील प्रमुख किल्ले

जिल्हा

किल्ले

जिल्हा

किल्ले

नाशिक

अंकाई-टंकाई, साल्हेर-मल्हेर, मांगी-तुंगी, ब्रम्हगिरी

रांजनगांव (पुणे)

श्री महागणपती

अहमदनगर

हरिश्चंद्रगड, रतनगड, व अहमदनगरचा भुईकोट किल्ला

पुणे

सिंहगड, पुरंदर, शिवनेरी, तोरणा, प्रचंडगड, राजगड

कोल्हापुर

पहाळा, विशालगड, गगनगड, भडर्गड,

रायगड

रायगड, कर्नाळा, लिंगाणा, द्रोणागिरी

सातारा

प्रतापगड, सज्जनगड, अजिंक्यतारा, मकरंदगड

औरंगाबाद

देवगिरी (दौलताबाद)

 पन्हाळा किल्ला

पन्हाळा महाराष्ट्रातील एक इतिहासप्रसिद्ध किल्ला, थंड हवेचे ठिकाण व कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य स्थान. लोकसंख्या २,२१९ (१९७१). कोल्हापूरच्या वायव्येस सु. १८ किमी. वर कोल्हापूर-रत्नागिरी हसरस्त्याच्या दक्षिणेस सह्याद्रीच्या कुशीत एका छोट्याशा पठारावर वसले आहे. त्याची स. स. पासून उंची ८४५ मी. असून थंड हवा व रोगप्रतिबंधक पाणी यांकरिता ते प्रसिद्ध आहे.

पन्हाळ्याचे दोन स्वतंत्र भाग आहेत. एक पन्हाळा किल्ला अथवा हुजूर बाजार आणि दुसरा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला रविवार, मंगळवार, गुरुवार, इब्राहीमपूर हा पेठांचा भाग. किल्ल्याचा परिघ ७.२५ किमी. आहे.

पन्हाळ्याचा एकूण परिसर हिरव्यागार वनश्रीने विनटलेला असून पावसाळा सोडून इतर ऋतूंत येथील हवा आल्हादकारक असते. पन्हाळा किल्ला केव्हा व कोणी बांधला यांविषयी निश्चित माहिती ज्ञात नाही. त्याच्या बांधकामासंबंधी काही दंसकथा प्रचलित आहेत; तथापि कोरीव लेख व करवीर पुराण यांतून पन्हाळ्याचे प्रणलाक, पन्नाळे, पर्णाल, पन्नागालय वगैरे नामोल्लेख आढळतात. शिलाहार राजा दुसरा भोज (११७५-१२१२) याची राजधानी येथे होती. त्याने पंधरा किल्ले बांधले अशी आख्यायिका आहे. त्यांपैकी पन्हाळा हा एक असावा. त्यानंतर यादव, बहमनी राजे, आदिलशाही, मराठे, मोगल व पुन्हा मराठे यांच्या सत्तांखाली पन्हाळा होता.

आदिलशाही काळात किल्ल्याची डागडुजी झाली, तटबंदी व दरवाजेही नवीन बांधण्यात आले. शिवाजी महाराजांनीही किल्ल्यात काही सुधारणा केल्या. शिवाजी महाराजांना सिद्दी जोहारने वेढा दिला तो या किल्ल्यातच आणि महाराजांनी संभाजीस कर्नाटकाचा कारभार करण्यासाठी ठेवले तेही याच किल्ल्यात. ताराबाईने कोल्हापूरची गादी स्थापन केल्यानंतर पन्हाळा ही राजधानी केली. दरम्यान शाहूने काही दिवस पन्हाळ्याचा कबजा घेतला होता. कोल्हापूरचे छत्रपती शहाजी यांच्या वेळी (१८२१-३७) पन्हाळा ब्रिटिशांना काही वर्षें दिला ; पण पुढे स्वातंत्र्यापर्यंत तो कोल्हापूर संस्थानाच्या अखत्यारीत होता.

पन्हाळ्यावरील अनेक ऐतिहासिक वास्तू जमीनदोस्त झाल्या आहेत. चार दरवाजा, राजवाडा अशा काही वास्तूंचे केवळ पाये वा भग्नावशेष दृष्टोत्पत्तीस येतात. सुस्थितीतील अवशिष्ट वास्तूंत तीन दरवाजा, वाघ दरवाजा ही प्रवेशद्वारे; गंगाकोठी, धर्मकोठी आदी बालेकिल्ल्यातील धान्यकोठारे; सज्जाकोठी, नायकिणीचा (कलावंतिणीचा) सज्जा (जीर्ण वास्तू) या तटबंदीवरील वास्तू ;संभाजी व जिजाबाई मंदिरे, रामचंद्रपंत अमात्यांची समाधी, सदोबा मुसलमानाचा दर्गा ही धर्मस्थळे आणि शृंगार (अंधार), बाव ही विहीर इ. प्रसिद्ध व कलापूर्ण आहेत. ख्यातनाम संतकवी मोरोपंत यांचा जन्म या स्थळी झाला आणि त्यांचे सुरुवातीचे सु. २४ वर्षांपर्यंतचे वास्तव्य या ठिकाणी होते. सदोबा मुसलमानाच्या दर्म्याप्रीत्यर्थ दरवर्षी येथे उरूस भरतो.

तबक उद्यान, जवाहरलाल नेहरू उद्यान व नागझरी ही ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधुनिकीकरण केलेली तीन सुरेख पर्यटन स्थाने आहेत. यांशिवाय येथील माध्यमिक शाळा, ग्रंथालय, सरकारी कार्यालये व रुग्णालय, राष्ट्रीयीकृत बँका व आधुनिक सुखसोयींनी सुसज्ज असलेली निवासस्थाने आणि आलिशान आहारगृहे स्वच्छता व टापटिपीसाठी ख्यातनाम आहेत.

येथे १९५४ पासून नगरपालिका आहे. महाराष्ट्र शासनाने पन्हाळ्यास गिरिस्थानाचा दर्जा दिल्यापासून शहरात गटारे, डांबरी रस्ते, विहिरी, बागबगीचे, सुटी-निवासस्थाने (हॉलिडे होम्स) वगैरे विविध सुधारणा झपाट्याने झाल्या. पन्हाळ्यावर अनेक चित्रपटनिर्माते, सिनेकलावंत, राजेरजवाडे यांचे टुमदार बंगले आहेत. येथील नयनमनोहर सृष्टिसौंदर्य व ऐतिहासिक वास्तू यांचा अनेक चित्रपटनिर्मात्यांनी चित्रपटांत उपयोग केला आहे.

नळदुर्ग किल्ला

उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील ऐतिहासिक ठिकाण. लोकसंख्या ७,३६७ (१९७१). क्षेत्रफळ ३४·७० चौ. किमी., स. स. पासून उंची ६७०·५६ मी. असून येथील हवामान आरोग्यवर्धक आहे.

हे तुळजापूरच्या आग्नेयीस सु. ३२ किमी. मुंबई-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर वसले आहे. येथील बोरी नदीकाठावरील चौदाव्या शतकातील नळदुर्ग हा किल्ला प्रसिद्ध असून या किल्ल्यावरूनच या ठिकाणास नळदुर्ग नाव पडले असे म्हणतात.

१८५३ पर्यंत नळदुर्ग जिल्ह्याचे आणि १९०५ पर्यंत तालुक्याचे हे मुख्य ठिकाण होते. नळदुर्ग दख्खन पठारावरील तटबंदी केलेल्या सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. यावर चालुक्य, बहमनी व आदिलशाही इत्यादींची सत्तांतरे झाली.

दुसऱ्या इब्राहिम आदिलशाहाने बोरी नदीवर धरण बांधून पाणीपुरवठ्याची कायमची सोय केली. स्वतःच्या सुखसोयींसाठी त्याने किल्ल्यात बांधलेला पाणी-महाल हे येथील मुख्य आकर्षण आहे. येथे १९४६ पासून नगरपालिका आहे. कर्नल मेडोज टेलरच्या कारकीर्दीत (१८५३-५७) याची फार भरभराट झाली. त्याने येथील बाजारपेठ सुधारून व्यापारास चालना दिली आणि या किल्ल्याचा मनोवेधक वृत्तांतही लिहिला.

नळदुर्गच्या आसमंतात ज्वारी, गहू, कापूस इ. पिके होतात. येथे दवाखाना, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय आहे. राम, महादेव व हनुमान यांची मंदिरे येथे आहेत. वनवासकाळात रामाचा येथे काही दिवस मुक्काम होता, असे म्हटले जाते. येथे रामनवमीचा उत्सव होतो व पौष पौर्णिमेस खंडोबाची यात्रा भरते.

मुल्हेर किल्ला

महाराष्ट्रातील शिवकालातील एक महत्त्वाचा डोंगरी किल्ला. तो नासिक जिल्ह्यात बागलाण तालुक्यात (सटाणा) मुल्हेर शहराच्या दक्षिणेस ३·२१ किमी. वर आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची १,३१७ मी. आहे. येथे जाण्यासाठी मालेगाव-सटाणा-मुल्हेर अशी राज्य परिवहन महामंडळाच्या गाडीची सोय आहे. हा सह्याद्रीच्या साल्हेर-मुल्हेर फाट्यावर मालेगावच्या वायव्येस सु. ६२ किमी.वर आहे. याचे मुल्हेर, मोरा व हातगड असे तीन भाग असून मुल्हेरलाच बालेकिल्ला असे दुसरे नाव आहे. किल्ल्याची अर्धी चढण संपल्यावर एक माची असून तीवर जुन्या घरांचे अवशेष व मशीद आहे. इथून पुढे जाताना निरनिराळे दरवाजे लागतात आणि एका विवरातून वर गेल्यानंतर बालेकिल्ला लागतो. या किल्ल्यास आवश्यक तेथे सर्व ठिकाणी तटबंदी आहे. बालेकिल्ल्यावर फत्ते-इ-लष्कर, रामप्रसाद व शिवप्रसाद अशा प्रत्येकी दोन मीटर लांबीच्या तोफा आहेत; शिवाय कचेरी, भडंगनाथाचे मंदिर, सु. १५ टाकी व दोन दारूखाने आहेततारिख-इ-फीरोझशाही, आईन-इ-अकबरी, तारिख-इ-दिलखुश इ. फार्सी ग्रंथांतून मुल्हेरची माहिती ज्ञात होते. मुल्हेरचा पहिला उल्लेख तारिख-इ-फीरोझशाहीया ग्रंथात १३४० मध्ये आला असून त्यावेळी मुल्हेर आणि साल्हेर हे माणदेव नावाच्या एका सेनाधिकाऱ्याच्या ताब्यात होते. हा किल्ला शाहजहान बादशहाच्या वेळेपर्यंत बागुल वंशातील राजांच्या ताब्यात होता. इ. स. १६१० मध्ये इंग्रज प्रवासी फिंच म्हणतो की, ‘मुल्हेर व साल्हेर ही दोन्ही चांगली शहरे होती.’ शाहजहानच्या काळात औंरगजेब दक्षिणेचा सुभेदार असताना त्याने प्रथम हा किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बागुल वंशी राजा भैरवसेनाने हा किल्ला कित्येक महिने मोठ्या शर्थीने लढविला; पण शेवटी त्याला तो किल्ला औरंगजेबास देऊन शाहजहानची मनसबदारी पतकरावी लागली. औरंगजेबाने या किल्ल्याचे नाव औरंगगड असे ठेवले. हा किल्ला घेण्याचे कामी भिकुजी चव्हाण, हंबीरराव मोहिते यांनी मोगलांना फार मदत केली होती. पुढे १६७२ च्या आगेमागे हे किल्ले छ. शिवाजींनी जिंकून घेतले. तत्पूर्वी १६६३ मध्ये सुरतेच्या लुटीच्या वेळीही हे किल्ले शिवाजींच्या ताब्यात होते. शिवाजीनंतर हे किल्ले पुन्हा मोगलांच्या ताब्यात गेले; पण साल्हेर किल्ला मात्र मोगलांना लाच देऊनच हस्तगत करावा लागला. पुढे उत्तर पेशवाईत १७५० च्या सुमारास मुल्हेरसकट इतर किल्ले मराठ्यांच्या ताब्यात आले. मराठी सत्तेच्या अवनतीनंतर १५ जुलै १८१८ रोजी हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यावेळी तेथील किल्लेदार रामचंद्र जनार्दन फडणीस यास माफी मिळाली.

वासोटा किल्ला

महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक इतिहासप्रसिद्ध वनदुर्ग. तो सातारा शहराच्या पश्चिमेस सु. ४० किमी. वर जावळी तालुक्यात सह्याद्रीच्या घनदाट जंगलात आहे. मराठ्याचा सेनापती बापू गोखले याने या किल्ल्याच्या दुर्गमतेबद्दल काढलेले उद्‌गार एका पत्रात नोंदण्यात आले आहेत. ह्याची सस पासून उंची १,१७२ मी. आहे. साताऱ्याहून बामणोलीला सु. ४० किमी. गेल्यावर बामणोलीहून नावेतून १५ किमी. वर मेट-इंदवली हे ठिकाण लागते. तेथून गडाच्या चढणीस प्रारंभ होतो. हा मार्ग अलीकडे अधिक वापरात आहे.

सुमारे तीन-चतुर्थांश डोंगर चढल्यानंतर चोहोंकडून तासलेल्या कड्यापाशी प्रवासी येऊन पोहोचतो आणि अत्यंत अरुंद अशा वाटेने हा कडा चढून गेल्यावर गडाचा अंडाकृती माथा त्याच्या दृष्टोत्पत्तीस येतो. गडावर सु. सहा हेक्टर सपाट क्षेत्र आहे. जांभ्या दगडाने बांधलेले एक लहानसे चंदकाईचे मंदिर व स्वच्छ पाण्याची दोन टाकी आहेत. गडाच्या पश्चिमेस ताई तेलिणीचा कडा प्रसिद्ध असून सु. ४५७ मी. उंच लांबट भिंतीसारखा आहे.

पूर्वी देहांताची शिक्षा झालेल्या कैद्यांचा कडेलोट तेथून करीत. माथ्याच्या उत्तरेकडील एक सुळका सोंडेप्रमाणे लांबवर पसरला आहे. ही किल्ल्याची माची होय. तिला काळकाईचे ठाणे म्हणतात. तिच्या पोटात एक गुहा आहे. तीत नागेश्वर नावाचे शिवलिंग असून त्यावर गुहेच्या छतातून पाणी झिरपत असते. त्या ठिकाणी शिवपार्वतीची एक सुबक मूर्ती आहे. अलीकडे संशोधकांना तेथे बाराव्या शतकातील काही वास्तूंचे जोते, विशेषतः नहाणीघर व कोठार यांच्या खुणा आढळल्या तसेच सोळाव्या शतकातील काही हत्यारेही उपलब्ध झाली आहेत.

वासोट्याचा प्राचीन इतिहास सुस्पष्ट नाही. कोल्हापूर शिलाहार शाखेतील दुसरा भोजराजा (कार. ११७८-९३) याने हा किल्ला बांधला. त्यानंतर सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात तो अनुक्रमे शिर्के आणि मोरे या आदिलशाहीतील सरदारांच्या आधिपत्याखाली होता. छ. शिवाजी महाराजांनी जावळीच्या

चंद्रराव मोऱ्यांचा पराभव करून त्या परिसरातील इतर मुलूख काबीज केला, त्यावेळी १६५५ मध्ये वासोटा त्यांनी घेतला आणि त्याचे नाव व्याघ्रगढ ठेवले; तथापि कालौघात ते कागदोपत्रीच राहिले. महाराजांनी राजापूरला पकडलेल्या इंग्रजांना सु. १० वर्षे या किल्ल्यात कैदेत ठेवले होते. छ. संभाजी व छ. राजाराम यांनी या किल्ल्याकडे विशेष लक्ष दिले नाही. उत्तर पेशवाईत हा किल्ला औंधच्या थोटे पंतप्रतिनिधींकडे गेला.

दुसऱ्या बाजीरावाने प्रतिनिधींना कैद करून मसूरला ठेवले, तेव्हा थोटे पंतप्रतिनिधींची रखेली ताई तेलीण हिने हा किल्ला काबीज करून तेथे वास्तव्य केले व प्रतिनिधींची तुरुंगातून मुक्तता केली. बाजीरावाने वासोटा घेण्याची कामगिरी बापू गोखल्यावर सोपविली. त्याने वासोट्यावर चढाई केली व जवळच्या उंच टेकडीवरून वासोट्यावर तोफेचा मारा केला. ताई तेलिणीने सु. आठ महिने हा किल्ला लढविला; पण अखेर तिचा पराभव झाला. त्यानंतर हा किल्ला कैद्यांसाठीच वापरात होता.

बाजीरावाने काही दिवस येथे छ. प्रतापसिंह व त्यांच्या कुटुंबियांना किल्ल्यात ठेवले होते (१८१७). त्यानंतर मराठ्यांनी कॉनेटस् हंटर आणि मॉरिसन या मद्रासच्या दोन इंग्रज अधिकाऱ्यांना पुण्याकडे जात असताना पकडून वासोट्यास कैदेत ठेवले होते. म्हतार्जी कान्होजी चव्हाण नावाच्या शिपायाने त्यांची उत्तम देखभाल केली; म्हणून पेशवाईच्या अस्तानंतर ब्रिटिश शासनाने त्यास बक्षीस दिले. जनरल प्रिझलर या इंग्रज सेनापतीने २९ मार्च १८१८ रोजी शेजारच्या जुन्या वासोटा टेकडीवर तोफा चढवून त्यांच्या मारगिरीने हा किल्ला हस्तगत केला.

अव्वल इंग्रजी अंमलात आणि स्वातंत्र्यानंतरही काही वर्षे या किल्ल्याकडे दुर्लक्ष झाले. कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामुळे किल्ल्याच्या भोवतालची आडोशी, माडोशी, शेंबडी, तबदी, कुसावळ, तांबी, खिरखिंडी, आंबवडे, वासिवटा, शेलटी इ. खेडी उठली. सांप्रत विद्यार्थ्यांची शिबिरे आणि सहली यांमुळे वासोट्याची पायवाट तयार झाली असून हौशी प्रवाशांच्या गिर्यारोहणाचे ते आकर्षण बनले आहे.

रायगड

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आणि शिवछत्रपतींनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी. रायगड जिल्ह्यात तो महाडच्या उत्तरेस २५ किमी. वर व जंजिऱ्याच्या पूर्वेस ६५ किमी. वर सह्याद्री पर्वतश्रेणींत ५·१२५ चौ. किमी. घोड्याच्या नालाप्रमाणे आकार असलेल्या पठारावर वसला आहे. त्याची सस.पासून उंची ८४६ मी. असून सभोवती सांदोशी, छत्री निजामपूर, वाघेरी, वाडी, पाचाड असे खेड्यांचे गट दिसतात. रायरी हे या टेकडीचे जुने नाव. पाश्चात्त्य लोक त्याचा उल्लेख पूर्वेकडील जिब्राल्टर असा करीत. ईशान्येकडील लिंगाणा, पूर्वेकडील तोरणा, दक्षिणेकडील कांगोरा चांभारगड-सोनगड, वायव्येकडील तळेगड व उत्तरेकडील घोसाळगड या किल्ल्यांची रायगडाभोवती संरक्षणाची फळी उभी राहिली. हे जाणूनच शिवाजी महाराजांनी तेथे राजधानी केली.

रायगडचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही. रायगडविषयी अनेक कथा, दंतकथा-वदंता प्रचलित आहेत. छ. शिवाजी-संभाजी यांच्या कारकीर्दीत येथे इंग्रज, डच, पोर्तुगीज इ. वकिलांनी भेट देऊन या किल्ल्याचे वर्णन लिहून ठेवले आहे. त्यांत फ्रायर, हेन्री ऑक्सिंडेन, गोन्कालो मर्तिन्स, टॉमस निकल्स आदींचे वृत्तांत इतिहासावर प्रकाश टाकतात. बाराव्या शतकात रायरी हे मराठे पाळेगारांचे निवासस्थान होते. चौदाव्या शतकात या पाळेगारांनी विजयानगरचे मांडिलकत्व पतकरले. इ. स. १४३६ मध्ये दुसऱ्या अलाउद्दीन बहमनीशाहने तो आपल्या ताब्यात घेतला.

इ. स. १७४९ मध्ये अहमदनगरच्या निजामशाहने रायरी आपल्या ताब्यात घेतली. याकुत इस्तंबोली हा त्यांचा किल्लेदार असतानाच आदिलशाहीच्या वतीने हैबतखानाने रायरीवर हल्ला केला आणि आसपासच्या प्रदेशांसह किल्ला जिंकला. त्याने राजे पतंगराव यास किल्लेदारी दिली. पुढे मलिक जमरून हा हवालदार झाला (१६२१). पुन्हा हा किल्ला निजामशाहीत गेल्याचे दिसते. मोगलांनी निजामशाही नष्ट केल्यानंतर आदिलशाहाशी झालेल्या करारानुसार रायरी आदिलशाहीकडे आली (१६३६). आदिलशाहने १६३६ ते १६४४ दरम्यान जंजिऱ्याच्या सिद्दी घराण्यातील इब्राहीम, सय्यद कब्बरी व शेख अली यांना हवालदारीचे हक्क दिले.

नंतर चंद्रराव मोरे यांच्याकडे रायरी आदिलशाहीतर्फे गेली. शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून १६५६ च्या सुमारास चंद्रराव मोऱ्यांकडील सर्व किल्ले काबीज केले. त्यात रायरी १५ एप्रिल ते १४ मे १६५६ दरम्यान त्यांच्या हाती आली असावी. शिवाजींनी रायरीचे रायगड असे नाव ठेवले आणि राजधानी करण्याच्या दृष्टीने कल्याणचा सुभेदार आबाजी सोनदेव यास इमारतींची डागडुजी, नव्या इमारती बांधणे, सुरक्षिततेसाठी तटबंदी उभारणे, पाणी पुरवठ्याची व्यवस्था करणे इ. कामे सोपविली. या कामी पन्नास हजार होन खर्च करण्यात आला. तिथे तीन-चार वर्षांत लहानमोठ्या तीनशे वास्तू बांधण्यात आल्या. शिवाजी महराजांनी १६६२ मध्ये कायमच्या राजधानीसाठी रायगडची निवड केली; तथापि १६७० पर्यंत येथे राजधानी हलविण्यात आली नव्हती.

१६७४ मध्ये येथेच स्वतःला महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर १६८९ पर्यंत तो छ. संभाजीच्या ताब्यात होता. पुढे मोगलांनी तो घेतला (१६८९) आणि नंतर पुन्हा मराठ्यांनी घेतला (१७३५); परंतु त्याचे वैभव नष्ट झाले. उत्तर पेशवाईत तो राजकीय कैद्यांच्या बंदिवासाचे ठिकाण होते. नाना फडणीस व दुसरा बाजीराव यांनी पडत्या काळात सहकुटुंब त्याचा आश्रय घेतला. नाना फडणीसाने १७९६ मध्ये काही इमारतींची डागडुजी केली. मराठ्यांचा पराभव करून ब्रिटिश लष्करी अधिकारी कर्नल प्रॉथरने १० मे १८१८ रोजी रायगड जिंकून घेतला. त्यावेळच्या तोफांच्या माऱ्यात अनेक इमारती पडल्या. त्यानंतर शिवजयंती उत्सवानिमित्त १८९७ मध्ये लो. टिळक प्रभृतींनी लोकजागृतीसाठी या ऐतिहासिक वास्तूला पुन्हा उजाळा दिला. आता ते पर्यटकांचे एक प्रेक्षणीय स्थान झाले आहे.

नगारखाना, मनोरे, बुरूज, मंदिरे इ. काही तुरळक वास्तू वगळता रायगडावरील बहुतेक इमारती आज नष्ट झालेल्या आहेत. त्यांचे भग्न अवशेष इतस्ततः विखुरलेले असून त्यांतून वास्तूंच्या भव्यतेची कल्पना येते. रायगडावर पाचाडकडून वाडीमार्गे जाणारा रस्ता अधिक सोयीचा आहे. किल्ल्यास हिरकणी, टकमक, भवानी आणि श्रीगोंदे अशी चार टोके असून टकमक टोक व हिरकणी यांबद्दल रोमांचकारी दंतकथा प्रसिद्ध आहेत.

चोर दरवाज्याशिवाय किल्ल्याला एकच महाद्वार आहे. इतर बाजूंनी कातळ व काही ठिकाणी तटबंदी आहे. नाणे दरवाजा हे रायगडचे सुरुवातीचे प्रवेशद्वार असून त्याच्या आतील बाजूस महादरवाजा लागतो. तेथे बावीस मीटर उंचीचे दोन बुरूज आहेत. पहारेकऱ्यांसाठी दोन देवड्या होत्या. त्यातून आत गेल्यानंतर कोठारे लागतात. शिवाजींनी मुसलमानांसाठी एक मशीद बांधली होती. दक्षिणेस आडवाटेला चोरदरवाजा आहे. पुढे एक किमी.वर रायगडचा सपाट भाग आहे. येथे फरास मदारशाह या मुस्लिम साधूची कबर आहे. त्याजवळ अंडाकृती हत्ती तलाव (३३ X २३ मीटर) आणि पुढे शंभर मीटरवर गंगासागर तलाव (३३ X ३० मीटर) आहे. त्याच्या दक्षिणेस दोन मजली उंच दोन मनोरे आहेत. पूर्वी ते पाच मजली होते.

मनोऱ्याच्या पश्चिमेस एकतीस पायऱ्या चढून गेल्यावर बालेकिल्ल्याचा पालखी दरवाजा लागतो. बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ ३०० X १५० मीटर असून सभोवती तटबंदी होती. आतील बाजूस जीर्ण झालेल्या इमारतींच्या दोन रांगा लागतात. उजवीकडे राण्यांचे सात महाल असून डावीकडे चाकरांच्या खोल्या होत्या.

त्या सर्वांची संडास-सांडपाण्यासह उत्तम व्यवस्था केलेली होती. बालेकिल्ल्याच्या मध्यभागी सिंहासनाचा चौथरा असून तो सुस्थितीत आहे. सिंहासनासमोर कारंजे असून त्यापुढे पूर्वेला १६ मीटर उंचीचा भव्य नगारखाना आणि बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. येथेच शिवाजीराजांचा दरबार भरत असे. या सभागृहात ध्वनिकीच्या दृष्टीने विचार केलेला दिसतो; कारण नगारखान्यासमोरील व्यक्तीस सिंहासनाजवळ बोललेले स्पष्ट ऐकू येते. त्यासमोर शिवाजींचा वाडा व त्याभोवती कार्यालयीन इमारती होत्या.

नगारखान्याच्या पूर्वेस कुशावर्त नावाचा तलाव आहे व जवळच श्रीगोंदे टोक आहे. याच्या दरम्यानच्या जागेत शिवाजींच्या अष्टप्रधानांचे वाडे होते. त्याच्या थोडे पुढे दारूखान्याचे कोठार (२५ X ६ मीटर) आहे. बालेकिल्ल्याच्या वायव्येस पीलखान्याची जीर्णशीर्ण वास्तू आहे. त्याच्या उत्तरेस गडावरील प्रसिद्ध बाजारपेठेचे अवशेष जोत्याच्या रूपाने अवशिष्ट आहेत. दोन्हीकडील मिळून येथे एकूण चव्वेचाळीस दुकाने होती. दोन रांगांत फरसबंदी असून सु. बारा मीटरचा रुंद रस्ता आहे. तेथून ईशान्येस प्राकारात हेमाडपंती पद्धतीने बांधलेले जगदीश्वर महादेवाचे मंदिर असून त्याच्या प्रवेशद्वारापाशी मारुतीची सुरेख पाषाणमूर्ती आहे. मंदिराभोवती नृत्यांगनांच्या राहण्याच्या खोल्या आहेत. मंदिरात एका शिलालेखावर राज्याभिषेकाची मिति-तिथी व शक यांचा उल्लेख आहे. मंदिराच्या पूर्व दरवाज्याच्या पुढे शिवछत्रपतींची समाधी व घुमटाकृती स्मारक आहे. त्याच्या समोर इमानी वाघ्या कुत्र्याचेही स्मारक आहे.

रायगडावरील इमारतींचा कालदृष्ट्या शोध घेणे कठीण आहे. शिवाजी-संभाजीनंतर त्याकडे दुर्लक्ष झाले आणि पेशवाईत तिथे फारसे बांधकाम झाले नाही, हे निश्चित. येथील वास्तुशैलीविषयी तज्ञांत मतैक्य नाही. अवशिष्ट वास्तूंतून सार्सेनिक व इस्लामी वास्तुशिल्पशैलीचे मिश्रण आढळते, प्रसंगोपात्त त्यात काही स्थानिक वास्तुविशेषही मिसळलेले दिसतात.

राजगड

शिवकालातील एक महत्त्वाचा डोंगरी किल्ला. छत्रपती शिवाजींची सुरूवातीची राजधानी येथे होती. तो महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात (वेल्हे तालुका) वेल्हे गावाच्या आग्नेयीस सु. १६ किमी.वर समुद्रसपाटीपासून १,३७६ मी. उंचीवर आहे. पायथ्याच्या गुंजवणे गावापासून पायवाटेने गडावर जाता येते. तेथूनच राजगडचा चढ सुरू होतो. हत्ती, घोडे वगैरे वाहने जातील एवढी रूंदी वाट आहे. या गडाला उत्तरेस पद्मावती, आग्नेयीस सुवेळा आणि नैर्ॠत्येस संजीवनी अशा तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे. याचा तट व बुरूज अनेक ठिकाणी दुहेरी म्हणजे चिलखती आहेत. यावर येण्यास गुंजपा, पाली, आळू व काळेश्वरी असे चार दरवाजे व तीन दिंड्या आहेत.

पद्मावती माची पुष्कळ लांब-रूंद असल्यामुळे राजगडावरील मुख्य वस्ती येथेच होती. तथापि सुवेळा व संजीवनी ह्या दोन्ही माच्यांवर आणि बालेकिल्ला यांवरही वस्ती होती. खुद्द छ शिवाजी महाराज कुटुंबासह या बालेकिल्ल्यावर रहात असत. सुवेळा माची साधारण सपाट व चिंचोळी आहे.

उलट संजीवनी माची चिंचोळी असली, तरी पायऱ्‍या पायऱ्‍यांनी खाली व वर चढत गेली आहे. येथील मुख्य देवता पद्मावती; तिचे मंदिर पद्मावती माचीवर आहे. याशिवाय पूर्वी हवालदाराची सदरसुध्द येथेच होती; पण स्वातंत्र्योत्तर काळात ती भुईसपाट झाली आहे. तिन्ही माच्या व बालेकिल्ला यांवर गणेश, मारूती, ब्रम्हर्षि, जननी काळेश्वरी, भागीरथी यांची लहानमोठी मंदिरे आणि दारूखाना, दिवाणघर, राजवाडा, पागा इ. कमीअधिक पडीक अवेस्थेतील वास्तू आहेत.

प्रत्येक माची व बालेकिल्ला यांवर पाण्याची व्यवस्था असून पद्मावती माचीवरील तळे पुष्कळच मोठे आहे. बालेकिल्ल्यावर लहानशी बाजारपेठ असून, त्या नमुन्यावरच पुढे रायगडची बाजारपेठ उभारलेली दिसते. या डोंगराचे प्रारंभीचे नाव मुरूमदेव. याला बहमनी आमदानीत महत्त्व नव्हते; पण अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक पहिला अहमद याने मुरूमदेव आपल्या ताब्यात घेतला. तदनंतर त्यास गडाचे रूप येऊ लागले. या गडाचे रक्षण करण्याचे काम प्रथम गुंजण माळवातील शिलिमकर देशमुखांकडे होते.

शिवाजीने १६४७ नंतर लवकरच मावळातील निरनिराळे गड आपल्या ताब्यात घेतले. त्याबरोबरच मुरूमदेव आपल्या ताब्यात घेतला. त्याला राजगड हे नाव देऊन ते आपले राजधानीचे ठिकाण केले. यामुळे प्रथम काही दिवस शिलिमकर व शिवाजी यांत कुरबुरी होत असत. शिवाजींनी १६७० पर्यंत हीच राजधानी ठेवली. शिवाजी व पुढे संभाजीनंतर हा किल्ला एकदोन वेळा औरंगजेबाच्या ताब्यात गेला असला; तरी तो सामान्यतः मराठयांच्याच ताब्यात राहिला. छ. शाहूंच्या कारकीर्दीत मावळातील कित्येक किल्ले भोरच्या सचिवांच्या ताब्यात दिले होते. सिंहगड वगळता संस्थाने विलीन होईपर्यंत ते त्यांच्या ताब्यात राहिले. त्यावेळी तेथे हवालदार व काही अधिकारी वर्ग असे.

रांगणा किल्ला

महाराष्ट्रातील शिवकालीन एक प्रसिद्ध किल्ला. हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातकुडाळ तालुक्यातकोल्हापूरच्या नैऋत्येस सु. ७८ किमी. वर सह्याद्रीच्या पर्वतरांगांत आहे.

याची उंची सस. सु. ८०० मी. असून याच्या तीन बाजूंस तुटलेला कडा आहे. त्याची लांबी १,६०० मी. असून रुंदी ९०० मी. आहे. त्याच्या पूर्वेच्या बाजूने या किल्ल्यावर जाता येते. यास कोल्हापूरपाटगाव,तांबडेवाडीचिक्केवाडी या मार्गाने बसने जाता येतेपण पावसाळ्यात हा मार्ग बंद पडतो. चिक्केवाडीहून रांगण्यास प्रायः चढ नाही.

उलट सु. ७ मी. उतरल्यावर किल्ल्याचा माथा येतो. त्याचा तट अनघड दगडांनी बांधलेला होता. किल्ल्याला पूर्वेकडून एकामागून एक तीन दरवाजे व पश्चिमेस एक दरवाजा आहे. पाण्यासाठी माथ्यावर एक तलाव व दोन विहिरी आहेत. गडावर रांगणाई (महिषमर्दिनी)मारुतीमहादेव यांची देवालये असून एका वाड्याचे जुने अवशेषही तेथे दिसतात.

रांगणाईसमोर एक पडझड झालेली दीपमाळ आहे. शिवाजीनी पन्हाळ्याप्रमाणे हा किल्लाही १६५९ मध्ये हस्तगत करून त्याची डागडुजी केली. छ. शाहूंबरोबरच्या युद्धात महाराणी ताराबाईंनी याचा आश्रय घेतला होता (१७०९). १८४४ मधील कोल्हापूरच्या बंडानंतर इंग्रजांनी ह्या किल्ल्याची तटबंदी पाडून टाकली आणि तो ताब्यात घेतला. प्रसिद्धगड म्हणूनही तो ओळखला जातो.

परांडा किल्ला

महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील त्याच नावाच्या तालुक्याचे व इतिहासप्रसिद्ध किल्ल्याचे ठिकाण. लोकसंख्या ८,७९८ (१९७१). बार्शीच्या पश्चिमेस सु. २७ किमी.वर सीना व तिच्या उपनद्यांदरम्यान ते वसले आहे. पुराणात याचा उल्लेख परमधामपूर या नावाने आढळतो. पुढे त्यास प्रचंडपूर म्हणू लागले आणि त्यानंतर परांडा हे नाव रूढ झाले.

येथे नगरपालिका असून सर्व तहसील कार्यालये आहेत. गावाच्या मध्यवस्तीत परांडा हा भुईकोट किल्ला आहे. त्याच्याभोवती खंदक आहे आणि २६ बुरूजांच्या तटांच्या आत काही वास्तू व एक मशीद आहे. या मशिदीच्या मागे बऱ्याच अंतरावर एका तळघरात काही वीरगळ व शिल्पे आहेत. तसेच मशिदीचे स्तंभ व तीवरील जाळीकाम मुसलमानपूर्व काळातील हिंदू मंदिरांची शैली सूचित करतात.

हेमाद्रीने आपल्याचतुर्वर्गचिंतामणि ग्रंथातील व्रतखंडाच्या प्रस्तावनेत यादव घराण्यातील भिल्लम राजाने प्रत्यंडकाच्या राजाला जिंकले, असे म्हटले आहे. हे प्रत्यंकड म्हणजेच परांडा असावा. परमानंद कवीच्या श्रीशिवभारत काव्यात त्याचा निर्देश प्रचंडपूर म्हणून केलेला आढळतो. बहमनी सुलतानांपैकी दुसरा महंमूदशाह याच्या महमूद गावान या मुख्यमंत्र्याने तो बांधला असावा असे एक मत आहे, तर तो महमूद ख्बाजा गावान याने बांधला असावा, असे दुसरे मत आहे. बहमनी सत्तेच्या -हासानंतर तो अहमदनगरच्या निजामशाही सत्तेखाली आला. निजामशाहीत या किल्ल्यास अधिक महत्त्व प्राप्त झाले.

१३०० मध्ये मोगलांनी काही काळ त्यावर आधिपत्य गाजविले. शहाजीच्या ताब्यात हा किल्ला काही वर्षे होता. आदिलशाहाने १६३० मध्ये हा किल्ला जिंकल आणि तेथील मूलूक मैदान (मालिक मैदान) हि मोठी तोफ विजापूरला नेली. पुन्हा १६५७ मध्ये तो मोगलांकडे गेला. विजापूरची आदिलशाही व दिल्लीचे मोगल यांच्या ताब्यात आलटून पालटून हा किल्ला राहिला. पेशवाईत त्याला फारसे महत्त्व राहिले नाही.

पद्मदुर्ग किल्ला

कुलाबा जिल्ह्यातील एक भुईकोट किल्ला, मुरुड तालुक्यात राजपुरी खाडीच्या मुखापाशी जंजिऱ्याच्या वायव्येस सु. ३ किमी. वर एका खडकावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. निजामशाहीच्या काळात सद्दी लोकांनी कुलाबा व रत्नागिरी या जिल्ह्यांतील समुद्रकिनाऱ्यावर आपली सत्ता स्थापन केली आणि तेथे काही जलदुर्ग व भुईकोट किल्ले बांधले. दांडा राजपुरी हा त्यांपैकीच एक किल्ला होता. हा किल्ला घेण्याचा शिवाजी महाराजांनी खूप प्रयत्न केला; पण तो घेणे त्यांना शक्य झाले नाही.

निदान दांडा राजपुरीकडील सिद्यांची सत्ता वाढू नये, म्हणून शिवाजीने दांडा राजपुरीसमोर सिद्दीला जरब बसविण्याच्या उद्देशाने एक नवीनच भुईकोट किल्ला बांधला आणि त्यास पद्मदुर्ग हे नाव ठेविले. या किल्ल्याच्या आश्रयाने दांडा राजपुरी काबीज करण्याच्या हेतूने पेशवे मोरोपंत पिंगळे १६६९ मध्ये दांडा राजपुरीवर चालून गेले असता, त्या प्रेदशातील शिवाजीच्या सुभेदाराने मोरोपंतास आवश्यक ती सामग्री पुरविली नाही. त्यामुळे शिवाजीच्या आरमाराची कुचंबणा झाली आणि ही मोहीम फसली. सुभेदाराने आपल्या कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पुढे शिवाजीने एका पत्रात त्याची खरमरीत शब्दात कानउघाडणी केली. यानंतर मात्र या किल्ल्याचे नाव फारसे एकू येत नाही.

प्रचंडगड किल्ला

(तोरणा). शिवकालीन एक डोंगरी किल्ला. तोरणा या नावाने तो प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात भोरच्या वायव्येस सु. २६ किमी. व पुण्याच्या नैर्ऋत्येस सु. ६५ किमी.वर तो वसला आहे. नसरापूर-वेल्हे रस्त्यावरील वेल्हे बुद्रुकपासून किल्ल्याकडे रस्ता जातो. उंची समुद्रसपाटीपासून सु. १,४०४ मीटर. शिवाजी महाराजांपूर्वी कानद खोऱ्याचा देशमुख कान्होजी झुंजारराव मरळ हा या किल्ल्याची व्यवस्था पाही. शिवाजी महाराजांनी १६४६ च्या सुमारास तो घेतला आणि त्यास प्रचंडगड हे नाव दिले. पुढे मिर्झाराजा जयसिंगबरोबर झालेल्या पुरंदरच्या तहानुसार शिवाजीने तो औरंगजेबास दिला (१६६५); पण पुन्हा १६७१-७२ मध्ये तो परत घेतला आणि सु. ५,००० होन खर्चून त्याची डागडुजी केली. संभाजीच्या मृत्यूनंतर तो कधी मोगलांकडे, तर कधी मराठ्यांकडे होता. औरंगजेबाने तो १७०४ मध्ये जिंकल्यावर त्याचे नाव फुतूहुल्घैब असे ठेवले. शाहूच्या कारकीर्दीत तो मराठ्यांकडे आला आणि भोर संस्थान विलीन होईपर्यंत भोरच्या पंतसचिवांच्या आधिपत्याखाली होता. या गडाचे झुंजारमल व बुधला अशा दोन माच्या व थोड्याशाच उंचीचा बालेकिल्ला असे तीन भाग आहेत. झुंजारमल माची विस्ताराने लहान आहे; पण ही उणीव बुधला माचीच्या विस्ताराने भरून काढली आहे. कदाचित या विस्तारामुळेच याला प्रचंडगड असे नाव दिले असावे. या किल्ल्यास एकामागून एक बिनी व कोठी असे दोन मुख्य दरवाजे असून त्यांतून गडाच्या माथ्यावर येताच तोरणजाईची देवळी, अंबारखाना, तोरण व खोकड ही टाकी लागतात. येथील तटास टकमक, भेद, झुंजार, सफेती, माळेचा, फुटका व चिलखती असे बुरूज आहेत. पाण्यासाठी खांब, कापूर, शिवगंगा, पाताळगंगा, महाळुंगे, महार, मेंगाई इ. टाक्या आहेत. गडावर सदरा, विशाळा, दारूखाना, लक्कडखाना इ. वास्तू असून शिवाय घंगाळजाई व वरदानी यांची मंदिरे आहेत.

पुरंदर किल्ला

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या याच नावाच्या तालुक्यातील एक प्रसिद्ध व बळकट डोंगरी किल्ला. तो पुण्याच्या दक्षिणेस सु. ४० किमी. वर व सासवडच्या नैर्ऋत्येस सु. १० किमी. वर एका उंच टेकडीवर वसला आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची १,३९८ मी. असून त्याच्या पूर्वेस भैरवखिंडीच्या पलीकडे वज्रगड किंवा रुद्रमाला हा छोटा पण मोक्याचा किल्ला आहे. पुरंदर, बालेकिल्ला व माची या दोन भागांत असून बालेकिल्ला माचीपेक्षा सु. ७० मी. उंच आहे. येथे सपाटी अगदी कमी असून फक्त केदारेश्वर मंदिर ही महत्त्वाची वास्तू आहे. पुरंदरची मुख्य वस्ती माचीवर असून तेथे जुन्या-नव्या अनेक वास्तू आहेत. किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ सहा चौ. किमी. असून सभोवती भिंतींची लांबी ४२ किमी. आहे. जुन्या वास्तूंत दिल्ली दरवाजा, गणेश दरवाजा व चोर दरवाजा ही तीन प्रमुख द्वारे; खंडकडा, बावटा, फत्तेह, कोंकणी, हत्ती इ. सहा बुरूज; दोन मनोरे, साखरी तलाव, मुकारशी तलाव, म्हसोबाची टाकी, महादेव मंदिर इत्यादींचा समावेश असून दगडी अंबरखाने, जुना राजवाडा, पुरंदर्यांाचा वाडा, सवाई माधवरावांच्या जन्मस्मरणार्थ बांधलेले देऊळ वगैरेंचा अंतर्भाव होतो. नव्या वास्तूंत माचीवरील लष्करी कँटोनमेंटच्या विविध इमारती, आरोग्यधाम, रुग्णालय, ईगल्स नेस्ट-बंगला, दर्गा तसेच मुरारबाजी देशपांडे या शूर योद्ध्याचा भव्य पुतळा इ.प्रसिद्ध आहेत. इंग्रजी अंमलात सदर्न कमांड या लष्करी तुकडीचे ते एक महत्त्वाचे केंद्र होते.

हा किल्ला निश्चितपणे कुणी व केव्हा बांधला याविषयी विश्वासार्ह माहिती ज्ञात नाही; तथापि बाराव्या-तेराव्या शतकांत तो बांधला असावा, असे काही अवशिष्ट पुराव्यांवरून दिसते. बहमनी राजा अलाउद्दीन हसन गंगू याने १३५० मध्ये त्याची तटबंदी मजबूत केली व पुढे महमूदशाह या बहमनी राजाने तेथे अर्धचंद्राकृती बुरूज बांधले (१३८४). अहमदनगरच्या मलिक अहमदने तो घेतला (१४८६) आणि पुढे जवळजवळ शंभर वर्षे तो निजामशाहीकडे होता. मालोजी भोसलेस तो १५९६ मध्ये इतर जहागिरींबरोबर मिळाला. मधली काही वर्षे सोडता तो शहाजी व पुढे शिवाजीकडे होता. शिवकाळात त्यास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. मोगल सरदार जयसिंग व दिलेरखान यांनी १६६५ मध्ये त्यास वेढा दिला. या वेढ्यात शिवाजीचा किल्लेदार मुरारबाजी देशपांडे मोठा परक्रम करून धारातीर्थी पडला. मोगलांनी किल्ला काबीज केला व शिवाजीने मोगलांबरोबर तह केला. शिवाजीने पुन्हा तो १६७० मध्ये घेतला; पण औरंगजेबाने दक्षिणेच्या स्वारीत तो जिंकला (१७०५). त्यानंतर तो पुन्हा मराठ्यांकडे आला. प्रथम ताराबाईच्या वतीने शंकर नारायण सचिव याने तो काबीज केला (१७०७). शाहूने तो बाळाजी विश्वनाथला बक्षीस दिला (१७१४)व पेशवाईत तो एक महत्त्वाचा किल्ला ठरला. रघुनाथरावाने तो पुरंदरे सरदाराला दिला (१७६४). बारभाईंच्या कारस्थानाची सर्व सूत्रे नाना फडणीसाने येथूनच हालविली. पुढे सवाई माधवरावांचा जन्म येथेच झाला. यानंतर इंग्रज-मराठे तह झाला. तो ‘पुरंदर तह’ म्हणून प्रसिद्ध आहे (१७७६). पेशव्यांचे उन्हाळ्यातील थंड हवेचे स्थळ म्हणूनही त्यास प्रसिद्धी मिळाली. १८१८ मध्ये तो ब्रिटिशांच्या ताब्यात गेला आणि ब्रिटिशांनी तेथे लष्करी तळ उभारिला. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रातील एक गिर्यारोहण लष्करी प्रशिक्षण केंद्र म्हणून त्यास महत्त्व प्राप्त झाले

सज्जनगड किल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रायगड हि शिवशाहीची तर सज्जनगड हि अध्यात्मिक राजधानी मानली जात होती. समर्थ रामदास स्वामी यांनी जिथे समाधी घेतली तो सज्जनगड किल्ला सातारा शहरापासून अवघ्या ९ कि.मी. अंतरावर आहे. या किल्ल्याला ७५० पायऱ्या आहेत. तसेच याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ३००० फुट आहे. या किल्ल्यावरती २ तलाव आहेत. समर्थ रामदास स्वामी यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची लढाई लढली. समर्थ रामदास स्वामी हे छ. शिवाजी महाराजांचे अध्यात्मीक गुरु होते. दास नवमी दिवशी असंख्य भाविक इथे जमतात आणि दास नवमीचा उत्सव साजरा करतात.

हाजीमलंग गड

 

ठाणे जिल्हयातील कल्याणच्या दक्षिणेस सुमारे 15 कि.मी. अंतरावरमलंगगड किल्ला आहे. मलंगगड हे धार्मिक स्थान श्री मलंग किंवा हाजी मलंग या नावाने ओळखले जाते. मलंगगड हा किल्ला शिलाहार राजाने बांधला. येथे मच्छिंद्रनाथांचे पुरातन मंदिर आहे आणि हाजीमलंग या मुसलमान साधूची कबर आहे. या कबरीच्या पूजेचा मान आजही हिंदूकडेच आहे. माघ पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते.

रायगड जिल्हयातील अन्य किल्ल्याप्रमाणेच माथ्यावर अवघड सुळका, व खाली थोडी माची आहे. ठाणे जिल्हयाच्या व रायगड जिल्हयाच्या सरहद्दीवर या किल्यावर बाबामलंग यांची समाधी आहे. किल्ल्यावरील पुजास्थानाच्या वर बराच उंच डोंगर आहे. तेथे तटबंदी, प्रवेशद्वार पाण्याची तळी, बुरुज आढळतात. अगदी उंचावरुन आजूबाजूला पाहिल्यास कुर्ला-मुंबईचा परिसर, पनवेलपर्यंतचा प्रवेश, तसेच माथेरानचा प्रदेश दिसतो. कल्याण स्थानकावरुन गडाच्या पायथ्याशी जाण्यासाठी बसचा उपयोग होतो. मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकाहून अर्ध्या तासात बसने गडाच्या पायथ्याशी पोहचता येते. गडाच्या निम्म्या उंचीवर तेथील सुप्रसिद्ध हाजीमलंग दर्गा आहे. गडावर जाण्यासाठी पायथ्यापासून २ तास लागतात.

वसईचा किल्ला

मुंबईपासून उत्तरेला 30 मैलांवर असलेले वसई हे ठिकाण खाडीच्या उत्तर तीरावर होते. आज वसई हे नगर पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्याचे मुख्य ठिकाण असून उपनगरी पश्चिम रेल्वेमार्गावर आहे. रेल्वे स्टेशनपासून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी बससेवा आहे. तेथे जाण्यासाठी रिक्षाही मिळू शकते.

प्राचीन काळापासून व्यापारी महत्त्व असलेले सोपारा हे बंदर वसईपासून अवघ्या सहा मैलावर असल्यामुळे मध्ययुगीन काळात पोर्तुगीजांचे या भागात बस्तान बसेपर्यंत वसईला महत्त्व येऊ शकले नाही. देवगिरीच्या यादवांच्या आमदानीत वसई एका प्रांताची राजधानी होती असा संदिग्ध उल्लेख एका शिलालेखात आहे.

16 व्या शतकाच्या सुरवातीला हे चित्र बदलले. गुजरातचा सुलतान महंम्मद बेगडा (1459-1513) याने मुंबई व या बेटाचा ताबा घेतला. 1514 साली बार्बोसाने वसईचे वर्णन “गुजरातच्या राजाचे एक उत्तम सागरी बंदर” असे केले आहे. त्याच्या आमदानीत वसईचा व्यापार वाढला, दर्यावर्दी उपक्रमांना उधान आले. भारतीय द्वीपकल्पातून तांबड्या समुद्रात जाण्याच्या मार्गावर वसई हे महत्त्वाचे बंदर बनल्यामुळे मसाल्याचे पदार्थ, कोको आणि पोफळीने भरलेली गलबते मलबारच्या किनाऱ्यावरुन वसईला येऊ लागली. 1526 साली पोर्तुगीजांनी वसईला वखार घातली. तथापि सुलतानाच्या जुलमी अधिकाऱ्यांचा आणि सागरी चाच्यांचा पोर्तुगीजांना बराच उपद्रव झाला असावा असे दिसते. या दुहेरी जाचाचा सूड उगवण्यासाठी इ.स.1529 मध्ये हेक्टर द सिव्हेरियाच्या अधिपत्याखाली 22 गलबतांचा ताफा उत्तरेतील समुद्रातील चाच्यांचा बंदोबस्त करण्यासाठी निघाला. या आरमारी ताफ्याने रात्रीच्या वेळी वसईच्या खाडीत प्रवेश करुन वसईवर हल्ला केला.

तेथे अली शाह या गुजरातच्या सुलतानच्या सरदारचा पराभव करुन त्याने वसई लुटली व गावात जाळपोळ केली. अशाच प्रकारची पुनरावृत्ती 1531 सालीही झाली तेव्हा असे प्रकार थांबविण्यासाठी काहीतरी कायमस्वरुपी उपाययोजना केली पाहिजे असे गुजरातच्या सुलतानास वाटू लागले. अशा तऱ्हेने होणाऱ्या हल्ल्यांचा आणि लुटालुटीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी व पोर्तुगीजांचा उत्तर किनाऱ्यावरील साम्राज्यविस्तार रोखण्यासाठी इ.स.1532 मध्ये त्यावेळचा गुजरातचा सुलतान बहाद्दुरशहा याने दीवचा सुभेदार मलिक टोकन यास वसई येथे कोट बांधण्याची आज्ञा दिली. त्यानुसार खाडीच्या आणि समुद्राच्या बाजूला तट व तटांच्या बाहेरच्या बाजूला खाऱ्या पाण्याच्या खंदकांची निर्मिती करण्यात आली. या कोटाच्या रक्षणासाठी घोडदळ व पायदळ मिळून 15,000 सैन्य ठेवण्यात आले. हा वसईचा पहिला कोट होय.

वसईचा किल्ला राष्ट्रीय संरक्षित स्मारक असून तो केंद्र शासनाच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अखत्यारीत येतो. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या मुंबई मंडळाने वसई किल्ल्याच्या सर्वांगीण जतन-दुरुस्तीचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. आजही किल्ल्यातील बरेचसे अवशेष त्यांचे मूळ स्वरुप काय होते याची कल्पना येऊ शकेल अशा स्थितीत आहेत.

वसई किल्ल्याचा एक जाणवण्याजोगा विशेष म्हणजे नगरपालिका मार्गाच्या उत्तरेकडील मोकळा भाग. हा भाग जाणिवपूर्वक मोकळा ठेवण्यात आला होता. किल्ला बांधताना पोर्तुगीजांना याच दिशेने हल्ला होण्याची भिती वाटत असावी. जर यदाकदाचित शत्रू आत शिरलाच तर त्याला लपायला जागा मिळून नये व संपूर्ण सैन्य गोळीबाराच्या टप्प्यात यावे यासाठी ही मोकळी जागा ठेवण्यात आली होती. मराठ्यांनी जेव्हा तटाला भगदाडे पाडून आत शिरण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही मोकळी जागा अगदी उत्तम तऱ्हेने कामी आली असेच म्हणावे लागेल.

बुरुजांचा बाणाच्या चपट्या पसरट शीर्षासारखा असणारा आकार हे आणखी एक वैशिष्ट्य मानावे लागेल. अशा तऱ्हेचे बुरुज महाराष्ट्रातील फिरंगाणात फक्त वसईलाच आढळतात. वरळी किल्ल्यात त्याचे अर्धस्फुट स्वरुप आढळते. गुजरात राज्यातील दमण येथे असलेल्या पोर्तुगीज किल्ल्यालाही वसईसारखेच बुरुज आहेत.

पोर्तुगीज आमदानीत अत्यंत नियोजनपूर्ण असलेला आणि राजेशाहीतही अगदी गोऱ्या लोकांपुरती मर्यादित असलेली का असेना पण काहीशी लोकशाही असलेली नगरपालिका असलेला किल्ला हा आपला नक्कीच महान वारसा आहे. त्याचप्रमाणे अशा बलाढ्य परकीय सत्तेवर दुर्दम्य इच्छाशक्तीने व आत्यंतिक चिकाटीने भारतीयांनी मात केल्याची स्मृती म्हणूनही या किल्ल्याचे महत्व अपरंपार आहे.

 

प्रतापगड किल्ला

महाबळेश्वर-महाड रस्त्यावर महाबळेश्वर पासून २० कि. मी. अंतरावर प्रतापगड आहे. १६५७ मध्ये मोरोपंत पिगळे यांनी हा किल्ला बांधून घेतला.

गडाच्या मध्यावर भवानी मातेचे दगडी मंदीर आहे. देवीची काळया पाषाणाची मुर्ती आहे. जवळच बालेकिल्ल्यात केदारेश्वराचे मंदीर आहे. त्यावर शिवाजी महाराजांची सदर व जिजामाता वाड्याचे अवशेष दिसतात. प्रतापगडाच्या जवळच कडेलोट पॉईंट आहे. तेथून दोषी आरोपींना कडेलोटाची शिक्षा देण्यात येत असे. याकड्यावरुन खाली पाहिले असता डोळे गरगरतात. प्रतापगडाच्या डोंगराला पूर्वी भोरप्याचा डोंगर असे म्हणत. या गडावरुन पश्चिमेला रायगड तर दक्षिणेला मकरंद गड दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स.१६५६ साली प्रतापगड बांधला. प्रतापगडाच्या पायथ्याशी १० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी व अफजलखान यांची ऐतिहासिक भेट होऊन त्यात अफजलखानाचा वध झाला. गडावर शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी तुळजाभवानीचे मंदिर व शिवछत्रपतींचा भव्य अश्वारुढ पुतळा असून गडाच्या पायथ्याशी अफजलखानाची कबर आहे.

 

हरिश्चंद्रगड किल्ला

हरिश्चंद्रगड म्हणजे नगर जिल्ह्याचे महाबळेश्वर ! ठाणे, पुणे आणि नगर यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड,

एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे. इतर सर्व किल्ल्यांना मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहेत हरिश्चंद्रगडाला तर दोन चार हजार वर्षांपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहुबाजूंनी नटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींनी नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्राचा उल्लेख प्राचीन अग्नीपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. १७४७ – ४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली.

हरिश्चंद्र, तारामती आणि रोहीदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे.महाराष्ट्रातील इतर पारंपारिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत तसेच साधारणपणे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रितील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे.

टोलारखिंडीच्या वाटेने गडावर आल्यावर आपण रोहीदास शिखरापाशी पोहचतो. येथून तास-दीड तासात आपण तारामती शिखरापाशी पोहचतो. पायथ्याशीच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे.

·         हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर : तळापासून या मंदिराची उंची साधारणतः सोळा मीटर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच ‘मंगळगंगेचा उगम’ असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथऱ्यात जमिनीत खाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत ‘चांगदेव ऋषींनी’ चौदाशे वर्ष तप केला आहे असे स्थानिक गावकरी सांगतात.

शके चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा । मार्गशिर तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ॥ हरिश्चंद्रनाम पर्वतु । तेथ महादेव भक्तु । सुरसिद्ध गणी विरुयातु । सेविजे जो ॥ हरिश्चंद्र देवता ॥ मंगळगंगा सरिता । सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान । ब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु । लिंगी जगन्नाथु । महादेओ ॥ जोतीर्थासि तीर्थ । केदारांसि तुकिनाति । आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा ॥’ हे चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबावर, भिंतीवर आढळतात. श्री चांगदेवांनी येथे तपश्चर्या करून ‘तत्वसार’ नावाचा ग्रंथ लिहिला. येथील एका शिलालेखावर, चक्रपाणी वटेश्वरनंदतु । तस्य सुतु वीकट देऊ ॥ अशा ओळी वाचता येतात. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच एक छोटे मंदिर आहे. यातही महादेवाची पिंड आहे. या छोट्या मंदिरासमोरच एक भाग्न अवस्थेतील मूर्ती आहेत. त्यातील पाषाणावर राजा हरिश्चंद्र डोंबाऱ्यांच्या घरी कावडीने पाणी भरत असलेला प्रसंग चित्रित केला आहे.

·         केदारश्वराची गुहा : मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डाव्या हातास एक गुहा लागते. याला केदारेश्वराची गुहा असे म्हणतात. या गुहेत १ मीटर उंच आणि २ मीटर लांब असे शिवलिंग आहे. यात कमरभर पाणी आहे. ही गुहा खरंतर चार खांबावर तोलली होती पण सद्यःस्थितीला एकच खांब शाबूत आहे. याच गुहेत एक खोलीही आहे. खोलीच्या डाव्या हाताच्या भिंतीवर शिवपूजनाचा प्रसंग कोरलेला आहे. या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालावयाची असल्यास बर्फतुल्य पाण्यातून जावे लागते.

·         तारामती शिखर : तारामती शिखर गडावरील सर्वात उंच शिखर आहे. साधारणतः उंची ४८५० फूट. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुफेत गणेशाची सुमारे साडेआठ फूटाची भव्य आणि सुंदरमुर्ती आहे. याच गणेशगुहेच्या आजुबाजुला अनेक गुहा आहेत. यातही राहण्याची सोय होते. गुहेच्यासमोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाईनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल, घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळता येतात. शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुख आढळतात. माथ्यावर दोन ते तीन शिवलिंग आढळतात.

·         कोकणकडा : कोकणकडा म्हणजे हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण. कोकणकडा म्हणजे गिर्यारोहकांना आकर्षणाचे स्थान. अर्ध्या किलोमीटर परिघाचा, वाटीसारखा अर्धगोल आकाराचा काळा भिन्न रौद्रभीषण कोकणकडा हा एकमेव अद्वितीय असावा. कड्याची सरळधार १७०० फूटा भरेल. पायथ्यापासून कड्याची उंची साधारणतः ४५०० फूट भरते. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पहाण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीयच आहे.

गडावर चहापाण्याची व जेवणाची सोय होते. पावसाळ्यात मात्र या गडाचे सौंदर्य काही औरच असते. विविधता या गडाएवढी इतरत्र कुठेही आढळणार नाही. करवंद, कारावीच्या जाळी, धायटी, उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल इत्यादी वनस्पती येथे आढळतात. या भागातील प्राणीवैभव मात्र शिकाऱ्यामुळे बरेच कमी झाले आहे. तरीही कोल्हे, तरस, रानडुकरे, बिबळ्या, ससे, भेकर, रानमांजरे इत्यादी प्राणी आढळतात. गडाचे सर्वोच्च शिखर तारामतीवरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाईची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड हा परिसर दिसतो. अशा तऱ्हेने अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड ‘ट्रेकर्सची पंढरी’ ठरतो.

 

शिवनेरी किल्ला

शिवनेरी किल्ला Shivneri Fort - ३५०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील नाणेघाट डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचे जन्मस्थान. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३ मध्ये ईस्ट कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षेपुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.

 जीर्णनगर’. ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे शहर इसवीसनापूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मीती करण्यात आली. सातवाहनाची सत्ता स्थिरवल्यानंतर येथे अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदवून घेतली. सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य, राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ.स. १४४३ मध्ये मलिक-उल-तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला इ.स.अ १४७० मध्ये मलिक-उल-तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंदी करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्युनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते. यानंतर १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजामाता गरोदर असताना जाधवरावांनी ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर घेऊन गेले. ‘शिवनेरी गडावर श्रीभवानी सिवाई, तीस नवस जिजाऊने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन. त्याऊपर शिवाजीराजे यांचा जन्म झाला. शके १५५६ क्षये नाम संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी चंद्रवार इ.स. १६३२ मध्ये शिवरायांनी गड सोडला आणि १६३७ मध्ये मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरुद्धा येथील कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. इ.स. १६७३ मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. इ.स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश पदरात पडले. पुढे ४० वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहुमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्याकडे हस्तांतरीत करण्यात आला

सात दरवाज्यांच्या वाटेने गडावर येतांना पाचवा म्हणजे शिपाई दरवाजा पार केल्यावर मुख्य वाटसोडून उजव्या पूढे गेल्यावर ‘शिवाई देवीचे’ मंदिर लागते मंदीराच्या मागे असणाऱ्या कड्यात ६ ते ७ गुहा आहेत. या गुहा मुक्कामासाठी अयोग्य आहेत. मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे. शेवटच्या दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. आजमितीस या अंबरखान्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. मात्र पूर्वी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे. अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात. एक वाट समोरच असणाऱ्या टेकाडावर जाते. या टेकाडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगा आहे. दुसरी वाट शिवकुंजापाशी घेऊन जाते. वाटेत गंगा, जमुना व याशिवाय पाण्याची अनेक टाकी लागतात. जिजाउंच्या पुढ्यात असलेला बालशिवाजी , हातातील छोटी तलवार फिरवीत आईला आपली भव्य स्वप्ने सांगत आहे, अशा आवीर्भातील मायलेकरांचा पुतळा ‘शिवकुंजा; मध्ये बसविला आहे. शिवकुंजासमोरच कमानी मशिद आहे आणि समोरच खाली पाण्याचे टाके आहे. येथून समोर चालत गेल्यास हमामखाना लागतो. येथूनच पुढे शिवजन्मस्थानाची इमारत आहे. ही इमारत दुमजली असून खालच्या खोलॊत जिथे शिवरायांचा जन्म झाला तेथे शिवरायांचा पुतळा बसविण्यात आला आहे. इमारतीच्या समोरच ‘बदामी पाण्याचे टाके’ आहे येथून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकावर घेऊन जातो. सुमारे दिड हजार फुट उंचीचा ह्या सरळसोट कड्याचा उपयोग हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत असे. गड फिरण्यास २ तास पुरतात. वर किल्ल्यावरून चावंड, नाणेघाट आणि जीवधन तसेच समोर असणारा वडूज धरणाचा जलाशय लक्ष्य वेधून घेतो.गडावर जाण्याच एदोन प्रमुख मार्ग जून्नर गावातूनच जातात. पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते.

या वाटेने गडावर यायच एझाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बसस्टँड समोरील रस्त्याने शिवपुतळ्यापाशी यावे. येथे चार रस्ते एकत्र मिळतात. डाव्या बाजूस जाणाऱ्या रस्त्याने साधारणतः एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते. मंदिरसमोर जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळभिंतीपाशी घेऊन जाते. भिंतीला लावलेल्या साखळीच्या साह्याने आणि कातळाट खोदलेल्या पाऱ्यांच्या साह्याने वर पोहचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहचण्यास पाऊण तास लागतो.

शिवपुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायऱ्यांपाशी घेऊन जातो . या वाटेने गडावर येतांना सात दरवाजे लागतात. पहिला महारदवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा, या मार्गेकिल्ल्याव्र पोहचण्यासाठी दीड तास लागतो.

जुन्नरला येतांना माळशेज घाट पार केल्यावर ८ ते ९ किलोमीटवर ‘शिवनेरी १९ कि.मी.’ अशी एक पाटी रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते. हा मार्ग गणेशा खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो. या मार्गाने गडावर पोहचण्यास एक दिवस लागतो.

या किल्ल्यावर शिवकुंजाच्या मागील बाजूस असणाऱ्या वऱ्हांड्यामध्ये १० ते १२ जणांची रहाण्याची सोय होते. किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती व्यवस्था आपण स्वतःच करावी. गंगा व जमुना या टाक्यांमध्ये बारामही पिण्याचे पाणि उपलब्ध आहे. गडावर जाण्यासाठी साखळीच्या मार्गेपाउण तास, सात दरवाजा मार्गे दीड तास लागतो.

 

तिकोना किल्ला

मुंबई-पुणे हमरस्त्यावरुन दिसणारे लोहगड आणि विसापूर किल्ले आपल्याला सर्वांना माहीत आहेत. याच किल्ल्यांच्या मागील बाजूस पवनमाळ प्रांतात असणाऱ्या तिकोना ऊर्फ वितंडगड याची आपण ओळख करून घेऊया. लोहगड आणि विसापूरच्या किल्ल्याच्या मागे हा किल्ला असल्याने थेट नजरेस पडत नाही. सध्याच्या द्रुतगति महामार्गावरून मात्र हा किल्ला सहज दृष्टीक्षेपात येतो. बोरघाट चढून गेल्यावर माथ्यावर कार्ले, भाजे, बेडसे, भंडारा आणि शेलारवाडी ही लेणी आहेत. या लेण्यांच्या सुरक्षिततेसाठी उभारलेले किल्ले म्हणजे लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना. प्राचीन बंदराना घाटमाथ्याशी जोडणाऱ्या अनेक घाटवाटा या परिसरात आहेत त्यामुळे यावर वचक ठेवण्यासाठी या दुर्गांची निर्मीती केली होती. साधरणतः या परिसरातील लेणी ही बौद्ध आणि हिनयान पद्धतीची असल्यामुळे हे सर्व किल्ले ८०० ते १००० या काळात बांधलेले असावेत.

इ.स. १५८५ च्या सुमारास निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशहा याने हा किल्ला जिंकला आणि किल्ला निजामशाहीत सामील झाला. या गडाबद्दलचा इतिहास फारसा कुठेही उपलब्ध नाही. शिवरायांनी १६५७ मध्ये जुन्या निजामाकडुन कोकणातील माहुली, लोहगड, विसापूर, सोनगड, तळा व कर्नाळा या किल्ल्यांसोबत हा किल्ला देखील आपल्या स्वराज्यात सामील करुन घेतला व सर्व निजामशाही कोकण शिवरायांच्या हाताखाली आले. या किल्ल्याचा उपयोग संपूर्ण पवनमावळावर देखरेखा ठेवण्यासाठी होत असे. सन १६६० या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. १२ जून १६६५ पुरंदर तहानुसार १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला. इ.स. १६८२ च्या ऑगस्ट महिन्यात संभाजी व अकबर याची भेट झाली. या भेटीनंतर अकबर तिकोना किल्ल्यावर राहण्यास आला. मात्र येथील हवा न मानवल्याने त्याला जैतापूर येथे धाडण्यात आले. इ.स. १८१८ मध्ये किल्ल्यावर छोट्या-फार प्रमाणात लढाई झाली यात किल्ल्याचे बऱ्याच प्रमाणावर नुकसान झाले. आजमितिस किल्ल्याची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे.

गडाचा घेरा फार मोठा नसल्यामुळे एक तासांत सर्व गड पाहून होतो. गडाच्या दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे वळावे, थोडे अंतर चालून गेल्यावर एक पाण्याचे टाके आणि गुहा लागते. गुहेत १० ते १५ जणांची राहण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहा राहण्यास अयोग्य आहे. गुहेच्या बाजुने वर जाणारी वाटेने थेट बाले किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहचतो. प्रवेशद्वाराच्या पायऱ्या ह्या दमछाक करणाऱ्या आहेत. दरवाज्यातून आत शिरल्यावर उजवीकडे पाण्याची टाके आहेत तर डावीकडे तटबंदीचा बुरुज दिसतो. सरळ थोडेवर गेल्यावर एक वाट उजवीकडे उतरते. येथे पाण्याची काही टाकी आढळतात. येथूनमाघाई फिरून सरळ वाटेला लागावे. ही वाट आपल्याला काही तुटलेल्या पायऱ्यांशी घेऊन जाते. येथून वर गेल्यावर समोरच महादेवाचे मंदिर आहे. मंदिरामागे पाण्याचा मोठा खंदक आहे. याला वळसा घालून गेल्यावर आपण ध्वजस्तंभाच्या जागी पोहचतो. बालेकिल्ल्यावरुन समोरच उभा असणारा तुंग, लोहगड, विसापूर, भातराशीचा डोंगर, मोर्सेचा डोंगर, जांभुळीचा डोंगर, पवनेचा परिसर आणि फागणे धरण हा सर्व परिसर न्याहळता येतो. गडावरून संपूर्ण मावळप्रांत आपल्या नजरेत येतो. 

सिंहगड किल्ला

सिंहगड किल्ला ४४०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
पुणे जिल्ह्यातील पुणे डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.

पुण्याच्या नैऋत्येला साधारण २५ कि.मी. अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यांसारखा दिसणारा खांदकड्याचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा ह्यामुळे पुण्यातून कुठूनही तो पटकन ध्यानी येतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलूख गडावरुन दिसतो.

हा किल्ला पूर्वी आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव हे विजापूरकरांकडून म्हणजेच आदिलशाहीकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ.स. १६४७ मध्ये दादोजी कोंडदेवाचे निधन झाल्यावर कोंडाण्यावरील किल्लेदार सिद्दी अंबर याला लाच देऊन शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला व या गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे इ.स. १६४९ मध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी तो परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये सिंहगड पण होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंडाण्याचा अधिकारी होता. हा मूळचा राजपूत होत पण तो बाटून मुसलमान झाला.

सिंहगड हा मुख्यतः प्रसिद्ध आहे तो तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे. शिवाजी महाराज जेव्हा आग्ऱ्याहून सुटून परत आले तेव्हा त्यांनी दिलेले गड परत घ्यायला सुरुवात केली. तेव्हा तानाजीने कोंडाणा आपण घेतो म्हणून कबूल केले. या युद्धाबाबत सभासद बखरीत पुढीलप्रमाणे उल्लेख आढळतो:तानाजी मालूसरा म्हणून हजारी मावळ्यांचा होता त्याने कबूल केले की, ‘कोंडाणा आपण घेतो’, असे कबूल करून वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता त्यांस कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरबस्ता होऊन, हाती तोहा बार घेऊन, हिलाल (मशाल), चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले, चालून आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार झाले. उदेभान किल्लेदार खाशा त्यांशी व तानाजी मालुसरा सुभेदार यांशी गाठ पडली. दोघे मोठे युद्ध, महाशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डावे हातची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवरि वोढ घेऊन, दोघे महारागास पेटले. दोघे ठार झाले. मग सूर्याजी मालूसरा (तानाजीचा भाऊ), याने हिंमत धरून, कुललोक सावरून, उरले राजपुत मारिले. किल्ला काबीज केला. शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले ‘एक गड घेतला, परंतु एक गड गेला.’ माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले.

 

देवगिरी किल्ला

 

 

दौलतींचे शहर म्हणून विख्यात असलेल्या दौलताबादला भेट द्यावी, असा विचार केला. खरे तर अनेकदा हा किल्ला चढलोय पण, वयपरत्वे जाणीवाही बदलत जातात असे म्हणतात आणि तोच वृत्तांत आपणासाठी इथे टंकत आहे. इतिहास आमचा कच्चा असल्यामुळे, काही चुकीचे लिहिले असेल तर ते आपण तपासून घ्यावे. या शहराने आणि किल्ल्याने अनेक वंशाचे उत्थान पाहिले. यादव, खीलजी, मोगलवंश हे त्यापैकी आहेत, असे म्हणतात.

महाराष्ट्रात जे काही भुईकोट किल्ले आहेत त्यापैकी हा एक. युद्धपद्धती आणि युद्धकलेतील गरजांच्या फेरबदलांना अनुसरुन या किल्ल्याची रचना आणि बांधणीही वेळोवेळी होत गेली असावी. याचसाठी दौलताबादचा किल्ला सैन्यवास्तुकलेतील प्रगतीचे प्रतीक म्हणून गणला जातो.

ह्या किल्ल्याचा नकाशा, भिंती आणि प्रवेशद्वाराची रचना अशी योजनाबद्ध रीतीने करण्यात आलेली आहे की, शत्रूच्या हल्ल्यापासून किल्ला सुरक्षित राखता येईल असे वळणा-वळणाचे अरुंद रस्ते शत्रुसैन्याच्या सहज प्रवेशाला थोपवून धरतात. तर उंच,उंच भिंती किल्लेबंदी करणा-या उरतात. संपूर्ण किल्ला चहूकडून जलमय कालव्यांनी वेढलेला आहे. किल्ल्याची उंची गाठण्यासाठी डोंगर पोखरुन तयार करण्यात आलेल्या दूर्गम, अतिसुरक्षित असे अंधारे बोगदे ओलांडावे लागतात. किल्ल्याच्या या रचनेमुळे लक्षात येते की, शत्रुची दिशाभुल करण्यासाठी आणि त्याला फसवण्यासाठी अशी रचना केलेली असावी.

किल्ल्याच्या एका बाजूला दहा कि,मी. भिंत पसरलेली आहे. किल्ल्यात प्रवेश करतांना एक महादरवाजा आहे, या दरवाजावर हत्तींचा हल्ला थोपवण्यासाठी टोकदार खिळे ठोकण्यात आलेली आहेत. यातून प्रवेश केल्यावर प्रत्येक गल्लीत पहारेक-यांच्या कोठड्या बांधण्यात आलेल्या आहेत.

 

महाराष्ट्रातील फळांचे वैशिष्टे
*
महाराष्ट्र राज्य फळाच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांकावर आहे.

*
महाराष्ट्रात विविध फळ पिकवण्याच्या बाबतीत अहमदनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.

*
सीताफळ व अंजीर या फळाच्या साठी पुणे जिल्हा अग्रेसर आहे.

*
सोलापूर जिल्ह्यात बोरे व लिंबाच्या पिकासाठी पहिला क्रमांक आहे.

*
केळीच्या बाबतीत जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.

*
कोकणात काजू, आंबा हि फळे येतात.

*
विदर्भातील नागपूर व अमरावती या भागात संत्रा हे फळ येते.

*
महाराष्ट्राच्या क्षेत्रानुसार आंब्याचे क्षेत्र सर्वात जास्त तर अनुक्रमे संत्रा, काजू, केळी, व बोर या पिकाचे क्षेत्र आहे.

राज्यातील इतर धार्मिक व पर्यटन स्थळे

स्थळ

जिल्हा

स्थळ

जिल्हा

टिटवाळे

ठाणे

चाफळ (मारूती)

सातारा

पंढरपूर

सोलापूर

बाहुबली

कोल्हापुर

जेजुरी (खंडोबा)

पुणे

शेगाव

बुलढाणा

हाजिमलंग

कल्याण (ठाणे)

महाकालेश्वर

सासुरे (सोलापूर)

जाहांगीर आर्ट गॅलरी

मुंबई

ज्योतिबा

कोल्हापूर

सिताबर्डीचा किल्ला

नागपूर

चित्रपट नगरी

कोल्हापूर

चांदबिबीचा महाल

अहमदनगर

बिबी का मकबरा

औरंगाबाद

राजाबाई टॉवर

मुंबई

हॅगिंग गार्डन

मुंबई

शिक्षण

·         महाराष्ट्रातले पहिले विद्यापीठ – मुंबई विद्यापीठ (१८५७)

·         पुणे विद्यापीठाची स्थापना – पुणे (१९४८)

·         महाराष्ट्रातील पहिले महिला विद्यापीठ – SNDT (१९५०)

·         मराठवाडा विद्यापीठाची स्थापना १९५८ मध्ये औरंगाबाद येथे झाली. १४ जानेवारी १९९४ रोजी त्याचा नामविस्तार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा केला.

·         महाराष्ट्रातील पहिले मुक्त विद्यापीठ – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, (नाशिक) १९८९

·         महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ – १० जून १९९८ (नाशिक)

·         कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूर (१९९३)

·         शिव छत्रपती क्रिडा विद्यापीठ – पुणे (१९९६)

·         आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाची स्थापना करण्याचे विधेयक संमत – १९९६ (वर्धा)

·         डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ – नोव्हें. २००० (नागपूर)

·         महाराष्ट्रातील अभीमत विद्यापीठे – टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, गोखले अर्थशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज, भारती विद्यापीठ, वैकुठ मेहता महाराष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था (सर्व पुणे) इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT पवई), इंटननॅशनल इन्स्टिट्युट फॉर पॉप्युलेशन सानन्सेस (मुंबई)

विविध शंशोधन संस्था

·         सेंट्रल वॉटर अँन्ड पॉवर रिसर्च स्टेशन – खडकवासला (पुणे)

·         इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ट्रॉपिकल मटेऑरॉलॉजी पुणे

·         इंडियन इन्स्टिट्युट ऑफ जिमोअमॅग्नरिझम – मुंबई

·         नॅशनल केमीकल लॅबोरेटरी पुणे

·         भाभा ऑटोमॅटीक रिसर्च सेंटर – मुंबई

·         डाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई

·         नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी – पुणे

·         नॅशनल फायर सर्व्हीस कॉलेज नागपूर

·         स्कूल ऑफ आर्टीलरी – देवळाली (नाशिक)

·         राष्ट्रीय सेवा योजना सुरु – २ ऑक्टो. १९६९

·         सावित्रिबाई दत्तक पालक योजना सुरु – १८३-८४

·         नवे शैक्षणिक धोरण – ५+३+२+२+३ आकृतीबंध – १९८६

·         महाराष्ट्रातील पहिली रात्र शाळा – पुणे -१८५५

·         महाराष्ट्र पोलीस अँकेडमी – नाशिक१९०६

·         महाराष्ट्रातील सध्याचे सरासरी आयुर्मान – ६४ वर्षे

·         राज्यातील हत्तीरोग शंशोधन केंद्र – वर्धा

·         राष्ट्रीय संघर्ष प्रबोधिनी – खडकवासला (पुणे)

·         महाराष्ट्र छात्रसेना – शाळेसाठी अनिवार्य व ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक आहे.

·         नॅशनल इन्व्हिरॉमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (नेरी) – नागपुर

·         इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अँस्ट्रॉनॉमी अँन्ड अँस्ट्रोफिजिक्स (आयुका) – पुणे

·         इंडियन इन्स्टिट्युट ऑफ रिसर्च इन म्यूमिस्मॅटिक स्टडीज – अंजनेरी (नाशिक)

·         शैक्षणिक धोरणाची मुलगामी चिकित्सा करण्यासाठी केंद्राचा आयोग – आचार्य राममुर्ती

·         महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना – पुणे, १९६७

·         ७ व्या यौजनेत नवोदय विद्यालयांची स्थापना झाली. राज्यात ३२ विद्यालये असून यात ६ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. मुलींना १/३ आरक्षण असून ग्रांमीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ७५% जागा राखीव असतात.

·         महाराष्ट्रातील पहिले नवोदय विद्यालय अमरावती

·         महाराष्ट्रातील पोलीस प्रशिक्षण केंद्र – खंडाळा, नाशिक, नागपुर, अकोल, जालना, सोलापूर, तासगांव (सांगली), मुंबई

No comments

Hindi vyakaran Mock Test

Scholarship Exam 2024 PAPER 1/2 : Hindi अनेकार्थी शब्द Start The Quiz Time's Up score: Next question See Your Result Total Quest...

Powered by Blogger.