महाराष्ट्राची लोकसंख्या

 जनगणना २०११ ही १८७२ पासूनच्या अखंडित शृंखलेतील पंधरावी असून स्वातंत्र्योत्तर सातवी जनगणना आहे. भारताचे महानिबंधक यांच्यामार्फत भारतातील जनगणनेचे कामकाज पार पाडले जाते. जनगणना २०११ नुसार राज्याची लोकसंख्या ११.२४ कोटी असून ती भारताच्या एकूण लोकसंख्येच्या (१२१.०२ कोटी) ९.३ टक्के इतकी आहे. लोकसंख्येच्या आकारमानानुसार उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्र भारतातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे. राज्याची २००१-११ या दशकातील लोकसंख्येची वाढ १६ टक्के असून ती १९४१ नंतरची सर्वात कमी वाढ आहे. यापूर्वीच्या दशकातील तत्सम वाढ २२.७ टक्के होती. २००१-२०११ या दशकातील राष्ट्रीय स्तरावर वाढ १७.६ टक्के आहे.

लोकसंख्येची घनता :

जनगणना २०११ नुसार राज्यातील लोकसंख्येची घनता ३६५ असून ती भारताच्या लोकसंख्येच्या घनतेहून (३८२) कमी आहे. जनगणना २००१ नुसार राज्यातील लोकसंख्येची घनता ३१५ होती. लोकसंख्येच्या घनतेनुसार मुंबई उपनगर व मुंबई शहर हे जिल्हे अनुक्रमे प्रति चौ.कि.मी. २०,९२५ व २०, ०३८ यासह अग्रस्थानी आहेत. गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता सर्वात कमी (७४) असून त्यापाठोपाठ सिंधुदुर्ग (१६३), चंद्रपूर (१९२) व रत्नागिरी (१९६) हे जिल्हे आहेत.

नागरी लोकसंख्या :

जनगणना २०११ नुसार राज्यातील ४५.२ टक्के लोकसंख्या नागरी भागात आहे, तर ती अखिल भारतीय स्तरावर ३१.२ टक्के आहे. राज्यात दहा लाख व त्याहून जास्त लोकसंख्या असलेले पाच नागरी समूह व एक शहर आहे. बृहन्मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद हे नागरी समूह असून वसई-विरार (महानगरपालिका) हे शहर आहे. राज्याच्या एकूण लोकसंख्येत या सहा नागरी समूह/शहरांचा हिस्सा २६.६ टक्के असून राज्यातील नागरी लोकसंख्येतील त्यांचा हिस्सा ५८.९ टक्के आहे.

टिप- नागरी समूह हा एखादे शहर व त्यालगतची वाढ qकवा दोन अथवा जास्त भौगोलिकदृष्ट्या संलग्न शहरे त्यांच्या लगतच्या वाढीसह व वाढीशिवाय मिळून तयार झालेला समूह होय.

ग्रामीण लोकसंख्या : जनगणना २०११ नुसार राज्यातील ग्रामीण लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या ५४.८ टक्के आहे .तर ती राष्ट्रीय स्तरावर ६८.८ टक्के आहे. दहा वर्षाच्या कालावधीत राज्यातील ग्रामीण लोकसंख्या ५७ लाखांनी वाढली आहे.

स्त्री-पुरुष प्रमाण :

जनगणना २०११ नुसार राज्यातील स्त्रीपुरुष प्रमाण ९२५ इतके झाले आहे, तर राष्ट्रीय पातळीवर ते ९४० इतके आहे. स्त्री-पुरुष प्रमाणाच्या बाबतीत भारतामध्ये महाराष्ट्राचे २२ वे स्थान आहे. स्त्री-पुरुष प्रमाण सर्वात जास्त रत्नागिरी जिल्ह्यात (१,१२३) असून त्याखालोखाल सिंधुदुर्ग जिल्ह्यात (१,०३७) आहे. मुंबई शहर (८३८), मुंबई उपनगर (८५७) आणि ठाणे (८८०) या जिल्ह्यांचे स्त्री-पुरुष कमी आहे. राज्यातील ०-६ वयोगटातील स्त्री-पुरुष प्रमाण २००१ मधील ९१३ वरून २०११ मध्ये ८८३ पर्यंत घसरले. या स्त्री-पुरुष प्रमाणात २००१-२०११ या कालावधीत ३०  इतकी तीव्र घसरण दिसते. राष्ट्रीय पातळीवर ०-६ वयोगटातील स्त्री-पुरुष प्रमाण (९१४) हे राज्यापेक्षा जास्त आहे. या वयोगटात राज्यातील बीड जिल्ह्यात स्त्री-पुरुष प्रमाणात सर्वाधिक घट झाली असून २००१ मधील ८९४ च्या तुलनेत २०११ मध्ये ८०१ अशी प्रतिकूल झाली. गडचिरोली जिल्ह्याचे हे स्त्री-पुरुष प्रमाण राज्यात सर्वात जास्त (९५६) असून त्या खालोखाल चंद्रपूर (९४५) जिल्ह्यात आहे.

साक्षरता :

भारतातील प्रमुख राज्यामध्ये महाराष्ट्राने साक्षरतेध्ये लक्षणीय वाढ नोंदविली आहे. सात वर्षे व अधिक वयाच्या लोकसंख्येचा साक्षरता दर २०११ मध्ये ८२.९ टक्के झाला. साक्षरतेध्ये देशात महाराष्ट्राचा १२ वा क्रमांक आहे. साक्षरता दर मुंबई उपनगर (९०.९ टक्के) जिल्ह्यात सर्वात जास्त असून ८७ नंदूरबार (६३.० टक्के) जिल्ह्यात सर्वात कमी आहे.

लोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील पहिले आणि शेवटचे पाच जिल्हे २०११
पहिले पाच जिल्हे:

[जिल्हे] -[लोकसंख्या] [टक्केवारी]
ठाणे -१,१०,५४,१३१ -९.८४%
पुणे  -९४,२६,९५९ - ८.३९%
मुंबई उपनगर -९३,३२,४८१ - ८.३०%
नाशिक  -६१,०९,०५२ -५.४४%
नागपूर -४६,५३,१७१ -४.१४%

शेवटचे पाच जिल्हे:
सिंधुदुर्ग -८,४८,८६८ -०.७६%
गडचिरोली -१०,७१,७९५ -०.९५%
हिंगोली-११,७८,९७३ -१.०५%
वाशिम -११,९६,७१४ -१.०६ % 
भंडारा -११,९८,८१०-१.०७%

महाराष्ट्रातील २०११ जणगणनुसार लोकसंख्येविषयी प्रमुख मुद्दे
*
महाराष्ट्रातील सर्वात जास्त पुरुष लोकसंख्येचा जिल्हा ठाणे आहे.
*
महाराष्ट्रातील सर्वात कमी पुरुष लोकसंख्येचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे.
*
महाराष्ट्रातील सर्वात जास्त स्त्री लोकसंख्येचा ठाणे जिल्हा आहे.
*
महाराष्ट्रातील सर्वात कमी स्त्री लोकसंख्याचा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा.
*
महाराष्ट्रातील एक कोटी लोकसंख्येवरील जिल्हा ठाणे होय.
*
महाराष्ट्रातील २०११ च्या जणगणनेनुसार जास्त घनतेचे पहिले पाच जिल्हे - मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे,पुणे कोल्हापूर,
*
महाराष्ट्रातील २०११ नुसार कमी घनतेचे पहिले पाच जिल्हे - गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, रत्नागिरी, यवतमाळ.
*
२०११ च्या लोकसंखेच्या घनतेचा दर ३६५ आहे. तर राष्ट्रीय घनतेचा दर ३८२ आहे.
*
महाराष्ट्रामध्ये देशातील ९.२९% एवढी लोकसंख्या राहते.
*
महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तर पहिले पाच जिल्हे - रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदीया, सातारा, भंडारा,
*
महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तर शेवटचे पाच जिल्हे - मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, बीड.
*
महाराष्ट्राच्या साक्षरतेचे पहिले पाच जिल्हे - मुंबई उपनगर, नागपूर, मुंबई शहर, अमरावती, अकोला.
*
महाराष्ट्राच्या साक्षरतेचे शेवटचे पाच जिल्हे - नंदुरबार, गडचिरोली, बीड, जालना, धुळे.
*
महाराष्ट्राच्या पुरुष साक्षरतेचे पहिले पाच जिल्हे - मुंबई उपनगर, नागपूर, सिंधुदुर्ग, गोंदिया, अकोला.
*
महाराष्ट्राच्या पुरुष साक्षरतेचे शेवटचे पाच जिल्हे - नंदुरबार, गडचिरोली, धुळे, बीड, जालना.
*
महाराष्ट्राच्या स्त्री साक्षरतेचे पहिले जिल्हे - मुंबई उपनगर, मुंबई शहर, नागपूर, अमरावती, अकोला.
*
महाराष्ट्राच्या स्त्री साक्षरतेचे शेवटचे जिल्हे - नंदुरबार, गडचिरोली, जालना, बीड, परभणी.
*
२०११ सालच्या जणगणनेनुसार महाराष्ट्रात ग्रामीण लोकसंख्या ६.१५ कोटी आहेत.
*
एकूण लोकसंख्येशी टक्केवारी ५४.७७ आहे.
*
महाराष्ट्रात राष्ट्रीय स्तराच्या मानाने ग्रामीण लोकसंख्या १३.७७ टक्क्यांनी ५४.७७ आहे.
*
महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या ५.०८ कोटी आहे.
*
राष्ट्रीय स्तरावर नागरी लोकसंख्येची ३१.१६% एवढी आहे.
*
महाराष्ट्रात नागरी लोकसंख्येची टक्केवारी ४५.२३ एवढी आहे.
*
महाराष्ट्रात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे आणि नागपूर जिल्हे हे सर्वात जास्त नागरीकरण झालेले जिल्हे आहेत.
*
गडचिरोली, सिंधुदुर्ग, आणि हिंगोली हे किमान नागरीकरण झालेले जिल्हे आहेत.
*
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे जिल्हे १००% नागरी जिल्हे आहेत.
*
महाराष्ट्रात ग्रामीण लोकसंख्येची सर्वात जास्त टक्केवारी गडचिरोली ८९.००% असून त्या खालोखाल सिंधुदुर्ग व हिंगोली जिल्हा येतो.
*
महाराष्ट्रात नागरी क्षेत्रात रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त लोकसंख्या वाढीचा दर ८२.८९% एवढा आहे.
*
महाराष्ट्राची ग्रामीण दशवार्षिक वाढ १०.३४% एवढे आहे.
*
महाराष्ट्राची नागरी दशवार्षिक वाढ  २३.६७% एवढे आहे.


No comments

Hindi vyakaran Mock Test

Scholarship Exam 2024 PAPER 1/2 : Hindi अनेकार्थी शब्द Start The Quiz Time's Up score: Next question See Your Result Total Quest...

Powered by Blogger.