सिंधुदुर्ग जिल्हा

 सिंधुदुर्ग जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र सिंधुदुर्ग नगरी, ओरस येथे आहे. सिंधुदुर्ग हा सागरतटीय जिल्हा आहे. पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त (३७) किल्ले असणारा तसेच सर्व प्रकारचे म्हणजे जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना १ मे, इ.स. १९८१ साली झाली. सिंधुदुर्ग जिल्हा हा आधी रत्नागिरी जिल्ह्याचा भाग होता. सिंधुदुर्ग जिल्ह्याच नाव सिंधुदुर्ग किल्ल्यावरून ठेवण्यात आलं. १९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला.
चतुःसीमा[संपादन]
·         पश्चिम - अरबी समुद्र
·         पूर्व- कोल्हापूर जिल्हा
·         दक्षिण- गोवा राज्य
·         उत्तर- रत्नागिरी जिल्हा
जिल्ह्यातील तालुके[संपादन]
·         सावंतवाडी तालुका
·         कणकवली तालुका
·         कुडाळ तालुका
·         देवगड तालुका
·         दोडामार्ग तालुका
·         मालवण तालुका
·         वेंगुर्ला तालुका
·         वैभववाडी तालुका
मासेमारी
सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२१ कि. मी. चा समुद्र किनारा लाभला आहे. प्रमुख मासेमारी बंदरे (८) - विजयदुर्ग, देवगड, आचार, मालवण, सर्जेकोट, कोचरा, वेंगुर्ला आणि शिरोडा. मच्छिमार लोकसंख्या - २५३६५ उत्पादन - १९२७३ मे. ट. मच्छिमार सहकारी संस्था - ३४ (एकूण सभासद १४२१६)
फुले
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर्‍हेतर्‍हेची रानफुले आढळतात. ही फुले म्हणजे वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक आणि पर्यावरण संवर्धकांसाठी अमूल्य ठेवा आहे. वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण गावडे आणि निसर्ग अभ्यासक वामन पंडित यांनी सिंधुदुर्गातील रानफुलांची माहिती देणारी ‘१०० वेलीफुले’ ही पुस्तिका तयार केली आहे. तीत सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आढळणार्‍या सुमारे १०० वेलीफुलांची माहिती वाचायला आणि पाहायलाही मिळते.
या पुस्तिकेत या पुस्तिकेत वेलीफुलांची माहिती त्यांच्या बाह्य स्वरूपाच्या वर्णनाबरोबरच खोड, पाने, पुष्पसंभार, फळे आदींच्या शास्त्रीय माहितीसह वाचायला मिळते. या माहितीबरोबरच काही वेलीफुलांची सुंदर रंगीत छायाचित्रेही देण्यात आलेली आहेत. तसेच या वेलीफुलांच्या शास्त्रीय नावांप्रमाणेच त्यांची मराठी नावे, फुले-फळे येण्याच्या कालावधीविषयीही माहिती मिळते. मोरवेल, बेंदरीलची वेल, वासन वेल, कांगली, खांड वेल, गोमेटी, शेंगाळो, रवांतो, गारंबी, समुद्र अशोक, गावेल आदी लोकांच्या नेहमीच्या माहितीतल्या, तसेच बर्‍याचशा अज्ञात अशा वैशिष्ट्यपूर्ण वेलीफुलांची माहिती ‘१०० वेलीफुले’ मध्ये वाचायला मिळते. हे पुस्तक कणकवलीच्या पंडित पब्लिकेशन्सने प्रसिद्ध केले आहे.
पर्यटन स्थळे
समुद्र किनारे
कुणकेश्वर मंदिर आणि समुद्रकिनारा

श्री क्षेत्र कुणकेश्वर.... कोकणातील एक पवित्र तिर्थक्षेत्र...अतीप्राचीन काळापासुन येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करुन असलेल्या शंभुमहादेवाची ही भुमी... कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर... देवावरुन गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर असेच प्रचलीत झाले. सुमारे ११०० व्या शतकापासुन प्रसिद्धीला आलेले हे स्थान म्हणजे कोकणातील धार्मीक व ऐतिहासीक सौंदर्याचा मुकुटमणीच म्हणावा लागेल. कुणकेश्वर मंदिरा इतके प्राचीन भव्य देवालय कोकणात इतरत्र कुठेच नाही. पुणे, मुंबई, कोल्हापुर या शहरांशी देवगडहुन अवघ्या १८ कि.मी. अंतरावर कुणकेश्वर हे गाव आहे.एसटी थांबते तेथून अवघ्या ५-७ मिनिटांच्या अंतरावर असणार्‍या मंदिराचा कळस लक्ष वेधून घेतो.ऐन किनार्‍याशी असणार्‍या उंचवटयावर उभारलेल्या या मंदिरचा सागरतटाकडील भाग भक्कम बांधीव तटाने सुरक्षित राखला आहे. ८-९ मीटर उंचीच्या या तटावर असणार्‍या सपाट जागेवर मंदिर आहे. मंदिराचा परिसर २२-२४ मीटर उंचीच मंदिर आहे. मंदिराचा परिसर तटाने परिवेष्टित तर आहेच, पण खाली जांभ्या दगडांची फरशीही आहे. अशा या कुणकेश्वर मंदीराचा इतिहास सुद्धा तितकाच प्राचीन, रोमांचकारी आणि रहस्यमय असा आहे.

देवस्थानच्या परिसरात समुद्रकिनारी काही शिवलिंग आहेत. त्यापैकी २१ शिवलिंग आपणास पाहावयास मिळतात. या शिवलिंगामागील इतिहास असा आहे की, गेली कित्येक वर्ष समुद्राच्या पाण्यामध्ये असणारी ही शिवलिंग झिज होत असतानासूद्धा ती पुर्ववत प्रमाणे आहेत अशी निदर्शनास येतात. इतका काळ लोटला तरी त्यांची म्हणावी तितकी झिज झालेली नाही. गेले कित्येक वर्षे यात्रेकरु या शिवलिंगाचे दर्शन घेत आहेत. ही शिवलिंग पांडवांनी घडवलेली आहेत अशी श्रद्धा आहे. याची साद देणारी पांडवलेणी आजही येथे आहेत.

देवळापासुन जवळच पूर्व दिशेस डोंगराच्या उतरणीवर काही लोक जमीन खणत असताना पूर्वकाळापासून कित्येक शतके बुजालेले एका गुहेचे दार मोकळे होऊन आंत कोरीव पाषाणी मूर्ती आढळून आल्या ही गुहा म्हणजे इतर कोरीव लेण्यांप्रमाणे एक लेणी आहे. पण यातील मूर्ती मात्र गुहेच्या दगडांवर कोरलेल्या नसून त्या अलग आहेत. गुहेची खोली तांबडया कापाच्या दगडाची असून मूर्तीचा दगड काळा-काळित्री आहे. हा काळा दगड गावात समुद्राच्या कडेस आणि डोंगराच्या कडयांत क्वचित स्थळी सापडतो.या गुहेला सध्या पांडव लेणी म्हणून ओळखले जाते. गुहेची खोली सुमारे १० फुट लांब ८ फुट रूंद आणि ६ फुट उंच असून, पाच फुट उंच आणि तीन फुट रूंद असा दरवाजा आहे. आत १८ कोरीव मुखवटे शिवलिंग आणि नंदी मिळून २० नग आहेत. मुखवटयांची मांडणी जोडी जोडीने केलेली आहे. पुरूष व स्त्री अशा ८ जोडया, एक तरूण पुरुषाचा मुखवट स्वतंत्र बसवलेला आहे. तसेच एक पुतळयाची नासधूस झाल्यामुळे तो पुरूषाचा किंवा स्त्रीचा हे नीट ओळ्खता येत नाही. त्यामुळे तो एका बाजुस ठेवला आहे. शिवलिंग आणि नंदी हे देखिल काळा- (काळित्री) दगडाचे असून गुहेत प्रवेश केल्यावर तिच्याध्यभागी पण जरा डाव्या बाजूस ठेविले आहेत. गुहेतील मुर्त्या हया देवतांच्या मुर्ती नसून राजघराण्यातील स्त्री पुरूषांचे ते मुखवटे आहेत. त्यांचे कोरीव काम उच्च दर्जाचे दिसून येते. कौशल्यामध्ये ओबडधोबडपणा कमी असून रेखीव व सुबकपणाकडे कोरण्याकडे चांगलेच लक्ष दिले आहे. पुरूषांच्या आकृती जरा मोठया असून त्या मानाने स्त्रियांच्या लहान आहेत. प्रत्येक जोडप्यास निराळी बसकण आहे. प्रत्येक मुखवटयाला राजास आणि राजघराण्यातील स्त्रीपुरूषांस शोभेल असाच पेहराव केलेला आहे. प्रत्येक मुखवटयास शिरपेच, डोकिच्या एका बाजूस तुरा, मोत्यांचे पेड कोरीव कामांत दाखविले आहेत. तसेच महाराष्ट्रीय वळणाची शिरोभूषणे आपणास या मुर्त्यांवर पाहावयास मिळतात.या बाबतचे आणखी संशोधन चालू आहे. मुळात कोकणात लेणी थोडी आहेत. आणि अशा तर्‍हेचे लेणे तर नाहीच.

भोगवे समुद्रकिनारा

वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे येथील समुद्रकिनाराही विलोभनीय आहे. भोगवे गावाला कर्ली नदी व समुद्र यांचा संगम पाहायला मिळतो, हे आगळे वेगळे वैशिष्टय आहे. लांबच्या लांब पसरलेली पांढर्‍या शुभ्र व स्वच्छ वाळूची चौपाटी आणि किनार्‍यावरील माड पोफळीच्या बागा यांमुळे या समुद्रकिनार्‍यावरील निसर्गसौंदर्य अधिक देखणे बनले आहे. कोचरे गावाच्या हद्दीत भोगवे समुद्र किनार्‍यालगतच्या एका टेकडीवर रम्य समुद्रकिनार्‍यावरच ऐतिहासिक निवती किल्ला हा छत्रपती शिवाजीमहाराजांनी बांधलला छोटासा किल्ला आहे. निवती किल्ल्यावरुन भोगवेची मनमोहक, रम्य चौपाटी अप्रतिम दिसते. निवतीच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात अणि जवळून 'डॉल्फिन' माशाच्या झुंडी पाहाता येतात. डॉल्फिनचे नृत्य पाहाण्याचा आनंदही अनुभवता येतो. यांत्रिकी होड्यांमधून समुद्र सफर करत ' डॉल्फिन' चे नृत्य पाहाता येते. हे डॉल्फिन मोठ्या संख्येने येथे पाण्यावर येतात. यांत्रिकी पर्यटक होड्यांच्या जवळूनच त्यांचा जलविहार चालू असतो. उंच उड्या मारत जलविहार करणारे डॉल्फिन पाहाणे पर्यटकांसाठी पर्वणीच ठरते. पर्यटकांना आवश्यक त्या सुविधा असणारे बीच रिसॉर्टही येथे आहे.

शिरोडा वेळागर समुद्रकिनारा

वेंगुर्लेपासून १७ कि.मी. अंतरावर निसर्गरम्य शिरोडा हे गाव आहे. हिरव्यागर्द वनश्रीने नटलेले, माड-पोफळीच्या बागांनी बहरलेले, सुंदर समुद्रकिनारा लाभलेले अत्यंत विनोभनीय गाव! शिरोड्यापासून गोवा अवघ्या ७ कि.मी. अंतरावर आहे. शिरोड्याला लांबच लांब पसरलेली पांढर्‍या शुभ्र वाळूची सुंदर, रम्य चौपाटी लाभलेली आहे. या चौपाटीलगतच असलेले भल्यामोठ्या सुरुच्या वृक्षांचे बन हे तर शिरोड्याचे एक खास वैभव आणि आगळे वैशिष्टयही आहे. साहित्यातील ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार मिळविलेले प्रतिभावंत साहित्यिक वि.स. तथा भाऊसाहेब खांडेकर ह्यांची ही प्रेरणाभूमी आणि कर्मभूमीही! भाऊसाहेब खांडेकरांनी येथील ट्युटोरिअल हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी केली आणि प्रारंभीच्या उत्तमोत्तम कादंबर्‍याचे लेखनही. असे हे शिरोडा सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, ऐतिहासिक परंपरा व पार्श्वभूमी लाभलेले गाव आहे. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात शिरोडा गावचे महत्त्वही फार आहे. १९३० साली शिरोडा येथे झालेल्या ऐतिहासिक मिठाच्या सत्याग्रहामुळे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात शिरोडा गावाचे नाव अग्रक्रमाने नमूद झालेले आहे.

तोंडवली समुद्रकिनारा

देवबाग कर्ली नदीइतकाच सुंदर किनारा आहे तळाशील गड नदीचा. गड नदी समुद्राला भेटायला येते ती तोंडवलीपासून. तळाशीलपर्यंत समुद्राला समांतर वाहते. मालवण, हडी, तोंडवली, तळाशील असा गाडीरस्ता उपलब्ध आहे. नदीच्या एका बाजूला तोंडवली, तळाशील, तर दुसऱ्या बाजूला ओझर, रेवंडी, कोळंब आहे. ओझरची ब्रह्मानंद स्वामींची असणारी गुहा व पाण्याचा झरा बघण्यासारखा आहे. ओझरजवळ आहे रेवंडी. मालवणचा सुपुत्र "वस्त्रहरण'कार मच्छिंद्र कांबळींचं गाव. गावात भद्रकालीचं मंदिर आहे. रेवंडीतल्या तरीवरून तळाशीलला बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. तळाशीलची मच्छिमारांची वस्ती संपली, की बांद्याच्या पुढे ओसाड बेट आहे. त्यावरून गड नदीच्या मुखाचं सुंदर दर्शन होतं. रेवंडीतूनसुद्धा गड नदी समुद्राला मिळते ती जागा बघण्यासारखी आहे. तोंडवळीचा सुरूचा किनारा, तळाशीलचा माडांच्या चिंचोळ्या पट्टीचा किनारा खास बघण्यासारखा.

 
तारकर्ली समुद्रकिनारा

मालवणपासून अवघ्या ७ कि.मी. अंतरावर अतिशय स्वच्छ व सुंदर असा समुद्रकिनारा आणि खाडी ह्यांच्या अनोख्या संगमातून तयार झालेले अद्भूत सौंदर्य तारकर्ली येथे पाहण्यास मिळते. विस्तीर्ण पसरलेला समुद्रकिनारा, पायांना कोमल स्पर्श करणारी मऊ वाळू, कोवळे उन. स्वर्ग यापेक्षा काही वेगळा असतो काय? तारकर्ली किनार्‍यावर गेल्यानंतर या स्वर्गाचा अनुभव येतो. अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा, बांबूची, सुपारीची झाडे पाहून मन प्रसन्न होते. तीरावरील नारळी पोफळीची हीरवीगार नयनरम्या दौलत , सुर्यास्त् आणि सूर्योदय या दोन्हींचे अनोखे दिव्या सौंदर्य न्याीहाळण्यारसाठी अप्रतिम स्थ ळ म्हरणजेच तारकर्ली बाधा व्हावी असे सौंदर्य निसर्गाने येथे उधळले आहे. येथे थांबून निसर्गाचा आनंद घेण्यासाठी रिसॉर्ट आपल्या सेवेत हजर आहेत. येथील समुद्र किनारे एवढे नितळ, स्वच्छ आहेत की पाण्यातील सौदर्य अगदी साध्या डोळ्यांनी न्याहाळता येते. निळेशार पाणी आणि क्षितिजापर्यंत पसरलेला किनारा रोजच्या ताणतणावापासून दूर ठेवतो. मनाला शांतावतो. गर्दीपासून दूर शांत, निवांत क्षण घालवण्यासाठी हे ठिकाण नक्की भेट देण्यासारखे आहे. तंबूत निवास, नावेतून सफर व स्कूबा डायव्हिंगचा अनुभवदेखील येथे घेता येतो. एमआयडीसीने तारकर्लीला प्रसिद्धी मिळवून देण्यात विशेष हातभार लावलाय.

 
वायंगणी समुद्रकिनारा

ऑलिव्ह रिडले कासव संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेला वेंगुर्ले-वायंगणी किनारा आता पर्यटकांसाठीही आकर्षण ठरतो आहे. किरात ट्रस्टच्या 'कासव जत्रे'च्या निमित्ताने वायंगणी गाव सहयोगातून पर्यटन नकाशावर आणण्याच्या प्रयत्नांना संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेल्या पर्यटकांनी चांगला प्रतिसाद दिला. कासव जत्रा हा उपक्रम कासव संरक्षण आणि संवर्धनाला पूरक ठरेल, पर्यटनाच्या माध्यमातून गावाची नवी ओळख पर्यटन नकाशावर येईल अशी जत्रेच्या आयोजनामागील भूमिका आहे.

 
निवती समुद्रकिनारा

कुडाळपासून साधारण २५ किमी वर निवतीचा किनारा आहे. कुडाळ- पाट-म्हापण-निवती असा प्रवास आहे. खाडीच्या दक्षिणेकडे निवती बंदर आणि उत्तरेकडे श्रीरामवाडी. निवतीला विजयालक्ष्मी पंडितांचे घर आणि आंब्याची विस्तीर्ण बाग आहे. निवतीच्या पूर्व-दक्षिण समुद्र किनारा पसरलेला आहे. सकाळी आकाश निरभ्र असेल तर सुर्योदयाचे फोटो छान मिळतात. गावाच्या पश्चिमेस निवती किल्ला समुद्रात पाय पसरून उभा आहे. किल्लयावर पडके बुरूज, खंदक आणि बऱ्यापैकी झाडी आहे. क्वचित मोर आणि जंगली प्राणीही दिसतात. भोगव्याच्या बाजूने थोडीशी दमछाक करणारी चढण आहे. किल्ल्यावरून भोगव्याचा किनारा अत्यंत सुंदर दिसतो. तासन तास इथून जाऊ नये असे वाटते. संध्याकाळी सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य दिसते. भोगवे-निवती किल्ला-निवती गाव व त्यापुढील किनारा असे चालत गेल्यास एक दिवसाची छान सहल होते. साहसाचाही आनंद मिळतो. किनाऱ्यावर खडकामध्ये अनेक समुद्री जीव आढळतात. कुडाळ-पाट-परूळे-भोगवे असेही जाता येते. आणि भोगव्याच्या किनाऱ्यावरून निवती किल्ल्यावर चढता येते. पाट येथे गावतळयामध्ये वेगवेगळया रंगाची कमळे आहेत. या विस्तीर्ण तळयाच्या पश्चिमेस दलदलीच्या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी नेहमी दिसतात. निवतीच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात अणि जवळून 'डॉल्फिन' माशाच्या झुंडी पाहाता येतात. डॉल्फिनचे नृत्य पाहाण्याचा आनंदही अनुभवता येतो. यांत्रिकी होड्यांमधून समुद्र सफर करत ' डॉल्फिन' चे नृत्य पाहाता येते. हे डॉल्फिन मोठ्या संख्येने येथे पाण्यावर येतात. यांत्रिकी पर्यटक होड्यांच्या जवळूनच त्यांचा जलविहार चालू असतो. उंच उड्या मारत जलविहार करणारे डॉल्फिन पाहाणे पर्यटकांसाठी पर्वणीच ठरते. पर्यटकांना आवश्यक त्या सुविधा असणारे बीच रिसॉर्टही येथे आहे.

सागरेश्वर समुद्रकिनारा

वेंगुर्लेपासून अवघ्या तीन कि.मी. वर हा बीच आहे. येथे सागरेश्वर देवाचे सुंदर मंदिर आहे. येथून वेंगुर्ले बंदराचे विहंगम दृश्य पाहता येते. डॉल्फिनदर्शनासाठी हा किनारा प्रसिद्ध आहे.

मोचेमाड समुद्रकिनारा

वेंगुर्ले मोचेमाडच्या किनार्‍यावरील विस्तीर्ण पसरलेल्या पांढर्‍या शुभ्र वाळुच्या चौपाट्या विलोभनीय आहेत. किनार्‍यालगत असलेल्या नारळ पोफळीच्या बागा आणि नजीकच्या डोंगर उतारावरील हापूस आंब्याच्या बागा त्यामुळे येथील समुद्रकिनारा अधिक रमणीय बनला आहे.

धार्मिक  स्थळे आणि इतर :
कुणकेश्वर मंदिर आणि समुद्रकिनारा

श्री क्षेत्र कुणकेश्वर.... कोकणातील एक पवित्र तिर्थक्षेत्र...अतीप्राचीन काळापासुन येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करुन असलेल्या शंभुमहादेवाची ही भुमी... कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर... देवावरुन गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर असेच प्रचलीत झाले. सुमारे ११०० व्या शतकापासुन प्रसिद्धीला आलेले हे स्थान म्हणजे कोकणातील धार्मीक व ऐतिहासीक सौंदर्याचा मुकुटमणीच म्हणावा लागेल. कुणकेश्वर मंदिरा इतके प्राचीन भव्य देवालय कोकणात इतरत्र कुठेच नाही. पुणे, मुंबई, कोल्हापुर या शहरांशी देवगडहुन अवघ्या १८ कि.मी. अंतरावर कुणकेश्वर हे गाव आहे.एसटी थांबते तेथून अवघ्या ५-७ मिनिटांच्या अंतरावर असणार्‍या मंदिराचा कळस लक्ष वेधून घेतो.ऐन किनार्‍याशी असणार्‍या उंचवटयावर उभारलेल्या या मंदिरचा सागरतटाकडील भाग भक्कम बांधीव तटाने सुरक्षित राखला आहे. ८-९ मीटर उंचीच्या या तटावर असणार्‍या सपाट जागेवर मंदिर आहे. मंदिराचा परिसर २२-२४ मीटर उंचीच मंदिर आहे. मंदिराचा परिसर तटाने परिवेष्टित तर आहेच, पण खाली जांभ्या दगडांची फरशीही आहे. अशा या कुणकेश्वर मंदीराचा इतिहास सुद्धा तितकाच प्राचीन, रोमांचकारी आणि रहस्यमय असा आहे.

देवस्थानच्या परिसरात समुद्रकिनारी काही शिवलिंग आहेत. त्यापैकी २१ शिवलिंग आपणास पाहावयास मिळतात. या शिवलिंगामागील इतिहास असा आहे की, गेली कित्येक वर्ष समुद्राच्या पाण्यामध्ये असणारी ही शिवलिंग झिज होत असतानासूद्धा ती पुर्ववत प्रमाणे आहेत अशी निदर्शनास येतात. इतका काळ लोटला तरी त्यांची म्हणावी तितकी झिज झालेली नाही. गेले कित्येक वर्षे यात्रेकरु या शिवलिंगाचे दर्शन घेत आहेत. ही शिवलिंग पांडवांनी घडवलेली आहेत अशी श्रद्धा आहे. याची साद देणारी पांडवलेणी आजही येथे आहेत.

देवळापासुन जवळच पूर्व दिशेस डोंगराच्या उतरणीवर काही लोक जमीन खणत असताना पूर्वकाळापासून कित्येक शतके बुजालेले एका गुहेचे दार मोकळे होऊन आंत कोरीव पाषाणी मूर्ती आढळून आल्या ही गुहा म्हणजे इतर कोरीव लेण्यांप्रमाणे एक लेणी आहे. पण यातील मूर्ती मात्र गुहेच्या दगडांवर कोरलेल्या नसून त्या अलग आहेत. गुहेची खोली तांबडया कापाच्या दगडाची असून मूर्तीचा दगड काळा-काळित्री आहे. हा काळा दगड गावात समुद्राच्या कडेस आणि डोंगराच्या कडयांत क्वचित स्थळी सापडतो.या गुहेला सध्या पांडव लेणी म्हणून ओळखले जाते. गुहेची खोली सुमारे १० फुट लांब ८ फुट रूंद आणि ६ फुट उंच असून, पाच फुट उंच आणि तीन फुट रूंद असा दरवाजा आहे. आत १८ कोरीव मुखवटे शिवलिंग आणि नंदी मिळून २० नग आहेत. मुखवटयांची मांडणी जोडी जोडीने केलेली आहे. पुरूष व स्त्री अशा ८ जोडया, एक तरूण पुरुषाचा मुखवट स्वतंत्र बसवलेला आहे. तसेच एक पुतळयाची नासधूस झाल्यामुळे तो पुरूषाचा किंवा स्त्रीचा हे नीट ओळ्खता येत नाही. त्यामुळे तो एका बाजुस ठेवला आहे. शिवलिंग आणि नंदी हे देखिल काळा- (काळित्री) दगडाचे असून गुहेत प्रवेश केल्यावर तिच्याध्यभागी पण जरा डाव्या बाजूस ठेविले आहेत. गुहेतील मुर्त्या हया देवतांच्या मुर्ती नसून राजघराण्यातील स्त्री पुरूषांचे ते मुखवटे आहेत. त्यांचे कोरीव काम उच्च दर्जाचे दिसून येते. कौशल्यामध्ये ओबडधोबडपणा कमी असून रेखीव व सुबकपणाकडे कोरण्याकडे चांगलेच लक्ष दिले आहे. पुरूषांच्या आकृती जरा मोठया असून त्या मानाने स्त्रियांच्या लहान आहेत. प्रत्येक जोडप्यास निराळी बसकण आहे. प्रत्येक मुखवटयाला राजास आणि राजघराण्यातील स्त्रीपुरूषांस शोभेल असाच पेहराव केलेला आहे. प्रत्येक मुखवटयास शिरपेच, डोकिच्या एका बाजूस तुरा, मोत्यांचे पेड कोरीव कामांत दाखविले आहेत. तसेच महाराष्ट्रीय वळणाची शिरोभूषणे आपणास या मुर्त्यांवर पाहावयास मिळतात.या बाबतचे आणखी संशोधन चालू आहे. मुळात कोकणात लेणी थोडी आहेत. आणि अशा तर्‍हेचे लेणे तर नाहीच.

भगवती मंदिर

देवगड-आचरा-मालवण मार्गावरील देवगड पासून 19 कि.मी. आणि मालवणपासून 29 कि.मी. अंतरावर असणा-या नारिंग्रे गावापासून 6 कि.मी. अंतरावर कोटकामते हे गाव आहे. येथे सुमारे 50 वर्षांपूर्वी (शके 1647) सेना सरखेल कान्होजी आंग्रे यांनी बांधलेले श्री भागवती मंदिर आहे. तशा आशयाच्या शिलालेख या देवालयाच्या भिंतीवर आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या गावात पूर्वी एक किल्ला होता. त्यावरूनच या गावाला कोटकामते हे नाव पडले आहे. हा संपूर्ण परिसर आमराईने नटलेला आहे. आता किल्ला नामशेष झाला असून त्याचे काही अवशेष शिल्लक आहेत. गावात प्रवेश करताना दिसणारा बुरूज आणि थोडीफार तटबंदी एवढेच अवशेष शिल्लक आहेत. मंदिरापर्यंत जाण्यास उत्तम रस्ता आहे. 
मंदिरात देवीची पाषाणी रेखीव मूर्ती आहे. मंदिरासमोर वड व पिंपळाचे दोन जुनाट वृक्ष आहेत. या वृक्षाखाली देवळाच्या प्रवेशद्वारापाशी देवीचे वाहन असलेली सिंह प्रतिमा आहे. मंदिराच्या सभा मंडपाला लाकडी खांब असून त्यावरील कोरीव नक्षीकाम अप्रतिम आहे. मंदिराशेजारी दोन ताफा आहेत.
दस-यात येथे नवरात्रोत्सव फार मोठ्या आणि पारंपारिक पध्दतीने शाही थाटात संस्थानिकांना शोभेल असा साजरा केला जातो. येथील उत्सवाचा आनंद लुटणे म्हणजे एक पर्वणीच आहे.

सोनुर्ली देवी माउली मंदिर

सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावही आपले वेगळेपण जपणारा. लोटांगणाच्या जत्रेसाठी हा गाव प्रसिद्ध! हजारो भक्तगणांची लोटांगणे जत्रोत्सवात पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. कोकणची दक्षिण काशी म्हणूनही सोनुर्ली माउली देवस्थान प्रसिद्ध आहे. माउलीच्या दरबारात भरणारी तुला प्रसिद्ध आहे. कोकण म्हटले की, कौलारू घरे, मातीच्या भिंती हे चित्र सहज डोळ्यांसमोर तरळते. पण आज सर्वत्र बिल्डरांचे प्रस्थ वाढले असल्याने स्लॅबच्या घरांचे जाळे पसरत चालले आहे. सोनुर्ली गाव मात्र त्याला अपवाद आहे. येथे स्लॅबचे घर नावाला सापडणार नाही. येथे मातीच्या भिंतींचा हळूहळू कायापालट होऊ लागला असला तरी या गावात भिंतीसाठी चिर्‍याचे दगड वापरले जात नाहीत. घरांच्या छप्परावर नळेच असावेत असा गाववासियांचा आजही आग्रह असतो. या परंपरेची जपणूक गाववासीय मोठ्या श्रद्धेने करतात. विटांची घरे येथे पाहावयास मिळतात. 'खेड्यामधले घर कौलारू' कसे असावे ते पाहावे तर इथेच! सुंदर सुंदर पहुडलेली घरे डोंगरमाथ्यावरून पाहताना तर चित्त हरपते. येथे स्लॅबची घरे बांधण्यास देवीचा कौल लागत नाही. काळेत्री दगड घराच्या पायासाठी वापरला जात नाही. तसे करण्यास देवीची परवानगी मिळत नाही. देवीच्या मंदिराचे बांधकाम काळेत्री दगड वापरून करण्यात आले आहे. त्यामुळे काळेत्री दगड घरासाठी वापरू नयेत असा दंडक आहे.

बागलांची राई

वेंगुर्ले-पाट रस्त्यावर दाभोलीपासून नजीकचा निसर्गरम्य अशा बागलांची राई या ठिकाणी कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मणांचे आद्य गुरु श्रीमंत पूर्णानंदस्वामींचे शिष्य श्रीमत् चिदानंद स्वामी यांची समाधी आहे. श्रीमत चिदानंद स्वामी हें महान योगी सत्पुरुष होते. आजगावच्या प्रसिध्द मतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बालवयातच श्री पूर्णानंद स्वामींनी त्यांना दर्शन देऊन त्यांच्यावर कृपा केली व त्यांना ब्रह्मज्ञान दिले व त्यांचे मूळ रुद्राजी हे नाव बदलून त्यांनीच चिदानंद असे ठेवले. सिध्दावस्था प्राप्त होताच १२ वर्षे त्यांनी भारतभर तीर्थयात्रा केली. योगसाधनेने मिळविलेल्या सामर्थ्यामुळे त्यांनी अनेक चमत्कार केले. स्वामी चिदानंद यांचे वंशज बागलकर या उपनावाने ओळखले जातात. त्यांचे मुळ नाव रुद्राची बाळकृष्ण प्रभु-मतकरी शके १६३० मध्ये त्यांचा आजगाव येथे जन्म झाला. गुरुंच्या आज्ञेवरुन चिदानंदनी चाळीसाव्या वर्षी गृहस्थाश्रमास प्रारंभ केला. त्यांच्या पत्नीचे नाव पार्वती होते. स्वामींना सहा पुत्र व एक कन्या होती. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी बांगलाची राई येथे समाधी घेतली. श्रीमद् चिदानंद स्वामींनी योगरहस्य, देवीभागवत ब्रह्मसूत्रावली, स्वानंदलहरी आदी ग्रंथ लिहिले. बांगलांच्या राईत श्रीमत्चिदानंदाच्या प्रमाणेच ब्रह्मानंद आणि विमलानंद यांच्या समाध्या आहेत. डोंगराच्या कुशीत असलेलया बागलांच्या राईतील श्रीमंत् चिदानंद स्वामींच्या समाधीवर एक आडवी, पाच सहा इंच रुंदीची कुडकाची लाकडी तुळई आहे. त्याची खालची बाजू नेहमी पाण्याने ओली असते आणि त्यातून महाशिवरात्रीपासून मृगापर्यंत खालच्या पिंडीवर सतत थेंबथेंब पाणी गळत असते. स्वामींच्या समाधीचे हे ठिकाण अत्यंत रम्य असून हिरव्या गार वनश्रीमुळे भर दुपारीही येथे सुखद गारवा असतो. बाजूलाच पाटाचे झुळझुळ पाणी अखंड वाहात असते. प्रतिभावंत ख्यातनाम मराठी साहित्यिक चि. त्र्यं. खानोलकर यांच्या आजोळीचे हे गाव या ठिकाणचय निसर्गाचे वर्णन त्यांच्या काव्यातून प्रगट झाले आहे.

किल्ले
विजयदुर्ग

विजयदुर्ग हा अभेद्य जलदुर्ग वाघोटन खाडीच्या दक्षिणेस एका विस्तीर्ण खडकावर उभा आहे. शिलाहार राजघराण्याच्या कारकिर्दीत म्हणजे सन 1993 ते 1206 या काळात राजा भोज याने हा किल्ला बांधला. कोल्हापूरच्या पन्हाळा येथे शिलाहार घराण्यातील भोज राजा राज्य करीत होता. भोज राजाने एकंदर 16 किल्ले बांधले व काहींची डागडुजी केली त्यात विजयदुर्ग किल्ल्याचा समावेश आहे. सन 1200 मध्ये तो बांधला गेला असावा असा अंदाज आहे.
इ.स. 1653 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकेपर्यंत या किल्ल्याने अनेक स्थित्यंतरे पाहिली. शिलाहारांचे राज्य देवगिरीच्या यादवांनी इ.स. 1218 मध्ये बुडविले. इ.स. 1354 मध्ये विजयनगरच्या राजाने देवगिरीच्या यादवांचा पराभव केला व कोकण प्रांत बळकावला. पुढे इ.स. 1431 मध्ये बहमनी सुलतान अलउद्दीन अहमदशहा याने विजयनगर राजाचा पराभव केला. 1490 ते 1526 या काळात बहामनी राज्याचे 5 तुकडे झाले. त्यात विजापूरचा आदीलशहाकडे कोकणप्रांत सोपविला गेला. त्यानंतर 1653 पर्यंत सुमारे 129 वर्षे विजयदुर्ग विजापूरकरांच्या अंमलाखाली राहिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1653 साली हा किल्ला विजापूरच्या आदिलशहाकडून जिंकून घेतला. छत्रपती शिवाजी महरांजानी हा किल्ला जिंकून घेतला तेव्हा साधारण 5 एकर क्षेत्रात हा किल्ला विखुरलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी आरमारी केंद्र स्थापन करावयाचे असल्याने त्यांनी किल्ल्याची दुरुस्ती व व्याप्ती केली. 14 एकर 5 गुंठे इतक्या क्षेत्रापर्यंत या किल्ल्याची व्याप्ती वाढविली. पूर्वेच्या बाजूला नवीन तटबंदी उभारली.

किल्ला कसा पहाल
किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले मारुती मंदिर आहे. पडकोट खुष्क म्हणजे किल्ल्याची मुख्य तटबंदी सोडून कांही अंतरावर बांधलेली तटबंदी. मुख्य दरवाजाला संरक्षण देणार्‍या निबीच्या दरवाजापुढे गेल्यावर 30 मिटर उंचीची तटबंदी. मुख्य दरवाजाच्या आत एक लहान दरवाजा होता, त्यास दिंडी दरवाजा म्हणत. रात्रौ मुख्य दरवाजा न उघडता त्याचा जाण्या-येण्यासाठी उपयोग करीत. डाव्या बाजूला खलबतखाना नावाची इमारत आहे. या इमारतीमध्ये सभा बैठका होत. या इमारतीचच्या समोर दारु-गोळ्याचे कोठार आहे. पुढे गेल्यावर भुयार दिसते. भुयाराच्या बाजूने तटावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. या किल्ल्यास विविध नावाचे 18 बुरूज आहेत. तटावरुन चालतांना बारकाईने पाहिल्यास तटाखालील कोठारे दिसून येतात. कांही अंतर चालून गेल्यावर लाईट हाऊस दिसते. लाईट हाऊसच्या पुढे तटाच्याखाली चुन्याचा घाणा दिसतो. तटाते बांधकाम करतांना दगडामध्ये सांधण्यासाठी वापरावयाचे सिमेंट मिश्रण म्हणून चुना, रेती, गुळ, हरड्याचे पाणी व नारळाचा काथा या घाण्यामध्ये मिश्रण करुन सिमेंट बनवत. चुन्याचा घाण्याच्या बाजूला गोड्या पाण्याच्या विहिरी, साहेबाचे ओटे, भवानी मातेचे मंदिर, जुने रेस्ट हाऊस, जखीणीची तोफ यासारख्या गोष्टी येथे पहावयास मिळतात.

देवगडचा किल्ला

देवगड प्रसिध्द आहे ते हापूस आंब्यासाठी. प्राचिन काळापासून देवगड हे एक सुरक्षित बंदर म्हणूनही प्रसिध्द आहे. देवगड बंदराच्या तीन बाजूंनी असलेल्या डोंगरांमुळे तेथे नाले सारखा आकार तयार झाला आहे, त्यामुळे या भागात पावसाळ्यातही उंच लाटा तयार होत नाहीत. याच कारणासाठी शिवाजी महाराजांच्या काळात व आजही मालवण, वेंगुर्ला व आजूबाजूच्या बंदरातील बोटी पावसाळ्यात देवगड बंदरात नांगरल्या जातात.
देवगडचा किल्ला समुद्रात शिरलेल्या टेकडीच्या निमुळत्या होत गेलेल्या टोकावर वसलेला आहे. त्यामुळे त्याला ३ बाजूंनी समुद्राचे नैसर्गिक संरक्षण लाभलेले आहे. देवगड किल्ला दोन भागात विभागलेला आहे. 
(
१) टेकडीवरील बालेकिल्ला व (२) समुद्राला लागून असलेला किल्ल्याचा भाग. देवगड गावात किल्ल्याबद्दल विचारल्यास थेट टेकडीवरील बालेकिल्ल्याचा रस्ता दाखवतात आणि सामान्य पर्यटकही तेवढाच किल्ला पाहून परत जातात.

इतिहास :
देवगड किल्ला कोणी व कधी बांधला याची माहिती उपलब्ध नाही. इतिहासातही या किल्ल्याचा फारसा उल्लेख आढळत नाही.इ.स.१७७२ मध्ये वॉल्टर ब्राऊन याने वाडीकर सावंतांच्या मदतीने देवगड किल्ल्यावर हल्ला चढविला होता, पण त्या हल्ल्यात त्यांचा पार धुव्वा उडाला होता.इ.स.१८१८ मध्ये कर्नल इम्लाफ याने हा किल्ला जिंकून घेतला.

पहाण्याची ठिकाणे :
देवगडचा किल्ला समुद्रात शिरलेल्या टेकडीच्या निमुळत्या होत गेलेल्या टोकावर वसलेला आहे. गावातून टेकडीवर जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. टेकडीच्या सुरुवातीच्या भागात दाट वस्ती आहे. या वस्तीतच डाव्या बाजूला एक गल्ली जाते, या गल्लीच्या टोकाला सुटा बुरुज आहे. वस्ती संपल्यावर बालेकिल्ल्याकडे जातांना उजव्या बाजूला २ सुटे बुरुज आहेत. हे तीनही टेहळणी बुरुज असून त्यांचा उपयोग समुद्रावर, बंदरावर व आजूबाजूच्या परीसरावर लक्ष ठेवण्यासाठी होत असे. टेकडीवरील पठारावरून बालेकिल्ल्याकडे जातांना आपल्याला प्रथम बालेकिल्ल्याची पूर्व पश्चिम पसरलेली तटबंदी व त्यातील ३ बुरुज दिसतात. देवगड किल्ल्याला ३ बाजूंनी समुद्राचे नैसर्गिक संरक्षण लाभलेले आहे. चौथ्या म्हणजेच टेकडीच्या बाजूने संरक्षण देण्यासाठी कातळात ३ मीटर रुंद व २.५ मीटर खोल खंदक खोदलेला आहे. या खंदकाच्या एका बाजूवर तटबंदी उभारल्यामुळे तटबंदीची उंची वाढलेली आहे. इतर किल्ल्यांच्या खंदकाप्रमाणे या खंदकात पाणी साठवले जात नव्हते. कातळात खोदलेल्या या खंदकातील दगड (चिरे) वापरून गडाची तटबंदी व बुरुज बांधलेले आहेत.
तटबंदीच्या पूर्व टोकाला २ बुरुजांच्या मध्ये गोमुखी दरवाजा लपवलेला आहे. दरवाजाच्या आतील बाजूस तटबंदीतच हनुमानाची मूर्ती बसवलेली आहे. त्याच्या शेजारीच प्रवेशव्दाराच्या बुरुजावर जाणारा जीना आहे. या बुरुजावरून संपूर्ण किल्ला दृष्टीक्षेपात येतो. येथून किल्ल्याच्या अर्ध्या भागात असलेली पोर्ट ट्रस्टची कार्यालये व दिपस्तंभ दिसतात. प्रवेशव्दाराच्या समोरच गणपतीचे जिर्णोध्दारीत मंदिर आहे. त्यातील पूरातन गणेश मूर्तीचे दर्शन घेऊन तटबंदीच्या कडेकडेने बालेकिल्ला पहाण्यास सुरुवात करावी.
प्रथम उजव्या बाजूस एक छोटी दोन खणी चिरेबंदी वास्तू दिसते. पुढे गेल्यावर कातळात खोदलेली २ सुकी टाकी दिसतात. किल्ल्याच्या पश्चिम टोकावर असलेल्या बुरुजावर चढण्यासाठी रुंद पायर्‍या आहेत. या बुरुजात जंग्या आहेत, तसेच तोफा ठेवण्यासाठी झरोके देखिल आहेत. याच बुरुजावर झेंडा लावण्यासाठी सोय केलेली आहे. बुरुजावरून खाली उतरून सरळ चालत गेल्यावर घरांचे चौथ‍र्‍यांचे अवशेष दिसतात.पुढे एक चिर्‍यात बांधून काढलेली चौकोनी विहिर आहे, तिच्या भोवती चिर्‍याचे कंपाऊंड केलेले आहे. विहिरीच्या पुढील भागात पोर्ट ट्रस्टची कार्यालये व दिपस्तंभ आहे. या भागात जाण्याची परवानगी नाही. त्यामुळे पुन्हा प्रवेशव्दारापाशी परत यावे. प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर डावीकडील आमराईत सिमेंट मध्ये बांधलेल्या पायर्‍या दिसतात. या पायर्‍यांनी ५ मिनिटात आपण समुद्राला लागून असलेल्या रस्त्यावर पोहोचतो. येथे कस्टमचे कार्यालय आहे; त्याच्या विरूध्द बाजूस म्हणजे डावीकडे वळून ( उजव्या बाजूस समुद्र व डाव्या बाजूस डोंगर ठेऊन) चालत राहील्यास ५ मिनिटात आपण पोर्ट ट्रस्टच्या गेटपाशी पोहोचतो. गेटच्या अलिकडे समुद्राच्या बाजूला एक भिंत आहे. या भिंतीच्या मागे किल्ल्याचे समुद्राकडील प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दारातून किल्ल्यावर एकदम प्रवेश करता येऊ नये म्हणून प्रवेशव्दारा समोरच भिंतीची रचना करण्यात आली आहे व डाव्या बाजूस चिंचोळी वाट ठेवलेली आहे. पूर्वीच्या काळी या प्रवेशव्दारा समोरच समुद्रात बोटींसाठी धक्का असावा. येथून पुन्हा रस्त्यावर येऊन कार्यालयांपाशी पोहोचावे. येथे दोन तोफा समुद्राकडे तोंड करून ठेवलेल्या आहेत. या दोन तोफांमधून जेटीवर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. जेटीवरून समुद्रात बांधलेले किल्ल्याचे चार बुरुज दिसतात. कार्यालय ओलांडून पुढे गेल्यावर शेवटच्या टोकावर एक मोठा बुरुज आहे. येथून बालेकिल्ल्यापर्यंत जाण्यासाठी पायर्‍या आहेत तसेच तटबंदी आहे.(या भागात जाण्याची परवानगी नाही. त्यामुळे पुन्हा प्रवेशव्दारापाशी परत यावे). येथे आपली गड प्रदक्षिणा पूर्ण होते. येथून आल्या मार्गाने परत बालेकिल्ल्यावर जावे किंवा सरळ रस्त्याने गेल्यास आपण ३० मिनिटात देवगड गावात पोहोचतो.

 
तेरेखोल किल्ला

तेरेखोल [ वेंगुर्ला तालुका आणि पेडणे तालुका उत्तर गोवा ] एकच गाव पण दोन तालुक्यात ? आश्चर्य वाटतंय ना? मित्रांनो तेरेखोल हा गाव वेंगुर्ला तालुक्यात येतो पण याच गावातील तेरेखोल किल्ला मात्र पेडणे तालुक्याचा (उत्तर गोवा जिल्हा) भाग आहे. १७ व्या शतकात सावंतवाडी संस्थानचे महाराज खेम सावंत भोसले यांनी तेरेखोल किल्ला बांधला. १७६४ साली हा किल्ला पोर्तुगीजांनी ताब्यात घेतला. तेरेखोल गाव जरी वेंगुर्ला तालुक्यात येत असलं तरी हा किल्ला मात्र सध्या गोवा सरकारच्या ताब्यात आहे. सध्या किल्यात एक आलिशान हेरिटेज हॉटेल बांधण्यात आल असून किल्यात प्रवेश निवडक लोकांनाच मिळतो. तेरेखोल पाहण्यासाठी वेंगुर्ला आणि सावंतवाडी बसस्थानकावरून बसेस उपलब्ध आहेत. गोव्यातून जाण्यासाठी केरी मार्गे यावे लागेल. विशाल तेरेखोल नदी पार करण्यासाठी फेरी बोट उपलब्ध आहेत. केरी (गोवा) - तेरेखोल आणि पाल्ये (गोवा) - आरोंदा (वेंगुर्ला) फेरीबोट सेवा सतत सुरु असते. केरी तून म्हापसा आणि पेडणे बसेस सतत उपलब्ध असतात.

रामगड किल्ला
 

रांगणा गडाजवळ उगम पावणारी गड नदी ८० किमी अंतर कापून समुद्राला मिळते. या गडनदी मार्गे होणार्‍या व्यापारावर, जलवहातूकीवर लक्ष ठेवण्यासाठी 'रामगड' किल्ला बांधण्यात आला. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेल्या एका डोंगरावर हा किल्ला बांधण्यात आला. आजही किल्ल्याचे प्रवेशद्वार, तटबंदी, बुरुज शाबूत आहेत.

इतिहास :
रामगडची उभारणी शिवाजी महाराजांनी केली. गडाचा इतिहास ज्ञात नाही. १८ व्या शतकात पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यामध्ये लढाई चालू होती. त्यावेळी तुळाजीने रामगड जिंकून घेतला होता. तेव्हा पेशव्यांचे सरदार कृष्णाजी महादेव व सावंतवाडीकर यांचा जमाव खंडाजी मानकर यांनी एकत्र होउन फेब्रुवारी १७९६ मध्ये रामगड जिंकला. ६ एप्रिल १८१८ ला रामगड किल्ला ब्रिटीशांनी जिंकून घेतला. त्यावेळी गडावर २१ तोफा व १०६ तोफगोळे असल्याचा उल्लेख मिळतो.

पहाण्याची ठिकाणे :
गडाच्या पश्चिमाभिमुख प्रवेशद्वारातून आपण गडावर प्रवेश करतो. गडाचे प्रवेशद्वार ८ फुट उंच आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला १८ फूट उंच बुरुज आहेत. प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला पहारेकर्‍यांसाठी देवड्यांची योजना केलेली आहे. या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस थोड्या अंतरावर अजून एक (चोर) दरवाजा आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या हाताला तटबंदी ठेऊन सरळ चालत गेल्यावर आपल्याला होळींच्या माळावर पोहोचतो. तेथे ७ तोफा रांगेत उलट्या पुरुन ठेवलेल्या दिसतात. त्यातील सर्वात मोठी तोफ ७ फूट लांबीची आहे. या तोफांसमोरच किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार आहे. हे उत्तराभिमुख प्रवेशद्वार गोमुखी बांधणीचे आहे. प्रवेशद्वाराच्या आत देवड्या आहेत. परंतू प्रवेशद्वारा बाजूच्या बुरुजांचे चिरे ढासळल्यामुळे प्रवेशद्वारातून रामगड गावातील होळीवाडीत जाणारा मार्ग बंद झाला आहे. या प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताच्या तटबंदीवरुन गड नदीचा प्रवाह दिसतो.
गडाच्या मधोमध बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ढासळलेले आहे. बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोरील तटावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. या तटावर काळ्या पाषाणातील गणपतीची अत्यंत सुबक मुर्ती आहे. बाजूलाच काही शाळूंका आहेत. या तटावरुन दुसर्‍या बाजूला पायर्‍यांनी उतरल्यावर आपण किल्ल्याच्या सध्याच्या प्रवेशद्वारापाशी येतो व आपली गडफेरी पूर्ण होते. गडाला १८ फूट उंचीचे १५ बुरुज आहेत. प्रत्येक बुरुजाला ३ दिशांना खिडक्या आहेत. बुरुजांच्यामध्ये १८ फूटी तटबंदी असून तीने पूर्ण किल्ल्याला वेढलेले आहे. तटबंदीची लांबी अंदाजे ६४० मीटर आहे. गडावर किल्लेदाराच्या वाड्याचा चौथरा आहे, पण पाण्याची विहीर अथवा तलाव आढळत नाही.

रांगणागड किल्ला
 

पूर्वेला सह्याद्री पर्वताच्या रांगा तर पश्चिमेला अथांग अरबी समुद्र. या दोघांच्या मध्ये कोकण प्रदेश वसला आहे. या प्रदेशात फिरताना निसर्गसौंदर्य तर डोळ्याला भावतेच, त्याशिवाय सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात दुमदुमलेला व अरबी समुद्राच्या लाटा-लाटांवर उसळणारा इतिहास साद घालतो. तो केवळ इथले गिरिदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट यांच्या अस्तित्वामुळेच. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरताना येथील सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर १४ गिरिदुर्ग पाहायला मिळतात. आपल्या देशात आपलेच राज्य असावे, या हेतूने प्रेरित होत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्याच्या रक्षणासाठी हजारो मावळे सरसावले. महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील उंच उंच शिखरांवर गिरिदुर्ग म्हणजे मुके मावळेच उभे केले. काही गिरिदुर्ग जिंकून घेतले. त्यापैकी एक असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माणगाव खोऱ्यातील रांगणागड हा आहे.
कुडाळ तालुक्यातील नारूर मुक्कामाहून रांगणागडावर जायला पायवाट आहे. भयाण जंगल, दगडधोंडय़ांतील पायवाट, जंगली पशूंचा वावर या संकटांवर मात करत रांगणागड गाठावा लागतो. वाटेत जर लक्ष चुकून तुमचा पाय घसरल्यास १०० ते १५० फूट तुम्ही खालीच गेला समजा. या गडावर जायचं म्हणजे दांडगी इच्छाशक्तीच हवी. तब्बल २ तासांनंतर गडावर पोहोचता येते. गडाची तटबंदी पूर्णपणे ढासळलेली आहे. जुना दिंडी दरवाजादेखील अर्धवट उभा आहे. दिंडी दरवाजातून आतमध्ये गेल्यावर उजव्या बाजूला पाण्याची विहीर लागते. थोडंसं पुढे चालत गेल्यावर दुसरा एक दरवाजा लागतो. या दरवाजाचं नक्षीकाम फारच सुंदर आहे. दरवाजातून पुढे गेल्यानंतर मोठा तलाव पाहायला मिळतो. या तलावात वर्षांचे बाराही महिने मुबलक पाणी असते. तलावाच्याच काठावर पश्चिमेला भग्नावस्थेतील शंकर मंदिर आहे, तर थोडंसं पुढे रांगणाई देवीचे मंदिर आहे. मंदिराच्या समोरील नक्षीदार दीपमाळ लक्ष वेधून घेते. या दीपमाळेचे बांधकाम काळ्या दगडाचे आहे. मंदिर छोटेसेच आहे; परंतु वादळात मंदिराची इमारत केव्हाही पडेल, अशी अवस्था या वास्तूची झालेली आहे. या मंदिराच्या बाजूला हनुमान मंदिरदेखील आहे. रांगणागड भेटीच्या निमित्ताने या गडावर एक दिवस वास्तव्य करण्याचा योग आला. संपूर्ण गडावर फिरताना या गडाच्या चारही बाजूला पाहिल्यास नजरेत मावणार नाही एवढा दूरवरचा प्रदेश दिसतो. या गडाचा नेमका इतिहास काय याचा शोध घेता घेता संदर्भ ग्रंथांमधून जी माहिती समोर आली ती रोमांचित करणारी होती.
हा गड शिलाहार घराण्यातील दुसरा भोज राजाने उभारला आहे. इ. स. ११७५ ते १२१२ हा या राजाचा कालावधी आहे. यावरून हा गड ८०० वर्षांहूनही अधिक काळापूर्वीचा आहे, हे लक्षात येते. शिलाहारांची पन्हाळा ही राजधानी होती. राजा दुसरा भोजने आपल्या कारकीर्दीत १५ किल्ले उभारले. त्यापैकी रांगणागड हा शिवाजी महाराजांनी जिंकून घेऊन स्वराज्यात सामील केला. प्रतापगडावर १० नोव्हेंबर, १६५९ रोजी शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला. यानंतर १८ दिवसांनी म्हणजे २८ नोव्हेंबर १६५९ रोजी महाराजांनी पन्हाळा जिंकून घेतला. पुढे पावणगड, वसंतगड व विशालगडाबरोबरच रांगणागडही जिंकून घेतला. १६९५ मध्ये रांगणागडावर राजाराम महाराजांना राज्याभिषेक करण्यात आला होता. ९ डिसेंबर, १८४४ साली हा गड इंग्रजांनी ताब्यात घेतला. अत्याधुनिक तोफांच्या माऱ्यात गडावरील इमारती व तटबंदीचे मोठे नुकसान झाले. कोल्हापूरच्या पन्हाळगडापासून हा किल्ला ५० मैलांवर आहे, तर समुद्र सपाटीपासूनची याची उंची ३००० फूट आहे.

सिंधुदुर्ग किल्ला
 

सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणाजवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. नोव्हेंबर २५, इ.स. १६६४ रोजी याचे बांधकाम आरंभले.

महत्त्व
शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या ५२ व ४५ दगडी जिने आहेत.ह्या किल्ल्यावर शिवकालिन ३ गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत.त्यांची नावे दूध विहीर,साखर विहीर व दही विहीर अशी आहेत.या किल्ल्यामध्ये महाराश्ट्रातील एकमेव शिवाजी महाराजांचे शंकराच्या रुपातील मंदीर आहे.याची स्थापना ‍राजाराम महाराजांनी केली होती.

इतिहास
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांकडे ३६२ किल्ले होते. या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश-वर्‍हाड या प्रदेशापर्यंतचा विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रुंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे, हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. चांगल्या, भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्रकिनार्‍याची पाहणी झाली. इ.स. १६६४ साली मालवण जवळील कुरटे नावाचे काळे कभिन्न खडक किल्ल्यांसाठी आणले. महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली. आज मोरयाचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेशमूर्ती, एकीकडे सूर्यकृती आणि दुसरीकडे चंद्रकृती कोरुन त्या जागी महाराजांनी पूजा केली. असं म्हणतात की, किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन खर्ची पडले. उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. ज्या चार मच्छिमार लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले, त्यांना गावे इनामे देण्यात आली. ऐतिहासिक सौदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुरटे खडकावर तीन शतके उभा आहे, तो शुद्ध काळाकभिन्न खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. या खडकावर समुद्र मार्गानी व्यापलेले क्षेत्र सुमारे ४८ एकर आहे. त्यांचा तट २ मैल इतका आहे. तटाची उंची ३० फूट असून रूंदी १२ फूट आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर २२ बुरुज आहेत. बुरुजाभोवती धारदार खडक आहे. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरला आहे. पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात ५०० खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस ८० हजार होन खर्ची पडले.

शिवकालीन चित्रगुप्त याने लिहिलेल्या बखरीत याबाबत पुढील मजकूर नमूद केला आहे :
"'
चौर्‍याऐंशी बंदरात हा जंजीरा,अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका,अजिंक्य जागा निर्माण केला ।
सिंधुदुर्ग जंजीरा,जगी अस्मान तारा ।
जैसे मंदिराचे मंडन,श्रीतुलसी वृंदावन, राज्याचा भूषण अलंकार ।
चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न, महाराजांस प्राप्त जाहले ।"

घडण व पहाण्यासारखी ठिकाणे
सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही. पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते. या खिंडेतून आत गेले की दुर्गाचे द्वार लागते. हे द्वार भक्कम असे उंबराच्या फळ्यांपासून केले आहे. उंबराच्या लाकडाचा उपयोग दीर्घकाळ टिकण्यासाठी होतो. त्याला सागाच्या लाकडाची जोड दिली आहे. आत गेल्यानंतर मारोतीचे छोटेखानी मंदिर आहे. तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे. बुरुजावर गेल्यानंतर १५ मैलांचा प्रदेश सहज दिसतो. 
पश्चिमेकडे जरिमरीचे देऊळ लागते. आजही तेथे लोक वस्ती करून राहतात. श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात बैठी महाराजांची प्रतिमा फक्त येथे दिसते. शिवाजी महाराजांची बैठी प्रतिमा अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर दिसत नाही. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर बारा वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते. इंग्रजानी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर काही प्रमाणात तो उद्ध्वस्त करून टाकला. किल्यांच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो. 
मराठ्यांचा भगवा ध्वज आणि त्यांचा ध्वजस्तंभ २२८ फूट उंच होता. त्यामुळे समुद्रातून दूरवरुन तो ध्वज सहज दृष्टिस पडत होता. ध्वजाला पाहून मच्छिमार खडकापासून लांब राहत असत. गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत. बंदूका टांगण्यासाठी तटाला भोके ठेवली आहे. सैनिकांसाठी पायखाने आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी ३०० वर्षापासून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश यातून दाखविला आहे, हे विशेष होय. कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा स्मृतिमय इतिहास म्हणजे हा किल्ला आहे. असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो.
सिंधुदुर्ग किल्ला मालवणपासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. ४८ एकर क्षेत्रात हा किल्ला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यातील देवालय इ.स. १६९५मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी बांधले. या किल्ल्यावर २८२ फूट उंचीचा भगवा ध्वज इ.स. १८१२ पर्यंत फडकत होता. इ.स. १९६१ साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तटदुरुस्ती केली.

पाण्याची सोय
मुख्य म्हणजे किल्ला परिसरात गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहे. त्यांची नावे दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशी आहेत. हे पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोडे पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे.

शिवगड किल्ला

कोल्हापूर व सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सीमेवर गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य आहे. या अभयारण्यात अपरिचीत असा शिवगड किल्ला आहे. मालवण, आचरा इत्यादी तळकोकणातील बंदरात उतरणारा माल अनेक घाटमार्गांनी सह्याद्रीच्या पठारावरील बाजारपेठांत जात असे. अशा घाटमार्गांपैकीच फोंडा घाटावर नजर ठेवण्यासाठी शिवगडाची उभारणी करण्यात आली होती.
राधानगरी व कळम्मावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या व जीववैवध्यतेने नटलेल्या दाजीपूर अभयारण्याला बरेच पर्यटक भेट देतात, पण अभयारण्यातच असलेला शिवगड पाहाण्यास फारसे पर्यटक फिरकत नाहीत. खरेतर थोडासा चढ व आटोपशीर आकार असलेला किल्ला दाजीपूरच्या भेटीत आरामात पहाता येण्यासारखा आहे.

पहाण्याची ठिकाणे :
शिवगड पाहाण्यासाठी दाजीपूर अभयारण्याच्या प्रवेशद्वारातून माणशी रुपये २०/ भरुन प्रवेश घ्यावा लागतो. अभयारण्यातील कच्च्या रस्त्याने फॉरेस्ट रेस्ट हाऊसपर्यंत गेल्यावर एक पायवाट गगनगिरी महाराजांच्या आश्रमापाशी जाते. या वाटेने अर्धातास चालल्यावर आपण शिवगडासमोरील पठारावर येतो. पठार व शिवगड यांच्यामध्ये एक टेकाड आहे. पठारावरुन खाली उतरुन मधल्या टेकाडाला वळसा घालून थोडासा चढ चढून शिवगडावर जाता याते. येथे तटबंदीचे काही अवशेष दिसतात.
शिवगडाच्या वायव्य दिशेकडे तोंड करुन असलेल्या उध्वस्त प्रवेशद्वारातून आपण गडावर प्रवेश करतो. प्रवेशद्वाराचे बुरुज अजून शाबूत आहेत. प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोर एक लांबलचक तटबंदी दिसते. गडाचे संरक्षण करण्यासाठी या दुहेरी तटबंदीची योजना केली असावी. तटबंदी ओलांडून पूढे गेल्यावर उजव्या बाजूस एक बूरुज दिसतो. गडाच्या पठारावर एक सुंदर सती शिळा आहे. स्थानीक लोक तीला 'उगवाई देवी' म्हणतात. तेथून उत्तरेच्या बुरुजावर गेल्यावर खाली कुर्ली धरण दिसते. तटबंदीच्या कडेकडेने दक्षिण बुरुजापाशी गेल्यावर बुरुजा खालून कोकणातील गडगे सखल गावातून येणारी वाट दिसते, तर दक्षिणेला फोंडा गाव दिसते. या शिवाय गडावर वाड्याचे काही अवशेष आहेत. गडाचा आकार आटोपशीर असल्यामुळे गड पाहाण्यास अर्धातास पुरतो. गड उतरुन परत येताना टेकडाला वळसा घातल्यावर समोरच्या कातळावर धबधब्यांच्या खुणा दिसतात. या धबधब्याजवळ पाण्याचे एक टाक आहे. धबधब्याचे पाणी पाटाने टाक्यात वळवलेले आहे. गडावर पाण्याची व्यवस्था आढळत नाही. या कुंडातील पाण्याचा वापर गडासाठी होत असावा. गडावरुन आजूबाजूचा परिसर पाहात असतांना पूर्वेला दाजीपूरच्या जंगलात एका मंदिराचे शिखर दिसते. मंदिर असलेल्या या परिसराला 'झांजेचे पाणी' म्हणतात. गड पाहून परत उगवाईच्या पठारावर येऊन कच्च्या रस्त्यावरुन जंगलाच्या दिशेने चालत गेल्यावर १० मिनिटात आपण मंदिरापाशी पोहोचतो. गगनगिरी महाराज येथे तपसाधनेसाठी बसत असत. या मंदिराच्या मागच्या बाजूला काही घरे आहेत. ती ओलांडून पूढे गेल्यावर एक बारामाही वाहणारा झरा आहे. त्यास झांजेचे पाणी म्हणतात. येथून शिवगडाचे दर्शन होते. येथून अर्ध्यातासात परत अभयारण्याच्या प्रवेशद्वाराशी जाता येते. याशिवाय दाजीपूर अगयारण्याची भटकंती सुध्दा करता येते. अभयारण्यात भटकंतीसाठी २१ किमी चा कच्चा रस्ता आहे. गाईड सोबत घेऊन जंगल पाहाणे सोईचे आहे.

किल्ले निवती

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दक्षिणेला, मालवण पासून १० किमी व वेंगुर्ल्यापासून १५ किमी सागरी अंतरावर असलेल्या निवती गावातील समुद्रात शिरलेल्या डोंगरावर शिवाजी महाराजांनी निवतीचा किल्ला बांधला. मालवणजवळ असलेली कर्ली खाडी ते वेंगुर्ला ह्या सागरी भागावर निवतीच्या किल्ल्यातून लक्ष ठेवता येते.

इतिहास :
सिंधुदुर्ग किल्ला बांधल्यानंतरच्या काळात शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. या किल्ल्याचा ताबा पुढे सावंतवाडीकर सावंतांकडे गेला. १७४८ साली पोर्तुगिजांच्या पदरी नोकरीस असलेल्या इस्माईल खानने निवतीवर हल्ला करुन तो जिंकून घेतला. १७८७ साली करवीरकर छत्रपती व सावंत यांच्यात झालेल्या लढाईत करवीरकरांनी किल्ला जिंकला. १८०३ मध्ये गडाचा ताबा परत सावंतांकडे आला. ४ फेब्रुवारी १८१८ रोजी इंग्रजांनी हा किल्ला जिंकून घेतला.

पहाण्याची ठिकाणे :
चिरेबंदी पायर्‍यांच्या वाटेने गड चढतांना आपल्याला प्रथम पायर्‍र्‍यांच्या दोंन्ही बाजूस असलेला २० ×१० फूटी खोल खंदक दिसतो. सध्या तो झाडीने झाकलेला आहे. याच वाटेने आपण भग्न तटबंदीतून किल्ल्यात प्रवेश करतो. येथे डाव्या बाजूला दोन भव्य बुरुजांमध्ये प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस देवड्या आहेत, पण प्रवेशद्वारापुढील मार्ग तुटल्यामुळे त्यातून प्रवेश करता येत नाही. तटबंदीतून किल्ल्यात प्रवेश केल्यावर दोन पायवाटा फूटतात. समोर जाणार्‍या पायवाटेने गेल्यास उजव्या बाजूस एक भव्य बुरुज दिसतो. तिथून पुढे गेल्यावर अजून एक भव्य़ बुरुज त्यावरील जंग्यासह पाहायला मिळतो. या बुरुजा जवळून खालच्या बाजूस अप्रतिम भोगवे बिच व कर्ली खाडी पर्यंतचा परिसर दिसतो. येथून डाव्या हाताला वळून समुद्राच्या दिशेला चालत गेल्यावर गडाच्या पश्चिम टोकावरुन पायथ्याला समुद्रात असलेले नारींगी रंगाचे खडक पहायला मिळतात. याच ठिकाणाहून उजव्या बाजूस समोर अरबी समुद्र व दूरवर वेंगुर्ल्याचे बर्न्ट रॉक्स हे दिपगृह दिसते. येथे एक खड्डा व त्यात उतरणार्‍या कातळात खोदलेल्या पायर्‍या पाहायला मिळतात. येथे खोदीव टाक असण्याचा संभव आहे. हे पाहून परत प्रवेशव्दारापाशी येऊन डाव्या बाजूच्या पायवाटेने गेल्यावर आपण बालेकिल्ल्यापाशी पोहोचतो. गडाचा बालेकिल्ला खंदक खोदून संरक्षित केलेला आहे. बालेकिल्ल्याची प्रवेशव्दारे, देवड्या, तटबंदी अजूनही शाबूत आहेत. तटबंदीत जागोजागी जंग्या आहेत. बालेकिल्ल्यात जुन्या वास्तूंचे चौथरे आहेत. बालेकिल्ला पाहून झाल्यावर किल्ल्याची भ्रमंती संपते.
निवती किल्ल्यावर आपल्याला पाण्याची व्यवस्था कुठेही दिसत नाही, ती किल्ल्याखाली केलेली आहे त्याला स्थानिक लोक 'शिवाजीची तळी' या नावाने ओळखतात. ती पाहाण्यासाठी किल्ला उतरतांना सरळ रस्त्याने गावात न जाता, उजव्या बाजूला समुद्राकडे उतरणार्‍या रस्त्याने खाली उतरावे. येथेच 'शिवाजीची तळी' नावाची पाण्याची टाकी आहेत. पुन्हा मुळ रस्त्याने निवती किनार्‍यावर गेल्यास छोटीशी पुळण व त्यावरुन समुद्रात घुसलेला २० फूटी खडक पाहायला मिळतो. याला 'जुनागड' म्हणतात. पुळणीच्या बाजूने त्यावर चढता येते. निवती पासून ८ किमी वरील परूळे गावात वेतोबा मंदीर संकुल आहे. त्यातील प्रमाणबद्ध कोरीव मूर्ती व वीरगळ पहाण्यासारखे आहेत.


o    थंड हवेचे ठिकाण
§  आंबोलीदोडामार्ग
o    अभयारण्य
§  दाजीपुर अभयारण्य कणकवली
o    ऐतिहासिक ठिकाणे
§  सावंतवाडी राजवाडासावंतवाडी
·          
o    धबधबा
§  नापणे धबधबावैभववाडी
§  व्याघ्रेश्वर धबधबादेवगड
§  सावडाव धबधबाकणकवली
§  आंबोली धबधबाआंबोली
o    तलाव
§  मोती तलाव
§  धामापुर तलाव
·          
o    सिंधुदुर्गातील इतर ठिकाणे
§  शिरोडा मिठागर
§  लाकडी हस्तकला
§  गंजिफा कार्ड
§  मोरयाचा धोंडा
§  डच वखार
सागर बंग्लो

No comments

Hindi vyakaran Mock Test

Scholarship Exam 2024 PAPER 1/2 : Hindi अनेकार्थी शब्द Start The Quiz Time's Up score: Next question See Your Result Total Quest...

Powered by Blogger.