हिंगोली जिल्हा
हिंगोली हा जिल्हा राज्यातील अगदी अलीकडच्या काळात म्हणजे १९९९ साली अस्तित्त्वात आलेला हा जिल्हा असून, संत ज्ञानेश्वरांच्या समकालीन असलेल्या “पहिल्या ज्ञानेश्वर चरित्रकाराचा” म्हणजे संत नामदेवांचा हा जिल्हा प्रत्येक मराठी माणसाला वंदनीय आहे. औंढा नागनाथाचे ज्योतिर्लिंग मंदिर हे या जिल्ह्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.हिंगोली जिल्हा हा मराठवाडा विभागाच्या उत्तरेस आहे. हिंगोलीच्या उत्तरेस अकोला जिल्हा व यवतमाळ जिल्हा, पश्चिमेस परभणी जिल्हा व आग्नेयेस नांदेड जिल्हा आहे, आताचा हिंगोली जिल्हा हा १ मे १९९९ पूर्वीपर्यंत परभणी जिल्ह्याचा एक भाग होता. त्या दिवशी औंढा, बसमत, हिंगोली, कळमनुरी व सेनगांव हे तालुके असलेला हा स्वतंत्र जिल्हा घोषित झाला.
हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४५२६ चौरस कि.मी.२ आहे. एकूण लोकसंख्या ९,८७,१६० तर साक्षरता ६६.८६% इतकी आहे. जिल्ह्यातील गोंधळ, शाहिरी, भारूड, पोतराज व कलगीतुरा या लोककला प्रसिद्ध आहेत. ज्वारी व कापूस ही जिल्हयाची मुख्य पिके आहेत
जिल्ह्यातील तालुके
· औंढा नागनाथ
· कळमनुरी
· बसमत
· सेनगांव
· हिंगोली
हिंगोली जिल्ह्याचा इतिहास
भौगोलिक माहिती
महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. भारताच्या पश्चिम-मध्य भागात असलेल्या महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. देशातील सर्वांत मोठे शहर, मुंबई हे महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर आहे. तर नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्र भारताचे महत्वाचे राज्य आहे.
महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेला स्थित आहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी आहे. महाराष्ट्रातील खूप मोठे क्षेत्र पठारी भागात मोडते. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. दख्खनचा पठारी प्रदेश विविध नद्यांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस व अरबी समुद्राला समांतर अशा सह्याद्री पर्वतरांगा (किंवा पश्चिम घाट) आहेत ज्यांची उंची सुमारे २१३४ मी. (अंदाजे ७,००० फूट) आहे. या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात. अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास कोकण म्हणतात. कोकण भागाची रुंदी ५०-८० कि.मी आहे. राज्याच्या उत्तरेस सातपुडा तर पूर्वेस भामरागड-चिरोळी-गायखुरी पर्वतरांगा आहेत. राज्यात मौसमी पाऊस पडतो. महाराष्ट्रातील काळी बेसाल्ट मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे.
महाराष्ट्र राज्य ३५ जिल्ह्यांत विभागले गेले आहे. या जिल्ह्यांचे ६ समूह अथवा महसुली विभाग आहेत. पुणे , नाशिक , औरंगाबाद , कोकण , नागपूर व अमरावती हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत राजस्व विभाग आहेत.
भौगोलिक, ऐतिहासिक व राजकीय-मतांनुसार महाराष्ट्रात पाच मुख्य विभाग आहेत. देश किंवा पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे विभाग), उत्तर महाराष्ट्र विभाग (नाशिक विभाग), मराठवाडा (औरंगाबाद विभाग), विदर्भ किंवा बेरार (नागपूर आणि अमरावती विभाग) , आणि कोकण (कोकण विभाग).
दळणवळण सोयी
नांदेड-अकोला, परभणी-यवतमाळ व जिंतूर-नांदेड हे महत्त्वाचे राज्यमार्ग (रस्ते)हिंगोली जिल्ह्यातनं जात असून जिल्ह्याच्या मध्यभागातून अकोला-पूर्णा हा लोहमार्ग जातो.
उद्योगव्यवसाय
लोकजीवन
शेतीव्यवसाय
· औंढा नागनाथ- बारा ज्योतिरलिंगांपैकी हे आठवे (आद्य) ज्योतिर्लिंग आहे.
· मल्लिनाथ दिगंबर जैन मंदिर (शिरड शहापूर),
· तुळजादेवी संस्थान (घोटा - ता. हिंगोली),
· संत नामदेवांचे जन्मस्थान (नरसी).
· शेवाळा येथील पूर्णानंद महाराजांचे मंदिर.
हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेव महाराजांचे मूळ गाव असून बालपणापासूनच पंढरीच्या विठ्ठलाच्या भक्तीची गोडी लागलेल्या संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून औंढा-नागनाथास जाऊन विठोबा खेचरांकडून गुरूपदेश घेतला. संत नामदेवांचे गुरू विठोबा खेचर यांचेही वास्तव्य या जिल्ह्यात होते.

Post a Comment