सांगली जिल्हा

 

 सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण व आग्नेय दिशेला आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ८,५७२ चौ. कि. मी. असून जिल्ह्याच्या उत्तरेला व वायव्येला सातारा, उत्तर व ईशान्येला सोलापूर, पूर्वेला विजापूर (कर्नाटक), दक्षिणेला बेळगाव (कर्नाटक), नैर्ऋत्येला कोल्हापूर व पश्चिमेला रत्‍नागिरी हे जिल्हे आहेत. पश्चिमेकडील शिराळा तालुका सह्याद्रीच्या मुख्य रांगेत येतो. जिल्ह्याचा पश्चिम भाग डोंगराळ आहे. कृष्णा खोर्‍याचा परिसर मात्र सपाट मैदानी स्वरूपाचा आहे.

सांगली जिल्ह्यातील तालुके :- शिराळा, वाळवा, तासगांव, खानापूर (विटा), आटपाडी, कवठे महांकाळ, मिरज, पलूस, जत कडेगांव

जिल्ह्यात जागोजागी भिन्नभिन्न भौगोलिक, आर्थिक व सामाजिक स्थिती आहे. जत, आटपाडी, कवठे महांकाळ हे कायम दुष्काळी तालुके आहेत. पलूस, वाळवा, मिरज तालुक्यांतील अनेक गावांना कायम पुराचा धोका असतो. शिराळा, कडेगाव, खानापूर हे डोंगरी तालुके आहेत. एका टोकाच्या शिराळा तालुक्यात जंगल आहे. तर दुसरीकडे जत तालुक्यात मैलोनमैल ओसाड जमीन आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या सांगलीचा निम्मा लोकव्यवहार कानडी भाषेत चालतो. जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी २०५ किमी व उतर-दक्षिण लांबी ९६ किमी आहे.

सांगली जिल्हा कृष्णा, वारणा नदी व उत्तरेस महादेवाच्या डोंगराखालील पठार व माणगंगा नदीच्या पात्रात वसला आहे. कृष्णा नदीची जिल्ह्यातली लांबी १०५ कि.मी आहे. जिल्ह्याचे तापमान किमान १४ अंश सेंटिग्रेड व कमाल ४२ अंश सेंटिग्रेड यांदरम्यान असते. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ४००-४५० मिलिमीटर आहे. जिल्ह्याची २००१सालची लोकसंख्या २८,२०,५७५ इतकी आहे.

निर्मिती

सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेचे चार तालुके व कर्नाटक सीमेलगतचे दोन तालुके मिळून १-८-१९४९ रोजी सहा तालुक्यांचा दक्षिण सातारा जिल्हा निर्माण झाला होता. त्यामध्ये जत, औंध, कुरुंदवाड, मिरज व सांगली संस्थानिकांच्या अधिपत्याखालील गावांचा समावेश होता. पुढे संयुक्त महाराष्टाच्या स्थापनेनंतर २१ नोव्हेंबर १९६० रोजी दक्षिण सातारा या जिल्ह्याचे नाव सांगली जिल्हा असे केले. या जिल्ह्यात १९६५ साली कवठे महांकाळ व आटपाडी हे नवे दोन तालुके निर्माण केले गेले. १९९९ साली तत्कालीन महाराष्ट्र सरकारने (युती सरकारने) पलूस तालुक्याची आणि नंतरच्या सरकारने २८ मार्च २००२ रोजी जिल्ह्यात कडेगाव नावाच्या १०व्या तालुक्याची निर्मिती केली. या जिल्ह्यात आता मिरज, कवठे महांकाळ, जत, आटपाडी, तासगाव, पलुस, वाळवा, शिराळा, विटा-खानापूर आणि कडेगाव असे एकूण दहा तालुके आहेत.

विशेष

'नाटक हे मराठी माणसाचे व्यवच्छेदक लक्षण होय. मराठी माणसाच्या जीवनात अढळ असे स्थान असलेल्या मराठी नाटकाचे उगमस्थान म्हणजे सांगली जिल्हा होय. येथेच विष्णुदास भावे यांनी पहिले मराठी नाटक सीतास्वयंवर सादर केले.

औरंगजेबाच्या छावणीचे कळस कापून आणणारे विठोजीराव चव्हाण व प्रतिसरकारचे प्रणेते नाना पाटील यांच्यासारख्या खंद्या वीरांना जन्म देणारी ही भूमी आहे. कलावंतांचा जिल्हा म्हणूनही सांगली प्रसिद्ध आहे. उत्तम दर्जाच्या तंतुवाद्यांची निर्मिती हे सांगली जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे.

संस्थानी खाणाखुणा, सुंदर कृष्णाकाठ आणि सहकारमहर्षी वसंतदादा पाटील यांचे जन्मस्थान हीदेखील सांगलीची ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. नाट्यपंढरी व कलावंतांचा म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा औद्योगिक क्षेत्रात तसेच कृषी क्षेत्रातही प्रगती साधण्याचा प्रयत्‍न करत आहे.

सांगली जिल्हा साखरपट्ट्यात येत असल्यामुळे येथे अनेक साखर-कारखाने आहेत. वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील क्र.१ चा सहकारी साखर कारखानाआहे.

नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व, (जन्म : २६ जून, इ.स. १८८८ ; नागठाणे, सांगली, महाराष्ट्र - मृत्यू १५ जुलै, इ.स. १९६७) या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. बालगंधर्व भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि मास्तर कृष्णरावांचे गुरुबंधू होत. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे गाणे ऐकून बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली. पुढे ते त्याच नावाने लोकप्रिय झाले.

नद्या

कृष्णा, वारणा, येरळा, माण, अग्रणी व बोर या सांगली जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. त्यांपैकी कृष्णा, वारणा व येरळा नद्या निश्चितपणे पाऊस पडणाऱ्या या प्रदेशातून वाहतात. कृष्णा ही सातारा जिल्ह्यातून वाहत येणारी नदी असून जिल्ह्यातील तिचा प्रवाहमार्ग १३०किमी. आहे. ती वाळवा, पलूस व मिरज तालुक्यांतून प्रथम पश्चिम-पूर्व व त्यानंतर वायव्य-आग्नेय दिशेस वाहते. कृष्णा नदीचे खोरे हा जिल्ह्यातील सुपीक भाग आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या वारणा, येरळा व अग्रणी या प्रमुख उपनद्यांबरोबरच कासेगाव व पेठ या नद्या आणि कटोरा ओढा, वाळू ओढा व खरा ओढा हे प्रमुख प्रवाह कृष्णेला मिळतात. वारणा नदी सांगली जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या सह्याद्री पर्वतश्रेणीतील प्रचितगडजवळ उगम पावते. तिची लांबी १७३ किमी. आहे. उगमानंतर ती शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातून काहीशी दक्षिणेकडे वाहत आल्यानंतर जिल्ह्याच्या दक्षिण सरहद्दीवरून (कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांची सरहद्द) प्रथम आग्नेयीकडे व त्यानंतर पूर्वेकडे वाहत जाते. सांगली शहराजवळच हरिपूर येथे ती कृष्णेला मिळते. मोरणा ही वारणेची उपनदी शिराळा तालुक्याच्या उत्तर भागात धामवडे टेकडीजवळ उगम पावते. सह्याद्रीच्या दक्षिण व आग्नेय दिशेने पसरलेल्या डोंगररांगांच्या दरम्यानच्या प्रदेशातून दक्षिण व आग्नेय दिशेत वाहत आल्यानंतर शिराळा तालुक्यातील मांगले येथे वारणा नदीला मिळते. काडवी, कानसा, शाली, अंबार्डी या वारणेच्या इतर उपनद्या आहेत.

सातारा जिल्ह्यातून वाहत येणारी येरळा ही सांगली जिल्ह्यातील एक प्रमुख नदी आहे. पश्चिमेकडील वर्धनगड-मच्छिंद्रगड आणि पूर्वेकडील महिमानगड-पन्हाळा डोंगररांगांमधून प्रथम दक्षिणेस, त्यानंतर आग्नेयीस व शेवटी दक्षिणेस वाहत जाऊन सांगली शहरापासून काही अंतरावर असलेल्या ब्रह्मनाळजवळ ती कृष्णेला मिळते. जिल्ह्यातील तिची लांबी सु.८५ किमी. आहे. येरळा नदीला पश्चिमेकडून नानी नदी व सोनहिरा ओढा, तर पूर्वेकडून कापूर नाला येऊन मिळतो. अग्रणी नदी खानापूर पठारावर बलवडीच्या जवळपास उगम पावते. उगमानंतर सु.३२ किमी. अंतर दक्षिणेस वाहत आल्यानंतर वज्रचौंदे येथून ती आग्नेयवाहिनी बनते. जिल्ह्याच्या बाहेर ती कृष्णेला मिळते. जिल्ह्यातील तिच्या प्रवाहमार्गाची लांबी सु.८५ किमी. आहे.

माण (माणगंगा) नदी सांगली जिल्ह्याच्या ईशान्य भागातील आटपाडी तालुक्यातून आग्नेय दिशेस वाहते. जिल्ह्यातील तिचा प्रवाह फक्त ३५ किमी. इतका कमी असला तरी तिच्या उपनद्या मात्र खानापूर, आटपाडी, जत, कवठे महांकाळ तालुक्यांचे जलवहन करतात. कोरडा नदी जतच्या जवळपास उगम पावते. उत्तरेस वाहत जाऊन ती जिल्ह्याच्या बाहेर माण नदीला मिळते. माण नदी पुढे भीमा नदीला मिळते. जतच्या ईशान्येस सु. ४ किमी. अंतरावर बोर नदी उगम पावते. या नदीने जत तालुक्याच्या पूर्व भागाचे जलवहन केले आहे. ईशान्येस व उत्तरेस वाहत जाऊन जिल्ह्याच्या बाहेर ती भीमा नदीला मिळते. जिल्ह्यातील तिची लांबी सु. ६४ किमी. आहे.

हवामान

हवामानाच्या दृष्टीने सांगली जिल्ह्याचे पश्चिमेकडील जास्त पावसाचा प्रदेश, कृष्णा खोऱ्याचा मध्यम पावसाचा प्रदेश आणि पूर्वेकडील कमी पावसाचा प्रदेश असे तीन विभाग पडतात. जिल्ह्याच्या पश्चिम भागात वार्षिक सरासरी पर्जन्यमान सु.४०० सेंमी. असून पूर्वेकडे आटपाडी व जत तालुक्यात ते सु.५० सेंमी. इतके कमी आहे. एकूण वार्षिक पर्जन्यापैकी ६८% पर्जन्य नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मिळतो. सुखटणकर समितीच्या शिफारशीनुसार जिल्ह्यातील जत, आटपाडी, खानापूर, मिरज, कवठे महांकाळ व तासगाव या तालुक्यांचा केंद्र शासनाने निश्चित केलेल्या अवर्षणप्रवणक्षेत्रात समावेश करण्यात आला असून १९७४-७५ पासून या तालुक्यांमध्ये अवर्षणप्रवण – क्षेत्रविकास कार्यक्रम राबविले जात आहेत.

जिल्ह्यातील वनक्षेत्र फारच कमी म्हणजे जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या अवघे ६% इतके आहे. एकूण वनक्षेत्राच्या सु. एक चतुर्थांश वनक्षेत्र एकट्या शिराळा तालुक्यात आहे. पश्चिमेकडील जास्त पावसाच्या सह्याद्री पर्वत व लगतच्या डोंगराळ प्रदेशात सदाहरित वने, सह्याद्रीच्या पूर्वेकडील डोंगराळ प्रदेशात मिश्र आर्द्र पानझडी वने, तर जिल्ह्याच्या पूर्वेकडील कमी पावसाच्या प्रदेशात शुष्क पानझडी वृक्ष, झुडुपे व गवत आढळते. सदाहरित जंगलांत जांभूळ, पिसा, भोसा, अंजन, हिरडा, तांबट इ. प्रकारचे वृक्ष आढळतात.

वाळवा, खानापूर व तासगाव तालुक्यांच्या सरहद्दीवर ‘सागरेश्वर’ अभयारण्य विकसित करण्यात आले आहे. हे अभयारण्य हरणांसाठी राखीव आहे. शिराळा तालुक्यातील ‘चांदोली’  अभयारण्य प्रसिद्घ आहे. हे अभयारण्य जिल्ह्याच्या सीमा ओलांडून कोल्हापूर, सातारा व रत्नागिरी जिल्ह्यांत पसरले आहे. त्याचा विस्तार सु. ३०० चौ. किमी. क्षेत्रात आहे. या अभयारण्यास राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला आहे. गवा, अस्वल, बिबट्या, हरिण इ. प्राणी तसेच पक्ष्यांच्या अनेक जातीअनेक दुर्मिळ वनस्पती या अभयारण्यात आढळतात. जिल्ह्यातील दंडोबाच्या डोंगरावर वनोद्याने आहेत.

ऐतिहासिक महत्त्वाचे

प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठी आदी सत्तांचा उत्कर्ष व ऱ्हास अनुभवला. पेशवाईच्या काळात सांगली हे स्वतंत्र संस्थान होते. या संस्थानांवर पटवर्धन घराण्याची सत्ता होती. मिरज हेदेखील संस्थान होते. स्वातंत्र्यपूर्व काळात सविनय कायदेभंगाच्या चळवळीत जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिळाशी येथे मोठा सत्याग्रह झाला होता. गोरक्षनाथ महाराजांनी ( नवनाथांतले दुसरे नाथ) शिराळ्यामध्ये ३२ शिराळा येथे सुरू केलेला नागपंचमीचा उत्सव जगप्रसिद्ध आहे.

दळणवळण

राष्ट्रीय महामार्ग क्र.४ हा पुणे व बंगलोर या शहरांना जोडणारा महामार्ग जिल्ह्यातून जातो.

मिरज-पुणे व मिरज-कुर्डुवाडी-लातूर हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. मिरज हे जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे.

शेती

जिल्ह्याच्या पश्चिम भागात विशेषत: शिराळे तालुक्यात पिवळसर, तांबूस, तपकिरी जमीन; तसेच मिरज, तासगाव तालुक्यात करडी व कृष्णा, वारणा, येरळा या नद्यांच्या खोर्‍यांत काळी-कसदार जमीन आढळते.

सांगली जिल्ह्यात ज्वारी हे प्रमुख पीक असून येथे घेतली जाणारी मालदांडी ही ज्वारीची जात विशेष प्रचलित आहे. सांगलीची हळद व येथील हळद-बाजार पूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. उसाचे पीकदेखील जिल्ह्यात मोठया प्रमाणावर घेतले जाते. अलीकडील काळात सांगली जिल्हा द्राक्षोत्पादनासाठी प्रसिद्धीस आला असून त्यांतल्यात्यांत तासगाव व मिरज तालुके द्राक्ष उत्पादनात जिल्ह्यात अग्रेसर आहेत. द्राक्षापासून बेदाणे तयार करण्याचे उद्योग वाढत आहेत. याशिवाय कृष्णा नदीकाठच्या प्रदेशात-म्हणजे मिरज, तासगाव व वाळवे या तालुक्यांच्या कांही भागांत तंबाखूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

जिल्ह्यातील प्रमुख पिके- बाजरी, भात (तांदूळ). ज्वारी, गहू, मका, ऊस, भुईमूग, हळकुंड/हळद, सोयाबीन, द्राक्षे, डाळिंब, कापूस

राजकीय संरचना

लोकसभा मतदारसंघ : सांगली - मिरज,सांगली, पलूस-कडेगांव, खानापूर, तासगाव-कवठे-महांकाळ व जत हे विधानसभा मतदारसंघ मिळून सांगली लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. (जिल्ह्यातील इस्लामपूर व शिराळा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आले आहेत.)

विधानसभा मतदारसंघ : जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत- [[मिरज], सांगली, इस्लामपूर, शिराळा, पलूस-कडेगाव, खानापूर, तासगांव-कवठे महांकाळ  जत.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६१ मतदारसंघ आहेत, तर पंचायत समितीचे १२२ मतदारसंघ आहेत.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

गणपती मंदिर, मिरजेचा दर्गा, संगमेश्वर मंदिर (हरिपूर), प्रचितगड व चांदोली धरण/अभयारण्य, बत्तीस शिराळा, तासगांव येथील गणेश मंदिर, दांडोबा अभयारण्य, शुकाचारी गुहा.

पर्यटन

·         गणेशदुर्ग किल्ला : कृष्णेकाठी वसलेले सांगली शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून, गावात मध्यभागी गणेशदुर्ग हा किल्ला आहे.

·         गणेश मंदिर : १८४४ मध्ये श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन यांनी बांधलेले येथील गणेश मंदिर प्रसिद्ध असून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांनी या मंदिरात बैठका घेतल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात.

·         कृष्णा  वारणा नद्यांचा संगम : सांगलीपासून जवळच हरिपूर येथे कृष्णा  वारणा या नद्यांचा संगम झाला असून येथील संगमेश्र्वराचे मंदिर प्रसिद्ध आहे. येथेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे स्फूर्तिस्थळ नावाचे स्मारक आहे.

·         कृष्णा-येरळा संगमावरील ब्रम्हनाळ आणि बहे येथील रामलिंग इत्यादी ठिकाणे प्रसिद्ध आहेत.

·         मिरज : मिरज हे एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असून येथील भुईकोट किल्ला, वानलेस मिशन दवाखाना व मीरासाहेब अवलियाचा दर्गा प्रसिद्ध आहेत.

·         ख्वाजा मीरासाहेब दर्गा : हा ५०० वर्षे जुना असून, सर्व धर्मांतील व पंथातील लोक येथे दर्शनास येतात.

·         सागरेश्वर अभयारण्य : सांगलीजवळील सागरेश्वर अभयारण्य प्रसिद्ध आहे. खानापूर, पलूस, वाळवा या तालुक्यांत हे अभयारण्य पसरले असून हे हरणांसाठी राखीव आहे.

·         चांदोली (ता. बत्तीस शिराळा) : हे धरण वारणा नदीवर बांधण्यात आलेले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली हे अभयारण्य येते. या जंगलात गवा ,अस्वल, बिबट्या हे प्राणी आढळतात

.

·         औदुंबर : सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथे कृष्णाकाठी दत्त मंदिर आहे. औदुंबर येथे राहूनच प्रसिद्ध कवी सुधांशू यांनी काव्यसाधना केली.

·         पेंटलोद येथील प्रचितगड, बाणूरचा भूपाळगड, तासगावचे गणपती मंदिर, कवठे-एकंद येथील सिद्धारामाचे मंदिर व त्या ठिकाणी दसर्‍याच्या वेळी रात्रभर होणारी फटाक्यांची आतषबाजी विशेष प्रसिद्ध आहे.

·         दंडोबा येथील उंच टेकडीवर शंकराचे प्राचीन मंदिर आहे.

राजकीय वारसा

सहकार क्षेत्राला निर्णायक वळण देणारे व आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत महाराष्ट्राला विकासाकडे नेणारे महत्त्वाचे निर्णय घेणारे वसंतदादा पाटील यांची कर्मभूमी व जन्मभूमी म्हणजे सांगलीच होय. वसंतदादांचा जन्म मिरज तालुक्यातील पद्माळे या गावचा होय. त्यांनी अनेक वर्षे विधिमंडळात व संसदेत सांगलीचे प्रतिनिधित्व केले.

उद्योग

जिल्ह्यात सांगली, मिरज, विटा, कवठे-महांकाळ व इस्लामपूर या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. जिल्ह्यात बारा साखर कारखाने असून सांगली येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हा देशातील सर्वाधिक दैनिक गाळप क्षमतेचा व आशियातील सर्वांत मोठा सहकारी साखर कारखाना आहे. उधोगांमध्ये साखरउद्योगा व्यतिरिक्त इतर अनेक व्यवसायांसाठी सांगली प्रसिद्ध आहे. उदा० हळद, मिरची, द्राक्षे, भडंग, आणि असे सांगलीतले बरेचसे उद्योग भारतात प्रसिद्ध आहेत .सांगलीच्या बाजारपेठेमधून महाराष्ट्रात व कर्नाटकात मालाची आवक - जावक आहे. येथील विष्णुअण्णा फळ मार्केट, मार्केट यार्ड, सांगली-मिरज .एम.आय.डी.सी. (औधोगिक वसाहती)मधून अनेक प्रसिद्ध उत्पादने जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचत आहेत. चिंतामणि मोटर्स ही भारतात र्मोडिफाइड गाडी बनवण्यासाठी ओळखले जाते. तसेच महाराष्ट्र कार ओल्ड पार्ट्स , ही फर्म सर्व लेटेस्ट कार्सचे जुना व नवे स्पेअर पार्ट्‌स भारतभर पोहोचवण्यासाठी ऑनलाइन सिविधा देते. हिची अधिक महिति आपन caroldpart.com वर मिळते. सांगली-कोल्हापूर रोडवर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ आणि जुना लोखंड बाजार आहे. या मार्केटमध्ये १७० दुकाने असून हे सांगली लोखंड मार्केट. नावाने ओळखले जाते. याची स्थापना सलीम नदाफ यानी केली असून ते मार्क्टचे अध्यक्ष आहेत

No comments

Hindi vyakaran Mock Test

Scholarship Exam 2024 PAPER 1/2 : Hindi अनेकार्थी शब्द Start The Quiz Time's Up score: Next question See Your Result Total Quest...

Powered by Blogger.