महाराष्ट्रातील मृदा / जमीन


महाराष्ट्रातील मृदा सर्वत्र सारखी नाही. हवामानात विशिषेत: पर्जन्यमानात असणाऱ्या फरकामुळे वनस्पतीमध्ये व त्यामुळे मृदा प्रकारातही फरक आढळून येतो. महाराष्ट्रात मुख्यत: दोन प्रकारची माती सापडते. 1000 मि.मी. पेक्षा कमी पावसाच्या प्रदेशात बहुतकरून काळी माती सापडते. सह्याद्रीच्या पूर्वेला असलेल्या पठाराचा बहुतेक सर्व भाग या मातीने व्यापलेला आहे. या मातीला 'रेगूर' असेही म्हणतात. ही जमीन सुपीक असल्याने तिला कापसाची काळी माती असेही नाव आहे. ही माती प्रामुख्याने सपाट पृष्ठभागावर व नद्याच्या काठी आढळते.

याउलट जास्त पावसाच्या प्रदेशात तांबडी माती सापडते. यात प्रामुख्याने जांभा मातीचा समावेश होतो. या मातीमध्ये लोह व ल्युमिनीयमचे प्रमाण जास्त असते. ही माती आम्लधर्मीय असल्यामुळे शेतीला उपयुक्त नाही. याप्रकारची माती कोकणात तसेच सांगली कोल्हापूर जिल्ह्यातही आढळते. याशिवाय विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील तांबूस रंगाची हलकी रेताड माती, किनारपटट्ीवर काही प्रमाणात मिळणारी विशेषत: नद्यांच्या मुखाशी सापडणारी खारी माती हे मृदांचे अन्य काही प्रकार आहेत. 

काळी मृदा किंवा रेगूर मृदा

महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्वाची मृदा दख्खनच्या पठारावरील काळी मृदा आहे. तिने दख्खनच्या पठारावरील सर्वात जास्त प्रदेश व्यापलेला आहे.

प्रदेश :

सहयाद्री पर्वताच्या पूर्वेकडे घाटमाथा ओेलांडल्यावर संपूर्ण प्रदेश काळया मृदेचा असून विदर्भातील पूर्वेकडील प्रदेश वगळता सर्वत्र काळी मृदा आढळते. अर्थात रेगूर मृदेचे स्वरुप सर्वत्र सारखे असतेच असे नाही. मृदेच्या थराची जाडी बदलत असते. त्याप्रमाणे रंगही गडद काळया रंगाचा असून फिकट होत असतो.

महाराष्ट्रात सर्वात उत्तम प्रकारची कापसाची काळी मृदा ही गोदावरी, भीमा, कृष्णा तसेच तापी नदीच्या खोऱ्यात आढळते. त्याचप्रमाणे त्यांच्या उपनद्यांच्या खोऱ्यात देखील काळी मृदा आहे. तिला कापसाची मृदा असेही संबोधले जाते. जवळपासच्या उंचवटयाच्या प्रदेशातही अशा प्रकारची मृदा आढळते. परंतु त्या ठिकाणी मृदेचा थर कमी कमी होत जातो आणि तिचा रंग फिकट होत जातो. हळूहळू मृदेची सुपीकता कमी होते आणि जास्त उंचीवर तिचे रुपांतर तांबडया मृदेत होऊ लागते. काळया मृदेचे प्रामुख्याने दोन उपप्रकार पडतात. : (अ) मैदानावरील मध्यम काळी मृदा व दरीमधील खोल काळी मृदा.

निमिर्ती

दख्खनच्या पठारावरील ज्वालामुखीच्या लाव्हारसापासून तयार झालेल्या खडकांमध्ये ल्यूमिनिअम आणि फेरोमॅगेनीजचे प्रमाण जास्त असते. अशा खडकांचे विदारण होऊन काळी मृदा तयार होते. वाषिर्क पाऊस 50 ते 75 सें. मी. दरम्यान असणाऱ्या आणि पर्जन्याचे 30 ते 50 दिवस असणाऱ्या प्रदेशात काळी मृदा तयार होते. काळी मृदा तयार होण्याचे प्रमुख कारण मृदेमध्ये हयूमसचे भरपूर प्रमाण होय असे सांगितले जात असे परंतु आता काहींच्या मतानुसार टिटॅनी फेरस मॅग्नेटाईटचे अल्प प्रमाण, तसेच लोहाचे भरपूर प्रमाण यामुळे मृदेस काळा रंग प्राप्त होतो. पठाराचा मूळ खडक बेसॉल्ट देखील निमिर्तीस कारणीभूत आहे.

रासायनिक पृथक्करण

काळया मृदेची सर्वसाधारण खोली 3 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त असते. त्यामध्ये चिकणमातीचे प्रमाण 55 पर्यंत आढळते. मॅग्नेशिअम कार्बेनिट, कॅल्शिअम कार्बेनेट यांचे प्रमाण भरपूर असते.तिच्यात ल्युमिनिअम ऑक्साइड देखील मोठया प्रमाणात असते तर फॉस्फरस, नायट्रोजन व सेंदि्रय द्रव्यांचे प्रमाण बरेच कमी असते.

गुणधर्म :

(1) काळया मृदेचे रंगानुसार विविध प्रकार पडतात. उदाहरणार्थ, गडद काळी मृदा, मध्यम काळी मृदा, उथळ काळी मृदा वगैरे. (2) नद्यांच्या खोऱ्यात मृदेची सुपीकता जास्त प्रमाणात असते, परंतु पठारी भागात मात्र सुपीकता कमी कमी होत जाते. पठारावरील मृदेचे वैशिष्टय म्हणजे तिच्यामध्ये ओलावा टिकवून धरण्याची क्षमता असते. (3) काळया मृदेचे वैशिष्टय म्हणजे तिच्यामध्ये ओलावा टिकवून धरण्याची क्षमता असते.

(4) मृदू कण आणि रासायनिक द्रव्यांमधील चुनखडीच्या प्रमाणामुळे सुपीकता कमी होत नाही.

(5) उन्हाळयात कोरडया हवेत काळी मृदा भुसभुशीत होते. तसेच मृदेच्या वरच्या थरास कडक उन्हामुळे मोठया भेगा पडतात. (6) अशा भेगांमध्ये मृदेचे सुटे कण जातात, तसेच हवा देखील राहते.

(7) मान्सूनच्या पाऊस सुरु झाल्यावर या मृदेवरील भेगा नाहीशा होतात व ही सुपीक मृदा पिकांस अत्यंत अनुकूल असते. (8) कापसाच्या काळया मृदेचा एक महत्वाचा दोष म्हणजे मृदेमध्ये वाजवीपेक्षा जास्त पाणी असल्यास किंवा अतिरिक्त जलस्ंाचिन झाल्यास जमिनीत पाणी साचून ती दलदलयुक्त होते.

महाराष्ट्रात विशेषत: पश्चिम भागात कालव्याच्या साहाय्याने जलस्ंाचिनाची सोय असणाऱ्या पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर जिल्हयात मृदेमधील क्षार वरच्या थरात केशाकर्षण मुळे वर आलेले आहेत. एकदा का मृदेमध्ये असे क्षार वर जमा होऊ लागले की तिची सुपीकता झापाटयाने कमी होते व ती हळूहळू परंतु कायम स्वरुपात नापीक बनू लागते. अशी ही क्षारयुक्त मृदा पुन्हा कोणत्याही उपायाने पिकाखाली आणता येत नाही, याचा वाईट अनुभव वर उल्लेखिलेल्या प्रदेशात काही ठिकाणी आला आहे. अशा जमिनीला ाोपण असेही म्हणतात. उत्तर महाराष्ट्रात पूर्णा नदीच्या खोऱ्यात देखील भूमिगत पाण्याची उथळ पातळी आणि पाण्याचा निकृष्ट प्रतीचा निचरा यामुळे अशा तऱ्हेची चोपण जमीन तयार झालेली आहे.

जांभा मृदा

प्रदेश

महाराष्ट्रामध्ये दक्षिण भागात कोकणातील रत्नागिरी, स्ंाधिुदुर्ग व रायगड, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हयात आणि सहयाद्रीच्या घाटमाथ्यावर तसेच तेथील डोंगराळ भागात जांभा मृदा आढळते. गडचिरोलीच्या पूर्व भागात जांभा मृदा आहे.

निमिर्ती :

उष्ण कटिबंधीय प्रदेशात आर्द्र हवामानात जांभा मृदा तयार होते. पावसाचे प्रमाण महाराष्ट्रातील वरील प्रदेशात 200 सें. मी. पेक्षा जास्त असल्याने तेथील खडकांचे विदारण आणि झीज होते. काही ठिकाणी पाण्याचा निचरा होतो. बरीचशी सेंदि्रय द्रव्ये मृदेच्या खालच्या थरात जातात व काही द्रव्ये भूमिगत पाण्यातून वाहतात किंवा केशाकर्षणामुळे वरच्या थरातून कल्शिअम, बेरिअम आणि सोडिअमची संयुगे खालच्या थरात जमा होतात. जमिनीमध्ये लोह, ल्युमिनिअम आणि मॅगेनीजची संयुगे असतात. खडकामध्ये सिलिकांवर विदारणाची क्रिया होऊन लिच्ंागिची प्रक्रिया व त्यापासून आयर्न ऑक्साइड तयार होतो. अशा तांबूस पिवळसर मृदेस जांभा मृदा म्हटले जाते. 

रासायनिक पृथक्करण

जांभा मृदेमध्ये वर उल्लेखिल्याप्रमाणे प्रामुख्याने लोह आणि ल्युमिनिअमच्या ऑक्साइडचे प्रमाण भरपूर असते. त्यामानाने चुनखडीचे प्रमाण कमी असते. साधारणपणे पोटॅश, नायट्रोजन व सेंदि्रय पदार्थाचे प्रमाण कमी असते.

गुणधर्म :

उंच डोंगराळ प्रदेशात तसेच सखल प्रदेशातही जांभा मृदा आढळते.

(1) जांभा खडकामध्ये बॉक्साइडचे साठे विपुल प्रमाणात पाहावयास मिळतात. सहयाद्री पर्वताच्या 1000 मी. उंचीच्या प्रदेशात आढळणाऱ्या जमिनीमधील मूळ खडकाचा वरचा थर वहनाने निघून गेलेला आहे. कारण तेथे पावसाचे प्रमाण जास्त आहे. जांभा मृदेचा थर तांबूस तपकिरी किंवा पिवळसर तांबडया छटांचा असतो.

(2) उंचावरच्या प्रदेशातील जांभा मृदा अतिशय पातळ, उथळ आणि खडकाळ स्वरुपाची असते. तिच्यात ओलावा टिकवून धरण्याची क्षमता असत नाही.

(3) रत्नागिरी व स्ंाधिुदुर्गच्या सखल भागामध्ये जांभा मृदेचे संचयन झालेले आहे. अशा सखल प्रदेशातील जांभा मृदेचा रंग गडद असतो. मृदेमध्ये ओलावा टिकवून धरण्याची क्षमता असते.

पीके

जांभा मृदा जरी साधारण सुपीक असली तरी तिची सुपीकता दख्खनच्या पठारावरील काळया मृदेपेक्षा कमी असते. या मृदेपासून कोकणामध्ये रत्नागिरी व स्ंाधिुदुर्ग जिल्हयात प्रामुख्याने फळबागांची लागवड मोठया प्रमाणात केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी प्रावीण्य संपादन केलेले आहे. रत्नागिरीमधील हापूस आंबा महाराष्ट्रातच नव्हे तर जगात प्रसिध्द आहे. त्यांची निर्यात करुन परकीय चलन मिळते. याशिवाय काजू, चिक्कू वगैरे फळझाडांचे उत्पादन मिळते.

किनाऱ्याची गाळाची मृदा

प्रदेश

महाराष्ट्रात कोकण किनारपऱ्या लगत सखल प्रदेशात गाळाची मृदा आहे. तिला ााबर मृदा असेही म्हणतात. ही मृदा कोकणात उत्तर दक्षिण दिशेने किनारपट्‌टीलगत असून अतिशय च्ंांचिोळया प्रदेशात आढळते.

निमिर्ती

कोकणामधून वाहणाऱ्या नद्या आपल्या प्रवाहाबरोबर आणलेला गाळ या प्रदेशात पसरतात. तसेच खाजण आणि खाडयांमध्ये चिखल व मळीच्या संचयनाने गाळाची मृदा तयार होते

पिके

ही मृदा वाळूमिश्‌्ा्रति लोम प्रकारची असते. या मृदेत प्रामुख्याने तांदळाचे पीक घेतनले जाते, तसेच किनाऱ्यालगतच्या प्रदेशात नारळ व पोफळीच्या बागा आढळतात.

तांबडी आणि पिवळसर मृदा

प्रदेश :

महाराष्ट्रामध्ये तांबडी व पिवळसर मृदा मर्यादित प्रदेशात पसरलेली आहे. सहयाद्रीच्या पर्वतमय भागात विशेषत:उत्तर कोकणलगत तसेच विदर्भाच्या पूर्व भागात वर्धा व वैनगंगा नद्यांच्या खोऱ्यात तांबडी व पिवळसर मृदा तयार झालेली आहे.

निमिर्ती

महाराष्ट्रातील अतिशय जुन्या अशा व्ंाध्यियन आणि कडाप्पा, तसेच आकिर्यनकालीन ग्रॅनाइट आणि नीस खडकांवर विदारणाची झिज होऊन तांबडी मृदा तयार झालेली आहे. ती चिकणमाती आणि वाळूमिश्‌्ा्रति असून तिला आयर्न पेरॉक्साइडमुळे तांबडा रंग आलेला आहे. बहुतेक मृदा लोम प्रकारची असते.

रासायनिक पृथक्करण :

तांबडया मृदेमध्ये वर उल्लेखिल्याप्रमाणे प्रामुख्याने आयर्न पेरॉक्साइड असते. चुनखडी आणि कार्बेनिटचे प्रमाण अल्प असते. तसेच फॉस्फरिक सिड, हयूमस आणि पोटॅश यांचेही प्रमाण अल्प असते.

(1) तांबडया मृदेची रचना, रंग, खोली, रासायनिक पदार्थाचे प्रमाण, सुपीकता यांच्यात स्थिरता असत नाही.

(2) पूर्णपणे तांबूस व लाल तांबडी मृदा असत नाही. तिचा रंग तपकिरी, पिवळा किंवा राखी देखील असू शकतो.

(3) उंचावरच्या प्रदेशात थरांची व रासायनिक पदार्थानी युक्त गडद रंगाची सुपीक ाोम प्रकारची असते.

मृदेची वैशिष्टे

हाराष्ट्रातील जमिनी प्रामुख्याने ऑजाइटबेसाल्टग्रॅनाइट व पट्टिताश्म यांसारख्या खडकांपासून तयार झालेल्या आहेत. रत्नागिरीसिंधुदुर्गकोल्हापूरसातारापुणे या जिल्ह्यांत बेसाल्ट खडकांत बदल होऊन जेथे जांभ्याचा खडक तयार झालेला आहेतेथे जांभ्याच्या जमिनी तयार झालेल्या आहेत. भूपृष्ठातील चढउतारखडकांच्या स्वरूपातील फरकवार्षिक पर्जन्यमानातील फरक (५० सेंमी. ते ५०० सेंमी.) व नैसर्गिक वनस्पती (वनश्री) समूहातील फरक यांमुळे महाराष्ट्रातील मृदा प्रामुख्याने सात गटांत विभागल्या जातात. या मृदांची काही वैशिष्ट्ये खाली थोडक्यात दिली आहेत. 

(१)लवणयुक्त व गाळाच्या जमिनी : पश्चिम किनापट्टीत या जमिनी आढळतात. या काळ्या पत्थरापासूनच निर्माण झालेल्या असून जेथे जेथे त्या समुद्रकिनाऱ्याला अगदी लागून आहे तेथे तेथे समुद्राचे पाणी आत घुसत असल्याने जमिनीतील लवणांचे प्रमाण वाढून त्या लवणयुक्त बनतात. त्यांनाच कोकणात खार जमिनी’ या नावाने संबोधिले जाते. किनारपट्टीपासून जसजसे दूर जावे तसतसे खार जमिनीऐवजी गाळाच्या जलोढ जमिनीचे प्रमाण वाढत जाते. या जमिनी कमीअधिक खोलीच्या असून त्यांची उत्पादनक्षमता खूपचकमी असते. खार जमिनीतील लवणांमुळे व गाळांच्या जमिनीत भूपृष्ठातील चढउतारामुळे जमिनीचा विकास जेवढा व्हावयास पाहिजे तेवढा झालेला नाही. या जमिनीत सध्या तरी भात हेच प्रमुख पीक घेतले जाते. 

(जांभ्याच्याजांभ्यासारख्या व तांबड्या जमिनी : जंगलातील विशिष्ट स्वरूपाची वनश्री व उष्ण आर्द्र हवामान यांमुळे बेसाल्ट या खडकामध्ये बदल होताना त्यापासून जांभ्याच्या व जांभ्यासारख्या जमिनी तयार होतात. या जमिनी प्रामुख्याने रायगडसिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हे तसेच सातारासांगलीकोल्हापूरनासिक व पुणे या जिल्ह्यांचा पश्चिम भाग यांत आढळतात. या जमिनी साधारणपणे अम्ल स्वरूपाच्या असतात व त्यात चुनखडी अजिबात आढळत नाही. जमिनीची उत्पादनक्षमता मध्यम ते कमी असते. फॉस्फेट व पोटॅश यांचा पुरवठा खूपच कमी असतो. वनश्री व हवामान या दोन घटकांचा जांभ्याच्या जमिनीवर विशेष परिणाम दिसून येतो. तांबड्या जमिनी प्रामुख्याने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत आढळतात व त्यांची उत्पत्ती मिश्र खडकापासून होते. या जमिनींच्या बाबतीतही वनश्री व उष्ण आर्द्र हवामान यांचा संयुक्तपणे परिणाम होतो. जांभ्याच्या जमिनी असलेल्या भागात २०० ते ३०० सेंमी. वार्षिक पाऊस पडत असल्याने ह्या जमिनीत भातनागली व फळझाडांची पिके प्रामुख्याने घेतात. जांभ्यासारख्या जमिनी असलेल्या भागातही पावसाचे वार्षिक प्रमाण २०० ते ३०० सेंमी. असतेपण या जमिनीत खरीप हंगामात भात व नागली आणि रबी हंगामात वाटाणा,घेवडा अशी पिके घेतात. ठाणेरायगड व नासिक या जिल्ह्यांच्या पश्चिम भागात जांभ्यासारख्या जमिनीचे प्रमाण जास्त आहे. 

 (वरड जमिनी व दरीतील चिकण दुमट जमिनी : या जमिनी बेसाल्ट खडकापासूनच झालेल्या आहेतपण त्या मात्र डोंगरी प्रदेशात घाटमाथ्यावर आढळताततर चिकण दुमट जमिनी दरीच्या प्रदेशात आढळतात. चढ उतारातील फरकाप्रमाणे या जमिनी ३ ते ४ सेंमी. खोलीपासून १ ते १.५ मी. खोलीच्या आढळतात. जास्त पावसाच्या प्रदेशातच या जमिनी आढळत असल्याने जमिनीतील विनिमय घटक द्रव्यांचे प्रमाण बरेच कमी असते व त्यांचे pH मूल्य ६.५ ते ७.५ या दरम्यान आढळते [पीएच मूल्य]. उतार फार असलेल्या भागातील जमिनींना कुमारीस’ असे म्हणतात व त्यांत नाचणीसारखी पिके व गवत घेतात. चिकण दुमट जमिनी सुपीक असल्याने त्यांत भाताचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. या जमिनीचा पोत व pH मूल्य सर्वसाधारणपणे स्थिर असतात. 

 (मध्यम व जास्त खोलीच्या काळ्या जमिनी : महाराष्ट्रातील जमिनीचे जास्तीत जास्त क्षेत्र या प्रकाराखाली मोडते. मध्यम काळ्या जमिनीत चुनखडीचे व विनीमय घटक द्रव्यांचे प्रमाण भरपूर व जमिनीचे pH मूल्य ८ ते ८.५ च्या पुढे असते. या जमिनीत फॉस्फेट व पोटॅशचे प्रमाण साधारणपणे समाधानकारक असलेतरी सेंद्रिय कार्बनाचे व नायट्रोजनाचे प्रमाण मात्र खूपच कमी असते. जमिनीची प्रत्यक्ष खोली व तिचा पोत याबाबतींत खूपच विविधता आढळते. जास्त खोलीच्या काळ्या जमिनी या मोठ्या नद्यांवरील पाणलोट भागांत व असंख्य लहान पाणवठ्याच्या भागातील तिरावर आढळतात. या बहुसंख्य जमिनी जलोढ आहेत. या खूप खोल व अत्यंत सुपीक आहेत. तापीभीमाकोयनागोदावरीप्रवरानीराकृष्णा यांसारख्या मोठ्या नद्यांच्या खोऱ्यांत या जमिनीचे प्रमाण जास्त आहे. जमिनीच्या सुपीकतेमुळे त्यांच्यात सर्व बागायती पिके उत्तम तऱ्हेची येतात. उशिरा पडणारा पाऊस जेव्हा अनुकूल असेल तेव्हा गव्हाचे व रबी ज्वारीचे उत्कृष्ट पीक काढले जाते. मध्यम व खूप खोलीच्या काळ्या जमिनींच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मात फारसाफरक नाही. पावसाच्या प्रमाणाप्रमाणे ज्वारी आणि गव्हाबरोबरच द्विदल धान्येकापूसभुईमूगनिरनिराळी कडधान्येगळिताची पिके यांसारखी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. ऊसद्राक्षे या नगदी पिकांसाठीही या जमिनी प्रसिद्ध आहेत. या भागात ६० ते ७५ सेंमी. एवढाच पाऊस पडत असल्याने सिंचन व्यवस्थेला शेतीत विशेष महत्त्व दिले जाते. 

 (वरड ग्रॅव्हली जमिनी : चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील डोंगराळ प्रदेशात या जमिनी प्रामुख्याने आढळतात. स्थानिक भाषेत त्यांना वरडीरेटरी इ. नावांनी संबोधितात.  जमिनीची सुपिकता फार कमी असल्याने त्यांच्यात नाचणीसारखी पिकेच फक्त येऊ शकतात. 

 (उथळ व चिकण दुमट जमिनी : भंडारा जिल्ह्यातील जवळजवळ ७० टक्के जमीन मिश्र खडकापासून तयार झालेली असून ती उथळ व चिकण दुमट स्वरूपाची आहे. बेसाल्ट खडकापासून तयार झालेल्या काळ्या जमिनीप्रमाणेच या जमिनीचे गुणधर्म आढळून येतात. पावसाचे प्रमाण निश्चित असल्याने खरीप हंगामात भात व खोल जमिनीत रबी हंगामात गहूजवस यांसारखी पिके घेतली जातात. 

(लवणयुक्त व चोपण जमिनी :  विशिष्ट भौगोलिक स्थिती व कमी पावसाचा प्रदेश या भागांत या जमिनी मोठ्या प्रमाणात आढळतात. खाऱ्यापाण्याच्या सिंचनासाठी वापरसिंचन म्हणून पाण्याचा अमर्याद वापरपाण्याची पातळी वर असलेला भाग व निचऱ्याचा अभाव यांमुळेही या तऱ्हेच्या जमिनी तयार होतात. ज्या जमिनींत विद्राव्य लवणांचे प्रमाण ०.५ प्रतिशतपेक्षा जास्त असतेत्यांना लवणयुक्त जमिनी असे संबोधिले जाते. सोडियमयुक्त विद्राव्य लवणांची मृण्मय खनिजांशी रासायनिक प्रक्रिया झाली कीलवणयुक्त जमिनीचे चोपण जमिणीत रूपांतर होते व त्यांचे pH मूल्य ८.५ ते ९.० च्या पुढे आढळते. लवणयुक्त व चोपण जमिनीचे क्षेत्र सारखे वाढत असून सध्या त्याचे प्रमाण सु. ०.५० लाख हेक्टर आहे. या जमिनी रासायनिक दृष्ट्या सुपीक असल्यातरी भौतिक व जैव दृष्ट्या पीक वाढीला प्रतिकूल असल्यामुळे त्यांची सुधारणा केल्याशिवाय त्या भरघोस पीक देत नाहीत. 

महाराष्ट्रातील जलसिंचन
महाराष्ट्राचे जलसिंचन जास्तीत जास्त किंवा कमाल सिंचन क्षमता सुमारे ७१ लाख हेक्टर समजली जाते. जलसंपत्तीचा वाटा ५३ लाख हेक्टर आहे. महाराष्ट्रामध्ये शेतजमिनीच्या कमाल सुमारे २ कोटी हेक्टर पैकी फक्त ७१ लाख हेक्टर जमिनीलाच पाणीपुरवठा होऊ शकेल. एकूण शेतजमिनी पैकी जलसिंचानाचे प्रमाण फक्त २६% असेल.

महाराष्ट्रात जलसिंचन प्रकारानुसार प्रमुख जिल्हे

जलसिंचन प्रकार-         जिल्हे
विहीर जलसिंचन-अहमदनगर,नाशिक,पुणे.
तलाव जलसिंचन -भंडारा,गोंदिया,चंद्रपूर,गडचिरोली
ठिबक जलसिंचन-नाशिक,अहमदनगर,औरंगाबाद,अमरावती,जळगाव.
तुषार जलसिंचन-जळगाव,अमरावती,बुलढाणा

महाराष्ट्रातील प्रमुख जलसिंचन योजना
*
पुणे विभाग - [पुणे - माणिकडोह, वाडज, डिंबे वरसगाव, पानशेत, खडकवासला, वीर,][सातारा - धोम, कन्हेर, कोयना,][कोल्हापूर - तुळशी, राधानगरी,][सोलापर - उजनी]

*
नाशिक विभाग - [नाशिक - वाघाड, आळंदी, ओझरखेड, पालखेड, गंगापूर, गिरणा.][अहमदनगर - भंडारदरा, ओझर, मुळा, कुकडी,][जळगाव - दहीगाव, जमना]

*
औरंगाबाद विभाग - [औरंगाबाद - जायकवाडी][बिड - माजलगाव][परभणी हिंगोली - येलदरी, सिद्धेश्वरी पूर्णा,][नांदेड - मन्याड, विष्णुपुरी][उस्मानाबाद - मांजरा,]

*
अमरावती विभाग - [अमरावती - अप्पर वर्धा, शहानुर,][अकोला वाशिम  - वान, पोपटखेड,महान,अडान][बुलढाणा - जयगाव, नळगंगा, हतनूर, जिगाव, खडकपूर्णा]

*
नागपूर विभाग -  [नागपूर - रामटेक, लोवर वेण्णा, पेंच] [वर्धा - अप्पर वर्धा, लोवर वर्धा,] [भंडारा गोंदिया - बाघ, इटियाडोह, भवानथडी, घोसी,][चंद्रपूर - असोला मेंढा, हुमण,][गडचिरोली - तुलतुली, बाती]

*
कोकण विभाग - [ठाणे - भातसा, सूर्या,वैतरणा,]

महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पाची सद्यस्थिती
महाराष्ट्रात ३० जून २०११ रोजी पूर्ण मोठ्या प्रकल्पाची संख्या ३२ वर आहे. तर प्रगतीपथावर ५४ मोठे प्रकल्प आहेत.मध्यम १८६ प्रकल्प असून ७२ मध्यम प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. राज्य स्तरावरील पूर्ण लघु प्रकल्प २५४९ असून प्रगतीपथावर ५५९ लघु प्रकल्प आहेत. स्थानिक पातळीवरील एकूण लघु प्रकल्प ६३,१४५ तर प्रगतीपथावरील लघु प्रकल्पाची संख्या ६६८१ एवढी आहे.

महाराष्ट्राच्या विविध धरणांच्या जलाशयांची नावे

धरण

जलाशयांची नावे

जायकवाडी

यशवंतसागर

कोयना

शिवाजी सागर

गोसीखुर्द (वैनगंगा)

इंदिरानगर

खडकवासला

बाजीपासलकर सागर

मुसा

हुसेन सागर (आंध्रप्रदेश)

राधानगरी

लक्ष्मीसागर

भंडारदरा (विल्सन डँम)

अर्थर सरोवर

तोतला डोह

मेघदूत जलाशाय

कोटा

राणाप्रताप सागर (राजस्थान)

भाक्रा

गोविंद सागर (हिमाचल प्रदेश)

महाराष्ट्रातील प्रकल्प, नदी व जिल्हा

धरण

नदी

जिल्हा

विर

नीरा

पुणे

पानशेत (तानाजी सागर)

मुठा

पुणे

वज्रचौड

अग्रणी

सांगली

गंगापूर

गोदावरी

नाशिक

मांजरा (निजाम सागर)

मांजरा

बीड

तिल्लारी

तिल्लारी

कोल्हापूर

अप्पर वर्धा

सीमोरा

अमरावती

नळगंगा

नळगंगा

बुलढाणा

सिध्देश्वर

द. पूर्णा

हिंगोली

काटेपुर्णा

काटेपूर्णा

अकोला

मोडकसागर

वैतरणा

ठाणे

खडकवासला

मुठा

पुणे

तेरणा

तेरणा

उस्मानाबाद

बोरी

बोरी

धुळे

धोम

कृष्णा

सातारा

बिंदुसरा

बिंदुसरा

बिड

उर्ध्वपैनगंगा

पेनगंगा

नांदेड, परभणी, यवंतमाळ

तापी प्रकल्प

तापी (मुक्ताई सागर)

हारनुर जळगाव

उजनी

भीमा

सोलापूर

मोर्णा

मोर्णा

अकोला

येलदरी

द.पुर्णा

जिंतुर (परभणी)

विष्णुपुरी

सिंचन योजना

नांदेड (शंकर सागर)

तानसा

तानसा

ठाणे

अप्पर तापी (गिरणा)

तापी

जळगांव

उर्ध्व गोदावरी

गोदावरी

नाशिक

तुळशी

तुळशी

कोल्हापूर

तोतला डोह

पेंच

नागपुर

मुळशी

मुळा

पुणे

बिंदुसरा

बिंदुसरा

बीड

माजलगांव

सिंदफणा

बीड

चाकसमान

इंद्रायणी

पुणे

इटियाडोह

गाढ्वी

गोंदिया

शिवाजी सागर

कोयाना

सातारा

सुर्या

सुर्या

ठाणे

ज्ञानेश्वर सागर

मुळा

अहमदनगर

वारणा

वारणा

कोल्हापूर

मालनगाव

कान

धुळे

काळ

काळ

रायगड

असलमेंढा

पायरी

चंद्रपूर

दारणा

दारणा

नाशिक

निळवंडे

प्रवरा

अहमदनगर

अडाण

अडाण

वाशिम

गोसीखुर्द

वैनगंगा

भंडारा (राष्ट्रीय धरण)

वाघुर

वाघुर

जळगांव

 

No comments

Hindi vyakaran Mock Test

Scholarship Exam 2024 PAPER 1/2 : Hindi अनेकार्थी शब्द Start The Quiz Time's Up score: Next question See Your Result Total Quest...

Powered by Blogger.