हवामान

 महाराष्ट्राच्या हवामानाचे स्वरूप :

* कोकण - कोकणचे हवामान उष्ण, दमट, सम, प्रकारचे आहे. कोकणची सखल किनारपट्टी अरबी समुद्रास अगदी जवळ असल्याने वर्षभर वर्षभर तो प्रदेश फार उष्नही व फार थंडही नसतो.
*
सह्यान्द्री - समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतशी हवा थंड होते. म्हणून सह्यान्द्रीच्या घाटमाथ्यावर उन्हाळ्यत देखील तेथील हवामान थंड असते. हिवाळ्यात मात्र कडाक्याची थंडी असते. म्हणून या भागातील हवामान थंड व आद्र असते.

* महाराष्ट्र पठार - महाराष्ट्राच्या पठारावर उष्ण,विषम,व कोरडे आहे. या भागात मार्च ते मे या काळात बरीच उष्णता असते. म्हणजेच उन्ह्याळातील व हिवाळ्यातील तापमानातच बरीच तफावत असल्याने   पठारावरील हवामान हे विषम आहे.

 
महाराष्ट्रातील ऋतू  :

उन्हाळा
महाराष्ट्रात साधारणपणे उन्हाळा-मार्च ते मे, पावसाळा -जून ते सप्टेम्बर, हिवाळा -  ऑक्टोबर ते फेब्रूअरी, हे तीन मुख्य ऋतू आहेत.२१ मार्च उत्तर गोलार्धात सूर्यकिरणे लंबरूप पडण्यास प्रारंभ होतो तसेच दिनमानाच्या कालही वाढते. महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान सुमारे १६' ते २२' दरम्यान असल्याने या काळात तापमानात वाढत जाते. कोकण किनार पट्टीत अरबी समुद्राच्या सानिध्यामुळे खरे व मतलई वारे यांचा फायदा मिळतो. तर दख्खनचे पठार हे सह्यन्द्री पर्वतामुळे अरबी समुद्रापासून अलग झालेले असते. यामुळे कोकण व पठार यावरील बरीच तफावत आहे. कोकणामध्ये दैनिक कमाल तापमान कक्षा ३०' ते ३३' सें च्या दरम्यान असते. मराठवाड्यात ३० ते ३५ सें तापमान असते. तर विदर्भामध्ये ४२ ते ४३ सें च्या आसपास असते.
पर्जन्य

हिवाळ्यामध्ये वायव्य भारतात तयार झालेल्या जास्त दाबाचा पट्टा सूर्य कर्कवृत्ताकडे  असल्याने हळूहळू दक्षिणेकडे सरकतो. एप्रिल महिन्यात हा जास्त दाबाचा पट्टा भारताच्या दक्षिण भागात असतो. व त्याचा बराचसा प्रदेश सागरावारही असतो. वायव्य भारतात  दाबाचा प्रदेश असतो. परंतु तो अजूनही कमजोरच असतो. दाबाच्या प्रदेशाकडून जास्त दाबाच्या प्रदेशाकडून लागतात. ते एप्रिल व मी महिन्यात   महाराष्ट्रच्याही  भागावरून वाहत जाऊन पाऊस देतात. यावेळेस आंब्याचा बहर असतो. म्हणून या पावसाला आंबेसरी असे म्हणतात.
महाराष्ट्र मान्सूनची संकल्पना
सर्वसाधारणपणे मान्सूनचे आगमन हि अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. उन्हाळ्यात भूभाग व जलभाग तापणे हे मान्सून चे तंत्र आहे. हे भारतीय उपखंडाचे वैशिष्ट्य आहे. सर्वसामान्यपणे महाराष्ट्रात जो पाऊस पडतो. त्यापैकी सुमारे ८५% पाऊस नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून मिळते. पावसाळ्यात चार महिन्याच्या कालावधीत कोकण आणि सह्यन्द्री पर्वतरांगेत भरपूर पाऊस पडतो. त्यामानाने मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस पडतो. महाराष्ट्राच्या पूर्व भागात अजून पावसाचे प्रमाण वाढत जाते. त्याचे कारण विदर्भ हा प्रदेश बंगालच्या उपसागरावरील मान्सून वाऱ्याच्या शाखेत येतो त्या भागात आगस्ट आणि सप्टेंबर या दरम्यान पाऊस पडतो.कोकणात २५० ते ३०० सें मी पाऊस पडतो. घाठ्माठ्यावरील आंबोली येथे सर्वात जास्त म्हणजे ७०७ से मी पूस कोसळतो. तर महाबळेश्वरला ५९४ एवढा पाऊस पडतो. 

माथेरानच्या पठारावर पावसाचे प्रमाण ४९३ से मी आहे. सह्यांद्रीच्या पूर्वेकडे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या भागाकडे ५० ते ६० सें मी पाऊस पडतो. तसेच हा प्रदेश अनिश्चित स्वरूपाचे आहे. म्हणून या भागाला अवर्षणग्रस्त प्रदेश म्हटले जाते. मराठवाड्यात ६० ते ८० सें मी एवढे पर्जन्य आहे. विदर्भात पावसाचे प्रमाण वाढत जाते. विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेस पावसाचे प्रमाण वाढत जाते. पश्चिम विदर्भात ७५ ते ९० सें मी पाऊस पडतो. तर पूर्व विदर्भात ९० ते १५० से मी इतका पाऊस पडतो. विदर्भातील गाविलगडच्या डोंगरात पावसाचे प्रमाण वाढत जाते. तेथील थंड हवेच्या चिखलदरा या ठिकाणी १५० सें मी एवढा पाऊस पडतो.ऑक्टोंबर संक्रमणाचा महिना - या महिन्यात प्रखर सूर्यप्रकाश असतो. आणि हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण भरपूर असल्याने उकाडा अनुभवास येतो.

हिवाळा
मान्सून संपल्यावर वाऱ्याचा काळ संपल्यावर नोवेंबरपासून खऱ्या अर्थाने हिवाळा चालू होतो. हिवाळ्यात सरासरी मासिक तापमानाचा विचार केला तर असे आढळते कि बऱ्याचशा रेषा पश्चिम पूर्व दिशेने असून त्या एकमेकास समांतर आहेत. हिवाळ्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडतो. महाराष्ट्रात हिवाळ्यात संपूर्ण खानदेश, नाशिक जिल्हा, बराचसा अहमदनगर पुण्यातील जुन्नर घोडेगाव,राजगुरुनगर, शिरूर,पुणे,हवेली, तालुके. विदर्भात अमरावती जिल्ह्याच्या धारणी,चिखलदरा, तसेच वरुड नागपूर भंडारा, चंद्रपूर या भागात किमान तापमान १० सें ते १२.५ सें एवढे असते. महाराष्ट्राच्या उर्वरित भागात म्हणजे दक्षिण महाराष्ट्र बऱ्याच प्रमाणात मराठवाडा व पश्चिम विदर्भ व पूर्व विदर्भात नागपूर जिल्ह्याचा दक्षिण भाग वर्धा, गोंदिया, भंडारा,चंद्रपूरच्या उत्तर भागात किमान तापमान १२.५ व १५ सें दरम्यान आहे.

महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्याचे वितरण
जास्त पर्जन्याचा प्रदेश - महाराष्ट्रातील कोकण आणि सह्यान्द्री डोंगरावर आणि डोंगराच्या पायथाचा प्रदेश या भागात ३०० ते ६०० इतका पाऊस पडतो. मध्यम पर्जन्याचा प्रदेश- सह्यान्द्रीच्या भागात, तर नाशिक,पुणे,सातारा,सांगली, या जिल्ह्याचा पश्चिम भाग गोंदिया, गडचिरोली, या भागात ३०० ते २०० से मी पाऊस पडतो. मध्यम ते कमी पर्जन्याचा प्रदेश - चन्द्रपूर, यवतमाळ,वर्धा, या भागात मध्यम पर्जन्य पडते. तर मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि सोलापूर, अहमदनगर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्याचा भागात  तसेच पश्चिम विदर्भातील सर्व जिल्हे या भागात कमी पर्जन्य होते.

महाराष्ट्रातील जालवायुमान:

महाराष्ट्र राज्य २२° उ. अक्षवृत्ताच्या दक्षिणेस असल्यामुळे राज्यात उष्ण कटिबंधीय जलवायुमान प्रत्ययास येते. सह्याद्रीच्या रांगा पश्चिम किनारपट्टीला जवळजवळ समांतर असल्यामुळे कोकणपट्टीतील सिंधुदुर्गरत्नागिरीरायगड व ठाणे जिल्हे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांपासून विलग झाले आहेत. महाराष्ट्रातील सह्याद्रीची सरासरी उंची सु. १,००० मी. आहे. त्याच्या रांगा पश्चिम-पूर्व दिशेत सु. ८०० किमी. रूंदीचे क्षेत्र व्यापितात. नैर्ऋत्य मॉन्सून वाऱ्यांना आडव्या दिशेत असल्यामुळे सह्याद्रीच्या रांगा म्हणजे भिन्न प्रकारांचे जलवायुमान विभागणाऱ्या सीमारेषाच होत. परिणामी सह्याद्रीच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्हीही बाजूंवरील वातावरणवैज्ञानिक परिस्थिती अगदी भिन्न प्रकारची असते. सह्याद्रीच्या पश्चिमेकडील वाताभिमुख बाजूला (कोकणपट्टीत व सह्याद्रीच्या पश्चिम उतरणीवर) खूपच पाऊस पडतो. पर्वतमाथ्यावर अधिकतम पाऊस पडतोतर सह्याद्रीलगतच्या पूर्वेकडील भागांत पावसाचे प्रमाण १/१० पेक्षाही कमी होते. पश्चिम किनारपट्टीवर विपुल पाऊस पडत असलातरी बहुतेक पाणी ओहोळानाल्यांनी अरबी समुद्रात जातेतर गोदावरीभीमा व कृष्णा ह्यांसारख्या पूर्ववाहिनी नद्यांमुळे पूर्व महाराष्ट्रातील कृषी व उद्योगांना पुरेल इतके पाणी मिळते. महाराष्ट्राच्या जलवायुमानाचे तीन मुख्य विभाग करता येतात. 

नैर्ऋत्य मॉन्सूनचा विभाग : या विभागात साधारणपणे १०० सेंमी. पेक्षाही अधिक पाऊस पडतो आणि त्यात किनारपट्टीलगतचे सिंधुदुर्गरत्नागिरीरायगड व ठाणे हे जिल्हे आणि पुणेसाताराकोल्हापूर जिल्ह्यांचे पश्चिमेकडील डोंगराळ भाग मोडतात. किनारपट्टीवरील भागात वार्षिक तापमानातील फरक ५° से. पेक्षा क्वचितच अधिक असतोसरासरी दैनिक तापमान २२° से. पेक्षा क्वचितच खाली येते. हवेची माध्य सापेक्ष आर्द्रता नेहमीच ५० टक्क्यांपेक्षा अधिक असते. हवा सदोदित उष्णार्द्र अवस्थेत असते आणि नैर्ऋत्य मॉन्सूनच्या कालखंडात लक्षणीय प्रमाणात वृष्टी होते. ह्या जलवायुमानीय विभागाच्या उरलेल्या डोंगराळ भागात हिवाळ्यात सापेक्ष आर्द्रता थोडी कमी होतेतथापि वर्षातील आठ महिने ती ५० टक्क्यांपेक्षा अधिकच असते. दैनिक तापमान २२° से. पेक्षा कमी झालेतरी ते १८° से. च्या वरच असते. 

शुष्क जलवायुमानाचा विभाग : या विभागात जळगावनाशिकऔरंगाबादपुणेबीडसाताराकोल्हापूरलातूर आणि उस्मानाबाद ह्या जिल्ह्यांतील अर्धशुष्क भाग आणि संपूर्ण धुळेअहमदनगरसोलापूर आणि सांगली जिल्हे मोडतात. येथे सबंध वर्षातून माध्य दैनिक तापमान १८° से. पेक्षा अधिकच असते. हिवाळ्यात ते २२ से. च्या खाली जातेतर इतर आठ महिन्यांत ते २२से.च्या वरच असते. वार्षिक पर्जन्य फक्त ६० ते ८० सेंमी. असतो. बहुतेक वृष्टी नैर्ऋत्य मॉन्सूनच्या कालखंडात होते. संबंध वर्षातून सरासरी दैनिक सापेक्ष आर्द्रता ५० टक्क्यांपेक्षा कमीच असते. या विभागाच्या मध्यवर्ती क्षेत्रात उन्हाळ्याच्या दोन किंवा तीन महिन्यांत अनेकदा ती ३० टक्क्यांच्या खाली जाते. 

पावसाळी जलवायुमानाचा विभाग : या विभागात नाशिकजळगाव जिल्ह्याचे उर्वरित भागऔरंगाबादबीडलातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांचे पूर्वेकडील भागमराठवाड्यातील उरलेले परभणी व नांदेड जिल्हे आणि विदर्भाचे अकोलाअमरावतीयवतमाळ,बुलढाणाभंडाराचंद्रपूरगडचिरोलीनागपूर व वर्धा हे जिल्हे येतात. ह्या विभागात ७० सेंमी. इतकी पर्जन्यवृष्टी होते. ती बहुतेक नैर्ऋत्य मॉन्सूनच्या कालावधीत होते. सरासरी वार्षिक सापेक्ष आर्द्रता ५० टक्क्यांपेक्षा कमी होते. संबंध वर्षाचे माध्य दैनिक तापमान १८से. पेक्षा अधिक असलेतरी हिवाळ्यात ते २२से. पेक्षा खाली जाते आणि वर्षाच्या इतर आठ महिन्यांत ते २२से. पेक्षा अधिक असते. 

वारे : महाराष्ट्रात हिवाळ्यात पृष्ठभागीय वारे उत्तर किंवा ईशान्येकडून तर वर्षा ऋतूत ते पश्चिम किंवा नैऋत्येकडून येऊन पूर्वेकडे जातात. पावसाळा सोडून इतर आठ महिन्यांत किनारपट्टीवरील भागात दुपारी व रात्री खारे आणि मतलई वारे वाहतात. पावसाळ्यातील पृष्ठभागीय पश्चिमी वारे अधिक वेगवान असतात. पावसाळ्याचा शेवट व हिवाळ्याचा प्रारंभ साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात येतो. ह्या संक्रमण कालावधीत पृष्ठभागीय वारे दुर्बल होतात. ते उत्तरेकडून दक्षिणेकडे जातात. महाराष्ट्रावरील वातावरणीय दाब हिवाळ्यात अधिकतम असतो. 

तापमान : महाराष्ट्रात मे महिन्यात उच्चतम तापमान अनुभवास येते. या महिन्यात सरासरी दैनिक उच्चतम तापमान किनारपट्टीवरील भागात ३३° से. इतके असते. पूर्वेकडे ते ३८° से. पासून ४३° पर्यंत वाढत जाते. विदर्भ आणि पूर्व खानदेशाच्या सखल प्रदेशांत अतितीव्र उन्हाळी परिस्थिती जाणवते. मे महिन्यात ह्या विस्तृत क्षेत्रांत अनेक ठिकाणी अनेक दिवशी ४२° ते ४३° से. सारखे उच्चतम तापमान ४५° ते ४७° से. पर्यंत जाते. पावसाळा सुरू झाल्यानंतर उच्चतम तापमान कोकणात ३.° से.नी व इतरत्र १०° ते १२° से. नी कमी होते. पावसाळयानंतर ऑक्टोबरात दैनिक उच्चतम तापमान सर्वत्र वाढू लागते. वातावरण शुष्क व तत्पतर होते. या कालावधीला विश्वामित्राचा उन्हाळा’ (ऑक्टोबर हीट) म्हणतात. पावसाळ्यानंतर वातावरणीय दाबही वाढत जातो व जानेवारीत तो अधिकतम होतो. 

हिवाळ्यात उत्तर भारतात अभिसारी चक्रवात पश्चिमेकडून पूर्वेकडे निघून जातात व हिवाळी पिकांना उपयुक्त पाऊस पडतो. या चक्रवातांमागून समशीतोष्ण व उपध्रुवीय अक्षवृत्तांतील शुष्क व अतिशीत वायुराशी उत्तर भारतात आपला अंमल गाजवतात. ह्या वायुराशींमुळे भारतात तीव्र थंडीच्या लाटा निर्माण होतात. उत्तर मध्य महाराष्ट्रालाही त्याची झळ पोहोचते. उद्यानेपिके व फळबागांची तीव्र थंडीमुळे खूप हानी होते. कोकणात जानेवारीत १९° से. इतके कमी तापमान असते. महाराष्ट्राच्या पूर्व भागात डिसेंबरात कडक थंडी असते. हिवाळ्यात अनेक दिवशी नीचतम तापमान १३° ते १४° से. किंवा त्यापेक्षाही कमी असते. महाराष्ट्रात - ०.° से. सारखे नीचतम तापमान मालेगावला १ फेब्रुवारी १९२९ रोजी तर ४८.° से. सारखे उच्चतम तापमान चंद्रपूरला १६ मे १९१२ रोजी नोंदले गेले आहे.  

 

सापेक्ष आर्द्रता : किनारपट्टीवरील भागात जून ते ऑक्टोबर महिन्यात ८० टक्क्यांइतकी सापेक्ष आर्द्रता असतेहिवाळ्यात ती ६० टक्क्यांपर्यंत खाली येते. महाराष्ट्राच्या अंतर्गत विभागात फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यांत अनेकदा दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ टक्के असते. एप्रिलनंतर व नैर्ऋत्य मॉन्सूनच्या काळात सापेक्ष आर्द्रतेत लक्षणीय वाढ होते. त्याच प्रमाणात अस्वस्थताही वाढू लागते. ऑक्टोबरनंतर सुखद हवामानाचे दिवस येऊ लागतात. हिवाळा सोडून इतर ऋतूंत डोंगराळ प्रदेशात दुपारी सापेक्ष आर्द्रतेत वाढ होतेइतरत्र दुपारी तीत घट होते. कोकणात सह्याद्रीच्या पश्चिमेकडील भागात पावसाळ्यात प्रतिमासी १० ते १२ दिवस आकाश संपूर्णपणे ढगाळलेले असते. खंडांतर्गत भागात पावसाळयात प्रतिमासी ६ ते ८ दिवस आकाश संपूर्णतया मेघव्याप्त व १ ते ४ दिवस सकाळी आकाश अगदी निरभ्र असते. वाऱ्यांचा वेग वाताभिमुख बाजूला अधिक असतो. डोंगर माथ्यावर पावसाळ्यात प्रतिमासी २२ दिवस आकाश संपूर्णतया मेघव्याप्त असते. सप्टेंबर महिन्यापर्यंत अनेक ठिकाणी मेघव्याप्तीचे प्रमाण अधिकच असते. 

पर्जन्य व दुष्का  : महाराष्ट्रात पर्जन्याचे वितरण अत्यंत विषम आहे. पाऊस मुख्यत्वेकरून जून ते सप्टेंबर या नैर्ऋत्य मॉन्सूनच्या कालावधीत पडतो. नैर्ऋत्य मॉन्सूनच्या वाऱ्यामुळे पडणाऱ्या पावसाचे क्षेत्र दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकते. १० जूनपर्यंत ते मुंबईपर्यंत येते व १२ जूनपर्यंत ते महाराष्ट्राची उत्तर सीमा गाठते. प्रत्येक ठिकाणी पावसाळ्याचा प्रारंभ गडगडाटी वादळांनी होतो. १२ सप्टेंबरनंतर नैर्ऋत्य मॉन्सूनचे निर्गमन सुरू होते. निर्गमनाच्या वेळीही गडगडाटी वादळे व अतिवृष्टी प्रत्ययास येते. १ ऑक्टोबरनंतर मॉन्सून सीमापृष्ठ महाराष्ट्राबाहेर जाते. 

            सह्याद्रीच्या वाताभिमुख बाजूच्या डोंगरात वर्षातून ६०० सेंमी. पेक्षा अधिककिनारपट्टीवर २०० सेंमी. पेक्षा अधिकतर मध्य महाराष्ट्रात ५० सेंमी. पेक्षा कमी अशा विषम प्रमाणात पाऊस पडतो. दौंडबारामतीइंदापूर-म्हसवड भागात ५० सेंमी. पेक्षा अतिशय कमी पाऊस पडतो. साधारणपणे सह्याद्रीच्या वातिभिमुख बाजूला जुलै तर वाताबिमुख बाजूला अहमदनगरऔरंगाबादबीड आणि सोलापूर जिल्ह्यांत सप्टेंबर महिना अधिकतम पावसाचा असतो. सह्याद्रीच्या पश्चिमेस व डोंगरमाथ्यावर २४ तासांत २.५ मिमी. पेक्षा अधिक पाऊस पडणारे दिवस ७५१०० असतात. सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागात फक्त ३५ दिवस लक्षणीय पाऊस पडतो. सह्यपर्वतरांगांपासून पूर्वेकडे थोड्याशा अंतरावर पर्जन्य १/१० पेक्षाही कमी झालेला आढळतो. यानंतर पूर्वेकडे पर्जन्याचे प्रमाण वाढत जाते. मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात अशा परिस्थितीमुळे अल्पतम पाऊस पडतो. 

कोकणविदर्भमध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांतील वार्षिक पर्जन्य अनुक्रमे २६०.७३ सेंमी.१०९.१९ सेंमी.८८.७१ सेंमी. आणि ८२.८० सेंमी. असा आहे. सबंध वर्षातून २४ तासांत २.५ मिमी. पेक्षा अधिक पर्जन्याचे दिवस काकणात ८८.विदर्भात ५४.,मध्य महाराष्ट्रात ४८ व मराठवाड्यात ४५.७ असतात. नैर्ऋत्य मॉन्सुनच्या कालावधीत एकंदर वार्षिक पर्जन्याच्या ९४ टक्के पाऊस कोकणात८७ टक्के विदर्भात आणि ८३ टक्के मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात पडतो. मध्य महाराष्ट्रात व मराठवाडा या भागांत नैर्ऋत्य मॉन्सूननंतर ११ टक्के पाऊस पडतो व आर्थिक दृष्ट्या हा महत्त्वपूर्ण व उपयुक्त असतो. महाराष्ट्रात २४ तासांत ६५.७३ सेंमी. सारखी विक्रमी वृष्टी २४ जुलै १९२१ रोजी माथेरानला झाली. 

सह्याद्रीच्या पूर्वेच्या वातविमुख बाजूच्या प्रदेशांवर अत्यल्प पाऊस पडतो त्यामुळे सह्याद्रीच्या पूर्वेला विस्तीर्ण दक्षिणोत्तर अवर्षणप्रवण पर्जन्यच्छाया प्रदेश निर्माण झाला आहे. त्यातील अनेक ठिकाणीवर्षातून ५० सेंमी. पेक्षाही कमी पाऊस पडतो. या क्षेत्रातच अनेकदा दुष्काळ पडतो. ज्या वर्षी पाऊस सरासरीच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी असतोते वर्ष दुष्काळी समजण्यात येते. मध्यम स्वरूपाच्या दुष्काळात वार्षिक पर्जन्य सरासरीच्या ५० ते ७५ टक्के असतोतर तीव्र दुष्काळात पाऊस सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी असतो. १९०१ ते १९५० च्या कालावधीत मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याने १३ वर्षेअहमदनगरजळगाव आणि सांगली जिल्ह्यांनी १० वर्षेतर महाराष्ट्रतील इतर जिल्ह्यांनी ३ ते ७ वर्षे दुष्काळ अनुभविला. कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात ३ ते ६ वर्षे साधा दुष्काळ पडला. कोकणात तीव्र स्वरुपाचा दुष्काळ शतकातून फक्त एकदाच पडू शकतो. मराठवाड्याच्या परभणी आणि बीड जिल्ह्यांनी अनुक्रमे १४ व १३ वर्षे तर इतर जिल्ह्यांनी ६ ते ७ वर्षे दुष्काळ अनुभविला आहे. बीड जिल्ह्यांत १९१२१९२०१९३७ व १९३९ या साली आणि औरंगाबाद जिल्ह्यात १९०५ व १९२० साली अतितीव्र दुष्काळ पडला होता. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात ५ ते ७ वर्षे दुष्काळग्रस्त अशी गेली अकोलाअमरावतीयवतमाळभंडारा व वर्धा या जिल्ह्यांत फक्त एकदाच तीव्र स्वरूपाचा दुष्काळ पडला होता. दरवर्षी महाराष्ट्रात सर्वत्र वार्षिक पर्जन्याचे प्रमाण बदलत असते. स्थूलमानाने साधा दुष्काळ (सरासरी वार्षिक पर्जन्यपेक्षा २५ टक्क्यांहून कमी पाऊस असलेली वर्षे) कोकणात १० वर्षातून एकदामध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात ५ वर्षातून एकदातर विदर्भात ६-७ वर्षातून एकदा पडतो. तीव्र स्वरूपाचा दुष्काळ (सरासरी वार्षिक पर्जन्यापेक्षा ५० टक्क्यांहून कमी पाऊस असलेले वर्ष) कोकणात १०० वर्षातून एकदामध्य महाराष्ट्रात २० वर्षातून एकदामराठवाड्यात २५ वर्षातून एकदातर विदर्भात ५० वर्षातून एकदा प्रत्ययास येतो. तथापि दरवर्षी कोणत्या ना कोणत्या तरी एकदोन जिल्ह्यांत वर्षणाच्या विषम वितरणामुळे दुष्काळ उद्भवतो. 

ज्या वर्षी पाऊस सरासरी वार्षिक पर्जन्यपेक्षा १२५ टक्क्यांहून अधिक असतो ते वर्ष पर्जन्याधिक्याचे समजण्यात येते. १९०१ ते १९५० च्या कालावधीत कोकणातील बृहन् मुंबईत ५ वर्षे व इतर जिल्ह्यांत २ ते ४ वर्षेमध्य महाराष्ट्रातील जळगावसोलापूर जिल्ह्यांत ९ वर्षेअहमदनगरनाशिकसांगलीसातारा जिल्ह्यांत ६ वर्षकोल्हापूरपुणे जिल्ह्यांत २ वर्षे व धुळे जिल्ह्यात ४ वर्षे अधिक प्रमाणात पाऊस पडला. मराठवाड्यातील नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत २-३ वर्षेतर इतर जिल्ह्यांत ४-५ वर्षे अधिक पाऊस झाला. विदर्भातील अकोलाबुलढाणायवतमाळनागपूरवर्धा जिल्ह्यांत ७ ते ९ वर्षे तर विदर्भातील इतर जिल्ह्यांत ३ ते ५ वर्षे अधिक प्रमाणात पाऊस पडला. 

 चक्री वादळे : पावसाळ्याच्या आरंभी आणि नंतर अरबी समुद्रात उग्र चक्री वादळे निर्माण होतात. ती महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर विक्रमी पाऊस पाडतात. त्यामुळे वेगवान वारेवादळी भरतीच्या लाटा व महापूर उद्भवतातकृषियोग्य जमिनी लवणयुक्त व निकामी होतातजलवाहतुकीत व्यत्यय येतोमासेमारीत अडचणी निर्माण होतातइमारतींची पडझड होते. अशी उग्र चक्रीवादळे अरबी समुद्रात वर्षातून एकदा किंवा दोनदा तरी निर्माण होतात. पावसाळ्यात बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात महिन्यातून तीन ते चार मॉन्सून अभिसारी चक्रवात’ निर्माण होतात व साधारणपणे ते उत्तर राजस्थान किंवा पंजाबच्या दिशेने जातात आणि मार्गात आलेल्या प्रदेशांवर (उदा.विदर्भ) विपुल प्रमाणात पाऊस पाडतात. या चक्रवातांच्या प्रभावाने भारतीय किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या पश्चिम भागावरही पावसाचे प्रमाण वाढते. सह्याद्रीच्या वाताभिमुख बाजूला वाढत्या उंचीप्रमाणे पर्जन्यात वृद्धी होते. आधुनिक संशोधनांतीसह्याद्रीच्या परिसरातदर १०० मीटर उंचीला पर्जन्यात ४२ सेंमी. वृद्धी होतेअसे आढळून आले आहे. 

 गडगडाटी वादळचंडवात इत्यादी : नैर्ऋत्य मॉन्सूनपूर्व व नैर्ऋत्य मॉन्सूनोत्तर काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गडगडाटी वादळे होतात. पावसाळा प्रस्थापित झाल्यानंतर गडगडाटी वादळांची संख्या लक्षणीय प्रमाणात घटते. महाराष्ट्रात गडगडाटी वादळांच्या दिवसांचे प्रमाण कोकणात १६.मध्य महाराष्ट्रात १९.मराठवाड्यात ३०.४ व विदर्भात २९.८ असे आहे. नैर्ऋत्य मॉन्सूनपूर्व काळात खंडांतर्गत भागात वर्षातून एक किंवा दोन गडगडाटी वादळांबरोबर गारांचा वर्षावही होतो. गारांचा पाऊस पश्चिम किनारपट्टीवर व कोकणात हुधा पडतच नाही. महाराष्ट्रात चंडवातांचे प्रमाण कमीच असते. नैर्ऋत्य मॉन्सूनपूर्व काळात खंडांतर्गत भागांत काही चंडवातांचे आविष्कार जाणवतात. एप्रिल-मे महिन्यांत व जून महिन्याच्या प्रारंभी खंडांतर्गत भागातविशेषतः विदर्भातवर्षातून एक किंवा दोन धूलिवादळे संभवतात. 

 धुके : डोंगराळ क्षेत्रे सोडली तर महाराष्ट्रात धुक्याचे प्रमाणही कमीच असते. डोंगराळ प्रदेशांत जुलै ते सप्टेंबर या महिन्यांत अनेक दिवशी दाट धुके पडलेले आढळते. नैर्ऋत्य मॉन्सूनचे निर्गमन झाल्यानंतरच्या काळात आणि नोव्हेंबर ते मार्च महिन्यांत मध्य महाराष्ट्रात अनेक दिवस आणि इतर ठिकाणच्या डोंगराळ क्षेत्रांत काही दिवस धुके पडते. हिवाळ्यातील पश्चिमी अभिसारी चक्रवात पू र्वेकडे निघून गेल्यानंतर त्यांच्यामागून येणाऱ्या शीत-शुष्कतम हवेच्या प्रभावामुळे उत्तर महाराष्ट्रात कधी कधी विस्तृत क्षेत्रावर कडक थंडीच्या लाटा येतात व सकाळी दाट धुके पडते.  

महाराष्ट्राचे हवामानविषयी इतर माहिती

·         महाराष्ट्राचा हवामान प्रकार – उष्णकटिबंधीय मोसमी

·         महाराष्ट्रातील पर्जन्य – नैऋत्य मोसमी वा-यांपासून प्रतिरोध पर्जन्य पडतो.

·         कोकणातील पर्जन्याची वार्षिक सरासरी – २५०० ते ३५०० मिमी.

·         महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण ७२०० मिमी. अंबोली, सिंधुदुर्ग

·         कोकणात उन्हाळ्यात पडणारा पाऊस – आंबेसरी

·         पर्जन्यछायेच्या प्रदेशात येणारे जिल्हे – सोलापूर, अहमदनगर

·         अवर्षण ग्रस्त भागात पर्जन्यमान – ५०० मिमीहून कमी

·         महाराष्ट्रातील ऋतु संक्रमणाचा महिना ऑक्टोबर

·         महाराष्ट्रातील सर्वाधिक थंडीची नोंद झालेली ठिकाणे – ०.६ मालेगांव (१९०२), देवळाली (१९६०)

·         वर्षभर सम व दमट हवामान आढळणारा विभाग कोकण

·         सर्वाधिक तापमान कक्षा – नागपूर (१९ )

महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाचे जिल्हे : चंद्रपूर ,वर्धा , नागपूर ,जळगाव ,इत्यादी.     

No comments

Hindi vyakaran Mock Test

Scholarship Exam 2024 PAPER 1/2 : Hindi अनेकार्थी शब्द Start The Quiz Time's Up score: Next question See Your Result Total Quest...

Powered by Blogger.